मायबोली गणेशोत्सव २०१६ : स्पर्धांचे निकाल

Submitted by संयोजक on 27 September, 2016 - 05:35

मायबोली गणेशोत्सव २०१६ अंतर्गत यंदा 'मायबोली मास्टरशेफ' ही पाककृती स्पर्धा तसेच 'संगीतक हे नवे' ही विनोदी लेखनस्पर्धा अश्या दोन स्पर्धा आयोजित केलेल्या होत्या. या दोन्ही स्पर्धांना मायबोलीकरांनी भरभरून प्रतिसाद दिला. यंदा आलेल्या 'मायबोली स्पेशल' पदार्थांच्या प्रवेशिकांमधून गोड आणि तिखट असे दोन विभाग करून सर्वाधिक मते मिळवण्यार्‍या पहिल्या तीन प्रवेशिका विजेत्या म्हणून घोषित कराव्यात असा निर्णय संयोजक मंडळाने घेतलेला आहे. स्पर्धांचे विजेते अर्थातच मायबोलीकरांकडून झालेल्या मतदानानुसार निवडले आहेत.

तर विजेते आहेत -

मायबोली मास्टरशेफ - पाककृती स्पर्धा

'तिखट' मास्टरशेफ

१) पहिला क्रमांक - धनि - 'येडा बटाटा'

२) दुसरा क्रमांक - भरत. - 'मिर्चीवडा'

३) तिसरा क्रमांक - कृष्णा- 'मका मस्तवाल पकोडा'

'गोड' मास्टरशेफ

१) पहिला क्रमांक - बाईमाणूस - 'मलई बदाम मटका विथ लेमन झटका'

२) दुसरा क्रमांक - आशिका - 'मका बेसन शाही रोल्स'

३) तिसरा क्रमांक - मनीमोहोर - 'पॅनकेक सँडविच'

संगीतक हे नवे - विनोदी लेखनस्पर्धा

१) पहिला क्रमांक - ऋन्मेऽऽष - रिक्शावाला आणि मी!

२) दुसरा क्रमांक - अमा - रिक्शावाला आणि मी!

३) तिसरा क्रमांक - आशिका - मी टिळकांशी बोलते

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सर्व विजेत्यांचे अभिनंदन .

पॅन केकला मत दिलेल्या सर्वांचे खूप खूप आभार

संयोजकांना मनापासून धन्यवाद .

एक नोटीस केलंत का ? मास्टर शेफ ( तिखट ) मधले सगळे विजेते हे पुरुष आय डी आहेत . छान वाटतंय . काळ चांगल्या अर्थाने बदलतोय .

आशिका , तुझं डबल अभिनंदन !

धन्यवाद सर्वांना.
इतर विजेत्यांचेही हार्दिक अभिनंदन !
मायबोली प्रशासन आणि संयोजकांचेही आभार
>>>>>>
+७८६

अगदी याच भावना माझ्या मनात होत्या पण शब्द सुचत नव्हते, आपण नेमके माझ्या मनातील विचार लिहिलेत Wink

>> पोलची वाट बघत आहे.
>>>>

पियु, थोडासा द्विधा मनस्थितीत गुरफटलोय.
मला मत देणार्‍यांनी नक्की त्या ऑफरच्या मोहात मत दिलेय की माझ्या प्रेमापोटी याबाबत गोंधळलोय,
त्यामुळे जर कोणी ऑफरकडे बघून मत दिले असेल तर त्यांना मी पोल काढायची विनंती करतो.
जर पोल नाहीच निघाला तर कोणी त्या ऑफरच्या मोहाने मत दिले नव्हते हे आपसूकच सिद्ध होईल Happy

मास्टर शेफ ( तिखट ) मधले सगळे विजेते हे पुरुष आय डी आहेत . छान वाटतंय . काळ चांगल्या अर्थाने बदलतोय
>>>>>
बहुतांश हॉटेलमध्ये मास्टरशेफ हे पुरुषच असतात. अगदी नाक्यावरच्या हॉटेलपासून वडापावच्या गाडीवर वडे तळणाराही पुरुषच असतो. प्रश्न आहे घरकाम म्हणून स्वयंपाक करायचा Happy

मात्र ओवरऑल काळ बदलतोय आणि ते चांगले आहे याच्याशी सहमत Happy

सर्व विजेत्यांचे अभिनंदन. या स्पर्धेत उत्साहाने भाग घेऊन आपापल्या प्रवेशिका व छायचित्रे अपलोड करणार्‍या सर्वच स्पर्धकांचेही आभार व अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा ! ज्यंना पारितोषिक मिळाले नाही वा केवळ थोडक्यात हुकले त्यांनीही नाऊमेद होऊ नये. प्रत्येक मोठ्या प्रवासाची सुरुवात छोट्याश्या पावलानेच होते ही चिनी म्हण आहे. कुणी सांगावे, आपल्यातलाच एखादा संजीव कपूर वा पद्मा लक्ष्मी होईल!
अनंत आमुची ध्येयासक्ती
अनंत अन आशा,
किनारा तुला पामराला.

संयोजकांचे आभार !

ता क : फिल्मफेयर मध्ये बेस्ट डेब्यू असतो तसा एखादा पुरस्कार पुढच्या स्पर्धेत ठेवता येइल का?

सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन!

मास्टर शेफ ( तिखट ) मधले सगळे विजेते हे पुरुष आय डी आहेत . छान वाटतंय . काळ चांगल्या अर्थाने बदलतोय
>>>>>
बहुतांश हॉटेलमध्ये मास्टरशेफ हे पुरुषच असतात. अगदी नाक्यावरच्या हॉटेलपासून वडापावच्या गाडीवर वडे तळणाराही पुरुषच असतो. प्रश्न आहे घरकाम म्हणून स्वयंपाक करायचा स्मित >> खरय, कारण घरकाम म्हणून केलेल्या स्वयंपाकाचे पैसे मिळत नाहीत.

विजेत्यांचं अभिनंदन!
संयोजकांचे आणि सर्व स्पर्धकांचे आभार.

इथे विजयी झालेले पुरुष आयडी काही व्यवसायाने शेफ नाहीयेत तरी ही त्यांनी ह्यात रस घेतला आणि बक्षीस हि मिळवलं हे बदल झाल्याचं द्योतक आहे असं मला म्हणायचं होतं .

सर्व विजेत्यांचे तसेच इतरही सर्व स्पर्धकांचेहि हार्दिक अभिनंदन !!! 'पाककृती स्पर्धा' आणि 'संगीतक हे नवे - विनोदी लेखनस्पर्धा' यातील सर्वच एकापेक्षा एक सरस होते..... छान वाटले.... बच्चे कंपनीचा बाप्पा रंगवण्याचा कार्यक्रम तसेच इतरही सर्व आयोजन अतिशय सुंदर झाले....

आयोजक - प्रशासकांचे मनःपूर्वक अभिनंदन !!!!

वाह.. सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन!!!!!!!

दरवर्षी विविध स्पर्धां , अभिनव कल्पकशक्ती वापरून आयोजित करणार्‍या संयोजकांचे कौतुक करावे तितके थोडेच!!!!

Run mesh, पोल तु स्वत:च काढणार होतास ...

सर्व विजेत्यांच अभिनंदन!

सर्व विजेत्यांचे, सहभागी स्पर्धकांचे आणि आयोजकांचेही मनापासून अभिनंदन Happy
आशिका, तुझ डबल अभिनंदन.

सर्व विजेत्यांचे व सहभागी स्पर्धकांचे हार्दिक अभिनंदन!
तसेच आयोजकांचेही मनापासून अभिनंदन व आभार!

Pages