मोबाईल वॉलेट/ इवॉलेट अनुभव, शंका निरसन

Submitted by अश्विनीमामी on 22 November, 2016 - 23:32

पेटिएम, स्टेट बँक बडी, पे झॅप आणि इतर मोबाईल कॅश वॅलेट उपलब्ध आहेत. आता हातात कॅश नाही पण रोजचे व्यवहार तर चालवायचे आहेत. आपण कोणी ही अ‍ॅप्स वापरता का? काय अनुभव तसेच नवीन वापर कर्त्यांचे शंका निरसन व्हावे ह्या साठी धागा प्रपंच.

मी अजून एक ही अ‍ॅप डाउ न लोड केलेले नाही. बिग बास्केट, व उबर आहे. त्याला हे चालते असे ऐकले
ओला मनी

सिट्रस वॅलेट , मोबि क्विक, एअर्टेल मनी, पेयू मनी, चिल्लर, ऑक्सिजन, वॉलेट हे पर्याय अ‍ॅड केले.

बिल पे हा पर्याय वापरून नेट बँकिन्ग द्वारा खालील बिले भरता येतील.
१) प्री व पोस्ट पेड टेलिफोन बिल्ल्स.
२) डीटीएच चा रीचार्ज
३) वीज बिले
४) इतर बँकांची क्रेडिट कार्ड ची पेमेंट
५ ) विम्याचे हप्ते.

अ‍ॅपस ची नावे धाग्यात मुद्दाम लिहीलेली नाहीत कारण एका दुसृया ब्रँडचे प्रमोशन नाही आहे. तर एकूण संकल्पनाच नवी आहे. खूप लोक्स धडपड करत आहेत त्यांना माहिती मिळावी. सिनीअर सिटिझन्स ना पण ह्याचा उपयोग होईल. कृपया आपल्या आईबाबांना ही कल्पना समजावून सांगा. व स्मार्ट फोन वर अ‍ॅप डाउनलोड करून द्या. त्यांचे रांगेत उभे राहणे वाचेल.
कमीत कमी १० रु. पासून तुम्ही हे इ पाकीट लोड करू शकता. व आपल्या घरच्यांना मित्र मैत्रिणींना पण ही सुविधा उपलब्ध करून देउ शकता. ( अ‍ॅड ऑन कार्ड सारखे. ) आधीच लोड केलेले प्री लोडेड असल्याने इथे तुम्ही लिमिट मध्ये असाल तर ट्रांझॅक्षन नाकारले जात नाही. सद्य परिस्थितीत आर बी आय ने इपाकिटाची लिमीट २०००० रु. केली आहे. व केवाय सी नोंदी करून हीच लिमिट एक लाख रुपये आहे. ह्यातून फार मोठ्या पर्चेसेस अभिप्रेत नाहीत तर रोजच्या जीवनातील ट्रँझाक्षन्स सोपी करणे हा उद्देश आहे.
तुम्ही म्हणजे ग्राहक २०००० रु लोड करू शकता. दुसृया बाजूला जो व्हेंडर आहे तो ५०. ००० रु. बँकेत भरू शकतो. छोट्या व्यापार्‍याला हे फायद्याचे आहे. ही परि स्थिती अजून सुधारण्यासाठी छोट्या व्यापारी वर्गाचे, सर्विस प्रोवायडरचे मत बदलणे गरजेचे आहे. नथिंग लाइक कोल्ड कॅश. ही सुरक्षिततेची भावना आमच्या पिढीत तरी होती पण आता पैसे बँकेत. व्यवहार मोबाईल वरून. खिसा रिक्कामा ही परिस्थिती कॉमन होत जाईल.

http://gadgets.ndtv.com/apps/news/demonetisation-rbi-doubles-monthly-lim...

http://economictimes.indiatimes.com/wealth/spend/facing-cash-crunch-afte...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पेटीएम तुमचे कार्ड लिंक करताना १ रु. भरुन घेते तो १ रुपया जर भरला गेला असेल तर पुढचे पैसे भरले जायला हवेत.

How do I get started with UPI?
It's really simple - all you have to do is download one of the 21 UPI apps from the Google Play store that supports the UPI. The full list of banks is here: Andhra Bank, Axis Bank, Bank of Maharashtra, Bhartiya Mahila Bank, Canara Bank, Catholic Syrian Bank, DCB Bank, Federal Bank, ICICI Bank, TJSB Sahakari Bank, Oriental Bank of Commerce, Karnataka Bank, UCO Bank, Union Bank of India, United Bank of India, Punjab National Bank, South Indian Bank, Vijaya Bank and YES Bank.
Others such as Bank of Baroda, HDFC, and State Bank of India are coming soon on the UPI. Once you download the UPI app, you need to verify your phone number, and then link your bank account to the app. Once you've confirmed your bank details, you're good to go and can start using the UPI app to send or receive money.

http://gadgets.ndtv.com/apps/features/what-is-upi-the-apps-charges-and-e...

