गेल्या गुरुवारी दिवाळीच्या आधी मी ऑफिसमध्ये एक जुनी पार्टी देणे लागत होतो ती फेडायचे ठरवले. फार काही जेवणाचा वगैरे बेत नाही पण टी टाईम स्नॅक्स म्हणून केक वाटायचा होता. मी घरून म्हणजे आमच्या ईथल्या दुकानातून पेस्ट्री घेऊन आलेलो. बॉक्स उघडताच जवळचे काही जण तुटून पडले तर लांबच्या काही जणांना मी घरपोच सर्विस देऊ लागलो. अश्यातच एकाने केक उचलतच सोबत एक शंकाही उचलली... "अंड्याचा नाही ना?"
आणि मी चपापलो. मला चपापलेले सर्व ऑफिसने पाहिले. काही जणांचा हात थबकला, तर काही जणांचे तोंड चघळायचे बंद झाले. ज्यांचे खाऊन झाले होते ते मला खाऊ की गिळू या नजरेने बघू लागले. ज्यांचा अजून केक घ्यायचा बाकी होता त्यातील पुढे सरसावलेले काही हात मागे सरकले.
काहींचा गुरुवार होता तर काहींची दिवाळी वसुबारसेलाच सुरू झाली होती. आणि काही तर आजन्म अंडे न खाणारे होते.
सर्व नजरा आता माझ्यावर लागल्या होत्या आणि काही क्षणच.. मी खळाळून हसू लागलो.. वेडं लागलंय का.. एवढे समजत नाही का मला.. अंड्याचा केक कसा आणेन वाटायला.. आणि हे म्हणताच सारे काही नॉर्मल झाले. या चार क्षणांत मी विचार केलेला की केक खरेच अंड्याचा आहे, पण बरेच लोकांचा खाऊनही झाला आहे. जर पाप लागायचे असेल तर आता ते मलाच लागू दे. तसाही माझा यावर विश्वास नाहीयेच. पण आता ज्यांचा खाऊन झालाय त्यांचे मने का विटाळा.. पोटात गेलेला केक परत तर येणार नाही.. तसेच ज्यांना खाताना समजले नाही की केक अंड्याचा आहे किंवा ते आधी विचारावेसे वाटले नाही अश्यांचा विचार करणे खरेच गरजेचे आहे का..
कबूल आहे की ही तोकडी सारवासारव आणि आपल्याच मनाचे समाधान आहे.. पण चूक तर आधीच घडून गेली होती. आणि ती कबूल न करण्याचा माझा तेव्हा घेतलेला निर्णय मला त्याक्षणी योग्यच वाटत होता.
पण दुर्दैवाने माझ्या या असत्यवचनानंतर ज्यांचा अजून केक घ्यायचा शिल्लक होता त्यांनीही तो घेतला. अर्थात जिथे मी दहा जणांचे धर्म बुडवले तिथे चार चौघांचे आणखी बुडाले असा विचार करून मी ते ही मनाला पटवून दिले.
पण आज दिवाळी संपवून ऑफिसला जाताना मात्र ही टोचणी मनाला स्वथ बसून देत नाहीये.
काय करू?
सत्य सर्वांना सांगू की नको? सुचत नाहीये..
कन्फेशनची पहिली स्टेप केलीय, थर्ड पर्सनला, म्हणजे ज्यांच्याशी हा किस्सा घडला नाही त्यांना सांगितलाय.. म्हणजे माझी गर्लफ्रेण्ड, काही व्हॉटस्सप ग्रूपवरचे मित्र, आणि आता तुम्ही मायबोलीकर..
पण ऑफिसमध्ये सांगावे की न सांगावे आणि सांगायचे झाल्यास आता कसे हे काहीच समजत नाहीये
मुख्य अंड्याबद्दल आमची मते
मुख्य अंड्याबद्दल आमची मते जहाल आहेत. तुमचे अवांतर अंडे असल्याने पास.
अरे आज तर शाहरूख खान चा
अरे आज तर शाहरूख खान चा वाढदिवस. अजून एक केक आणून वाटा.
मुंबईत असलात तर एग वाला, एगलेस अश्या केकच्या व्हराइटी उपलब्ध असतात. ते विचारून आणलेले बरे. नुसते डाएट रेस्ट्रिक्षन असले तर ठीक काही लोकांना चालून जाईल पण प्युअर व्हेजीटेरिअन लोकांना चालणार नाही अॅलर्जी असलेल्यना त्रासही होउ शकेल. असत्य वचन केव्हाही बरोबर नाही. केक खाल्ल्याच्या आनंदा पेक्षा खोटे बोलल्याची टोचणी जास्त आहे का ह्याचा मनात बॅलन्स करून बघा. उत्तर मिळून जाईल.
