मिसळ - महाराष्ट्राला पडलेलं एक चवदार स्वप्न!
सौमित्रच्या गारवावाली कुंद पावसाळी हवा असावी, आजूबाजूला हिरवाईनं नटलेला (अर्थ आपल्या सोयीनुसार घ्यावा) परिसर असावा, निवडक मित्रांबरोबर गप्पा रंगलेल्या असाव्यात. मंद झुळुकेसोबत त्याक्षणाला केवळ ‘दैवी’च म्हणता येईल, असा खमंग सुवास सुटावा. क्षणभर डोळे मिटून आपण तो सुवास अनुभवत राहतोय, तोपर्यंत बाळू, पिंट्या, बारक्या असं ‘एरवीचं’ नाव धारण केलेल्या यक्षानं आपल्यासमोर, बादशहासमोर नजराणा पेश करताना आणतात त्या पद्धतीनं ट्रेमध्ये ठेवलेला, उसळीवर मुक्तहस्ते पेरलेल्या शेवफरसाणानं भरलेला चिनी मातीचा बोल, त्याच्यासोबत डोक्यात सुरू असलेले जगातले सगळे विचार तात्पुरते संपवायची ताकद असणाऱ्या रश्श्याचा भलाथोरला वाडगा आणि पांढर्याशुभ्र पावाची जोडी अवतीर्ण व्हावी. त्यासोबत नवपरिणीत वधूबरोबर पाठराखिणीसारख्या येणाऱ्या खमंग तळलेल्या भज्यांची प्लेट आणि अधमुर्या ताकाचा शुभ्र चषक पेश करावा.
आपण जगाचा विचार सोडून काठोकाठ भरलेल्या मिसळ-रश्श्याच्या बोलकडे आणि भज्यांकडे एकदा मन भरून बघत ‘चांगभलं’ म्हणत मिसळीवर ताव मारावा. ताकात चिमटीएवढीच मिठाची कणी घालत त्याचा पेला रिचवावा. 'प्लीज, रिटायर होऊ नकोस रे' अशी विनवणी करायची वेळ आणणाऱ्या गावसकरच्या बॅटिंगसारखी हुरहूर लावत, तरी समाधानानं योग्य वेळेत मिसळीच्या कार्यक्रमाची चवदार सांगता व्हावी. आणि कार्यक्रम न राहता तो मिसळीचा महोत्सवच होऊन जावा...
पुणे फूड फेस्ट सादर करत आहे - ‘पुणे मिसळ महोत्सव’, पुण्यात पहिल्यांदाच. तोही आमराईत.
इथे मिळेल हरतर्हेची मिसळ. गोडसर झाक असलेली पुणेरी मिसळ, कोल्हापूरची झटका देणारी मिसळ, नाशिकची चटकदार मिसळ, बिर्याणी स्टाईल ‘दम’ मिसळ, जैन मिसळ, १००% उपासाची आणि तरीही ‘तर्रीदार’ मिसळ. थोडक्यात, तुम्हांला जशी पाहिजे तश्शी मिसळ! सोबत कांदाभजी, वडे, चहा, कोल्ड कॉफी आणि वेगवेगळी डेझर्टस् तर आहेतच. शिवाय मनोरंजनाचे इतरही बरेच सुखद धक्के असणारेत.
तर पुण्यातल्या पहिल्यावहिल्या मिसळ महोत्सवात सहभागी व्हा, सिंहगड पायथ्याला अगदी खर्या निसर्गाच्या सान्निध्यात. मिसळीचा आस्वाद घ्या, ’टिपीकल’ हॉटेलात नाही, तर मस्त आंब्यांच्या झाडाखाली टेबल-खुर्चीचा जामानिमा मांडून.
नक्की या, कारण एकूणच 'चुकवू नये' अशा काहीपैकी असणार आहे सगळंच.
पुणे फूड फेस्ट आयोजित ‘पहिला पुणे मिसळ महोत्सव’.
आमराई, गोळेवाडी, सिंहगडच्या घाटरस्त्याला जायच्या आधीच उजवीकडे, पुणे - ४११ ०२५.
(मायबोलीकरांना सहज आठवण म्हणून - सिंहगडावरच तेरा वर्षांपूर्वी पहिल्यावहिल्या वर्षाविहाराची सुरुवात झाली होती).
दिनांक - ७, ८, ९ ऑक्टोबर, २०१६.
