"तू..तू जा इथून", आकाश कानावर हात ठेवून किंचाळला. त्याच्या किंचाळीनं त्याच्या बाजूच्या बेडवर झोपलेल्या सुजयलाही दचकून जाग आली. घाबरून त्यानं आधी लाईट लावला. समोरचं दृश्य पाहून त्यालाही घाम फुटला.
आकाश कोपऱ्यात पाय दुमडून अंगाचं मुटकुळं करून बसला होता. घामानं तो नखशिखांत भिजला होता. भेदरलेली नजर एका जागी स्थिर राहत नव्हती, सतत भिरभिरत होती. कानावर हात गच्च दाबून धरलेले होते.
आज परत त्याला अटॅक आला होता, हे सुजय समजून चुकला. त्यानं पटकन टेबलावरची पाण्याची बाटली घेतली. बाजूलाच स्टीलचा पेला होता, पण त्याला अजून कालच्या बीअरचा वास चिकटलेला होता. तो धुऊन आणून मग याला पाणी पाजण्याइतका वेळ त्याच्याकडे नव्हता. जे काही करायचं ते आत्ता, या क्षणी करायला हवं होतं. त्यानं आकाशला जवळ घेऊन थोपटलं, थोडं पाणी प्यायला लावलं आणि हळूहळू कॉटवर नेऊन बसवलं. आकाश अजूनही पंख्याकडेच बघत होता.
"सुजय...तो...तो आहे इथेच... तो बोलतो माझ्या कानात."
"रिलॅक्स आकाश. इथे कुणीही नाहीये. तुला भास होतायत."
"नाही, भास नाही. अमर आहे इथे. तो बोलतो माझ्याशी."
"काय बोलतो? आणि तुझ्याशीच का बोलतो? मीसुद्धा राहतोय इथे. मीतर त्याच्याच बेडवर झोपतोय. आकाशऽऽ, तू माझ्याकडे बघ आधी. अमर तुझ्याशीच काय, पण कोणाशीही कधीही बोलू शकत नाहीये. अमरला जाऊन आता दोन वर्षं होतील, आकाश. तो आता या जगातच नाहीये. तुला परत भास व्हायला लागलेत. यू बेटर गो टू युअर पेरेन्ट्स’ हाऊस ऍन्ड सीक काऊन्सिलींग लाईक अर्लिअर."
"सुजय, हे भास नाहीत, हे तुला माहीत आहे चांगलंच. आणि त्याला काऊन्सलरचीही गरज नाही, हेही माहितेय. तरी तू परत परत त्याला चुकीच्या रस्त्यावर का पाठवतोस? तुला इथे आणलं कशाला मी च्यायला?" कानावर पडलेल्या अमरच्या आवाजाकडे सपशेल दुर्लक्ष करत आकाशला मी थोपटून झोपवलं. त्याच्या अंगावर पांघरुण घालताना कोकरासारख्या झालेल्या त्याच्या चेहऱ्याकडे पाहून एकदम गहिवरून आलं.
"फार काळ दुर्लक्ष करून नाही राहता येणार तुला, सुजय. तुलाही हे माहीत आहे. किती दिवस पुढे पुढे ढकलणार आहेस गोष्टी या? त्याला जगायला ऑक्सिजन लागतो, हे जितकं स्वाभाविक आहे, तितकीच ’ही’ गोष्टही स्वाभाविक आहे, हे किमान तू तरी जाणू शकतोसच नक्की."
माझ्या कानात इअरफोन खुपसून मी ती कुजबुज थांबवली होती, पण हा उपाय तात्पुरता होता, हे मलाही ठाऊक होतं. जी मी टाळत होतो, ती वेळ लवकरच येणार होती...
आशिका | 13 September, 2016 - 13:04
गेले काही दिवस जे चालू होतं ते आकाशच्या आकलनापलिकडलं होतं. नुकत्याच घडलेल्या प्रसंगानंतर झोप लागणं शक्यच नव्हतं. विचारांच्या खोल गर्तेत तो आकंठ बुडाला.
खरंच अटॅक येतात का आपल्याला, सुजय म्हणतोय तसे? की ..... की जे आपल्याला दिसतंय, ऐकू येतंय ते वास्तवच आहे? आणि जर हे वास्तव असेल तर बाकी इतरांना ते दिसत नाही का? जाणवत नाही का?. आपल्यालाच असा काही सिक्स्थ सेंस आहे का? .....की ते इतरांना दिसत नसल्याचा आभास निर्माण केला जातोय? मुद्दामहून/ घडवून आणलं जातंय हे सारं? आपल्याला कौंसिलिंगची -अँटीडीप्रेसंट्सची केती तीव्रतेने गरज आहे हे सिद्ध करण्यासाठी ?........ अरे बापरे..... मघाशी झालेल्या सो कॉल्ड भासापेक्षाही या विचारांनी आकाश पुरता भंजाळून गेला.
अस्वस्थ झाला. कोण आणि का करत असावं हे सारं आपल्याशी? आपल्याला कसलाही आजार नाही यावर ठाम राहून मात्र इतरत्र जे जे घडतंय त्या नाट्याचा मूकपणे भाग होऊनच या प्रकाराच्या मुळाशी जाता येईल. यासाठी गरज आहे ते कायम सतर्क राहून आजूबाजूची प्रत्येक लहानशी हालचाल टिपण्याची. आकाशने स्वतः च्या मनाशी तसा चंगच बांधला.
