Submitted by नीधप on 24 June, 2014 - 02:01
इथे विविध प्रकारच्या डब्यांची चर्चा अपेक्षित आहे. त्यातल्या पदार्थांची नव्हे.
हा मुद्दा आधीच कुठे चघळून झाला असेल तर इथला रवंथ तिथे हलवून हा बाफ 'भुर्रर्रर्र काऊ घेऊन गेला!' करून टाकावा अशी मान्नीय अॅडमिन वा वेबमास्तरांस विनंती.
अन्नं न सांडणारे, वस्तू गार व गरम ठेवणारे, मावेबल नॉनमावेबल, स्टीलचे, प्लास्टिकचे, कागदाचे, दगडाचे, मातीचे, सोन्याचे वगैरे कुठल्याही मटेरियलचे, सर्व आकार, प्रकार वगैरेचे अन्न वाहून नेणारे डबे हा इथला मूळ विषय.
स्टोरेजसाठीचे डबे चघळण्यासाठी हा बाफ नको.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
>>सोन्याचे टप्परवेअरचे डबे,
>>सोन्याचे
टप्परवेअरचे डबे, डबी मला देशात बरे वाटले.
उसगावात असतांनाच्या डब्यात आईसशीटचे पार्टीशन होते. लंचटायमाला अन्न मायक्रोवेव्हमध्ये गरम करायचे. फार बरे पडायचे. देशात एखादा चांगला ब्रँड आहे का असा डबा असणारा?
एकच नावं टपरवेअर याला पर्याय
एकच नावं टपरवेअर याला पर्याय नाही
अन्न सांडणे नाही की लवण्डणे नाही
ग्रुपॉनवर हे दिसलं बघ. मावेची
ग्रुपॉनवर हे दिसलं बघ.
मावेची पण जरूर नाही.
प्लास्टिकमधे गरम अन्न विशेषतः
प्लास्टिकमधे गरम अन्न विशेषतः रसभाज्या, पातळभाज्या, आमट्या वगैरे द्यायला नको वाटतं मला अजून तरी.
कितीही नीट साफ केलं तरी हळदिचा, मसाल्यांचा एक बारीक वास रहातोच प्लास्टिकला.
टवे मधे पण हे होतं का?
तांदूळ गहू असे साठवणूकीचे
तांदूळ गहू असे साठवणूकीचे धान्य ठेवायला मोठे स्टील / अल्युमिनिअमचे डबे बरे पडतात. गव्हाचे पीठ ठेवायला घट्ट झाकणाचा फ्लोरा कंपनीचा मोठा डबा घेतलेला... तीन वर्ष झाली, बरा आहे अजून. इथे दमट हवा असल्याने मटकी, मूग सारख्या गोड्या धान्यांना लग्गेच कीड लागते म्हणून स्टील पेक्षा घट्ट झाकणाचे प्लास्टीक डबे/बरण्याच बर्या पडतात. सध्या पर्ल पेटच्या बरण्यांचा सेट आहे.
गंमत म्हणून होम शॉप वरून ब्लॅक अँड व्हाईट १५ बरण्यांचा सेट मागवलेला. अगदीच कचकड्याचा शो पीस. मसाले, साखर, काजू व इतर सटर फटर खाऊ भरून ठेवलाय.. दिसायला बरा दिसतोय.
त्याच्याबरोबरच चौकोनी आकाराचे घट्ट झाकणाचे (एअर टाईट) डबे मिळालेत ते फ्रीजमध्ये भाज्या, कणीक स्टोअर करायला बरे पडतात. उरलेले मध्यम आकाराचे शो चे डबे तांदूळ, ज्वारी, बाजरी, नाचणी इ. पीठे फ्रीजमध्ये स्टोअर करायला बरे पडतात.
एक मोठा चौकोनी डबा प्लास्टीकचा (किंवा २-३ छोटे) एअर टाईट झाकणाचे जे फरसाण, बिस्कीटे असे पदार्थ्य स्टोअर करायला बरे पडतात.
टपर वेअर खूप महाग आहे. मोठे डबे घेण्यापेक्षा फ्रीजमध्ये ठेवण्यासाठी, टिफीन साठी, मावे मध्ये वापरण्यासाठी टप्परवेअर बरं पडतं.
आणखी कोणाला किचनमध्ये स्पेस सेवर डब्ब्यांबद्दल माहीती असेल किंवा चांगल्या टिकाऊ कंपनीबद्दल तर सांगा.
टवेपेक्षा लॉक अँड लॉक जास्त
टवेपेक्षा लॉक अँड लॉक जास्त चांगले वाटले मला. ट्रेनच्या बेशिस्त गर्दीत टवेची झाकणं सहज उघडतात, लॉक अँड लॉकची नाही उघडत.
