डब्बा

Submitted by नीधप on 24 June, 2014 - 02:01

इथे विविध प्रकारच्या डब्यांची चर्चा अपेक्षित आहे. त्यातल्या पदार्थांची नव्हे.
हा मुद्दा आधीच कुठे चघळून झाला असेल तर इथला रवंथ तिथे हलवून हा बाफ 'भुर्रर्रर्र काऊ घेऊन गेला!' करून टाकावा अशी मान्नीय अ‍ॅडमिन वा वेबमास्तरांस विनंती.

अन्नं न सांडणारे, वस्तू गार व गरम ठेवणारे, मावेबल नॉनमावेबल, स्टीलचे, प्लास्टिकचे, कागदाचे, दगडाचे, मातीचे, सोन्याचे वगैरे कुठल्याही मटेरियलचे, सर्व आकार, प्रकार वगैरेचे अन्न वाहून नेणारे डबे हा इथला मूळ विषय.

स्टोरेजसाठीचे डबे चघळण्यासाठी हा बाफ नको.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ट्वे मध्ये ताकाकरता उपाय मी करतो तो असा - दही २/२.५ टेस्पू + थोडं मीठ + ज्रीरा पावडर किंवा हवा असलेला मसाला असं टवेच्या ट्म्ब्लरमध्ये न्यायचं फार गरमी असेल तर त्यातच २ बर्फाचे क्यूब्सही टाकायचे (हे अर्थात तुमच्या प्रवासाच्या वेळेवर सुद्धा अवलंबून आहेच) मग ओफिसात जेव्हा हवं असेल तेव्हा त्यात गार पाणी घालून हलवून घ्यायचं. गार ताक तयार. पुन्हा सांड्लवंड नाहीच. अन ओझंही नाही.
तसही वर कुणीतरी लिहिल्याप्रमाणे टवेची झाकणं त्यांनी सांगीतल्याप्रमाणे लावली की डबा मस्तपैकी सील होतो.

ताक नेलम की माझ्या टवेच हम्खास झाकण उडतं. कधी कधी दह्यानेही उडतं मग लॉ&सी वापरायला सुरुवात केली. पण त्याच्या सील मधून ताक बाहेर येतं.

वेल खूप आंबट दही/ताक असेल तर झाकण नक्कीच उघडतं. माझं आत्तापर्यंत एकदाच ताकाची बरणी पर्समध्ये सांडली होती. कारण ऐनवेळी जॅमच्या रिकाम्या झालेल्या बरणीत नेलं होतं. मी फोटो टाकलाय तसल्या कंटेनर ने आजतागायत मला कधीच धोका दिला नाहिये. माझा प्रवास अत्यंत वाईट असतो. ताकाचा कंटेनर लॅपटॉपच्या सॅकमध्ये असतो. ती कुठेही ठेवलेली असते बसमध्ये, पण मला नो चिंता.
अ‍ॅक्चूली टवेच असं नाही पण कोणत्याही कंटेनरचं झाकण लावण्याची पद्धत असते. तसं झाकणं लावलं आणि पुन्हा झाकणाची चोच वर उचलून आतली हवा काढून घेऊन पुन्हा लावलं की मस्त टाईट बसतं झाकण.

योकु - मी तर दह्यात जलजीरा पावडर, थोडं रॉक सॉल्ट आणि दोन चमचे साखर घालून एकत्र मिक्सरवर व्हिप करते, कंटेनर मध्ये ओतते (पाणी घालूनच) आणि फ्रिजर मध्ये टाकते. ऑफिसला निघताना काढून लंच बॅग मध्ये. ऑफिसात पोचून जेवेपर्यंत ताक छान गार राहतं.

Happy पुढच्यावेळी डब्याचे व्यक्तिचित्र हि लेखनस्पर्धा घेतली पाहिजे. किती ती व्हरायटी आणि किती ते प्रेफ्रेन्सेस! Happy आवडलच!!