पूनम | 13 September, 2016 - 13:26
"ए अरे काय लिहिलं आहेस हे? ह्यॅ!. हे असलं काही मला जमणार नाही हां. सॉरी." हातातले कागद सुजयच्या अंगावर भिरकावत आकाश ओरडला. "आजार काय, मनोविकार काय, कानात बोलणारी भूतं काय आणि आभासांवर लक्ष काय... फाल्तू आहे हे. कसला विषय निवडला आहेस हा नाटकासाठी? हे सुचतंच कसं तुला? कोणत्या युगात राहतोय आपण? आणि सादर काय करतोय आपण? हे बघ सादर करायचंच असेल तर प्रेमकथा सादर कर. च्यायला तेवढाच रोमान्स करता येईल. नाहीतर सामाजिक विषय चिकार आहेत. अगदी स्वच्छ भारत अभियानावरही नाटक करायला तयार आहे मी. पण हे भूत-प्रेत नाही बाबा. अरे थेटरमध्ये एकाने जरी चुगली केली ना तर आख्खा प्रयोग माती खाईल. काहीतरी विचार कर. चल, बदल हे. नाहीतर मला तरी बदल. मला नाही जमणार." निर्वाणीचं सांगत आकाश रूमबाहेर गेला.
च्यामारी! हा साला सपशेल नकारच देऊन गेला की- सुजय बुचकळ्यात पडला. आता नाटक कसं करायचं? आकाशशिवाय तीच कथा का आकाशसहित नवी कथा?
कविन | 13 September, 2016 - 13:44
"समजाव यार या येड्याला. तू बोल्लास म्हणून याला घेतलं नाटकात तर याची ही नाटकं.नौटंकी साला"
"अमर, कूल यार. मी बघतो कायतरी."
"सुज्या साल्या आज त्याला अक्कल शिकव नाहीतर मी माझ्या पद्धतीने हँडल करेन. च्यायला! म्हणे लवस्टोरी करुया. लास्ट इयर लवस्टोरीच केलेली ना? काय झालं? स्पर्धेत माती खाल्ली याने. "
"चील यार! लास्ट इअरला याने नाही त्या रागिणीने माती खाल्लेली. काय तर म्हणे आकाश आणि तिचं ब्रेक अप झालाय सो ती काम नाही करणार त्याच्यासोबत."
"ती पण तसलीच रडी. बोल्लेलो मी तेव्हा आकाशला या गर्लफ्रेन्डांचे हट्ट पुरवायला नसतात आपली नाटकं. तो पण गांडू. दम नाय त्याच्यात तिला नाय बोलायचा."
"आणि हे गुढनाटक नको काय मधेच काढलं रे याने? तुच बोल्लेलास ना, यावेळी रत्नाकर मतकरी आहेत प्रमुख पाहुणे तर गुढनाटक बसवुयात"
"हो हो, मी बघतो बोल्लो ना तुला"
चल त्या आकाशला गाठू आधी. फुकण्या फुकत बसला असेल नाक्यावर.
मंजूडी | 13 September, 2016 - 14:31
आकाशसहीत नवी कथा!
नाक्यावर पोचेपर्यंत सुजयचा निर्णय झाला होता.
आकाश आणि सुजय दोघे सख्खे मित्र. एकाच कॉलेजात एकाच डिविजनमध्ये, अगदी राहायचेही एकाच रूममध्ये. आन्हिकांपुरते एखाद् तास एकमेकांपासून विलग होत असतील. अगदी जुळे भाऊ वाटावेत असे सतत खांद्याला खांदा लावून असायचे. दोघांचाही स्वभाव उमदा, बुद्धीमत्ता, आवडीनिवडी आणि विचारसरणीही सारखीच. कौटुंबिक पार्श्वभूमीही बरीचशी सारखीच होती. स्वतःच्या पायांवर उभं राहून कुटुंबाला सावरण्याचं ध्येय दोघांपुढे होतं. लफडी, भानगडी, मारामार्या इत्यादी शब्दांनाही थारा नव्हता त्यांच्या आयुष्यात. शहरातले नवेनवे अनुभव घेत, कल्पनांची विचारांची देवाणघेवाण करत दोघांचंही आयुष्य मजेत चालू होतं.
अश्यात पुरुषोत्तमच्या निमित्ताने रागिणी दोघांच्या आयुष्यात दाखल झाली. एक अभिनेता तर दुसरा दिग्दर्शक, त्यामुळे दोघांनाही तिचा सतत सहवास घडू लागला. खरं पाहता रागिणीसारख्या सौंदर्याच्या अॅटमबॉम्बवर जीव जडेल हे दोघांच्याही स्वभावात बसणारं नव्हतं. पण ते वयच वेडं होतं खरं! सुजयच्या वह्यांची पानं तिच्यावरच्या कवितांनी भरू लागली. तिला बघितल्याखेरीज, तिच्याशी बोलल्याखेरीज चैन पडेनाशी झाली. आता तिला विचारायचंच असा सुजयने आपल्या मनाचा हिय्या केला. काय बोलायचं कसं विचारायचं वगैरे सगळा नीट विचार करून तिला एक सुरेखसं पत्र लिहिलं. पण...
एका तालमीत अमरने रागिणीला आकाशवरून चिडवलं आणि रागिणी चक्क त्यावर लाजली. आकाशही हसू लागला. तिथून पुढे त्या दिवशीची तालीम बारगळलीच. सगळेच त्या दोघांना चिडवण्यात सामील झाले. सुजयची दखल कोणीच घेत नव्हतं.
त्याचवेळी सुजयला कळून चुकलं की त्याने रागिणीसाठी लिहिलेलं पत्र कसं आणि कुठे गहाळ झालं होतं.
आकाशसहीत नवी कथा!
नाक्यावर पोचेपर्यंत सुजयचा निर्णय झाला होता.
तालमीत एक आणि प्रत्यक्षात वेगळीच!!
मॅगी | 13 September, 2016 - 15:55
"च्या*** हि रागिणी! खडा टाकून बघितला आकाशच्या नावाने आन ही लाजतं काय..
असेल तो आकाश दिसायला हिरो! मग आपन काय कमी हाय का.. " अमरचा मेंदू बधिर झाला..