हे असे प्लास्टिकचे डबे (फूडग्रेडचेच, बाकी कुठलं प्लास्टिक अन्नासाठी वापरत नाही.) धुण्यासाठी कोमट पाणी आणि लिक्विड सोपला पर्याय नाही. पण ह्या दोन व्यंजनांनी स्वच्छ होतात हे डबे.
हे डबे बघ. फक्त झाकण प्लास्टिकचं आहे.
टवे मधे पण हे होतं का? >>
टवे मधे पण हे होतं का? >> नाही. अगदी गर्र्म नाहीच भरायचं पण त्यात. काहीच प्रॉब्लेम नाही येत.
मिनिटभर गरम करायला चालतात हे डबे मावेत त्यामुळे ट्वे ला नो ऑप्शन.
जरा महाग आहेत खरी पण वर्थ मला तरी वाटतात.
ड्रिमगर्ल इथे फक्त 'टिफिन'
ड्रिमगर्ल
इथे फक्त 'टिफिन' डब्यांबद्दल चर्चा अपेक्षित आहे, स्टोरेजबद्दल नाही.
टपरवेअरच्या डब्यांतूनही
टपरवेअरच्या डब्यांतूनही कालांतराने भाजीचा रस बाहेर येतो. असे २-३ डबे वाया गेल्यावर टपरवेअर घेत नाही. "लॉक & लॉक" ने आजवर कधी दगा दिला नाहिये. ती बहुतेक कोरियन कंपनी आहे. एक अजून कमी किंमतीला "लॉक & सील" पण येतात डुप्लिकेट "लॉक & लॉक" टाईप्स. त्याच्यावर पण १००% फूड ग्रेड, रेफ्रिजरेटर सेफ, मायक्रोवेव सेफ(w/o lid) असे लिहिलेले असते. मी त्यातलेही वापरले आहेत. ते पण १००% लीक प्रूफ आहेत.
टपरवेअरमधेही झाकणं पिवळट
टपरवेअरमधेही झाकणं पिवळट पडतात, एक बारीकसा वास रहातोच असं सारखं वाटतं. पण ताक वगैरे न्यायला टपरवेअरचा तो लांबुडका उभा डबा मस्त असतो.
सध्या स्टीलचे पण एअरटाईट प्लास्टिकच्या झाकणांचे डबे टिफिनसाठी वापरते. झाकणं पिवळट होतात कालान्तराने पण मग बदलायची. फक्त हे डबे फ्रीजमधे ठेवले तर झाकणांची लौकर वाट लागते असं लक्षात आलंय.
टपरवेअरचा एक सॅन्डविच टिफिन बॉक्सपण आहे. तोही मस्त आहे एकदम.
टपरवेअर ला पर्याय नाही असे
टपरवेअर ला पर्याय नाही असे मला वाटते. मी खीर , उसळी वैगरे कायम घेऊन जाते. कधीही गळले नाही.
लिक्विड सोप ने डबे क्लिन होतात.
डबे नीट पुसून त्यात वर्तमान पत्राचे टुकडे टाकून फ्रीझ मधे ठेवल्यावर वास वैगरे निघून जातो. ही टीप मला अॅमेझॉन वर मिळाली.
लॉक अँड लॉक मधे जी रबराची पट्टी असते ती नीट साफ करण आवश्यक आहे, नाहितर त्यात चिकटपणा ऑईल वैगरे जमा होते आणि त्या काळ्या पडतात.
लॉक अँड लॉक मधे जी रबराची
लॉक अँड लॉक मधे जी रबराची पट्टी असते ती नीट साफ करण आवश्यक आहे>>> हो. डबा धुताना ती काढून धुवून सुकवून पुन्हा लावायची.
टपरवेअरचे खूप डबे घरात
टपरवेअरचे खूप डबे घरात असल्याने काहीतरी वेगळे म्हणून स्नॆपडीलवरून 'नयासा' कंपनीचा लंच बॉक्स ऑर्डर केला होता गेल्या वर्षी (साग्रसंगीत चौरस आहार कंपल्सरी च्या काळात). 3 मावेसेफ लीकप्रूफ डबे, 1 उंच ताकाचा डबा, 1 फोर्क, 1 चमचा,1 नॆपकिन, गरम राहण्यासाठी मॆचिंग इन्सुलेटेड बॆगसकट ₹250. खूप चांगला आहे. मंजूने सांगितल्यानुसार कोमट पाणी व लिक्विड सोप. गिफ्ट द्यायलाही बेस्ट. (डबा सेट).
