मायबोली गणेशोत्सव २०१६ : स्पर्धांचे निकाल

Submitted by संयोजक on 27 September, 2016 - 05:35

मायबोली गणेशोत्सव २०१६ अंतर्गत यंदा 'मायबोली मास्टरशेफ' ही पाककृती स्पर्धा तसेच 'संगीतक हे नवे' ही विनोदी लेखनस्पर्धा अश्या दोन स्पर्धा आयोजित केलेल्या होत्या. या दोन्ही स्पर्धांना मायबोलीकरांनी भरभरून प्रतिसाद दिला. यंदा आलेल्या 'मायबोली स्पेशल' पदार्थांच्या प्रवेशिकांमधून गोड आणि तिखट असे दोन विभाग करून सर्वाधिक मते मिळवण्यार्‍या पहिल्या तीन प्रवेशिका विजेत्या म्हणून घोषित कराव्यात असा निर्णय संयोजक मंडळाने घेतलेला आहे. स्पर्धांचे विजेते अर्थातच मायबोलीकरांकडून झालेल्या मतदानानुसार निवडले आहेत.

तर विजेते आहेत -

मायबोली मास्टरशेफ - पाककृती स्पर्धा

'तिखट' मास्टरशेफ

१) पहिला क्रमांक - धनि - 'येडा बटाटा'

२) दुसरा क्रमांक - भरत. - 'मिर्चीवडा'

३) तिसरा क्रमांक - कृष्णा- 'मका मस्तवाल पकोडा'

'गोड' मास्टरशेफ

१) पहिला क्रमांक - बाईमाणूस - 'मलई बदाम मटका विथ लेमन झटका'

२) दुसरा क्रमांक - आशिका - 'मका बेसन शाही रोल्स'

३) तिसरा क्रमांक - मनीमोहोर - 'पॅनकेक सँडविच'

संगीतक हे नवे - विनोदी लेखनस्पर्धा

१) पहिला क्रमांक - ऋन्मेऽऽष - रिक्शावाला आणि मी!

२) दुसरा क्रमांक - अमा - रिक्शावाला आणि मी!

३) तिसरा क्रमांक - आशिका - मी टिळकांशी बोलते

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

ऋन्मेऽऽष | 13 September, 2016 - 22:57
धन्यवाद स्मित

आता ही स्पर्धा असल्याने वोट अपील करायला हरकत नाही डोळा मारा

मत देणार्‍या मायबोलीकरांसमोर दोन ऑफर ठेवतो,

ऑफर क्रमांक एक -
१) जर मी पहिला आलो, तर एका आठवड्यात मायबोली सोडून जाईन
२) जर दुसरा आलो, तर दोन महिन्यांनी मायबोली सोडून जाईन
३) जर तिसरा आलो तर तीन वर्षांनी मायबोली सोडून जाईल.
यापैकी काहीच न झाल्यास ............ झेला आयुष्यभर स्मित

ऑफर क्रमांक दोन -
१) जर मी पहिला आलो, तर वर्षाला एकच धागा
२) जर मी दुसरा आलो, तर महिन्याला दोनच धागे
३) जर मी तिसरा आलो तर आठवड्याला तीनच धागे
यापैकी काहीच न झाल्यास ............ दिवसाला एक धागा... आणि रात्रीला आणखी एक धागा स्मित

तळटीप - स्पर्धेचा निकाल माझ्या बाजूने लागल्यावर तुम्हाला कोणती ऑफर हवीय यासाठी स्वतंत्र पोल काढण्यात येईल

>> पोलची वाट बघत आहे. Proud

धन्यवाद सर्वांना.

इतर विजेत्यांचेही हार्दिक अभिनंदन !

मायबोली प्रशासन आणि संयोजकांचेही आभार

सर्व विजेत्यांचे अभिनंदन.

मिर्ची वड्याला मत देणार्‍या सगळ्यांचे आभार. रेसिपी करून मग पावती मिळाली तर आणखी छान वाटेल.

डोकं लढवायला लावल्याबद्दल संयोजकांचे आभार.

हे व्यासपीठ उपलब्ध करून देणार्‍या मायबोली प्रशासनाचेही आभार.

Pages