अमर हा पुण्याजवळच्या पौड गावच्या माजी सरपंचाचा मुलगा. बापाने भरपूर डोनेशन भरून इंजिनीयरींग कॉलेजला घातला. वर्गातल्याच सुजय आणि आकाशबरोबर श्री. धनंजय माने यांच्या बंगल्यात पेइंग गेस्ट म्हणून रहातो. पेइंग गेस्ट म्हणून रहात असला तरी पहिलं वर्ष काठावर पास झाल्याबरोब्बर हट्टाने एक स्कॉर्पिओ गाडी घेतली. वडिल माळकरी त्यामुळे त्यांना अमरचे फालतू उद्योग आवडत नाहीत. सुजय आणि आकाश सारख्या मध्यमवर्गीय मुलांसोबत राहून अमर जरातरी सुधारेल अशी आशा आहे त्यांना..
maitreyee | 13 September, 2016 - 16:25
रागिणी ... शहरातलेच नव्हे तर देशातले अग्रगण्य उद्योगपती आणि चोरडिया मोटर्स चे मालक राघवभाई चोरडिया यांची एकुलती एक कन्या !! त्यांच्या आलिशान प्रासदतुल्य बंगल्याचे नाव देखिल "रागिणी" होते!
हल्लीच त्यांनी लेकीच्या नावाचा "रागी" हा बाइकचा नवा ब्रँड बाजारात आणला होता आणि तरुणांमध्ये तुफान लोकप्रिय झाला होता. हार्ले डेव्हिडसन ला टक्कर देईल अशी ट्रेन्डी एकच बाइक होती या घडीला देशात !!
रुपगर्विता आणि अतिश्रीमंत रागिणी मोटाभाई डाह्याभाई कांतिलाल चोरडिया अर्थात MDKC कॉलेजमधे आल्यापासून सगळ्यांच्या चर्चेचा विषय न होती तरच नवल !
वास्तविक श्रीमंतांसाठी अन सेलेब्रिटीज साठी असलेल्या पाचगणी च्या सेन्ट झेवियर्स कॉलेज मधे तिने जावे अशी राघवभाईंची इच्छा होती पण रागिणीच्या हट्टापुढे त्यांचा नाइलाज झाला.
पहिल्याच दिवशी तिने एन्ट्री घेतली तीच "रागी" बाइक वरून !! तिचे २ बॉडीगार्ड रॉकी आणि टोनी तिच्या ड्रायवर विलासबरोबर मागून तिच्याच मर्सिडीज मधे तिच्याबरोबर होते , आणि ते तसे नेहमीच तिच्यासोबत सावलीसारखे असायचे.
बहुतेक तरुणांचा आणि काही तरुणींचाही तिला बघून हृदयाचा ठोका चुकला नसता तरच नवल. पण तिच्या वलयामुळे बरेच जण तिला फ्र्यन्डशीप मागयला घाबरूनच होते . सुजय, अमर आणि आकाश फक्त अपवाद होते. ते तिघे तेवढे तिच्या वलयामुळे बुजले नाहीत. तिला त्यामुळे ते फार आवडले. तिने न मागता (सध्यापुरती) त्या तिघांना प्रोबेशन वर फ्र्यन्डशीप दिली होती. तेही तिला अन इतर दोघा प्रतिस्पर्ध्यांना मनातून आजमावत होते आणि ही फ्र्यन्डशिप आता पुढे कुठल्या रश्त्याने न्यावी याची गणिते नकळत मांडत होते.
अशातच ...
... "स्टुडन्ट ऑफ द इयर" अशीअभिनव स्पर्धा कॉलेज मधे जाहीर झाली!!
कविन | 13 September, 2016 - 18:12
या रागिणीचं काय कळतच नाय बॉ आपल्याला. गेल्या वर्षी नाटकाच्या तालमीत तिला आकाश वरुन पिडलं तर च्यायला चक्क लाजली. वाटलं पोरगी पटली या येड्याला. पण नाटकाच्या चार दिवस आधी ब्रेक अप डिक्लेअर केला आणि खाल्ली ना माती, पडलं ना नाटक पार. यावर्षी तो सुजय गोंडा घोळत होता त्याच्याकडून कायबाय लिहून स्वतःच्या नावावर त्याच्या कविता खपवून फेमस झाली आणि त्याला पण दिला डच्च्यु च्यामारी
आता सध्या त्या घार्या गोर्या तिट्या बरोबर हिंडतेय. तिट्या म्हंजे त्योप गोरा चिट्टा, लहान बाळाला तिट लावल्यावर कसा दिसतो चेहरा बाळाचा तस्सा दिसणारा म्हणुन तो तिट्या
आता यंदा मज्जाच बघ तू परशा, नाय ही पोरगी माझ्या सोबत उतरली स्टुडंट ऑफ द इयर च्या कपल स्पर्धेत तर अमर नाव बदलून आकाश घेईन नाव मी. हा जबान दि है मैने. मैने जो ठान ली तो मै अपने आपकी भी नही सुनता. परशा अब देख तू मज्जा..
शरी | 14 September, 2016 - 13:41
"हा अमर कोण समजतो कोण स्वतः ला? गाडी उडवत शायनिंग मारत कॉलेज मधून फिरला म्हणजे रागिणी पटणार आहे का त्याला?" आकाश सुजय ला सांगत होता. आणि सुजय? मित्राचा ब्रेक अप झाल्यावर त्याच्याच गर्ल फ्रेंड सोबत स्वतः चं नशीब आजमावायची रिस्क घेऊन हात पोळवून बसला होता. "ही पोरगी कॉलेज मध्ये कुणालाच पटणार नाही हे कळत नाही का त्याला?" सुजय म्हणाला.
जुन्या मित्रांचं एक बरं असतं... असली वादळं येतात आणि जातात, त्याला मागे टाकून मैत्री टिकवून ठेवतात ते हे मित्र!! सुजय आणि आकाश, रागिणी चा एपिसोड मागे टाकून पुन्हा एकत्र आले होते.
"अमर त्या तिट्या शी पंगा घेतोय रागिणीसाठी. पण तिट्या च्या गोंडस चेहऱ्यामागे कोण आहे हे ना रागिणी ला माहित आहे ना अमरला!! हे बघ. ही बातमी बघ" असं म्हणून सुजय ने एक जुना पेपर टाकला आकाश समोर. आकाशच्या चेहऱ्यावर भीती पसरली. ब्रेक-अप झालेलं असलं तरी रागिणी बद्दल त्याच्या मनात सॉफ्ट कॉर्नर होताच.