अगदी गर्र्म नाहीच भरायचं पण
अगदी गर्र्म नाहीच भरायचं पण त्यात. <<
हे आपल्या हातात असेल तर ठिक पण बाई स्वैपाक केल्यावर डबे भरते. आणि नवर्याच्या हपिसात पोचवते डबा. मी अनेकदा तेव्हा घरीही नसते त्यामुळे यावर लक्ष ठेवता येणं अशक्य.
पोळ्या, भाजी, कोशिंबीर आणि आमटी/ कढी/ इतर काही पातळ असेल ते असं जनरली असतं डब्यात. त्याच्या हपिसात मावे घेतला नाही अजून. कदाचित बेसिक मावे घेईन इव्हेंच्युअली. हपिस १० मिन चालत एवढ्याच अंतरावर आहे सध्या त्यामुळे फार टेन्शन नाही. पण विविध डबे दिले की केवळ पोळी व भाजी वाले डबेच घरी येतात बाकीचे डबे हपिसातच रेंगाळत पडतात आणि मी गेले कुठे डबे सगळे अशी ओरड केली की घरी परत येतात. त्यामुळे एकच सेट असावा जेणेकरून रात्री तो घेऊन यायचे लक्षात राहील असा विचार आहे.
सामी, हो! आणि लॉक अँड लॉक
सामी, हो! आणि लॉक अँड लॉक डब्याच्या झाकणाची रबरी रींग असलेली खाचही जुन्या टूथब्रशने घासून स्वच्छ करावी लागते.
मी टपरवेअरचेच डबे वापरते.
मी टपरवेअरचेच डबे वापरते. पातळ रसाही त्यात नेता येतो. बाहेर येत नाही.
लॉक अॅन्ड लॉक चे पण वापरून पाहीले. पण काही महिण्यांनी त्याचे लॉक माझ्याकडून तुटले होते. त्यामुळे आता टपरवेअर डब्यांचा सेट परमनंट झालाय माझ्यासाठी
माझेही मत टपरवेअरलाच.
माझेही मत टपरवेअरलाच. त्यांच्या लंच बॉक्सबरोबर बॅगही येते. त्यामुळे सगळे डबे एकाच पिशवीत राहतात. हरवत नाहीत.
झाकण सैल होणे, पिवळा रंग येणे हे सगळे किमान दोन वर्षांच्या सतत वापरानंतर होते, लगेच नाही. पण तोवर किंमत वसूल झालेली असते त्यामुळे डब्याच्या पोळी-भाजी-आमटीसाठी टपरवेअरच.
रच्याकने लॉक अॅन्ड सीलचेही चांगले आहेत. त्यात विविध आकारही उपलब्ध आहेत. टवेमध्ये आकार लिमिटेड आहेत. पण लॉअॅसीला पिशवी मिळत नाही लंच बॉक्सबरोबर.
मिल्टनचे टिपिकल स्टीलचे डबे आणि त्यावर प्लॅस्टिकचा मोठा डबा हेही गोड असतात. ज्यांना स्टीलच हवे आहे त्यांच्यासाठी चांगला पर्याय. पण ते एअर टाईट नसतात. सरळसोट ठेवले तरच त्यातून रस सांडत नाही.
मला एक टवे विकणारी बाई
मला एक टवे विकणारी बाई म्हणाली होती कि टवेच्या वेगवेगळ्या डब्यांची झाकण लावायची पण एक पद्धत आहे. ती पद्धत लोक फॉलो करत नाहीत आणि मग झाकण खराब झालं म्हणुन ओरडतात. तुम्ही जिथुन टवे घेताय त्याला/तिला विचारा असं काही आहे का ते.
टवे इ. प्लॅस्टिकची झाकणं कालांतराने पिवळट पडतात हे खरं आहे. आणि अजुन एक म्हणजे प्लॅस्टिकचे डबे आमची बाई स्टीलच्या स्क्रबरने घासते (खुप वेळा सांगुन झालं तरीही). त्यामुळे हे डबे आपले आपण हलक्या हाताने प्लॅस्टिकच्या घासणीने घासुन घेणे आले.
घरात स्टिलचे डबे खुप असल्याने ते वापरण्याकडे जास्त कल आहे. मग पातळ भाजी असल्यास झाकण लावताना (झाकण घट्ट बसावे म्हणून) मध्ये एक प्लॅस्टिकची पिशवी घालणे मस्ट. शिवाय घरात कॉटनच्या छोट्या छोट्या पिशव्या खास डब्यांसाठी शिवुन घेतल्या आहेत. भाजी ओली असो वा कोरडी, डब्याला त्या कॉटनच्या पिशवीत घालुनच मग आम्ही बॅगेत ठेवतो.
