कुछ रंग प्यार के ऐसे भी - सोनी वाहिनीवरची नवीन मालीका

Submitted by मिरची on 29 June, 2016 - 03:38

कुछ रंग प्यार के ऐसे भी सोनी वाहिनीवरची ९.३० वाजता प्रक्षेपित होणार्‍या मालिकेविषयी चर्चा करण्यासाठी हा धागा. कोण कोण बघतं हि मालिका? कशी वाटतेय?

नायक-नायिका आणि सर्वच कलाकार अतिशय उत्तम करत आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे फारशी वास्तवापासून दूर न जाता ही मालिका सादर केली आहे...अजूनतरी....

सहज सुंदर अभिनय व संवाद या मालीकेची बलस्थानं वाटतात...

कलाकार - शहीर शेख, एरिका फर्नांडीस, सुप्रिया पिळ्गावकर

krp.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Natashyachya veles pan Supriya aswastha aste, pan te arrange marriage aste so khup insecure naste. Pan sonachya veles pharach insecure hote. Aadhi pan jeva jeva dev chya lagnachya vishay nighto teva ti talate " Abhi woh baccha hai"

Aata sudhha ti tyachya sathi mulgi baghat nahi, sonala mulga suchwate.

Asha kahi aaya astat jya sunebaddal jealous feel kartat aani mulala share karayala tayar nastat. Kahi examples aaikali aahet aani 1-2 tar pahili aahet.

Sadhya mazi favorite serial aahe hi, kahe la bye kel mi

आज सोना पण मस्त सुनावून गेली... + ११११११११११

सगळेच मस्त काम करतात ह्या मालिकेत. देव त्याची घालमेल खूप छान दाखवतो. मामाची नजर पण एकदम बोलकी आहे.

सध्याची फेवरेट शिरेल ही माझी.

देवची घालमेल का होतेय आता? +१
आणि हे कबुल करण्याऐवजी, शोना ये शादी करके खुश नहीं रहेगी म्हणतोय..
मला जय सोनी ही आवडतो. शेवटी देव-शोना ही जोडी परत जमल्यावर जय परत एकटा राहणार.. so sad..
मला ही नवीन जोडी ही चालेल..

हो, न्हालं घोडं गंगेत. देवने सोनाचा साखरपुडा तोडून, सोनाने त्याल दारूच्या नशेत घरी सोडलं. मग मुलाची अवस्था पाहून ईश्वरी (सुप्रिया) हेवाली आणि तिने कसंही करून आपल्या मुलाला जे हवं (त्याचं प्रेम) ते मिळवून द्यायचंच या निर्धाराने सोनाक्षीच्या घरी जाऊन त्यांच्यासमोर पदर पसरून 'रिश्ता' मागितला. सोनाचे बाबा फार काही खुश नाहीत, ना त्यांचा देव व त्याच्या आईवर विश्वास आहे. पण मुलीच्या आनंदासाठी ते लग्नाला तयार होतात आणि मग सगळीकडे आनंदीआनंद.
पण एवढं सुखासुखी लग्न होऊ देतील तर मग पुढे काय दाखवणार ? यासाठीच मालिकेत ईश्वरीच्या आत्तेसासूचं आगमन झालं असून ती आता पदोपदी सोनाक्षीमध्ये उणिवा काढणार आणि ईश्वरीला ऐकवणार की ही मुलगी चांगली नाही, तू चूक केलीस तिला निवडून. आणि त्यातच सोनाक्षीच्या पोटात दुखायला लागतं आणि तिला डॉक्टरांकडे घेऊन जातात. देव रिपोर्ट्स घ्यायाला जातो तेव्हा डॉक्टर सांगतात की xyz कारणांमुळे सोनाक्षी आई बनू शकण्याचे चान्सेस अगदी कमी आहेत..
हे ऐकून हबकलेला देव, आईला ही न्यूज द्यायला निघतो.. & to be continued... अजून १ वर्ष तर सहज चालेल ही मालिका... Happy

रच्याकने, मुलं खरोखरचं आईचं खूप ऐकतात आणि आया मुलांबद्दल खूपच पझेसिव्ह असतातं. मुलीचे आई-वडीलही तिच्यावर प्रेम करतात नाही असं नाही पण मुलाच्या आई-वडिलांना मुलगा म्हणजे त्यांची प्रॉपर्टी वाटतो, जाम हक्क गाजवतात ते, हे मी स्वत: अनेक उदाहरणांमधून पाहिले आहे...!

बरोबर. पुढे काय दाखवायच म्हणुन पाणी घालायला सुरुवात. सोनाला मुल न होणं, आत्याबाई. पुढे ते रिपोर्ट दुसर्याच पेशंटचे होते असं दाखवतील.

Pre nuptial agreement राहिलच. देवने सह्या केल्यात. पाणी वाढवायची सोय.

नाही. देव, सोनाचे आईबाबा कोणालाच मान्य नाही. सुप्रिया बाईंनी देवची सही फसवुन घेतलिये.

सोनाला माहितच नाहिये बहुतेक.

काल जाम डोक्यात गेली सुप्रिया आणि देव... काय म्हणे वंशाचा दिवा हवा, पोताच हवा, तरंच घरी येईन.. ! इथे यांची सून स्वत: डॉक्टर आहे, मुलचा एवढा मोठ्ठा बिझनेस आहे, तरी हे लोकं असून जुन्या काळातच जगतात. समजा नाही झालं एखादीला मूल तर मग काय एवढं बिनसलं? दत्तक घेता येईल किंवा एखाद्या मुलाची/ मुलीची आर्थिक, तसेच शिक्षणाची जबाबदारी घेता येईल ना..!

आता बरीच वर्ष पुढे गेलीय ही मालिका.. आता दोघांचा डिवोर्से झालाय.. त्यांना मुलगी पण आहे.. आता तीच्यावरुन भांडण.... पाणीच पाणी चहूकडे...

Pages

Back to top