आंबट गोड | 14 September, 2016 - 15:39
तिट्याचे पूर्वायुष्य फारसे कुणाला ठाऊक नव्हते. असायचे काही कारणही नव्हते. कुरळ्या केसांचा, गोरापान, गोंडस 'तिट्या' म्हणजेच अमृत पाटील. मुळशीचे सध्याचे सरपंच आणि मोठेच प्रस्थ असलेले बाळासाहेब पाटील यांची एकुलती एक अवलाद.
अमृत दिसायला जरी सोज्वळ व सालस दिसत असला तरी पक्का आतल्या गाठीचा , बेरकी मुलगा होता.
अमरला त्याची पार्श्वभूमी संपूर्ण माहिती नव्हती पण तो तिट्याचे सगळे उद्योग उघडकीस आणायच्या प्रयत्नात होता. तसाही तो स्वतः अशा बाबतींत हुशार होताच!
"मुळशी गावच्या सरपंचाच्या मुलावर बेपर्वा गाडी चालवल्याबद्दल गुन्हा दाखल" सुजय पेपरातील बातमी आकाशला दाखवित म्हणाला. " या तिट्याने दोघांना उडविलं होतं एक वर्षापूवी.." सुजयने सांगितले.
आकाशला रागिणीची मनातून काळजी वाटत होती आणि तिच्याबद्दलचं प्रेमही कमी होत नव्हतं ! "तर काय रे, सगळे साले तिच्या पैशाच्या मागे आहेत. या तिट्याला तर मी अस्सा सरळ करतो ना... " त्वेषाने आकाशच्या मुठी वळल्या.
आकाश होताच जरासा भाऊक आणि हळव्या मनाचा. सरळ, निष्कपट. त्या मानाने सुजय जास्त व्यवहारी व जग पाहीलेला. समोरच्या प्रमाणे चाल बदलणारा. सुजयला माहिती होतं की आकाश तिला मनातून विसरु शकलेला नाही.
नानबा | 14 September, 2016 - 17:39
ब्रेकिंग न्यूज
मुळशीचे विद्यमान सरपंच श्री. बाळासाहेब राव राजे पाटील ह्यांच्या एकुलत्या एक मुलाचा संशयस्पद परिस्थितीत मृत्यू. त्याच्याच कोलेजमधील अमर पवार बेपत्ता. संशयाची सुई सुजय आणि रागिणी ह्या सहअध्यायांवर.
मॅगी | 14 September, 2016 - 23:15
"रागिणी, सुन ना. तुने आकाशसे कुछ बात की थी क्या तेरे और तिट्याके बारेमे?" सुजयने रागिणीला हलवून विचारले.
"प्लीज या, कुछभी हा.. मै क्यू बोलुंगी कुछ? वो तो लास्ट मंथही बॉम्बे चला गया ना कुछ तो ट्रीटमेन्ट कराना था उसका" रागिणीने जरा उखडूनच उत्तर दिले. तिट्याचा अचानक मृत्यू झाल्याने सगळ्यांनाच काही सुचत नव्हतं. पण रागिणीकडे यातून बाहेर पडायचा प्लॅन तयार होता आणि आपल्याला कोणी हात लावू शकत नाही ही खात्रीसुद्धा..
तिच्यासमोर बसलेल्या सुजयच्या डोक्यात मात्र रागिणीला आपण कसे अडकवणार हे विचार पिंगा घालत होते. तसेही रागिणीचे फिंगरप्रिंट्स असलेला एक चाकू त्याच्या लॉकरमध्ये ठेवलेलाच होता.
आंबट गोड | 16 September, 2016 - 10:44
आकाशचे डिप्रेशन चे प्रमाण वाढत होते. आधीच एक वर्ष वाय डी झालेलं, त्यात रागिणी सोबतचा ब्रेक अप...!! त्यामुळे त्याचे मन भरकटले होते. रागिणीला स्वतःच्या सौंदर्याची आणि संपत्तीची पूर्ण जाणीव, नव्हे ताठा होता ; आणि याच्या जोरावर आपण कुणालाही लीलया खेळवू शकतो याची तिला कल्पना होती.
आकाशच्या घरच्यांनी त्याला मानसोपचार तज्ज्ञांकडे नेण्याचे ठरविले . त्याचाच भाग म्हणून दर महिन्यात त्याला मुंबईला चार पाच दिवसांसाठी ट्रीटमेंटला जावे लागत होते.
" आकाश तो पागल हो गया है, यार... मैने उसे कितना समझाया की मै उसे 'उस' नजरीये से नही देखती...फिर भी मानता नही! " रागिणी ने तिच्या गोर्यापान चेहेर्या वरचा फुलाफुलांचा स्कार्फ काढत म्हटलं. सुजय परत एकदा तिच्या टपोर्या डोळ्यांत हरवून गेला.....'हिला असंच खुलवत- झुलवत ठेवून वठणीवर आणायला हवी....." क्षणात भानावर येत त्याच्या व्यवहारी मनाने विचार केला...!!
तो काहीच बोलला नाही , पण त्याच्या मनात अमरचे विचार पिंगा घालत होते. कुठे असेल बरं तो?..