UPI सुविधा चालू झाली का ? बडी ला चार्जेस आहेत का ? बडी डालो केलंय पण वापरलं नाही अजून.
नवे कार्ड रीडर आलेय. वर्षाला पाच हजार घेतात. कॅल्सी च्या आकाराचे आहे. मोबाईलला पण जोडता येते. वायफाय कनेक्तिव्हिटी आहे. ही मशीन्स सरकारने फ्री मधे दिलीत तर कॅशलेस होता येईल.

घरची धुण्याभांड्याची बाई /दूधवाला/ भाजीवाला या सगळ्यांचे पैसे ऑनलाईन ट्रान्स्फर केले त्यांच्या त्यांच्या खात्यात . सोसायटीचा मेंटेनन्स पुढच्या महिन्या पासून ऑनलाईन भरणार आहे सोसायटीने नोटीस फिरवली आहे त्यांच्या खात्यात मेंटेनन्स भरावे अशी . ज्यांना चेक द्यायचा असेल त्यांनी चेक ने दिले तरी चालेल . इलेट्रीसिटी आणि महानगर ग्यास च बिल आधीपासून ऑनलाईन भरते आहेच . वाणी /केमिस्ट ने ऑनलाईन पैसे भरले तरी चालतील असे सांगितले आहे . पुढल्या वेळेपासून जरूर पडली तर वाण्याचं महिन्याभराचं बिल ऑनलाईन देईनच . केमिस्टचेही देईन Happy

पेटीएम तुमचे कार्ड लिंक करताना १ रु. भरुन घेते तो १ रुपया जर भरला गेला असेल तर पुढचे पैसे भरले जायला हवेत.

>> नाही.. हा १ रुपयाही भरला गेला नाही.

आज एका दुकानदाराला विचारलं तर त्याने सांगितलं की पेटीएम बँक वापरलं तर ४% किंवा इतर काहि चार्जेस लागत नाही बहुतेक क्रेडीट्/डेबीट कार्ड वापरले तरच चार्जेस लागतील. कुणाचा अनुभव असेल तर कळवा. इथे नागपुरात अनेक ठीकाणी पेटीएमचे बोर्ड लागले आहे.

As per Paytm website, जर KYC केले असेल तर ३१ डिसेंबर पर्यन्त छोट्या दुकानदाराला पेटीम टु बँक फुकट आहे. KYC केले नसेल तर १% लागेल. त्यानंतर १% with KYC / 4% without KYC लागतिल असे कुठेतरी वाचले आहे, नक्की माहित नाही.

जर दुकानदारानी website/app वरुन Paytm ची सुविधा दिली (जशी tatasky सारख्या कंपन्या केबल चे बिल भरण्यासाठी देतात), तर Paytm त्याना १.९९% चार्ज लावते. ह्या १.९९% वर सरकार १५% सर्विस टॅक्स लावते ( १.९९% च्या १५% म्हणजे ०.३% होतात) आणि ९७.७१% पैसे हातात येतात.

भारत सरकार द्वारा यु पी आय ची जाहिरात जारी झालेय आणखीन यु ट्यूब वर चिक्कार छोट्या क्लिप्स आल्येत. यु पी आय पेमेंट सिस्टिम मध्ये एक पैसा हि कमिशन कट होत नाही असं सांगितलं जातंय Happy

पेटिम पासवर्ड रिसेट कसा करायचा?
OLA app मधून पेटिम option वर सहज क्लिक केलं तर अ‍ॅपने direct पेटिएम अकाऊंट createच केलं . मग पेटिएम अ‍ॅप download केलं. त्यावर हा फोन नंबर आधीच रजिस्टर्ड आहे असा मेसेज आला. Uhoh
फोन नंबर आधीच रजिस्टर्ड कसा काय ते कळालं नाही.
त्यावर forgot password वर क्लिक केलं की टेक्निकल एररचा मेसेज येत आहे. आता पासवर्ड रिसेट कसा करू?

त्या paytm मध्ये काही balance नसेल तर reinstall करा.

मोबाईल बँकिंग वापरत असाल तर upi वापरायला लागा. बाकी ओला, airtel, बिगबास्केट जिथ उपलब्ध आहेत तिथे त्या विक्रेत्यांचे वॉलेट वापरा. नाहीतर तुमच्या बँकेचे वॉलेट वापरा.