अवांतर: हे ऑफिसात असले केक समोसे व चिप्स हे अन हेल्दी प्रकार कायम उपलब्ध असतात त्या ऐवजी
उत्तम फ्रेश फळे द्यावेत असे माझे वैयक्तिक मत आहे. ते मी पण कुठे बोलून दाखवलेले नाहे. इथेच कन्फेस करते.
हॅपी शारुक बर्थडे टू यू.
ऑफिसात सांगून टाक. परत
ऑफिसात सांगून टाक. परत तुझ्याकडन कोणी कसलीही पार्टी मागणार नाही.
अंड्याचा केक आणि एगलेस केक
अंड्याचा केक आणि एगलेस केक यातला फ्लेवर चा फरक खाणार्याला कळतो.
बाकी चुकून खाल्ल्यास काही हरकत नसावी.
'एगलेस आहे का' हे विचारण्याची आणि तो तसा नसल्यास सांगणार्याची अवघड परिस्थिती टाळायला आम्ही 'केक मधले,कुकिज मधले,डोनट मधले, बिस्किटातले,तिरामिसू मधले अंडे त्यात असल्यास कोणत्याही दिवशी चालते' हा सोयीस्कर बदल बर्याच आधी करुन घेतला आहे.
हल्ली बरेच लोक ऑफिसात द्यायला आणताना एगलेस केक बघूनच आणतात, अगदी पट्टीचे फिश इटर्स पण आठवड्यातल्या काही दिवशी अजिबात अंडे न चालणारे असतात.अती रिलीजियस जैनांचे स्पेक्स तर विचारुच नका.त्यात बसायला बरीच इफ एल्स लूप लावावी लागतात आपण आणलेल्या पदार्थाना.
अंड्याचा केक आणि एगलेस केक
अंड्याचा केक आणि एगलेस केक यातला फ्लेवर चा फरक खाणार्याला कळतो.>>
अंड्याचा वास मास्क करायलाच मेनली व्हॅनिला फ्लेवर घालतात केक कुकी मध्ये.
एगलेस केक मध्ये सॅचुरेटेड फॅट्स फारच जास्त प्रमाणात घालतात. पण ते काहींना चालत असेल.
अरे ह्यात बाफत काही दम नाही. केक हजम बात खतम. पुढील आठवड्याचा मेजर विषय ट्रंप कि हिलरी असेल. त्यावर काढ बाफ. लै मजा व्हनार आहे. हसू हसू वेड लागायची वेळ आली आहे.
पुढील आठवड्याचा मेजर विषय
पुढील आठवड्याचा मेजर विषय ट्रंप कि हिलरी असेल. त्यावर काढ बाफ. >>> अमा, त्याला आपले घरगुती विषयांवरच धागे विणु आय मिन काढु देत.
इथे करायचेस ना
इथे करायचेस ना !
http://www.maayboli.com/node/50990
इथे करायचेस ना ! >>> छे, तसे
इथे करायचेस ना ! >>> छे, तसे केले असते तर अजुन एक धागा प्रसवायचे पुण्य मिळाले नसते.
ऑलरेडी कितीतरी पुण्य जमा आहे
ऑलरेडी कितीतरी पुण्य जमा आहे की गाठीला. अजून जास्त जमवले तर अजीर्ण होईल
सत्य सर्वांना सांगू की नको?
सत्य सर्वांना सांगू की नको? सुचत नाहीये.. >>> सांग सांग , तुला बैलासारखं बड बड बडवतील
गिर्या आणि हार्पेन
गिर्या आणि हार्पेन
हर्पेन, कबूल. तिथेही सांगता
हर्पेन, कबूल. तिथेही सांगता आले असते. पण मुळात मायबोलीवर नाही तर ऑफिसमध्ये कन्फेशन करायचे आहे. ईथे सल्ला हवाय. करावे की करू नये. करायचे असल्यास कसे करावे. तुम्ही माझ्या जागी असल्यास काय केले असते. तुम्ही माझ्या ऑफिसवाल्यांच्या जागी स्वताला ठेवून पाहिल्यास तुम्हाला माझ्याकडून काय अपेक्षित असते. आणि मी सत्य सांगितल्यावर तुम्ही कसे रिएक्ट झाला असता.. यातली लास्ट लाईन महत्वाची.. कोण कसा रिएक्ट होईल याचा काही अंदाज येत नाहीये. प्रश्न एखाद दुसरया मित्राचा नाही तर बारापंधरा जणांचा वार बुडलाय.. काही समजून घेतील पण काहींनी भडकून मारायला सुरुवात केली तर.... जमावाला चेहरा नसतो.. कोण माझाच केल खाऊन माझ्यावरच डूख धरून बसला असेल काही सांगता येत नाही..