कविन | 16 September, 2016 - 12:31
तिट्या कॉलेजमधे ड्रग्ज सप्लाय करत असतो. मुलींना प्रेमाच्या जाळ्यात फ़सवून फ़ार्मवर न्यायचे आणि नंतर ब्लॅकमेल करायचे या त्याच्या उद्योगाची अमरला माहिती असतेच तसही. तोच तर त्याचा पार्टनर इन क्राईम असतो दरवेळी. पण सध्या बाब रागिणीची असते म्हणून त्यांच्यात वितुष्ट आलेले असते. त्याला एक्सपोज करायचेच या विचाराने अमरला आता झपाटलेले असते. एकीकडे नाटकाची प्रॅक्टीस आणि दुसरीकडे स्टुडंट ऑफ द इयरची तयारी यात सगळे बिझी असतानाच अमरचा तिट्याला रंगेहातो पकडायचा प्लॅन तयार होत असतो. त्यातच त्याला समजतं की एकवर्षापुर्वी ज्या दोघांना तिट्याने उडवलं होतं त्यातला एक सुजयचा आत्तेभाऊ असतो. सुजयलाही प्लॅनमधे सामिल करुन घेतलं तर त्या डोकेबाज सुजयचं डोकं इथेही चांगलं कामी येईल म्हणून तो या सगळ्याची सुजयलाही कल्पना देतो.
त्यादिवशी रागिणीचा वाढदिवस असतो. तिट्या आणि ती वाढदिवस साजरा करायला त्याच्या फ़ार्मवर जाणार असल्याची बातमी परशा अमरला देतो. बास्स! अमरचं ठरतं ... हिच ती वेळ हाच तो क्षण....फ़ार्म वर जाऊनच त्याला एक्स्पोज करायचे ठरवून तो परशाला घेऊन तिथे जायचं ठरवतो पण परशाला या भानगडीत अडकायचं नसतं तो बहाणे सांगायला लागतो. फ़ट्टू झाला का रे...जा मै अकेलाही काफ़ी हू उस सुअर के लिये...असं म्हणत अमर तिथून गाडी घेऊन निघतो. अर्ध्या वाटेत असताना त्याला सुजयचा फ़ोन येतो. त्याचा प्लॅन ऐकल्यावर तो ही त्याला बाईकवरुन डायरेक्ट फ़ार्मवर भेटायचं कबूल करतो. ठरल्याप्रमाणे सुजय तिथे पोहोचतो पण अमरचा काही पत्ता नसतो. अमरचा फ़ोनही स्विच्ड ऑफ़ येत असतो. बेल वर हात ठेवून वाजवावी की परत फ़िराव याचा विचारच करत असताना आतून दार उघडतं आणि घाबरलेली रागिणी एका हातात रक्ताळलेला सुरा घेऊन बाहेर पडते ती थेट दारात उभ असलेल्या त्याला धडकते. एक क्षणभर तो भांबावतो. त्याला सावरायला काही क्षण जातात. रागिणी त्याला बिलगून आता ओक्साबोक्शी रडत असते. सेल्फ़ डिफ़ेन्स साठी केलं ..मी.. मुद्दाम नाही..अशा हुंदक्यांच्या अधेमधे आलेल्या शब्दांवरुन त्याला परिस्थितीची कल्पना येते. आत जावं की मागे फ़िराव असा विचार करुन तो शेवटी मागे फ़िराव अस ठरवतो. रागिणीला घेऊन तो बाईकवरुन निघतो. तिच्याकडचा रक्ताळलेला सुरा तो पिशवीत गुंडाळून डिकीमधे ठेवतो. तिला तिच्या हॉस्टेलला सोडून तडक रुमवर येतो.
अमरचं काय झालं असेल याचा त्यालाही अंदाज लागत नसतो. डोकं जरा शांत झाल्यावर तो पुढे काय करता येईल त्याचा विचार करतो.
आज ना उद्या तिट्यावरच्या हल्ल्याची बातमी पेपरमधे छापून येणार याची त्याला खात्री असते पण तो जिवंत आहे की मेला हे ही त्याने त्यावेळी बघीतलेलं नसतं. रागिणीचा सुरा त्याने लॉकरमधे सेफ़ ठेवून दिलेला असतो. तिचा पैसेवाला बाप तिला सोडवायला त्याचा किंवा अमरचा बकरा करायला जाईल तेव्हा वापरता येईल तो हत्यार म्हणून असा विचार करुन त्याने तो जपून ठेवलेला असतो.
रागिणी वडिलांचा पैसा आणि पॉवरच्या जोरावर सहीसलामत सुटते. वडील तिला पाचगणीच्या कॉलेजमधे घालतात आणि रागिणी चॅप्टर समाप्त होतो
नंतर काही दिवसांनी अमरची गाडी घाटात खाली मिळते. बरीच शोधाशोध केल्यावर खाली पायथ्याच्या गावात अमरचा मृतदेह ही मिळतो.
दोन वर्ष मधे जातात. सुजय आणि आकाशच आता पिजी म्हणून रहात असतात. आकाशच्या मानसिक आजाराची माहिती असल्याने सुजय त्याचा फ़ायदा उठवत त्याला अमरच्या मृत्युकरता तोच जबाबदार असल्याचं बिंबवण्यात यशस्वी झालेला असतो.
आकाश मनाने फ़ारच कमकुवत असतो. त्यात मायबोलीवरचे अमानविय धागे आणि गानु आज्जीची गोष्ट वाचल्यापासून तो भुताखेतांवर विश्वास ठेवायला लागलेला असतो.
आकाशने जे नाटकाचं स्क्रिप्ट फ़ालतु म्हणून रिजेक्ट केलेलं असतं त्याच नाटकाला सुजयने आकाशचं रिअल लाईफ़ बनवून टाकलेलं असतं
नाक्यावर पोहोचे पर्यंत सुजयने जो निर्णय घेतलेला असतो
आकाश सहीत नवीन कथा
तालमीत एक... प्रत्यक्षात वेगळीच
तेच त्याने करुन दाखवलेल असतं
आता त्या कथेचा आता दि एन्ड होत आलेला असतो आणि सुजय द मास्टर माईंडने तो एन्ड आधीच त्या फ़ालतु म्हणून अव्हेरलेल्या स्क्रिप्ट मधे लिहून ठेवलेला असतो.
.
.
.
.
कॉलेजमधे यावर्षीच्या नाटकाची नोटीस लागते. पुन्हा एकदा सुजयच्या लेखणीला स्फुरण चढतं. यावर्षी एखादं "तो मी नव्हेच" टाईप स्क्रिप्ट लिहायचं त्याने आधीच ठरवलेलं असतं. यावर्षी मात्र फ्रेशर्स ना घेऊन त्याला "सगळं" करायचं असतं..