याहूचे १ अब्ज हून अधिक लोकांचे पासवर्ड आणि व्यक्तिगत माहीती हॅक झाली. >>> याहुच्या बाबतीत याआधी पण असे झाले आहे ना?

http://www.loksatta.com/desh-videsh-news/paytm-says-48-customers-does-fr...
मोबाईल वॉलेट कंपनी पेटीएमला ६ लाखांचा गंडा घालण्यात आला आहे. ४८ ग्राहकांनी ६ लाखांची फसवणूक केल्याची तक्रार पेटीएमने सीबीआयकडे नोंदवली आहे. मागील काही दिवसांपासून पेटीएमच्या सर्व्हरमध्ये अनेक अडचणी येत आहेत. नोटाबंदीच्या निर्णयानंतर देशभरातील लाखो लोक पेटीएम सेवेचा लाभ घेत आहेत. सध्या पेटीएमकडून सर्व्हर दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. मात्र यासाठी नेमका किती कालावधी लागेल, हे पेटीएमकडून स्पष्ट करण्यात आलेले नाही. याशिवाय सर्व्हरमधील बिघाडाचे कारणदेखील पेटीएमकडून सांगण्यात आलेले नाही.
‘जगभरातील बहुतांश बँकिंग अॅप आणि ई-वॉलेट अॅप हार्डवेअर सुरक्षेचा वापर करत नाहीत. हे अॅप पूर्णपणे एँड्रॉईड मोडवर चालतात. त्यामुळे वापरकर्त्यांचे पासवर्ड अतिशय सहजपणे मिळवले जाऊ शकतात. याशिवाय वापरकर्त्यांच्या हातांचे ठसेदेखील सहजपणे मिळवता येतात. भारतातील डिजीटल वॉलेट्स आणि मोबाईल बँकिंग अॅपसाठी हा अतिशय चिंतेचा विषय आहे,’ असे क्वॉलकॉमचे वरिष्ठ संचालक उत्पादन व्यवस्थापकांनी सांगितले आहे.

बाकी भक्तांना चायनीज पेटीम कसे काय चालते ? कमाल आहे !!

पेटीएमने सीबीआयकडे नोंदवली आहे.

<<

पेटीएमच्या घरी झालेल्या चोरीची चौकशी सीबीआयने करायचा काय संबंध? अशी मला उठून सीबीआयकडे तक्रार करता येते का?

की साहेबांचा फोटू जाहिरातीत लावल्यानंतर पेटीएम आता हिंदूस्थान सरकारचं अंडरटेकिंग झालंय?

हे घ्या इलेक्ट्रॉनिक पेमेंटचे साईड इफेक्ट्स : सरकारी रुपे कार्डाने ५०० रुपयापाठी, मेट्रो पासवर किती सरचार्ज चोरलाय ते पहा.

करा राष्ट्रभक्ती लोकहो!

fe18e6d9-3339-4197-9b84-5cda006881df.jpg

भीम हे अ‍ॅप्लिकेशन अवघ्या २४ तासात लोड वाढल्याने सर्वर डाऊन झाले. पण प्रश्न हा नाही आहे...

प्रश्न हा आहे की जेव्हा ताणाचा अंदाज घेऊन बनवण्यात आलेले सरकारी अ‍ॅप्लिकेशनचे सर्वर डाऊन होऊ शकते.
तर खाजगी कंपनीचे अ‍ॅप्लिकेशन अचानक आलेल्या ताणामुळे का बंद पडले नाही.?? पेटीएम चे सर्वर ८ नोव्हेंबर नंतर आलेल्या अचानक १५००% अधिक ताणामुळे अजिबात बंद पडले नाही. जेव्हा मार्केट मधे अशा प्रकारचे ते एकमेव अ‍ॅप्लिकेशन होते. परंतू नोटबंदीच्या ५० दिवसामधे तसे बरेच अ‍ॅप्लिकेशन्स लाँच झाले. एका अ‍ॅप्लिकेशन वर येणारा ताण सुध्दा बर्‍याच प्रमाणात कमी झाला. लोक किती ऑनलाईन ट्रांस्फर करतात किती वापर होतो. याचा संपुर्ण डाटा या ५० दिवसात उपलब्ध होता. याचा वापर भीम अ‍ॅप्लिकेशन तयार करताना केला गेला असणार.

तरी सुध्दा जर "भीम" सारखे अ‍ॅप्लिकेशनचा सर्वर डाऊन होऊ शकतो. पण "पेटीएम" सारख्या अ‍ॅप्लिकेशनचा नाही.

कुणाला काहीच नवल वाटत नाही? Uhoh

Pages