मी अ‍ॅमेझॉन वरून खालील डबा मागवला आहे. छान वाटला.
Borosil Klip N Store Microwavable Containers, 320ml, Set of 3 with Lunch Bag
थोडा जड आहे, पंण ट्रॅवलिंग हेक्टिक नसेल आणि प्रायवेट वेहिकल किंवा ऑफीस बस ने कम्युटिंग करत असाल तर चांगला ऑप्शन आहे.
मला Rs. ५७७/- ला मिळाला.

बोरोसिल म्हणजे मावेमधे कुकींगला ( रिहीटींग नव्हे ) वापरता येइल का?

१ / २ माणसाची भाजी ठेवता येइल इतक्या छोट्या साईझमधे बोरोसीलचे बोल उपलब्ध नाहीत बाजारात Uhoh

बोरोसिल म्हणजे मावेमधे कुकींगला ( रिहीटींग नव्हे ) वापरता येइल का?> हो कुकींगला पण चालेल.

बापरे! अर्ध्या माणसाची भाजी ?! - हाहा (बकासुर बाजारात नक्की मिळेल. फिदीफिदी ) >> Lol

आशू Lol

space saver डब्ब्यांचा कोणाला अनुभव आहे का??
सिम्पल सोबर साठवणी चे डब्बे घ्याचे आहेत.
online http://www.amazon.in/Tallboy-Space-Saver-Modular-Multi-purpose/dp/B0193K... हे डब्बे पहिले पण review काय पटले नाही राव.
याला काही option आहे का??
किंवा कोणी वापरात का असे काही डब्बे तर सांगू शकेल का??
थोडी बचत पण हवी म्हणून हा सर्व खटाटोप.
खूप सारे option आहेत पण काळात नाही काय निवडावे.
मदत मिळेल का plz

रतिका, मी मध्यंतरी लाइमरोडवरून बोगो ऑफरमध्ये कटिंग एज चे डबे घेतले. मला तरी बरे वाटले. जागा बरीच वाचते.

स्टोरेजसाठीचे डबे चघळण्यासाठी हा बाफ नको. >>> हे आत्ता वाचलं Uhoh

डबा असा शब्द आहे ,डब्बा नव्हे.चावीला च्यावी ,पेट्रोलला प्याट्रोल असे अनेक चूकीचे उल्लेख होत असतात.

चांगली माहिती या बाफमुळे मिळाली . मी पण टपर वेअरचे डबे वापरतेय .

डबा असा शब्द आहे ,डब्बा नव्हे >>> तो काही costume शब्द नाही स्पेसिफिक उच्चार असायला Wink

टपर वेअर चा blue bag मधील लंच सेट नाही मिळत का? मी amazon वरुन मागवलेल्या सेट मधे रेड बॅग आहे. रिटर्न करायच विचार करत आहे. blue bag मधील लंच सेट कुठे मिळेल?

डबा असा शब्द आहे ,डब्बा नव्हे. >>>>> नाही डब्बा असाच शब्द आहे. स्टोरेजचा तो डबा आणि खाउचा/लंचचा तो डब्बा Proud लंच बॉक्स / टिफिन असं काही नसतंच. ड्ब्बा Lol

आणि डब्बा म्हणजे लॉक & लॉक. वेगवेगळे आकार आणि साइझ, पण लॉक & लॉक. दुसरं काही नाहीच.

blue bag मधील लंच सेट कुठे मिळेल? >> तुम्हाला नक्की काय साईझ न शेप चे डबे हवेत? की फक्त निळी बॅग हविये?

सामी मेधा चक्रदेव शी संपर्क साधा. ती तुम्हाला छान गाईड करेल.
माझे सगळे टपर चे डबे मी तिच्याकडूनच घेते.

avani1405 मला लंच सेट बॅग सकट हवा आहे.सध्या चा खूप वापरुन झाला आहे.
सामी मेधा चक्रदेव शी संपर्क साधा> थॅन्क्स दक्षिणा , आजच कॉन्टेक्ट करते.

Pages