गडकिल्ले स्वच्छता अभियान अंतर्गत दुर्गवीर प्रतिष्ठान ची हि दुसरी मोहीम...
गेल्या दोन वर्षापासुन आमची पोर मोठ्या हिम्मतीने "नव्या मित्राची " सेवा करत आहे ...
२ ऑक्टोंबर ला सरकारी गडकिल्ले स्वच्छता अंतर्गत मृगगडावर मोहीम झाली ....
या गड दोस्तांची निगा राखणारे दुर्गवीर रामदास , प्रज्वल आणि अमित हजर होते , या अमित चे लै कौतुक हो पोरगा थेट ऑफिस वरून गडावर फॉर्मल वर आला .. (इथे मुख्य हेतू "पापडाचा होता " अशी धुक्यातील अफवा पसरली होती )
नेरुळवरून काही Corporate लोक गडावर येणार होते त्याच्या जोडीला " टारझन अमित " राखीव ठेवला ,
रिमझिम पाऊस आणि धुक्यातून वाट काढत काढत गडावर पोहचलो ..
केवळ गडावरील वाढलेले रान काढायचे असल्यामुळे ,वेळ न घालवता मुख्य सदरेवर श्रमाची सुरवात केली , कमीत कमी वेळेत संपुर्ण सदर स्वच्छ झाली , यात मुख्य महिनत घेतली ती प्रफुल भाऊ अनिकेत , नाखवा काका आणि " गोल्डी योगेश " ( 4 महिने आलो नाही आलो नाही म्हणुन संपूर्ण कसर एकाच मोहिमेत पूर्ण करतोय - इतिगोल्डी योगेश )..
Corporate वाल्याची वाट पाहून पाहून आम्ही 'पार्लेजी ' पावसात बुडवून फस्त केला ....
गडावरील आवडत ठिकाण म्हणजे शेवटच्या टोकावरील " कातळ कोरीव " घराचे घरटे ...
आज पर्यंत मी एवढ्या मोठ्या आणि सुस्पष्ट असलेले घरटे इतर गडावर नाही पाहिले , खांब रोवण्यासाठी असलेलं " पोस्ट होल " आणि त्यात वाढेलेले गवतलवा जमा स्वच्छ केला ....
12 वाजायला आले तरी हे कंम्पनी वाले अजून आले नाहीत ,त्याच्या साठी राखून ठेवलेली " स्वच्छतेची जागा " तशीच होती ....
सामुहिक चर्चा टाक्याच्या ठिकाणी बसला , त्यात ' वाघरे ' चा जन्मदिन मग सकाळचे पोह्याचे दोन चमचे भरून साजरा केला .. त्यात भेट वस्तू म्हणून " टक्के " भाई ने ..लाकूड तोड्याच्या गोष्टीची ची आठवण करत " सोन्याची कि लाकडी " हा प्रश्न न करता " एक फावडा " भेट दिला ....
त्यांच्या साठी ठेवलेलं काम उशीर झाल्यामुळे " आम्हीच करू " हा ठराव गडकऱ्यानी मजूर केला ...
गवतात न दिसणारा मंदिर परिसर ,क्षणात " सुंदर " झाला ...
दीड च्या सुमारास " त्ये Corporate " लोक आली , आणि लक्षात आले की यांना उशीर हा " this is my 1st trek ". मुळे झाला तसेच त्यात "मुंबईत नोकरी करणारे इतर भाषिक होते आणि महिला हि होत्या ..
म्हटलं आता हे एवढे थकले आहेत , काम करतील का ? हा प्रश्न सगळ्यांना पडला ..
पण वर येताच ते सगळे म्हटले " बोलो क्या Clean करना है " हिम्मतिची दाद आम्ही रवींद्रला गडदर्शन करून पूर्ण केली .. थोडक्यात .. त्यांच्या कडून रान स्वच्छ करून घेतले ...
केशव दादांनी देवीला अगरबत्तीलाऊन आमच्या सर्व दुर्गवीरांसाठी बळ मागीलते .....
सगळे लोक सुखरूप पोहचले यातच आम्ही समाधानी झालो ..
पोटभर " दनाणून " जेवण हाणून पायथ्यातील मंदिरात " ओळख आणि चर्चाप्रतिक्रिया " झाली. रामा-अमितने दुर्गवीरचे धैय आणि गडाचा इतिहास सांगु मोहिमेची सांगता केली ...
