Submitted by सुप्रिया जाधव. on 13 October, 2016 - 01:38
कित्येकदा नाहक बळी गेली
उमलायच्या आधी कळी गेली
विरहात तळमळली असावी ती
पाण्यातसुध्दा मासळी गेली
जी राखली होती तुझ्यासाठी
ती एक जागा मोकळी गेली
शहरीकरण झाले तहानेचे
गावातली गोड़ी तळी गेली
त्याच्या विचारांची उड़े झुंबड़
व्यापुन मनाची पोकळी गेली
परिपक्व निर्णय घेतला आपण
इच्छा चिरडली कोवळी गेली
तिसरीच कोणी जन्मले मी ही
त्याच्या चितेवर वेगळी गेली
सुप्रिया
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
एका झटक्यात नाही समजली.
एका झटक्यात नाही समजली. पुन्हा वाचावी लागेल
तिसरीच कोणी जन्मले मी
तिसरीच कोणी जन्मले मी ही
त्याच्या चितेवर वेगळी गेली<<<< वा वा
छान गझल
परिपक्व निर्णय घेतला
परिपक्व निर्णय घेतला आपण
इच्छा चिरडली कोवळी गेली >>> क्या बात है!