पुण्यात संगमवरी देवघर कुठे मिळेल?

Submitted by हर्ट on 18 October, 2013 - 01:39

मित्रान्नो, पुण्यात संगमवरी देवघर कुठे मिळेल? नक्की असा पत्ता सांगा मी इथे अगदी नवनवीन आहे.

धन्यवाद मित्रान्नो.

बी

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नक्की पत्ता नाही माहीती मला. पण बरच वेळा अशी दुकाने हायबेच्या कडेला पाहीली आहेत मी....
चांदणी चौकाकडून कात्रजकडे बायपासने जाताना डाव्या हाताला साधारणपाणे सिंहगड रोडच्या थोडे मागे पुढे आहे अस आठवतय.... तसेच औंध आणि चिंचवड-डांगे चौक वाटेवर पण आहेत.....

लाकडी हवी असल्यास अलका टॉकीज पाशी कुलकर्णी पेट्रोल पंपासमीर पण २ -३ चांगली दुकाने आहेत.... साधारणपणे ५०००-१२००० अशी पडतात.. पण design चांगले आहेत... मला असे पण कळले होते की अशीच लाकडी देवघरे कोल्हापूरला देवळाजवळ चांगली व स्वस्त मिळतात (खखोदेजा)....

अजुन एक नवीन प्रकार म्हणजे काचेचे देवघर.... फारसा प्रचलित नाहिये, पण मस्त दिसते....

तसेच Jabongच्य siteवर पण पाहीली आहेत मी... मी Order केलेल्या आतापर्यंतच्या सर्व वस्तू तरी त्यांच्याकडून वेळेवर व नीट Deliver झाल्या आहेत....

जुना MUMBAI-PUNE highway - Toll नक्याचया अलिकडे . मी ११००/- ला घेतला होता. रोड साइड ला घेतला होता. २.५ फीट उन्च.

PuNyaat nemakaa kuThe aahes tu? kaaLevaaDi phaaTyaa javaLa shekaDo prakaachi devaghara.n miLataatil.

बी, तुम्ही अनेक वस्तु कुठे कुठे मिळेल, इ. प्रश्न विचारलेत. (ते छानच आहे) पण तुम्ही कुठून आणि काय घेतलेत, त्याबद्दलचे तुमचे अनुभव लिहिलेत तर पुढे ही माहिती शोधणार्‍यांना तसेच ज्यांनी माहिती दिली आहे त्यांनाही उपयोग होईल.

संगमरवरी देवळे तुम्हाला पुण्याहून औंधमार्गे थेरगाच्या डांगे चौकाकडे जातांना जगताप डेअरीच्या थोडे पुढे गेल्यावर रस्त्याचे डाव्या बाजूला मिळतील.

कात्रज डेपोकडून धायरीकडे जाताना एक डीमार्टची शाखा सुरु झालेली आहे (पुणे- बंगळूरु महामार्गावर) ! त्याच्या जवळपास (महामार्गाच्या दोन्ही बाजुस ) खुप दुकाने (वर्कशॉप्स) आहेत संगमरवराचे काम करणारी. तिथे मिळतात संगमरवरी देवघरं !!

पुण्यात लाकडी देवघर कुठे मिळेल - शक्यतो गावात किंवा कोथरूड / कर्वेनगर परिसरात ?
आम्ही २"X२" चा बॉक्स करून घेतलाय - ८ इंचाचा drawer आणि वरून marble

मला वाढदिवसाचं सामान मिळतं ती गल्ली माहिती आहे.>>>

ती गल्ली आणि तिला समांतर असणारी कपड्यांची गल्ली ह्यांना जोडणारी एक लेन आहे तिथे तो खरे तर तिथेच बनवतो लाकडाच्या निरनिराळ्या वस्तु कारखानाच आहे तो..