समाप्त.
=========================================================
नियमावली:
१) कथेचा शेवट अतिरंजीत चालेल पण पटेल असा असावा
२) आपण लिहिलेला प्रसंग आधीच्या प्रसंगाला पुढे नेणारा आणि सुसंगत असावा.
३) आधीच्याने लिहिलेला प्रसंग, 'हे सगळं स्वप्नात झालं' असं पुढच्याने म्हणून त्याची मेहनत वाया घालवू नये. थोडक्यात, स्वप्न पडणार असतील, तर ती अधिकृत ज्याची त्याने स्वतःच्या प्रसंगातच रंगवावी.
४) चारपेक्षा जास्त नवीन पात्रांचा एका प्रसंगात नव्याने परीचय करून देऊ नये.
५) स्थळ, काळ, वेळेचं भान ठेवावं.
==========================================================
थोडक्यात कहानी अबतक- सुजय,
थोडक्यात कहानी अबतक- सुजय, आकाश आणि श्रीमंत अमर विथ स्कॉर्पियो धनंजय मानेंच्या बंगल्यात पेईंग गेस्ट म्हणून रहात आहेत. रागिणी नावाची श्रीमंत, तरुण, देखणी मुलगी त्यांच्या कॉलेजात आहे. सुजय आणि अमर रागिणीवर मनोमन मरत आहेत तर आकाश तिच्यावर आणि ती आकाशवर बहुधा प्रेम करत आहेत किंवा त्यांना तसं वाटत आहे. बरोबरीने एक नाटकही बसवलं जात आहे ज्याचा दिग्दर्श्क आहे सुजय आणि नायक-नायिका आहेत आकाश आणि रागिणी. आणि एक सर्वोत्तम विद्यार्थी निवडायची स्पर्धाही घोषित झालेली आहे.
बरोबर?
बराय.
आता विचार करते
कथेचं मूळ विसरताय ना!!
कथेचं मूळ विसरताय ना!! ह्यातला अमर मेलेला आहे आणि तो आकाश ला दिसतो / बोलतो. अमर चा आवाज सुजय ला पण ऐकू येतोय पण तो हे आकाश ला दाखवत नाहीये.
कथेचं मूळ विसरताय ना!!>> नाही
कथेचं मूळ विसरताय ना!!>> नाही नाही. ते मूळ उपटलं आम्ही काल आणि रोप नवीन जागी लावलंय. आता अमर जिवंत आहे, सर्वांना दिसतोय आणि ऐकायलाही येतोय
"हा अमर कोण समजतो कोण स्वतः
"हा अमर कोण समजतो कोण स्वतः ला? गाडी उडवत शायनिंग मारत कॉलेज मधून फिरला म्हणजे रागिणी पटणार आहे का त्याला?" आकाश सुजय ला सांगत होता. आणि सुजय? मित्राचा ब्रेक अप झाल्यावर त्याच्याच गर्ल फ्रेंड सोबत स्वतः चं नशीब आजमावायची रिस्क घेऊन हात पोळवून बसला होता. "ही पोरगी कॉलेज मध्ये कुणालाच पटणार नाही हे कळत नाही का त्याला?" सुजय म्हणाला.
जुन्या मित्रांचं एक बरं असतं... असली वादळं येतात आणि जातात, त्याला मागे टाकून मैत्री टिकवून ठेवतात ते हे मित्र!! सुजय आणि आकाश, रागिणी चा एपिसोड मागे टाकून पुन्हा एकत्र आले होते.
"अमर त्या तिट्या शी पंगा घेतोय रागिणीसाठी. पण तिट्या च्या गोंडस चेहऱ्यामागे कोण आहे हे ना रागिणी ला माहित आहे ना अमरला!! हे बघ. ही बातमी बघ" असं म्हणून सुजय ने एक जुना पेपर टाकला आकाश समोर. आकाशच्या चेहऱ्यावर भीती पसरली. ब्रेक-अप झालेलं असलं तरी रागिणी बद्दल त्याच्या मनात सॉफ्ट कॉर्नर होताच.
तिट्याचे पूर्वायुष्य फारसे
तिट्याचे पूर्वायुष्य फारसे कुणाला ठाऊक नव्हते. असायचे काही कारणही नव्हते. कुरळ्या केसांचा, गोरापान, गोंडस 'तिट्या' म्हणजेच अमृत पाटील. मुळशीचे सध्याचे सरपंच आणि मोठेच प्रस्थ असलेले बाळासाहेब पाटील यांची एकुलती एक अवलाद.
अमृत दिसायला जरी सोज्वळ व सालस दिसत असला तरी पक्का आतल्या गाठीचा , बेरकी मुलगा होता.
अमरला त्याची पार्श्वभूमी संपूर्ण माहिती नव्हती पण तो तिट्याचे सगळे उद्योग उघडकीस आणायच्या प्रयत्नात होता. तसाही तो स्वतः अशा बाबतींत हुशार होताच!
"मुळशी गावच्या सरपंचाच्या मुलावर बेपर्वा गाडी चालवल्याबद्दल गुन्हा दाखल" सुजय पेपरातील बातमी आकाशला दाखवित म्हणाला. " या तिट्याने दोघांना उडविलं होतं एक वर्षापूवी.." सुजयने सांगितले.
आकाशला रागिणीची मनातून काळजी वाटत होती आणि तिच्याबद्दलचं प्रेमही कमी होत नव्हतं ! "तर काय रे, सगळे साले तिच्या पैशाच्या मागे आहेत. या तिट्याला तर मी अस्सा सरळ करतो ना... " त्वेषाने आकाशच्या मुठी वळल्या.
आकाश होताच जरासा भाऊक आणि हळव्या मनाचा. सरळ, निष्कपट. त्या मानाने सुजय जास्त व्यवहारी व जग पाहीलेला. समोरच्या प्रमाणे चाल बदलणारा. सुजयला माहिती होतं की आकाश तिला मनातून विसरु शकलेला नाही.
