एक कन्फेशन करायचे आहे @

Submitted by ऋन्मेऽऽष on 2 November, 2016 - 04:07

गेल्या गुरुवारी दिवाळीच्या आधी मी ऑफिसमध्ये एक जुनी पार्टी देणे लागत होतो ती फेडायचे ठरवले. फार काही जेवणाचा वगैरे बेत नाही पण टी टाईम स्नॅक्स म्हणून केक वाटायचा होता. मी घरून म्हणजे आमच्या ईथल्या दुकानातून पेस्ट्री घेऊन आलेलो. बॉक्स उघडताच जवळचे काही जण तुटून पडले तर लांबच्या काही जणांना मी घरपोच सर्विस देऊ लागलो. अश्यातच एकाने केक उचलतच सोबत एक शंकाही उचलली... "अंड्याचा नाही ना?"

आणि मी चपापलो. मला चपापलेले सर्व ऑफिसने पाहिले. काही जणांचा हात थबकला, तर काही जणांचे तोंड चघळायचे बंद झाले. ज्यांचे खाऊन झाले होते ते मला खाऊ की गिळू या नजरेने बघू लागले. ज्यांचा अजून केक घ्यायचा बाकी होता त्यातील पुढे सरसावलेले काही हात मागे सरकले.

काहींचा गुरुवार होता तर काहींची दिवाळी वसुबारसेलाच सुरू झाली होती. आणि काही तर आजन्म अंडे न खाणारे होते.

सर्व नजरा आता माझ्यावर लागल्या होत्या आणि काही क्षणच.. मी खळाळून हसू लागलो.. वेडं लागलंय का.. एवढे समजत नाही का मला.. अंड्याचा केक कसा आणेन वाटायला.. आणि हे म्हणताच सारे काही नॉर्मल झाले. या चार क्षणांत मी विचार केलेला की केक खरेच अंड्याचा आहे, पण बरेच लोकांचा खाऊनही झाला आहे. जर पाप लागायचे असेल तर आता ते मलाच लागू दे. तसाही माझा यावर विश्वास नाहीयेच. पण आता ज्यांचा खाऊन झालाय त्यांचे मने का विटाळा.. पोटात गेलेला केक परत तर येणार नाही.. तसेच ज्यांना खाताना समजले नाही की केक अंड्याचा आहे किंवा ते आधी विचारावेसे वाटले नाही अश्यांचा विचार करणे खरेच गरजेचे आहे का..

कबूल आहे की ही तोकडी सारवासारव आणि आपल्याच मनाचे समाधान आहे.. पण चूक तर आधीच घडून गेली होती. आणि ती कबूल न करण्याचा माझा तेव्हा घेतलेला निर्णय मला त्याक्षणी योग्यच वाटत होता.

पण दुर्दैवाने माझ्या या असत्यवचनानंतर ज्यांचा अजून केक घ्यायचा शिल्लक होता त्यांनीही तो घेतला. अर्थात जिथे मी दहा जणांचे धर्म बुडवले तिथे चार चौघांचे आणखी बुडाले असा विचार करून मी ते ही मनाला पटवून दिले.

पण आज दिवाळी संपवून ऑफिसला जाताना मात्र ही टोचणी मनाला स्वथ बसून देत नाहीये.

काय करू?

सत्य सर्वांना सांगू की नको? सुचत नाहीये..

कन्फेशनची पहिली स्टेप केलीय, थर्ड पर्सनला, म्हणजे ज्यांच्याशी हा किस्सा घडला नाही त्यांना सांगितलाय.. म्हणजे माझी गर्लफ्रेण्ड, काही व्हॉटस्सप ग्रूपवरचे मित्र, आणि आता तुम्ही मायबोलीकर..

पण ऑफिसमध्ये सांगावे की न सांगावे आणि सांगायचे झाल्यास आता कसे हे काहीच समजत नाहीये Sad

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

असामी, तिच्या वेगळ्याच गप्पा म्हणजे तिला नेहमी रोमांटीकच बोलायचे असत>>हेच तर चुकतं तुमच..आता romantic गोष्टी bf सोबत नाही करणार तर कोणासोबत करायच्या..??

