Submitted by सायो on 17 September, 2016 - 12:44
ठिकाण/पत्ता:
शनिवारवाडा, न्यूजर्सी.
(योग्य वेळ येताच पत्ता मिळेल. शेजारीपाजारी बेल वाजवून 'शनिवारवाडा हाच का?' म्हणून चौकशी करू नये)
कोजागिरी निमित्ताने मसाला दूध गटग यंदा शनिवारवाड्यात करण्याचे योजिले आहे. प्रत्येकाने घरून मसाला आणि दूध घेऊन यावे. कप आमच्याकडे मिळतील. दुसर्यांदा मसाला दूध प्यावेसे वाटल्यास एक्स्ट्रा चार्ज पडेल.
माहितीचा स्रोत:
तो आणि कशाला हवाय?!
प्रांत/गाव:
तारीख/वेळ:
शनिवार, October 15, 2016 - 12:40 to Tuesday, October 18, 2016 - 12:00
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
दुध थंड झाले की काय?
दुध थंड झाले की काय?
लोकांनी रजिस्टर केलं की
लोकांनी रजिस्टर केलं की उकळायला ठेवणार. थंड करायला/व्हायला वेळ आहे अजून.
बर, साधारण किती वाजता
बर, साधारण किती वाजता भेटण्याचा प्लान आहे?
कोजागिरी म्हणजे लेट भेटायचं
कोजागिरी म्हणजे लेट भेटायचं आहे का? पण मग साउथीजना घरी जायला उशीर होईल. अर्थात एबाबांनी बस काढली तर कुछ हो सकता हय.
मी विचार करत होते साधारण ५ ची
मी विचार करत होते साधारण ५ ची वेळ ठरवूया. चालेल?
बामा सुमडीत येऊन रेजिस्टर
बामा सुमडीत येऊन रेजिस्टर करून गेल्या काय?
लवकर निघायचं ठेवा बर्का नाही तर मला परत यायला फार उशीर होतो. गेल्या वेळी शेवटचे धा मिन्ट अनावर झोप येत होती.
पांढरे कपडे का?
पांढरे कपडे का?
बायांनी केस धुवा त्यादिवशी
बायांनी केस धुवा त्यादिवशी म्हणजे सोडता येतील. पांढरी साडी, ड्रेस आपला आणा. मेणबत्त्या मी देईन. पांढरे कपडे घालून, केस सोडून हातात मेणबत्ती घेऊन नेबरहूडात चक्कर टाकणं हे सांकात अॅड करता येईल हव्म तर.
नेबरहूडात कशाला? घरीच आयेगा
नेबरहूडात कशाला? घरीच आयेगा आनेवाला पार्ट टू करून टाका. बुवांनां दादामुनींचा रोल द्या.
अर्र सशल, आजूबाजूच्यांना
अर्र सशल, आजूबाजूच्यांना घाबरवायचंय, घरातल्यांना नाही.
घरातले नाही पण दादामुनींना
घरातले नाही पण दादामुनींना घाबरवा.
आजूबाजूच्यांना घाबरवायचंय,
आजूबाजूच्यांना घाबरवायचंय, घरातल्यांना नाही>>>
हडळी
>>> बायांनी केस धुवा
>>> बायांनी केस धुवा त्यादिवशी म्हणजे सोडता येतील.
म्हणजे? केस तुमच्याकडे सोडून जायचं?!
स्वाती, सोडणे हे त्या
स्वाती, सोडणे हे त्या वाक्यातील इतरही शब्दांबाबत वापरलेले असू शकते
कोजागिरी की कोजागिरी और
कोजागिरी की कोजागिरी और हॅलोविन का हॅलोविन
फा छू छू मंतर
ज्युईश न्यू इयरच्या म्हणजेच
ज्युईश न्यू इयरच्या म्हणजेच रोशोशानाच्या सुमुहूर्तावर मेन्यूची चर्चा करायला घेऊया.
माझ्यासकट सर्वांच्या
माझ्यासकट सर्वांच्या कीबोर्डाच्या वाफा त्या न झालेल्या गटगच्या बाफवर सोडून झाल्याने इथे वर्दळ दिसत नाही. नाहीतर आत्तापर्यंत १२००-१३०० पोस्टी यायला हव्या होत्या.
