बार बार देखो

Submitted by समीरपाठक on 14 September, 2016 - 11:57

निर्माता धर्मा प्रोडक्शन्स (जोहर फॅमिली) आणि रितेश सिधवानी, फरहान अख्तर नवीन चित्रपट घेऊन आलेले आहेत, बार बार देखो. काही वर्षांपूर्वी करण जोहरच्याच सुपरस्टार शाहरुख खानच्या “कभी अलविदा ना केहना” मध्ये पण एका चांगल्या कन्सेप्टची निरर्थक हाताळणी मुळे वाट लागली होती, त्या अनुभवाची आठवण धर्मा प्रोडक्शन्सला ‘बार बार देखो’ करून देणार हे नक्की.

वास्तविक बघता comparatively वेगळी कल्पना होती. प्रेमात पडलेले जोडपे लग्न करण्याचा निर्णय घेते आणि या निर्णयात नवरदेवाची महत्वाकांक्षा आड येऊन लग्न तुटते. या कथेला भूत-भविष्य-वर्तमान या तिन्ही काळात निर्माता-दिग्दर्शकाने फिरवण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा प्रयत्न लोकांना कितपत आवडतो यावर कमर्शियल याचे यश अवलंबून असेल.

सिद्दार्थ मल्होत्रा (करण जोहरचे “स्टुडंट ऑफ इयर”चे फाईंड) आणि कतरीना कैफ ये दोघे नायक नायिका म्हणून कहाणीला लाभलेले आहेत. कहाणी जरा वेगळी होती, भूतकाळात गुंतून न राहता आणि भविष्य काळाची व्यर्थ चिंता न करता वर्तमान काळाला पूर्ण 100% देऊन वर्तमान काळाला जगा असा संदेश देण्याचा लेखक श्री राव यांचा प्रामाणिक प्रयाण होता. मान्य कि सिद्धार्थ मल्होत्राने प्रयत्न पूर्ण केला पण तो पुरा पडला नाही. माझ्या मते तो एक चांगला मॉडेल आहे. त्याने कॅमेऱ्यासमोर येऊन आठ-दहा फोटो काढून निघून जाण्यातच त्याची भलाई आहे. 'आपण अभिनय करू शकतो' असा आव त्याने आणू नये. अभिनेत्री कतरीना कैफ बद्दल काय लिहिणार, सुपरस्टार सलमान खानच्या मुळे वर आलेली एक व्यक्ती. इतक्या वर्षांनंतरहि इंग्रजी-हिंदी भाषेतले ट्रान्सफॉर्मेशन अभिनयात तिला जमू नये??

नित्या मेहरा या नवीन दिग्दर्शकाचे दिग्दर्शन बार बार देखो ला मिळालेले आहे. नित्या मेहरा या सहपटकथा लेखकही आहेत. दुर्दैवाने हे सोडून त्यांच्याबद्दल सांगण्यासारखे काहीही विशेष नाही.
बऱ्याच ठिकाणी त्यांची अननुभवी हाताळणी नडली असे बघताना वाटून जाते पण नंतर नेटवर फिरताना मला लक्ष्यात आलं कि अनिल कपूरच्या '24' या मालिकेच्या दिग्दर्शकही त्याच आहेत. म्हणजे "बंदी मे दम है" अगदीच नवीन नाही. कहाणीचा ठिसूळपणा हाच वाट लागण्यामागे मुख्य मुद्दा असावा.

करण जोहर ने एक दोन नव्हे चक्क पाच संगीतकारांच्या वेगवेगळ्या गाण्यांसाठी उपयोग केलेला आहे. आणि फॉरेन लोकेशन्स वगेरे वगेरे (पडद्यावरील) श्रीमंती थाटमाटहि करण्यात कसूर केलेली नाही. पण.....
कोणताही सिनेमा का बघावा किंवा का बघू नये हा प्रतीकांचा वैयक्तिक प्रश्न असतो. मला बार बार देखो मध्ये कतरीना कैफचा 'भारतीय लूक' हि गोष्ट सोडून इतरही काहीही उल्लेखनीय जाणवले नाही. मला समजले नसेल असे असेल कदाचित, पण मी अर्धा स्टार (1/2*) 'बार बार देखो' ला देईन बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा.

-समीर

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला सिद्धार्थ मल्होत्रा चा अभिनय सोडला तर बाकी पिक्चर आवडला. चांगली कन्सेप्ट आहे आणि खुप मेलोड्रामॅटिक न करता मांडणी नीट जमली आहे.

मला पण चित्रपट आवडला. कतरिना कडून अभिनयाच्या फारश्या काही अपेक्षा न ठेवल्यामुळे अपेक्षाभंग झाला नाही. कथा चांगली मांडलिये, पण उत्तरार्धात थोडा स्लो वाटला.
एकंदरित वेगळ्या धाटणीचा पण एकदा तरी पाहावा असा चित्रपट आहे. दुसर्‍यांदा पाहताना कदाचित पुढे काय होणार आहे, हे माहित असल्यामुळे बोअर होईल असे वाटते.

पाहिला नाही. पण एकंदरीत वेगवेगळी मतं ऐकल्या/ वाचल्यापासून मला झोया अख्तर टाईप मूव्ही वाटतोय. पाहायला हवा.