कऊ खरेय तुमचे. पण मगाशी मी तिला कॉल केला ५००-हजारच्या नोटा बंदची ब्रेकींग न्यूज देण्यासाठी पण कसले काय. तेव्हाही तेच बोलायचे होते. माझी सगळी एक्सायटमेंट फुस्स झाली. थोडेतरी ईतर गप्पा मारायला हव्यात ना.
एनीवेज, बरे झाले हा धागा वर काढलात. शुक्रवारी माझा फराळाचा टर्न आहे. त्यासोबत हे कन्फेशन करून टाकेन एकदाचे आणि हलका होईन Happy

आणि हो, अर्थातच, काय झाले हे विकांताला ईथे अपडेटेन Happy

थोडेतरी ईतर गप्पा मारायला हव्यात ना. >> त्यापेक्षा तिच्याकडे असलेल्या अवैध झालेल्या नोटा घेऊन बदलून दे Wink

हो असामी, त्या अवैध नोटा बदलायच्या आहेत हे जेव्हा तिला उद्या समजेन तेव्हा बरोबर ती माझ्याशी या विषयावर बोलायला येईन. मी करू शकत असेन हे काम तर मला करायला लावेलच ती. किंवा लाईन लागली असेल बॅंकेत तर ती बोअर होऊ नये म्हणून सोबत नेईलच मला..

अन्जू, हो ते जे काही घडेल ते तसे च्या तसेच, बरेवाईट का घडेन, ईथे अपडेटेनच मी..
तसाही प्रामाणिकपणाचा कळस आहे मी Happy

ऋन्मेऽऽष काळजी करू नका, हल्ली विकतचे सर्व केक्स "केक् मिक्स" ची भुकटी वापरून बनवतात. ते अंडे विरहीत असते. मी नुकतीच केक बनवणे ह्यावर एक कार्यशाळा अनुभवली. त्यात मिळालेले ज्ञान आहे. तस्मात बिन्धास्त रहा....तुमच्याकडून काहीही पाप घडले नाहिये...( चुकून :))

फायनली फराळासोबतच सांगितले. प्रत्येकाच्या हातात एकेक चकली आहे हे पाहिले. जेणेकरून मला मारायचा विचार कोणाच्या मनात आलाच तर आताही आपण याचेच नमक मसाला खातोय याची तरी जाण ठेवतील Happy

गदारोळ झालाच अपेक्षेप्रमाणे, पण वाटले होते तसा राडा नाही झाला - साधारण खालील प्रतिक्रिया आल्या ...

....

अरे आधीच त्या मोदींनी दिलेला धक्का काय कमी आहे जे तू एक आणखी एक देत आहेस? Uhoh

नालायका स्वत: तर काही देवधर्म पाळत नाहीस, दुसर्‍यांचाही बुडव. कुठे फेडशील ही पापं Angry

हा हा हा, मला वाटलेलेच. त्या दिवशी तू दचकला तेव्हाच मला समजलेले. अ‍ॅक्टींग मध्ये कमी पडलास रुनम्या Wink

अरे नालायका तुला समजलेले मग आम्हालाही सांगायचे होतेस ना.. तरी मी दोनदा विचारले होते Sad

तरी मला चव बघून तसं वाटलेलं हं Blush

काही नाही, यालाही आता केक मधून भेंड्याची भाजी खाऊ घालूया Proud

त्यापेक्षा सोमवारी पुन्हा चकल्या आणायला लावूया. हिच त्याची शिक्षा Happy

अश्या हसतखेळत चर्चेत प्रकरण आटोपले.
फक्त शेवटी एकच जण जवळ येऊन जरा नर्म दुखावलेल्या आवाजात म्हणाले, जरा बघून आणायचे होते रे .. मी बस्स सॉरी बोल्लो Sad

आयशप्पथ!! मारलं नाही तुला कोणीच??? कम्माल आहे हं!! Wink

सांगितलंस ते चांगलं केलंस. गिल्ट राहणार नाही मनात. Happy

गुड! Happy एकाखेरीज इतर सगळ्यांनी खेळीमेळीत घेतलं ते छान आहे.

जालावर बाचाबाची बघून वेगळीच समजूत होते; पण रिअल लाइफमधे लोकं बरीच एक्सेप्टींग आणि अकोमोडेटींग असतात अशी आशा धरायला हरकत नाही.