"हम निचे जिंदा आये ! और आप लोकोने हमारा बहुत खयाल रखा And Durgveer team Doing very gr8 job. " या अश्या प्रतिक्रिया मिळवून आम्हाला आत्मसमाधान मिळाले ..
मीही आपले " भावनिक Touch " वाक्य त्यांना बोलुन मोकळा झालो ..
" आपण चांगल्या कामासाठी गडावर येतो तर तो गडच आपली निगा राखतो , काही इजा करवत नाही तो , उलट काळजी घेतो "
( हे सारं "मिश्र मराठी हिंदीत " बोललो ,so इथे मांडू शकत नाही आणि तुम्हाला कळणार हि नाही )
And Finally ८ कि ९ वेळा निघालेले " सागर टक्के " घरा कडे निघाले ...
हरी हरी...
आता पुढील मोहीम "सुरगड " तारीख ७ ऑक्टोंबर ..
#दुर्गवीर #मृगगड #पाटोळेम्हणे
आडवाटेवरील मृगगड
आमची हत्यारे
घळीतील खडतर वाट
आधीची अवस्था
सुरवात
आधी आणि नंतर प्रकारातील प्रचि
आधी आणि नंतर प्रकारातील प्रचि
पोह्याच्या शुभेच्या
रानातुन मुक्त झालेली सोमजाई देवी
corporate वाले
कापलेले गवत परत कापले म्हणून सुटलेले हश्या
छान उपक्रम.. अभिनंदन..
छान उपक्रम.. अभिनंदन..
सही , अभिनंदन !
सही , अभिनंदन !
khup mast....
khup mast....
वाढलेले गवत कशासाठी कापायचं
वाढलेले गवत कशासाठी कापायचं ते कळलं नाही. ते पण लिहाल का लेखात?
मला स्वच्छता म्हणजे मानव निर्मित कचरा उचलून केलेली स्वच्छता वाटलेली.
त्या कापलेल्या गवताचं काय केलं नंतर?
अमित + १
अमित + १
सुंदर, खूप छान उपक्रम
सुंदर, खूप छान उपक्रम
नमस्कार अमितन , या अश्या आड
नमस्कार अमितन ,
या अश्या आड वाटे वरील गड किल्ल्यावर "मानव ठेवक " कचरा कमी प्रमाणात मिळतो ...
हि मोहीम "गड किल्ले स्वच्छता मोहीम " अंतर्गत राबवली गेली आहे .. शिवकाळात " न्हाणवा " नावाची दरवर्षी मोहीम गडावर राबवली जायची याची नोंद " आज्ञा पत्रात मिळते " तीच मोहीम गडावर दर वर्षी आपल्या माध्यमातून केली जाते , यात आम्हाला स्थानिक लोकांचा मोठा पाठबळ आहे , तसेच काढलेले गवत स्थानिक घेऊन जातात ...
धन्यवाद ..

मी दुर्गवीर - अतिशय छान
मी दुर्गवीर - अतिशय छान उपक्रम खुप शुभेच्छा , तुमच्या मेहनतीला ___/|\___ .
अमितव - असे गवत कापुन टाकल्याने त्यांच्या मुळांपासुन वास्तुला होणारी हानी / पडझड काही प्रमाणात थांबवता येते.
गडवाटा व्हीजिबल होतात / चालण्यास सुरक्षीत होतात (बोल्डर्स अन कडे यांचा अंदाज येतो) .
थोडक्यात झुडपांत गड्प झालेल्या गडाला गडपण येत.
@ ईनमीन तीन, थोडक्यात झुडपांत
@ ईनमीन तीन, थोडक्यात झुडपांत गड्प झालेल्या गडाला गडपण येत.>>> आपण छान माहिती दिलीत. आमच्या मनात तोच प्रश्न उठला होता, कि किल्ल्याची साफसफाई न करता हे आडवाटेची स्वच्छता का करताहेत. म्हणजे असंही असतं तर!
गड्प झालेल्या गडाला गडपण>>> मस्तं नादमधुर वाक्य लिहिलंत. आवडलं!
शिवकाळात " न्हाणवा " नावाची दरवर्षी मोहीम गडावर राबवली जायची>>>> गडसंवर्धनाचेसुद्धा तंत्र असते, हे जाणून आश्चर्य वाटले.
नक्की कोण कचरा करून जातात
नक्की कोण कचरा करून जातात याचा प्रथम शोध घ्यायला हवा.