एक कन्फेशन करायचे आहे @

Submitted by ऋन्मेऽऽष on 2 November, 2016 - 04:07

गेल्या गुरुवारी दिवाळीच्या आधी मी ऑफिसमध्ये एक जुनी पार्टी देणे लागत होतो ती फेडायचे ठरवले. फार काही जेवणाचा वगैरे बेत नाही पण टी टाईम स्नॅक्स म्हणून केक वाटायचा होता. मी घरून म्हणजे आमच्या ईथल्या दुकानातून पेस्ट्री घेऊन आलेलो. बॉक्स उघडताच जवळचे काही जण तुटून पडले तर लांबच्या काही जणांना मी घरपोच सर्विस देऊ लागलो. अश्यातच एकाने केक उचलतच सोबत एक शंकाही उचलली... "अंड्याचा नाही ना?"

आणि मी चपापलो. मला चपापलेले सर्व ऑफिसने पाहिले. काही जणांचा हात थबकला, तर काही जणांचे तोंड चघळायचे बंद झाले. ज्यांचे खाऊन झाले होते ते मला खाऊ की गिळू या नजरेने बघू लागले. ज्यांचा अजून केक घ्यायचा बाकी होता त्यातील पुढे सरसावलेले काही हात मागे सरकले.

काहींचा गुरुवार होता तर काहींची दिवाळी वसुबारसेलाच सुरू झाली होती. आणि काही तर आजन्म अंडे न खाणारे होते.

सर्व नजरा आता माझ्यावर लागल्या होत्या आणि काही क्षणच.. मी खळाळून हसू लागलो.. वेडं लागलंय का.. एवढे समजत नाही का मला.. अंड्याचा केक कसा आणेन वाटायला.. आणि हे म्हणताच सारे काही नॉर्मल झाले. या चार क्षणांत मी विचार केलेला की केक खरेच अंड्याचा आहे, पण बरेच लोकांचा खाऊनही झाला आहे. जर पाप लागायचे असेल तर आता ते मलाच लागू दे. तसाही माझा यावर विश्वास नाहीयेच. पण आता ज्यांचा खाऊन झालाय त्यांचे मने का विटाळा.. पोटात गेलेला केक परत तर येणार नाही.. तसेच ज्यांना खाताना समजले नाही की केक अंड्याचा आहे किंवा ते आधी विचारावेसे वाटले नाही अश्यांचा विचार करणे खरेच गरजेचे आहे का..

कबूल आहे की ही तोकडी सारवासारव आणि आपल्याच मनाचे समाधान आहे.. पण चूक तर आधीच घडून गेली होती. आणि ती कबूल न करण्याचा माझा तेव्हा घेतलेला निर्णय मला त्याक्षणी योग्यच वाटत होता.

पण दुर्दैवाने माझ्या या असत्यवचनानंतर ज्यांचा अजून केक घ्यायचा शिल्लक होता त्यांनीही तो घेतला. अर्थात जिथे मी दहा जणांचे धर्म बुडवले तिथे चार चौघांचे आणखी बुडाले असा विचार करून मी ते ही मनाला पटवून दिले.

पण आज दिवाळी संपवून ऑफिसला जाताना मात्र ही टोचणी मनाला स्वथ बसून देत नाहीये.

काय करू?

सत्य सर्वांना सांगू की नको? सुचत नाहीये..

कन्फेशनची पहिली स्टेप केलीय, थर्ड पर्सनला, म्हणजे ज्यांच्याशी हा किस्सा घडला नाही त्यांना सांगितलाय.. म्हणजे माझी गर्लफ्रेण्ड, काही व्हॉटस्सप ग्रूपवरचे मित्र, आणि आता तुम्ही मायबोलीकर..

पण ऑफिसमध्ये सांगावे की न सांगावे आणि सांगायचे झाल्यास आता कसे हे काहीच समजत नाहीये Sad

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ज्यांना पाव चालतो त्यांना केक अंड्याचा असला तरी चालायला हवा. एकेक आश्चर्य आहे. असो.
असे लोक उपास आहे म्हणून खोटे बोलत नाहीत का असा माझा प्रश्न आहे. ते तर अंड्यापेक्षा भारी आहे. कोणते पाप मोठे ते त्यांनीच ठरवावे. तुम्हाला कष्टी होण्याचे कारण मला तरी दिसत नाही. तसेच धर्म बुडतो असे जर कोणी म्हणत असेल तर एक तर धर्म तकलादू आहे किंवा पाळणारा तकलादू आहे. इतक्या फालतु गोष्टि वर विचार न करणे बरे. एकच चूक आहे की तुम्ही आधी केक चालेल का असे विचारले असते तर बरे झाले असते. म्हणजे आपोआपच तुम्हाला त्यांनी कोणता केक चालेल ते सांगितले असते.