ऑफिसात कुणालाही काहीही सांगु
ऑफिसात कुणालाही काहीही सांगु नकोस. अगदी अंडे चालत अस्लेल्या मित्राला/मैत्रिणीलाही सांगु नकोस. तुझ्या लक्षात आलं नसेल एगलेस केक घ्यायला हवा ते. आता तर केक हजम बात खतम.
पण पुन्हा अशी चुक करु नको. दुसर्याला खाउ देताना/पार्टी देताना त्याच्या खाण्यापिण्याच्या सवयींचा जरुर विचार करावा.
अरे ऋन्मेऽऽष केक खावून कधीच
अरे ऋन्मेऽऽष केक खावून कधीच संपला. आता सगळे विसरले आणि तू ही विसरुन जा.चूकुन खाल्यास काहीच हरकत नसते. आणि तसेही अंडे खावून न खावून काही धर्म बुडत नाही. विकतच्या किती तरी पदार्थांमधे अंडे असते. व्हेज/नॉन व्हेज पदार्थ एकत्र मिळणार्या रेस्टॉरंट मधे वेज खाणार्यांच्या पोटात नकळत नॉन्वेज जातच असेल.
एका रेप्युटेड रिसॉर्ट मधे ४ दिवस रहायला होतो तेव्हा तेथील शेफ सोबत चांगली मैत्री झाली होती, तेव्हा बोलण्याच्या ओघात त्याने संगितले कि तिथे नान बनवताना अंडे घालतातच. मग आम्हीच विचारले कि पण जे लोक नॉन व्हेज खात नाहीत त्यांचे काय? तर तो हसला आणि म्हणाला कि अंडे नाही घातले तर नान इतके छान बनणारच नाहीत.
कोण माझाच केल खाऊन माझ्यावरच
कोण माझाच केल खाऊन माझ्यावरच डूख धरून बसला असेल काही सांगता येत नाही..
>> ओएम जी. ये क्या?
पण तुझे मन किती निष्पाप आहे. टोटली फॅन गर्लिंग. इतके गिल्टी वाटून घेउ नकोस. इफ दे लव्ह यू दे विल फरगिव्ह.
ऋन्म्या वेडा का रे तू. खरं
ऋन्म्या वेडा का रे तू. खरं सांगायला
बर्याचदा अज्ञानात सुख असतं रे
बर्याचदा अज्ञानात सुख असतं रे .
सामी अगदी बरोबर... मध्यंतरी
सामी अगदी बरोबर... मध्यंतरी हे वाचले होते मटावर की ताक घालुन केलेले नान ईतके चांगले नाही लागत म्हणुन ते अंड घालतात बर्याच लोकांना हे माहीतच नसते ते व्हेज समजुन खातात
काही कन्फेशन द्यायची गरज
काही कन्फेशन द्यायची गरज नाही.पाप वगैरे कल्पना खोट्या आहेत हे तुच लिहीले आहे.अंडे नको,कांदा नको,जैन पावभाजी हवी ईईई लोकांचा मला तिटकारा येतो.असे वाटते यांना एकदा सामिष खायला काय आभाळ कोसळते काय.
काहींची दिवाळी वसुबारसेलाच
काहींची दिवाळी वसुबारसेलाच सुरू झाली होती. सर्वांचीच असते रे वसुबारसेपासून असं मला वाटतं.
आता सांगू नकोस, तेव्हाच सांगायला हवं होतंस. स्वतःला माफ कर आणि अशी चूक परत होणार नाही, याची दक्षता घे. त्यातल्या एकाला पण सुचलं नाही का अंड आहे की नाही केक मधे ते बॉक्सवर तपासून बघावं, कारण तशी खूण असतेना वेजची.
धर्म बुडतो म्हणजे नेमके काय
धर्म बुडतो म्हणजे नेमके काय घडते हे मला जर समजाऊन सांगितले तर प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करीन.
ऋन्मेष, केक पोटात पचला, बात
ऋन्मेष,
केक पोटात पचला, बात हजम.