आतापर्यंतची कथा हेडरमध्ये
आतापर्यंतची कथा हेडरमध्ये वाचा.
ब्रेकिंग न्यूज मुळशीचे
ब्रेकिंग न्यूज
मुळशीचे विद्यमान सरपंच श्री. बाळासाहेब राव राजे पाटील ह्यांच्या एकुलत्या एक मुलाचा संशयस्पद परिस्थितीत मृत्यू. त्याच्याच कोलेजमधील अमर पवार बेपत्ता. संशयाची सुई सुजय आणि रागिणी ह्या सहअध्यायांवर.
नानबा सही ट्विस्ट
नानबा सही ट्विस्ट
"रागिणी, सुन ना. तुने आकाशसे
"रागिणी, सुन ना. तुने आकाशसे कुछ बात की थी क्या तेरे और तिट्याके बारेमे?" सुजयने रागिणीला हलवून विचारले.
"प्लीज या, कुछभी हा.. मै क्यू बोलुंगी कुछ? वो तो लास्ट मंथही बॉम्बे चला गया ना कुछ तो ट्रीटमेन्ट कराना था उसका" रागिणीने जरा उखडूनच उत्तर दिले. तिट्याचा अचानक मृत्यू झाल्याने सगळ्यांनाच काही सुचत नव्हतं. पण रागिणीकडे यातून बाहेर पडायचा प्लॅन तयार होता आणि आपल्याला कोणी हात लावू शकत नाही ही खात्रीसुद्धा..
तिच्यासमोर बसलेल्या सुजयच्या डोक्यात मात्र रागिणीला आपण कसे अडकवणार हे विचार पिंगा घालत होते. तसेही रागिणीचे फिंगरप्रिंट्स असलेला एक चाकू त्याच्या लॉकरमध्ये ठेवलेलाच होता.
आकाशचे डिप्रेशन चे प्रमाण
आकाशचे डिप्रेशन चे प्रमाण वाढत होते. आधीच एक वर्ष वाय डी झालेलं, त्यात रागिणी सोबतचा ब्रेक अप...!! त्यामुळे त्याचे मन भरकटले होते. रागिणीला स्वतःच्या सौंदर्याची आणि संपत्तीची पूर्ण जाणीव, नव्हे ताठा होता ; आणि याच्या जोरावर आपण कुणालाही लीलया खेळवू शकतो याची तिला कल्पना होती.
आकाशच्या घरच्यांनी त्याला मानसोपचार तज्ज्ञांकडे नेण्याचे ठरविले . त्याचाच भाग म्हणून दर महिन्यात त्याला मुंबईला चार पाच दिवसांसाठी ट्रीटमेंटला जावे लागत होते.
" आकाश तो पागल हो गया है, यार... मैने उसे कितना समझाया की मै उसे 'उस' नजरीये से नही देखती...फिर भी मानता नही! " रागिणी ने तिच्या गोर्यापान चेहेर्या वरचा फुलाफुलांचा स्कार्फ काढत म्हटलं. सुजय परत एकदा तिच्या टपोर्या डोळ्यांत हरवून गेला.....'हिला असंच खुलवत- झुलवत ठेवून वठणीवर आणायला हवी....." क्षणात भानावर येत त्याच्या व्यवहारी मनाने विचार केला...!!
तो काहीच बोलला नाही , पण त्याच्या मनात अमरचे विचार पिंगा घालत होते. कुठे असेल बरं तो?..
तिट्या कॉलेजमधे ड्रग्ज सप्लाय
तिट्या कॉलेजमधे ड्रग्ज सप्लाय करत असतो. मुलींना प्रेमाच्या जाळ्यात फ़सवून फ़ार्मवर न्यायचे आणि नंतर ब्लॅकमेल करायचे या त्याच्या उद्योगाची अमरला माहिती असतेच तसही. तोच तर त्याचा पार्टनर इन क्राईम असतो दरवेळी. पण सध्या बाब रागिणीची असते म्हणून त्यांच्यात वितुष्ट आलेले असते. त्याला एक्सपोज करायचेच या विचाराने अमरला आता झपाटलेले असते. एकीकडे नाटकाची प्रॅक्टीस आणि दुसरीकडे स्टुडंट ऑफ द इयरची तयारी यात सगळे बिझी असतानाच अमरचा तिट्याला रंगेहातो पकडायचा प्लॅन तयार होत असतो. त्यातच त्याला समजतं की एकवर्षापुर्वी ज्या दोघांना तिट्याने उडवलं होतं त्यातला एक सुजयचा आत्तेभाऊ असतो. सुजयलाही प्लॅनमधे सामिल करुन घेतलं तर त्या डोकेबाज सुजयचं डोकं इथेही चांगलं कामी येईल म्हणून तो या सगळ्याची सुजयलाही कल्पना देतो.
