मैदा - १ वाटी
साखर - १ वाटी
खवा - १ वाटी
ओल्या खोबर्याचा कीस - २ वाटी
गूळ - १ वाटी
वेलची पावडर - १/२ चमचा
केशर
पाणी
तूप - १ चमचा
तेल तळण्यासाठी
मीठ
१. एका पॅनमध्ये तूप गरम करून त्यात ओले खोबरे, गूळ व खवा टाकून नीट परतून घ्यावे. गूळ पूर्ण विघळून सारण परत घट्ट होईपर्यंत परतावे. सारणामध्ये वेलची पावडर व केशर टाकून मिक्स करावे. सारण एका ताटात काढून गार करण्यासाठी ठेवावे.
२. एका भांड्यामधे मैदा व थोडे पाणी घेऊन फोटोत दाखवल्याप्रमाणे पीठ भिजवून घ्यावे.
३. कढईत तेल गरम करण्यासाठी ठेवावे.
४. दुसर्या पातेल्यात साखरेचा दोन तारी पाक करून घ्यावा.
५. सारणाचे छोटे छोटे चपटे गोळे करून घ्यावेत.
६. भिजवलेल्या पिठामध्ये सारणाचा गोळा कव्हर करून घ्यावा व तेलामध्ये सोडावा.
७. पीठे सोनेरी रंगावर तळून घ्यावे.
८. तळलेले पीठे पाकामध्ये १० मिनिटे बुडवून ठेवावेत.
९. पीठे बाहेर काढून बदामाच्या कापांनी सजवावेत. गोकोल पीठे खाण्यासाठी तयार आहेत.
मृणाल एकही फोटो दिसत नाहीये.
मृणाल एकही फोटो दिसत नाहीये.
फोटो दिसत नाही.
फोटो दिसत नाही.
मृणाल एकही फोटो दिसत नाहीये.
मृणाल एकही फोटो दिसत नाहीये. >>> +१
मृणाल, मस्त पदार्थ !! पण फोटो
मृणाल,
मस्त पदार्थ !! पण फोटो दिसत नाहीयेत माझ्या स्क्रीन वर
प्रचि दिसत नाहीएत
प्रचि दिसत नाहीएत
फोटो दिसेनात
फोटो दिसेनात
(No subject)
माझ्या खाजगी जागे मधुन मला
माझ्या खाजगी जागे मधुन मला फोटो टाकता येत नाहित. संपादक, प्लीज हे फोटो लेखामधे टाकाल का?
यम्मी टेम्टींग दिसत आहे.
यम्मी टेम्टींग दिसत आहे.