सध्या जुन्या पद्धतीचा २/३ खुडाचा डबा नेतो आहोत. हा असा.
पण ताक वगैरे न्यायला
पण ताक वगैरे न्यायला टपरवेअरचा तो लांबुडका उभा डबा मस्त असतो. >> अगदी. सद्ध्या वापरते हाच.
टवेच्या डब्यांबरोबर येणारी पिशवीही सोयीची आहे.
आणि नीरजा, सोन्याचे? भारी!
टवेच्या वेगवेगळ्या डब्यांची
टवेच्या वेगवेगळ्या डब्यांची झाकण लावायची पण एक पद्धत आहे. >> बरोबर आहे. असते त्यांची एक पद्धत. विकणारी व्यवस्थित शिकविते. शिकून घ्यावी.
हे डबे आपले आपण हलक्या हाताने प्लॅस्टिकच्या घासणीने घासुन घेणे आले.>> हां, हे मात्र आहे. बाईला एक तर ट्रेन करा, नाहीतर आपणच घासा. बाईचे ट्रेनिन्ग शक्य नसेल आणि आपलेआपण घासायचा कंटाळा असेल तर कोणतंही प्लॅस्टिक लवकरच खराब होणार. मग स्टीलचाच पर्याय उरतो.
पण लॉअॅसीला पिशवी मिळत नाही
पण लॉअॅसीला पिशवी मिळत नाही लंच बॉक्सबरोबर. >>> ओ ताई, घरच्या वेगवेगळ्या पिशव्या वापरायच्या ड्रेसला मॅचिंग
माझ्या मिल्टनच्या भाजीसाठी घेतलेल्या डब्याचं प्लॅस्टिकचं झाकण लगेचच फाटलं आणि नुसती वाटीच राहिली. लगेच दुकानदाराकडे जायला वेळ झाला नाही त्यामुळे नंतर झाकण बदलून घेणं राहून गेलं.
आणि नीरजा, सोन्याचे? भारी!
आणि नीरजा, सोन्याचे? भारी! <<
आता आपल्याला नाही परवडत पण असतीलही ना कुणी वापरत.. आपल्याला थोडंच माहिती.. पण मेन्शन न केल्यामुळे 'लेफ्टौट' वाटले त्यांना असे व्हायला नको ना!
हो, हो!
हो, हो!
माझी बाई सगळं काही हिरव्या
माझी बाई सगळं काही हिरव्या स्क्रबरनेच घासते (नॉनस्टिक तव्याला स्पंज फक्त). ते चालतं का ट वे ला?
डबे हे आपणच घासणं
डबे हे आपणच घासणं 'मस्ट'.
पौर्णिमा म्हणते तसं टवे पिवळट पडेपर्यंत दीडदोन वर्षं झालेली असतात. तोपर्यंत किंमत वसूल. लॉक अॅन्ड लॉकचे चांगले आहेत, पण त्यापेक्षा टवे ला माझी पसंती आहे.
माझ्याकडे तीन पुडाचा स्टीलवर प्लास्टिक केसिंगचाही एक डबा आहे. त्याच्या खालच्या झाकणीत एक छोटा चमचा आणि काटा असतो. तो मात्र फारसा वापरला जात नाही.
----
----
सध्या खूप दुकानात
सध्या खूप दुकानात सिग्नोरावेअर असा एक ब्रॅ ण्डबघितला.. आधी मला टपरचा डुप्लिकेट वाटला म्हणून मी फार काही लक्ष दिले नाही पण गुगलुन पाहिले तर बरा मोठा ब्रॅण्ड वाटतोय..प्रॉडकट सगळे टपरचे कॉपी आहेत..बॅग सकट.... कुणी वापरुन पाहिला आहे का?
सि.वे चा एक चपटा डबा आहे
सि.वे चा एक चपटा डबा आहे माझ्याकडे गिफ्ट म्हणून आलेला. पण मी त्यात कायम कोरडा खाऊ घेऊन जाते.
ते स्टील + प्लॅस्टीकचे झाकण
ते स्टील + प्लॅस्टीकचे झाकण वाले डबे ठाण्यात मिळतात का कुठे? चांगला वाटतोय.
मलाही टवे फारसे आवडत नाहीत. लॉ . अॅ. लॉ वापरला जातो. स्टिलवाला मिळाला तर मस्त.
सावली, गोखले रोडला जनता स्टील
सावली, गोखले रोडला जनता स्टील मध्ये आहेत अनेको प्रकारचे डबे. त्यात तसले पण आहेत.
Pages