ज्यांना पाव चालतो त्यांना केक अंड्याचा असला तरी चालायला हवा. एकेक आश्चर्य आहे.>>> असु शकतं असं.
एका फ्लाईटला माझ्या शेजारच्या माणसाला एअरहोस्टेसने नॉन्वहेज चालेलं का म्हणुन विचारलं तर तो एवढा भडकला तिच्यावर , मी वेज रिक्वेस्ट केलेलं असताना तु नॉनव्हेज विचारलचं कसं म्हणुन त्या एअरहोस्टेसला भांड भांड भांडला ( तीने तर जेवणपण दिलं नव्हतं त्याला ) , त्या एअरहोस्टेसने त्याची माफी मागितली तिच्या सुपरवायझरने माफी मागितली तरी पठ्ठ्या काही थांबायला तयार नाही , शेवटी मी न राहवुन त्याला जाऊ दे ना भो म्हटलं तरी ऐकायला तयार नाही , शेवटी त्याच्या बकबकीला कंटाळुन मीच सीट बदलुन द्यायची विनंती केली तेव्हा कुठे थोडा शांत झाला तो.
असतात असे नमुने.

माझं बुकिंग नेहमी हॉस्पिटलवाले करतात आणि अगदी न चुकता व्हेज ऑप्शन सिलेक्ट करतात.
मला तर एअर होस्टेसने नॉन्वेज चालेल का विचारल्यावर सीटवर उडी मारावीशी वाटते.
आणि मग चिकन सँडविचच खाते.
Wink

अहो साती ईथे नाही तर कुठे विचारणार. विविध जातपातवयोगटऊंचीविचाराची लोकं एक ईथेच तर मायबोलीवरच तर भेटतात. गर्लफ्रेण्डशी बोलायला गेले तर तिच्या आपल्या एक वेगळ्याच गप्पा असतात.

तसेच उद्या मी कबूल करायचे ठरवल्यास ती पंधरा लोकं कशी आणि किती वेगवेगळ्या पद्धतीने रिएक्ट होतील आणि काय पडसाद उमटतील याचा ईथल्या विविध प्रतिसादांवरून अंदाज बांधायलाही बरे पडेल.

माझा स्वत:चा कल बोलाल तर खरे काय ते सांगण्याकडेच आहे. पण कसे याबाबत अजूनही संभ्रमात आहे. तरी ईथे आलेले काही पर्याय पटले आहेत. काही शंका आहेत.

Arree ....itni si baat dil pe mat le yaar ....visar te ....far vichar kartoy tu....zali ata party deun.

Ani shevti tuzi party denyamagchi bhavna important ahe ....baki tuzi marji ...i hope te lok samjun ghetil.

ज्यांना पाव चालतो त्यांना केक अंड्याचा असला तरी चालायला हवा. एकेक आश्चर्य आहे
>>>>

अरे हा काय पॉईंट आहे. पाव नॉनवेज कसा असतो? भारतीय बेकरीतला पाव का?

असा काही मुद्दा निघाला तर कामच बनेल. आमच्याकडे वरचेवर चिकन बिर्याणी आणि तंदूरीच्या पार्ट्या होत असतात. पण गणपतीमध्ये मेजॉरटी शाकाहारी म्हणून वेज बिर्याणी आणि "पाव" भाजीची पार्टी झाली होती. सर्वांनी तूफान पाव हादडलेले. तर उद्या माझ्या सत्यकथनानंतर कोणी भडकलेच तर हा मुद्दा त्यांच्यावर फेकता येईल की तुम्ही पाव तर पटापटा खाल्लेत मग अंड्याला का नाही बोलत आहात...
पण पाव खरेच अंड्याचा किंवा नॉनवेज मध्ये मोडणारा असतो का?