वेळ - शुक्रवार, दि. ७ ऑक्टोबर - सकाळी ९ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत.
शनिवार, दि. ८ ऑक्टोबर - सकाळी ८ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत.
रविवार, दि. ९ ऑक्टोबर - सकाळी ८ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत.
अंबर मस्त रे. पुढच्या वेळी
अंबर मस्त रे. पुढच्या वेळी मुंबईत कर कि. नक्की येऊ
महोत्सवाला शुभेच्छा ! जमल्यास
महोत्सवाला शुभेच्छा ! जमल्यास मुंबईतही आयोजित करा.>>>> +१००
वा..मूळ धागा आणि त्यावरची
वा..मूळ धागा आणि त्यावरची चिनुक्सची पोस्ट वाचून मोह होतोय पुणे भेट द्यायचा.. माबो पुणेकर मंडळी कधी हजेरी लावणारेत? इथून काही फारसे लांब नाही पुणे.>>>> +१
महोत्सवाला शुभेच्छा!
सगळ्या मायबोलीकरांचे
सगळ्या मायबोलीकरांचे मनापासून आभार ! बराच गडबडीत असल्याने मनातले सगळेच सविस्तर लिहिता येत नाहीये,पण एका अस्सल मराठी पदार्थाला व्यासपीठ द्यायचा एक प्रामाणिक प्रयत्न करतोय .Adminअजय,समीर आणि चिन्मय ह्यांनी मायबोलीचा सहकार्याचा हात आपणहून पुढे केला .
ज्या समूहाविषयी आपल्या मनात प्रचंड आपुलकी,आत्मीयता असते तीच भावना त्या समूहानी आपल्याला दाखवल्यावर कसं वाटतं ते सांगणे मुश्कील आहे भैया ! पण खूप बरं वाटलं एवढंच आत्ता सांगू शकतो.
संपूर्ण कुटुंबाला एकत्र बसवून एक चांगली खादाडीची इव्हेंट करण्याचा हा एक प्रयत्न आहे .मायबोलीचे घरचेच कार्य आहे ,तेव्हा समस्त मायबोलीकरांच्या सहभागाची वाट बघतोय.आलात की आवर्जून भेटा .
{ आमराई पुण्यातून फार लांब नाही .राजाराम पुलापासून साधारण १९ किलोमीटरवर आहे .डहाणूकर कॉलनीपासून वारजे, उत्तमनगर ,NDA ,खडकवासला असे करुनही साधारण तेवढेच अंतर आहे }
कळावे
लोभ असावा
अंबर
दोन्ही यजमानांची आग्रहाची
दोन्ही यजमानांची आग्रहाची आमंत्रणं आली उपस्थितीचा आहेर द्यायला जावंच लागणार आता
पुण्यातल्या माझ्या मुलीला
पुण्यातल्या माझ्या मुलीला सहकुटूंब जावून माझं प्रतिनिधित्व करायला मीं सांगितलं आहेच . मीं सुद्धां हें निमित्त साधून पूणे भेट करावी म्हणतोय.
आयोजकाना शुभेच्छा.
जावूं या ना पुण्याला ! आयोजकाना माझ्यासारख्यांसाठी खास
' पुणेरी पगडी महोत्सव 'ही भरवण्याची कल्पना सुचवतां येईल !!
महोत्सवाला
महोत्सवाला शुभेच्छा!!!
भाऊकाका, लय भारी!
भाऊकाका
भाऊकाका
रविवारची हजेरी नक्की सोबत
रविवारची हजेरी नक्की
सोबत मित्रांना आणले तरी चालेल काय (माबो वर नसणाऱ्या ) ?
विश्या, हा महोत्सव सर्वांसाठी
विश्या,
हा महोत्सव सर्वांसाठी खुला आहे.
@दक्षिणा, मिसळ गटग करायची
@दक्षिणा, मिसळ गटग करायची आयडिया खूप छान आहे. मी अजून कुठल्याही मायबोलीकरांना भेटले नाही. त्यानिमित्त भेटता येईल आणि भेटायला खुप खूप आवडेल.
अर्रे व्वा, मस्तच कल्पना.
अर्रे व्वा, मस्तच कल्पना. नक्की येईन. मायबोलीकरांना कसे ओळखणार पण?
माबोकरांपैकी ज्यांना माबो
माबोकरांपैकी ज्यांना माबो टीशर्ट्स घालून वा माबो बॅग्ज घेऊन यायला जमेल त्यांना गर्दीतही हेरणे बऱ्यापैकी सोपे जाईल.