चांगल झालं रे मित्रा !
तुझ्या मनात कसला सल रहाणार नाही , पण आता तु भेंड्याची भाजी आणलीस तरी लोकांच्या मनात शंका येणार Happy

सल मनात राहणार नाही हे खरेय, हलके वाटले त्यानंतर लगेचच. जर हा धागा नसता आणि ईथे अपडेटायचे नसते तर किस्सा विसरूनही गेलो असतो. अर्थात आता ऑफिसवाले हा कायम चघळत राहणार आणि विसरू देणार नाहीत ती गोष्ट वेगळी.

एकाखेरीज इतर सगळ्यांनी >>> त्या एकानेही तसे राग नाही दिला की चीडचीड नाही केली. एखादा जर जास्त श्रद्धेने वार पाळत असेल तर त्याला आपला वार बुडाला म्हणून वाईट वाटणे साहजिक आहे असे समजूया Happy

का बे झाल्या का सगळ्या स्मायल्या वापरुन ? Lol .... नाही.., या राहिल्या होत्या Rofl

ज्याला एखाद्या गोष्टीची अ‍ॅलर्जी असते तो काहीही खाताना बघून खातो ना? मग अंडं, नॉन-व्हेज न खाणार्‍यांनीपण तेच करायला हवं. मग ते विकत घेताना असो नाहीतर कुणी दिलेलं खाताना असो. देणार्‍याला दोषी ठरवणं चुकीचं आहे. विषेशतः केक सारख्या गोष्टी ज्यात अंडं असणं हे अंडं नसण्यापेक्षा जास्त कॉमन आहे. मी तर म्हणीन की चुकून खाल्लं गेलं तर त्या देणार्‍या माणसाला अपराधी वाटू नये अशी प्रतिक्रिया द्यावी (जर त्याने हे मुद्दाम केलेलं नसण्याची खात्री असेल तर Happy )

मी तर म्हणीन की चुकून खाल्लं गेलं तर त्या देणार्‍या माणसाला अपराधी वाटू नये अशी प्रतिक्रिया द्यावी (जर त्याने हे मुद्दाम केलेलं नसण्याची खात्री असेल तर स्मित )
>>>>
योग्य मत आहे.
म्हणजे मी जर दुसर्‍या बाजूला असतो तर मी देखील हेच मत राखले असते.
तरी माझ्या मनात एकच आणि एवढाच सल होता की मध्ये कोणीतरी यात अंडे आहे का विचारल्यावर मला ते येस्स आहे म्हणून स्ट्राईक झाले होते पण तेव्हा मी खरे बोलायला चरकलो. त्यामुळे पुढच्यांनीही माझ्या विश्वासावर खाल्ले.

मला मुळात Eggless केक हा प्रकारच मनाला पटत नाही. (मी काही मांसाहारी नाही, पक्का शाकाहारी आहे.) माझ्या माहितीप्रमाणे Eggless केक हा साध्या (with Egg) केकपेक्षा थोडा महाग असतो. उदा. साधा (with Egg) केक २५० रु./किलो असेल तर Eggless केक हा ३०० रु/किलो असतो. Eggless केक बनवताना त्याचे मिश्रण खूप फेटावे लागते. (केक spongy होण्यासाठी). आता मला सांगा, ही मेहनत वाचवण्यासाठी एखाद्या बेकरीने केक बनवताना अंडे वापरले आणि मग केकवर Eggless चा tag लावला तर??? म्हणजे मेहनत कमी आणि किंमत मात्र जास्त!!! त्यामुळे सर्व शाकाहारी लोकांना एकच सांगणे, बाहेरील केक खाऊ नका, अगदी Eggless असला तरी!

आता मला सांगा, ही मेहनत वाचवण्यासाठी एखाद्या बेकरीने केक बनवताना अंडे वापरले आणि मग केकवर Eggless चा tag लावला तर??? म्हणजे मेहनत कमी आणि किंमत मात्र जास्त!!!

असे शक्यतो होत नाही. कारण केकला अंड्याचा हलकासा वास येतोच. असे झाले तर लोकांचा विश्वास गमावल्यासारखे होईल आणि पदार्थाचा खप कमी होईल. अंड्याला पर्याय म्हणून केक बनवताना तो हलका होण्यासाठी कोक सारखे पेय वापरले जातात.

असे झाले तर लोकांचा विश्वास गमावल्यासारखे होईल आणि पदार्थाचा खप कमी होईल.
>>>>>>>
विश्वासाचे काय बोलता.. मार पडेल बेदम असे करणार्‍याला.. १८५७ चा उठाव याच तात्कालिक कारणामुळे घडला ना

Pages