हो ना आलीच की वो तारीख! वंदू
हो ना आलीच की वो तारीख! वंदू बेन / हसू बेन काय म्हनतेत ?
हो तेच, वायफळ गप्पा मारून
हो तेच, वायफळ गप्पा मारून दमली मंडळी.
मी- भेळ, मसाला दूध.
भेळे करता फरसाण कुठले वापरता?
भेळे करता फरसाण कुठले वापरता?
फरसाण नाही, रेडी भेळ मिक्स
फरसाण नाही, रेडी भेळ मिक्स आनंद ब्रँडचं.
>> भेळे करता फरसाण कुठले
>> भेळे करता फरसाण कुठले वापरता?
आमच्या मुंबईत कित्येक भैय्ये भेळेत फरसाण घालतच नाहीत. कुरमुरे, कांदा, बटाटा, टोमॅटो, कोथींबीर, चटण्या, लिंबू, चुरलेल्या पुर्या आणि वरून शेव. (तसा इथे काही संबंध नाही, उगीच एफ वाय आय)
सायो विचारलं कारण घरी भेळ
सायो विचारलं कारण घरी भेळ करताना नेहमी डोंबिवली हुन आणलेलं फरसाण च खाल्लं गेलंय.
इथले दीप्/मिर्च्मसाला/बॉम्बे भेल/आनंद वगैरे वापरुन बघितले नव्हते.
आनंद ची प्रॉड्क्ट्स चांगली असतात. मेनली स्प्यासी लिहिलेल्या गोष्टी स्पायसी असतात. स्पायसी मिक्स्चर खरंच असते
आता नवरात्र संपलं की आनंद चं स्पायसी भेल मिक्स आणुन बघतो.
आनंद ब्रांडचं कुठलं हे पण आता
आनंद ब्रांडचं कुठलं हे पण आता विचारतो. गेल्या टायमाला आनंदचं एक भेळ मिक्स आणलं तर त्यात इतका जास्त कडक स्टफ होता (महा कडक तळलेली डाळ महा कडक पुऱ्या आणि काय काय).
नेक्स्ट टायमाला नुसते पिवळ्या रंगाचे कुरमुरे आणि बारीक शेव वालं पाकीट आणणारे.
मॅक्स, फरसाण हल्दीरामचं मिक्स (का कायश्या अशाच) नावाचं चांगलं आहे. कॅनडात त्याचं पर्पल पाकीट होतं इकडे येई येईतो रंग बदलू झाला.
सुरतीचं ताजं असेल तर चांगलं असतं, पण ते फालतू पिशव्यात विकतात त्यामुळे हमखास वास येणारं अत्यंत बेकार असतं.
डोंबिवलीहून फरसाणच्या ऑर्डर घेण्यात येत आहेत. संपर्क साधा.
मला वाटलं आनंद म्हणजे त्या
मला वाटलं आनंद म्हणजे त्या आपल्या ह्यांच्याबद्दल काही आहे. त्या ब्रँडच्या गोष्टी स्पायसी असणारच.
>> ह्यांच्याबद्दल नावं
>> ह्यांच्याबद्दल
नावं घ्यायला लाजू नका. उखाण्यात घ्या हवं असेल तर
मॅक्स, सॉरी, आनंद नाही,
मॅक्स, सॉरी, आनंद नाही, बॉम्बे किचनचं बॉम्बे भेल- स्पायसी लिहिलेला पॅक आहे.
लंच टायमाला की सांजच्याला
लंच टायमाला की सांजच्याला आहे गटग ?
वेन्यूचा झिप कोड टाका ना प्लीज. म्हणजे ड्रायविंग किती करावं लागेल तो अंदाज येईल
ए बावळटांनो, जेमतेम दहा दिवस
ए बावळटांनो, जेमतेम दहा दिवस उरलेत. मेनु व झिप कोड टाका !
मागच्या वेळी अख्खा आड्रेस
मागच्या वेळी अख्खा आड्रेस दिला होता तर तरी तुम्ही बाहेरच्या बाहेर कलटणार होतात. आता नुसता झिप कोड दिला तर तुम्ही निस्त्या लिविंग्स्टनच्या पेरीफेरीवर फेर्या मारत बसाल, गरागरा गरागरा.
Pages