त्यादिवशी रागिणीचा वाढदिवस असतो. तिट्या आणि ती वाढदिवस साजरा करायला त्याच्या फ़ार्मवर जाणार असल्याची बातमी परशा अमरला देतो. बास्स! अमरचं ठरतं ... हिच ती वेळ हाच तो क्षण....फ़ार्म वर जाऊनच त्याला एक्स्पोज करायचे ठरवून तो परशाला घेऊन तिथे जायचं ठरवतो पण परशाला या भानगडीत अडकायचं नसतं तो बहाणे सांगायला लागतो. फ़ट्टू झाला का रे...जा मै अकेलाही काफ़ी हू उस सुअर के लिये...असं म्हणत अमर तिथून गाडी घेऊन निघतो. अर्ध्या वाटेत असताना त्याला सुजयचा फ़ोन येतो. त्याचा प्लॅन ऐकल्यावर तो ही त्याला बाईकवरुन डायरेक्ट फ़ार्मवर भेटायचं कबूल करतो. ठरल्याप्रमाणे सुजय तिथे पोहोचतो पण अमरचा काही पत्ता नसतो. अमरचा फ़ोनही स्विच्ड ऑफ़ येत असतो. बेल वर हात ठेवून वाजवावी की परत फ़िराव याचा विचारच करत असताना आतून दार उघडतं आणि घाबरलेली रागिणी एका हातात रक्ताळलेला सुरा घेऊन बाहेर पडते ती थेट दारात उभ असलेल्या त्याला धडकते. एक क्षणभर तो भांबावतो. त्याला सावरायला काही क्षण जातात. रागिणी त्याला बिलगून आता ओक्साबोक्शी रडत असते. सेल्फ़ डिफ़ेन्स साठी केलं ..मी.. मुद्दाम नाही..अशा हुंदक्यांच्या अधेमधे आलेल्या शब्दांवरुन त्याला परिस्थितीची कल्पना येते. आत जावं की मागे फ़िराव असा विचार करुन तो शेवटी मागे फ़िराव अस ठरवतो. रागिणीला घेऊन तो बाईकवरुन निघतो. तिच्याकडचा रक्ताळलेला सुरा तो पिशवीत गुंडाळून डिकीमधे ठेवतो. तिला तिच्या हॉस्टेलला सोडून तडक रुमवर येतो.
अमरचं काय झालं असेल याचा त्यालाही अंदाज लागत नसतो. डोकं जरा शांत झाल्यावर तो पुढे काय करता येईल त्याचा विचार करतो.
आज ना उद्या तिट्यावरच्या हल्ल्याची बातमी पेपरमधे छापून येणार याची त्याला खात्री असते पण तो जिवंत आहे की मेला हे ही त्याने त्यावेळी बघीतलेलं नसतं. रागिणीचा सुरा त्याने लॉकरमधे सेफ़ ठेवून दिलेला असतो. तिचा पैसेवाला बाप तिला सोडवायला त्याचा किंवा अमरचा बकरा करायला जाईल तेव्हा वापरता येईल तो हत्यार म्हणून असा विचार करुन त्याने तो जपून ठेवलेला असतो.
रागिणी वडिलांचा पैसा आणि पॉवरच्या जोरावर सहीसलामत सुटते. वडील तिला पाचगणीच्या कॉलेजमधे घालतात आणि रागिणी चॅप्टर समाप्त होतो
नंतर काही दिवसांनी अमरची गाडी घाटात खाली मिळते. बरीच शोधाशोध केल्यावर खाली पायथ्याच्या गावात अमरचा मृतदेह ही मिळतो.
दोन वर्ष मधे जातात. सुजय आणि आकाशच आता पिजी म्हणून रहात असतात. आकाशच्या मानसिक आजाराची माहिती असल्याने सुजय त्याचा फ़ायदा उठवत त्याला अमरच्या मृत्युकरता तोच जबाबदार असल्याचं बिंबवण्यात यशस्वी झालेला असतो.
आकाश मनाने फ़ारच कमकुवत असतो. त्यात मायबोलीवरचे अमानविय धागे आणि गानु आज्जीची गोष्ट वाचल्यापासून तो भुताखेतांवर विश्वास ठेवायला लागलेला असतो.
आकाशने जे नाटकाचं स्क्रिप्ट फ़ालतु म्हणून रिजेक्ट केलेलं असतं त्याच नाटकाला सुजयने आकाशचं रिअल लाईफ़ बनवून टाकलेलं असतं
नाक्यावर पोहोचे पर्यंत सुजयने जो निर्णय घेतलेला असतो
आकाश सहीत नवीन कथा
तालमीत एक... प्रत्यक्षात वेगळीच
तेच त्याने करुन दाखवलेल असतं
आता त्या कथेचा आता दि एन्ड होत आलेला असतो आणि सुजय द मास्टर माईंडने तो एन्ड आधीच त्या फ़ालतु म्हणून अव्हेरलेल्या स्क्रिप्ट मधे लिहून ठेवलेला असतो.
.
.
.
.
कॉलेजमधे यावर्षीच्या नाटकाची नोटीस लागते. पुन्हा एकदा सुजयच्या लेखणीला स्फुरण चढतं. यावर्षी एखादं "तो मी नव्हेच" टाईप स्क्रिप्ट लिहायचं त्याने आधीच ठरवलेलं असतं. यावर्षी मात्र फ्रेशर्स ना घेऊन त्याला "सगळं" करायचं असतं
हाच आता द एन्ड आहे हो संयोजक.
हाच आता द एन्ड आहे हो संयोजक.
कविन.. अमर ला थोडा सस्पेंस
कविन..
अमर ला थोडा सस्पेंस मधे ठेवायचा होता ना......सगळाच निकाल लावून टाकला की तुम्ही! सुजय पारच व्हिलेन!!
एनी वे.. पुढे काय आता?
अरे मस्त कविन! सही एन्ड
अरे मस्त कविन! सही एन्ड केलास, सगळी सूतं जमवून. (अमरला मारलंच ना शेवटी तुम्ही! ये अच्छा नही किया. आकाश तुम्हे कभी माफ नही करेगा :फिदी:)
रच्याकने, मूळ कथा तुझीच होती काय?
अहो आंबट गोड... गणेशोत्सव
अहो आंबट गोड... गणेशोत्सव संपला ना मग आता हे धागे बंद होतील त्या आधी दि एन्ड व्हायला हवा म्हणून जरा भराभरा कथा खरडून टाकली पुढची
पुढे काय? >>> बघू या आता हा सुजय नेक्स्ट "लाईव ड्रामा" काय घेऊन येतोय नवीन स्क्रीप्ट मधे ते
रच्याकने, मूळ कथा तुझीच होती
रच्याकने, मूळ कथा तुझीच होती काय?>>>तुला सुजय शोधायची घाई झालेय काय?
आकाश तुम्हे कभी माफ नही
आकाश तुम्हे कभी माफ नही करेगा 》》 साॅरी आकाश
अरेच्च्य्या...कथा संपली पण!
अरेच्च्य्या...कथा संपली पण!
Pages