बेंगलोर, म्हैसुर, उटी ट्रीप बद्दल माहिती हवी आहे

Submitted by राज1 on 31 August, 2016 - 05:45

आम्हाला या दिवाळीत (३० ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर) बेंगलोर, म्हैसुर, उटी ला जायचे आहे. २९ ऑक्टोबर ला रात्री निघून २ नोव्हेंबर ला पुण्यात पोहोचायचे आहे. या चार दिवसात बेंगलोर, म्हैसुर, उटी किंवा म्हैसुर, उटी बघणे व जाता येता चा प्रवास श्यक्य आहे का? KSTDC च्या वेबसाईट वर बेंगलोर, म्हैसुर, उटी व कोडाईकनाल ची ट्रीप ५ दिवसांची आहे. ती ट्रीप सोमवारी व गुरवारी आहे. सगळी महत्वाची ठिकाण बघता येतील आशी काही ट्रीप आहे का? पुणे ते बेंगलोर प्रवास बस ने करावा कि ट्रेन ने?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

राजेंद्र

कावेरी जलवाटपाच्या प्रश्ना वरून कर्नाटक मध्ये सध्या निदर्शने चालू आहेत (दिवाळी पर्यंत निदर्शने संपतील) ती निदर्शने किंवा बंद नाहीत हे बघूनच तेथे जा.

या टुअरसमध्ये
१) रात्रीचा प्रवास कुठे करवणार ते विचारा
२)कुठून सुरुवात होणार आणि शेवटी कुठे सोडणार?
३)कुन्नुरवरून परत बंगलोरलाच आणत असतील तर तो प्रवास उगाचच होतो.त्यापेक्षा म्हैसुरवरून हसनला जाउन हळेबिड बेलूर करून तिथूनच सकाळच्या नऊच्या ट्रेनने पुणे /मुंबई यावे.
४) स्वत:च प्लान केल्यास। अधिक उत्तम स्थळदर्शन होते.स्थानिक हाफ डे साइटसिइंग घ्यावे.
५) पुणे ते बंगलोर आणि परतीचे हसन ते पुणे रेल्वे ठीक आहे.
६) बरीच ठिकाणे अतिरंजित वाटतात/जिथे अधिक वेळ हवा तिकडे फारच थोडा वेळ देतात /दुकानाची भेट टाइमपास

शरद
टूर ची सुरवात बेंगलोर ला सुरु होऊन बेंगलोरलाच संपते असे KSTDC व hoysala tours च्या website वर दिसलं.
त्यांच्या ट्रीप च्या तारखा, Tour Cost व दिवस आमच्या ट्रीप बरोबर जुळतील असे वाटत नाही.
पुणे ते बेंगलोर व बेंगलोर ते पुणे प्रवासाचा खर्च travel कंपन्या करणार का आम्ही करायचा याचा उल्लेख नाही.
आम्ही पुणे ते बेंगलोर प्रवास कर्नाटक state च्या बस (AIRAVAT) ने करणार, त्याला वेळ १३ तास लागतात व ट्रेन ला २४ तास लागतात व ट्रेन ची वेळ संध्याकाळी किंवा रात्री नाही.
चार दिवसात आमची ट्रीप होऊ शकेल का?
तुमच्या माहितीचा कोणी ट्रीप organizer आहे का?

चौधरी यात्रा कं पाहा.पुणे ते पुणे रेट असेल.मुंबई /नाशिक सुद्धा असते.सर्वात स्वस्त असते.मी स्वत: टुअर ग्रुप टाळतो आणि फक्त रे रेझ करतो.बाकीचं तिकडे गेल्यावर. कॅन्सल केल्यास फक्त रेल्वेवाले १२०/ कापतात तेवढेच नुकसान होते तेवढेच.रिफंड टुअर/हॅाटेल चे मिळणे अवघड असते.दिवाळीत फार गर्दी असेल.बंगलोरपर्यंतचा खर्च तुम्हालाच करावा लागेल.kstc ची पत्रकं आहेत माझ्याकडे टुअर नं सांगा.रिफंड रूल्स फार कडक असतात( सर्वच राज्यांचे असेच असतात.)खासगी टुअरवाले नंतरच्या टुअरमध्ये अडजस्ट करतात.