श्री अरे तोंडावाटेच त्याला परत बोलावणार होतो रे. चल अंड्या रवंथ करायला ये म्हणून हाक मारली असती आणि घश्याबाहेर डोकावताच पटकन खेचून घेतले असते Happy

वर कोणीतरी आयडीया दिली आहे की आणखी एक बिन अंड्याची केक पार्टी करून त्या वातावरणात हे सांगावे. ही आयडीया छान वाटतेय. लोकं माफ करतील नाहीतर समोरच्या बिन अंड्याच्या केकला मुकतील.

फक्त जरा खर्चिक वाटतेय. याऐवजी फराळ लाडू चिवडा वर काम चालवता येईल का विचार करायला हवा. आमच्या चकल्या तसेही हिट आहेत ऑफिसात. एकदा चटक लागली की एकावर एक खाव्याश्याच वाटतात. आधी प्रत्येकाला एकेक चकली देऊन मग आणखी एकेक चकली त्यांच्यासमोर नाचवत हे जमवता येईल..

माझा स्वत:चा कल बोलाल तर खरे काय ते सांगण्याकडेच आहे. >>> इथे सर्व वाचून, गिल्ट राहाणार असेल मनात, तर स्वतःच्या मनाचे ऐक ते हर्पेन यांनी योग्य शब्दात सांगितलं आहे. सामोरा जा परीस्थितीला.

.

अंजू, ते मस्करीत म्हटलंय. प्रॅक्टीकलीही तसे काही शक्य नाही, म्हणजे एका हातात चकली नाचवणारा ऋन्मेष तुमच्या डोळ्यासमोर आला असेल तर.. Happy

पण येस्स, येत्या सोमवारी फराळ विथ लॉटस ऑफ चकली घेऊन जाणार आहे तिचा आस्वाद घेत असताना, होत असणारया गप्पागोष्टी थट्टामस्करीने प्रत्येकाचा मूड चांगला आहे हे बघूनच एकसाथ सर्वांनाच काय ते सांगेन. काय माहीत कदाचित प्रकरण मला वाटतेय तेवढे सिरीअसही नसेल. दोनचार प्रेमाच्या शिव्या हासडून आणि टपल्या मारून याचा निकालही लागेल. Happy

आता सगळे प्रतिसाद पुन्हा सावकाश वाचले कारण दिवसा ऑफिसकामाच्या नादात वेळ नव्हता मिळाला.

सर्वच सल्यांचे मनापासून धन्यवाद.
मी वर एक नमूद केलेला पटलेला सल्ला हर्पेन यांचा होता.

मंदार,
I think if you purchase fresh pastry it will be packed in the box which will not have any green or red dot. Even baskin robins box don't have such marking.
>>>

हो सेलेजॉर नामक दुकानातील होता. फ्रेश पेस्ट्री बॉक्समध्ये भरल्या. मुळात ते लोकंच कसे ओळखतात त्यांनाच ठाऊक. त्यांच्याकडूनच अदलाबदली झाली तर.... असो, बराच मोठा फटका पडला खिशाला. त्यामुळे आणखी विकतचे दुखणे घेतलेय असा फील आहे Happy

असामी,
Officeमधल्या लोकांना ह्या बाफाचा अ‍ॅड्रेस दे, हाय काय, नाय काय. 
>>>>>
हे शक्य नाही.
एकतर मी दहा गोष्टी लिहिल्या असतील ऑफिसच्या ईथे. त्या आणि यापुढेही लिहिताना काळजी घ्यावी लागेल.
तसेच मी ऑफिसटाईमला ईथे किती वेळ ऑनलाईन असतो ते देखील सर्वांना समजू लागेल.
उदाहरणार्थ आता ही माझी दोन वाजून गेल्यानंतरची पोस्ट! उद्या लेट गेलो तर खरडपट्टी, कोण सांगते रात्री 2-2 वाजेपर्यंत जागे राहायला.. आधीच ऑफिसच्या व्हॉटसपग्रूपमध्ये अडकलोय. आणखी ईथेही वॉच नको Happy

असामी, तिच्या वेगळ्याच गप्पा म्हणजे तिला नेहमी रोमांटीकच बोलायचे असते. माझ्या आयुष्यातले हे प्रॉब्लेम्स तिला बोअर करतात. काही सिरीअसनेसच नाहीये. लग्न होऊन संसाराची जबाबदारी पडेल तेव्हा दाल आटा अंडा पेस्ट्रीचे भाव समजतील.

Pages