मस्तच कल्पना आणि शुभेच्छा.
मस्तच कल्पना आणि शुभेच्छा.
कब है मिसल गटग ??
कब है मिसल गटग ??
मी उद्या जायचं म्हणतेय.
मी उद्या जायचं म्हणतेय.
काल मिसळ महोत्सव भेट आणि माबो
काल मिसळ महोत्सव भेट आणि माबो गटग दोन्ही घडले. मिसळ महोत्सवात भारी मिसळी आहेत, सोबतचे जामुन शॉट्स आणि मस्ताना शॉट्स पण भारी.... सिंहगड फेमस दही आम्ही पोचायच्या आधीच संपले असल्याने चाखता आले नाही. बच्चे कंपनीने भरपूर धमाल करून घेतली. सध्या आमराईत आम नसल्याने आमराई वाचली नाहीतर बच्चेमंडळी माकडांसारखी झाडावर चढलेली होतीच, त्यांनी आंबे काही ठेवले नसते.
एकूण मिसळ महोत्सव जोरात सुरु आहे, आज सुट्टीचा दिवस असल्याने अजून धमाल येणार हे नक्की.
ओह, काल झाले का गटग मी आज
ओह, काल झाले का गटग
मी आज जायचा बेत करत होते
अरे आजही काही जण जाणारेत.
अरे आजही काही जण जाणारेत. कालचे एकदम मिनी गटग होते. आज खूप जण जमुन जा आणि मजा करा. आत्ता सई असेल तिथे. ती आज सकाळी 8 वाजता परत जाणार होती.
मज्जा आली! आज सकाळी मिसळ
मज्जा आली! आज सकाळी मिसळ महोत्सवाला हजेरी लावली!
आज सकाळी मिसळ महोत्सवाला भेट
आज सकाळी मिसळ महोत्सवाला भेट दिली. खमंग मिसळी, मायबोलीकरांशी गप्पा, हिरवीगार आमराई व त्यात उठून दिसणारी लाल पांढऱ्या रंगसंगतीची बैठक व्यवस्था, बाजूच्या भातशेतीतल्या इंद्रायणी वाणाचा सुगंधी दरवळ व त्यात मिसळलेला दम-जैन-उपास-तर्रीदार-मस्तीवाल्या मिसळींचा संमिश्र झणका, निसर्गरम्य परिसर व मजल दरमजल करत आल्यामुळे खवळलेली भूक!! क्या कहने!!
अंबर कर्वेंशी ओळख झाली, मस्ती मिसळीच्या एका मालकांशी त्यांच्या जामुन शॉट्स बद्दल वार्तालाप केला. तुडुंब चरले. पोटोबा व मन तृप्त करून पुन्हा म ज ल द र म ज ल करत घरी!
१) २) ३)
१)
२)
३)
वॉव.. सुपर भारी आहे मिसळ
वॉव.. सुपर भारी आहे मिसळ महोत्सव ची कल्पना...
अकु.. लाजवाब फोटोज.. बघतानाही तोंपासु होतंय
निसर्गरम्य परिसर
निसर्गरम्य परिसर
अरुंधती एकदम खल्लास फोटो
अरुंधती एकदम खल्लास फोटो
अकु, सुंदर फोटो... पुण्यात
अकु, सुंदर फोटो...
पुण्यात येऊनही महोत्सवाला जाऊ नाही शकलो मी!!
अकु, एकदम टेम्प्टिंग फोटो.
अकु, एकदम टेम्प्टिंग फोटो.
मस्त मस्त!!
वॉव फोटो भारीच.
वॉव फोटो भारीच.
मी शनिवारी सकाळी लवकर जाग
मी शनिवारी सकाळी लवकर जाग आल्याने कॅमेरा घेऊन सिंहगड पायथ्याला निघालो. खूप वेळ एकटच फिरलो व सुंदर निसर्ग पाहुन परत आलो. घरी येईपर्यंत डोक्यात हे आलेच नाही की इथेच मिसळ महोत्स्वच चालु आहे. माठपणा केला व एका सुंदर संधीला मुकलो.
छान फोटो!!! केपी, मी तुमच्या
छान फोटो!!!
केपी, मी तुमच्या फोटोंची वाट पाहत होतो. मला वाटले तुम्ही मिसळ महोत्सवाला हजेरी लावणारच.
Pages