मिसळ - महाराष्ट्राला पडलेलं एक चवदार स्वप्न!
सौमित्रच्या गारवावाली कुंद पावसाळी हवा असावी, आजूबाजूला हिरवाईनं नटलेला (अर्थ आपल्या सोयीनुसार घ्यावा) परिसर असावा, निवडक मित्रांबरोबर गप्पा रंगलेल्या असाव्यात. मंद झुळुकेसोबत त्याक्षणाला केवळ ‘दैवी’च म्हणता येईल, असा खमंग सुवास सुटावा. क्षणभर डोळे मिटून आपण तो सुवास अनुभवत राहतोय, तोपर्यंत बाळू, पिंट्या, बारक्या असं ‘एरवीचं’ नाव धारण केलेल्या यक्षानं आपल्यासमोर, बादशहासमोर नजराणा पेश करताना आणतात त्या पद्धतीनं ट्रेमध्ये ठेवलेला, उसळीवर मुक्तहस्ते पेरलेल्या शेवफरसाणानं भरलेला चिनी मातीचा बोल, त्याच्यासोबत डोक्यात सुरू असलेले जगातले सगळे विचार तात्पुरते संपवायची ताकद असणाऱ्या रश्श्याचा भलाथोरला वाडगा आणि पांढर्याशुभ्र पावाची जोडी अवतीर्ण व्हावी. त्यासोबत नवपरिणीत वधूबरोबर पाठराखिणीसारख्या येणाऱ्या खमंग तळलेल्या भज्यांची प्लेट आणि अधमुर्या ताकाचा शुभ्र चषक पेश करावा.
आपण जगाचा विचार सोडून काठोकाठ भरलेल्या मिसळ-रश्श्याच्या बोलकडे आणि भज्यांकडे एकदा मन भरून बघत ‘चांगभलं’ म्हणत मिसळीवर ताव मारावा. ताकात चिमटीएवढीच मिठाची कणी घालत त्याचा पेला रिचवावा. 'प्लीज, रिटायर होऊ नकोस रे' अशी विनवणी करायची वेळ आणणाऱ्या गावसकरच्या बॅटिंगसारखी हुरहूर लावत, तरी समाधानानं योग्य वेळेत मिसळीच्या कार्यक्रमाची चवदार सांगता व्हावी. आणि कार्यक्रम न राहता तो मिसळीचा महोत्सवच होऊन जावा...
पुणे फूड फेस्ट सादर करत आहे - ‘पुणे मिसळ महोत्सव’, पुण्यात पहिल्यांदाच. तोही आमराईत.
इथे मिळेल हरतर्हेची मिसळ. गोडसर झाक असलेली पुणेरी मिसळ, कोल्हापूरची झटका देणारी मिसळ, नाशिकची चटकदार मिसळ, बिर्याणी स्टाईल ‘दम’ मिसळ, जैन मिसळ, १००% उपासाची आणि तरीही ‘तर्रीदार’ मिसळ. थोडक्यात, तुम्हांला जशी पाहिजे तश्शी मिसळ! सोबत कांदाभजी, वडे, चहा, कोल्ड कॉफी आणि वेगवेगळी डेझर्टस् तर आहेतच. शिवाय मनोरंजनाचे इतरही बरेच सुखद धक्के असणारेत.
तर पुण्यातल्या पहिल्यावहिल्या मिसळ महोत्सवात सहभागी व्हा, सिंहगड पायथ्याला अगदी खर्या निसर्गाच्या सान्निध्यात. मिसळीचा आस्वाद घ्या, ’टिपीकल’ हॉटेलात नाही, तर मस्त आंब्यांच्या झाडाखाली टेबल-खुर्चीचा जामानिमा मांडून.
नक्की या, कारण एकूणच 'चुकवू नये' अशा काहीपैकी असणार आहे सगळंच.
पुणे फूड फेस्ट आयोजित ‘पहिला पुणे मिसळ महोत्सव’.
आमराई, गोळेवाडी, सिंहगडच्या घाटरस्त्याला जायच्या आधीच उजवीकडे, पुणे - ४११ ०२५.
(मायबोलीकरांना सहज आठवण म्हणून - सिंहगडावरच तेरा वर्षांपूर्वी पहिल्यावहिल्या वर्षाविहाराची सुरुवात झाली होती).
दिनांक - ७, ८, ९ ऑक्टोबर, २०१६.
वेळ - शुक्रवार, दि. ७ ऑक्टोबर - सकाळी ९ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत.
शनिवार, दि. ८ ऑक्टोबर - सकाळी ८ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत.
रविवार, दि. ९ ऑक्टोबर - सकाळी ८ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत.
केपी, मी तुमच्या फोटोंची वाट
केपी, मी तुमच्या फोटोंची वाट पाहत होतो. >>स्वारी!! फोटो काढलेत पण मिस्ळ महोत्सवाचे नाहीत.
मी वेगळ्याच कामात अडकले आणि
मी वेगळ्याच कामात अडकले आणि जायचं ठरवूनही गेले नाही. खूप हुरहूर लागली. मला खादाडी पेक्षा मायबोलीकरांना भेटण्यात जास्त इंटरेस्ट होता. चांगली संधी गेली.
मस्त आहेत फोटो अकु!
मस्त आहेत फोटो अकु!
मी गेले होते काल १२.३० च्या
मी गेले होते काल १२.३० च्या दरम्यान, तोपर्यंत अकु घरी पोहचली होती.
धन्यवाद मंडळी!
धन्यवाद मंडळी!
Pages