पुढच्या वेळी एगलेस बघून आण.कन्फेक्शन वगैरे देण्यातली मोठी गोष्ट ही नाही.बडे बडे ऑफिसो मे छोटी बाते होती रहती है.
माझ्या अय्यंगार कलिग ला एअर लाईन एन जेवणाचा प्रेफरन्स हिंदू व्हेज दिलेला असताना पण चिकन सुप दिले होते आणि त्यात प्रत्यक्ष चिकन दिसत नसल्याने त्याने ते प्यायल्यावर त्याच्या लक्षात आले होते.(पॅकेट वर ग्रीन डॉट्/रेड डॉट नव्हता.)
ऑफिसमधले कुणीच मायबोलीवर
ऑफिसमधले कुणीच मायबोलीवर नाहीत का .... जर मायबोली वाचत असतील तर एव्हाना कळले असेल.
Come on man leave it. Even
Come on man leave it. Even the person who eat only eggless cake should have asked you before eating it. So you are not only at fault. I think if you purchase fresh pastry it will be packed in the box which will not have any green or red dot. Even baskin robins box don't have such marking.
ऋन्मेष : केक खाऊन केंव्हाच
ऋन्मेष : केक खाऊन केंव्हाच संपला ना? मग आता कशाला स्वतःच्या डोक्याचा भुंगा करून घेतो आहेस? विसर ते. आता सत्य सांगून उगाचच विषय वाढवू नकोस.
पुढच्या वेळेस केक आणशील तेंव्हा आधी मायबोली वर सल्ल्यासाठी एक धाग काढ आणि मग केक च्या दुकानात जा ...................
तुम्ही माझ्या जागी असल्यास
तुम्ही माझ्या जागी असल्यास काय केले असते.
ऋन्मेष,
"अंड्याचा नाही ना?" विचारल्यानंतर माहीत नाही सांगीतले असते. जे तू केले नाहीस.
पण असो. ते काही 'अन-डू' करता येणार नाही.
तू शेंगा खाऊन टरफले टाकली आहेस. तूच उचलायला पण हवीत ना!
बिनधास्त सांगून टाक. असे अंड पण न खाणारे काय मार-बिर देत नाहीत. आणि दिला थोडा मार तर तू आहेस ना हट्टाकट्टा नौजवान (का नाहीयेस म्हणूनच घाबरतोयस ) पोरंबाळं झालेले गृहस्थाश्रमी लोक असे घाबरायला सुरु करतात. तर ते एक असोच
कोणी मारायला आलेच तर सांगायचे ज्याने कधीच कोणतीच चूक / पाप केली नाही त्यानेच पुढे यावे मारायला
तर मी काय म्हणतो बिनधास्त सांगून टाक.
नाहीच सांगीतलेस तर तू मोठा गुंड झाल्यावर बाकी सगळ्यांचे कान चाव. माझा कान चावायचा हक्क गमावलायस.
असो जोक्स अपार्ट
काय करू-
मनात सल राहून जाण्यापेक्षा किंवा अजून वाईट म्हणजे असं केलं तरी चालतं अशी तुझ्या मनाची समजूत होण्यापेक्षा सांगून टाकणे श्रेयस्कर.
कसं करू-
अजून एक अंड न घातलेला केक आण. सगळ्यांना खायला घाल आणि मग हा कबुली जवाब पण देऊन टाक.
इतना तो बनता है |
काय राव .. ह्यला काम धंदे
काय राव .. ह्यला काम धंदे नाहियेत काहीच..
एक ऋकोतबो गुलमोहर ग्रूप चालू
एक ऋकोतबो गुलमोहर ग्रूप चालू करायला पाहिजे.
ऋन्मेषला कोणाशी तरी बोलायचंय.
ऋबाळा, तुझे कोतबो ग्रूपात आत्तापर्यंत किती धागे झाले मोज बघू!
आपण ऋ साठी वेगळी ऋतुबोली
आपण ऋ साठी वेगळी ऋतुबोली किंवा ऋसई (वसई सारखं) साईट काढून देऊ
केक मधे खरच अंडे घातलेले
केक मधे खरच अंडे घातलेले होते का ? अंडे फोडून फेटून घातलेले होते कि फक्त एग प्रोटीन होते ? ते गावठी अंडे होते ? ब्रॉईलर होते ? हे elaborate केल्यास नीट उत्तर देता येईल. तोवर
Officeमधल्या लोकांना ह्या बाफाचा अॅड्रेस दे, हाय काय, नाय काय.
Pages