शरद
प्रतिसादा बद्दल धन्यवाद,
चौधरी यात्रा कं ची ट्रीप Mysore-Ooty-Kodaikanl, हैदराबाद, तिरुपती बालाजी, कन्याकुमारी आशी ११ दिवसाची आहे.
मी स्वत: टुअर ग्रुप टाळतो आणि फक्त रे रेझ करतो, रे रेझ म्हणजे काय?
तुमच्या माहितीचा कोणी बेंगलोर मध्ये ट्रीप organizer आहे का जो आमची Bangalore-Mysore-Ooty-Kodaikanl ट्रीप ३० ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर या दिवसात organize करून देईल.

Try make my trip. Com they do customised tours. Or you can book their vehicle and manage your own tour. Check on trip advisor to find things to do at particular tourist point. Ola, uber, wiwigo or numerous other transport operators provide rent a car. Happy holidays.

राजेंद्र, आम्ही तिथे पोहोचल्यावर (बंगलोर) प्रथम एक हॅाटेलात सामान टाकले आणि आजुबाजूला जे टुअरिस्ट एजंट्स होते त्यांच्याकडून पत्रके आणि माहिती घेतली.आपली परतीची वेळ पाहून त्यांनी लगेच कायकाय होईल किती रु लागतील ते सांगितले.दोनचार ठिकाणची तुलना केल्यावर कल्पना आली आणि तुलना करणे सोपे गेले.आम्ही तसेच करतो पण त्यांच्यामार्फत न जाता स्वत: जातो.तुम्ही त्यातल्या एकाकडे बुक करू शकता.सावधगिरीम्हणजे प्रत्येकाने ksrtcचा मोठा बोर्ड लावलेला असला तरी त्यांच्याशी काही संबंध नसतो.कोणथ्याही दुकानात/हॅाटेलात यांचे कमिशन असते.तुम्ही ते कोडाईकनाल म्हणताय ते होणे शक्य नाही चार दिवसांच्या वेळात.कुन्नुर होते.बंगलोर -म्हैसूर-उटि-कुन्नुर होईल परंतू तो रात्री नऊला कुन्नुरवरून निघेल ते सकाळी बंगलोरला आणेल.

लहान मुले असतील तर ११ दिवसांची ट्रिप घेऊ नका.
म्हैसुरात फक्त राजवाडा,झु , सायन्स म्युझिअम,हे स्वत: पाहा.वृंदावन गार्डन बोअरिंग आहे.श्रिरंगप्ट्टण छान आहे॥

एक फूकटचा सल्ला .........

मेक माय ट्रीप कडून कधीही जावू नका , अत्यंत टूकार सर्विस असते त्यांची , कोणाला कोणाचा ताळमेळ नसतो , कॅब ड्रायव्हरही मधेच बदलतो असे अनुभव आहेत.

बेंगलोर, म्हैसुर, उटी हे सर्व पहायचे असेल तर ५-६ दिवसांचे नियोजन करा, २ दिवस तर प्रवासातच जातील फिरायला बरेच स्पॉट आहेत, शिवाय खरेदीलाही बरे आहे.

प्रवास बस ने करावा कि ट्रेन ने?
शक्यतो ट्रेन ने करा .. म्हैसुर पर्यंत (किंवा जवळ) जाता येईल.

शरद यांनी "म्हैसुर ते उटी हा प्रवास बसनेच करावा "म्हटले आहे त्याविषयी थोडेसे-
मोठी बस (५५ सिटर असेल तर) तर ती दूरच्या रस्त्याने जाते.म्हैसूरवरून वन-डे उटी टुअर करवून आणणारे स्वराज माजदाच्या २३सिटर बसने वेगळ्या शॅार्टकटने करवतात तो मार्ग मुदुमलाइच्या अरण्यातून जातो. संध्याकाळी बरेच प्राणी वाटेतच दिसतात.येण्याची वेळ आणि मार्ग विचारून घ्या टुअरवाल्यास.

टुअरचे रेझर्वेशन आताच्या बंगलोर म्हैसूर संदर्भात न करणेच चांगले.आंदोलन चालू आहे.हॅाटेल बुकिंगही नकोच. फारतर रेल्वेची तिकिटं मात्र काढून पाच दिवस अगोदर रद्द करा.तीन दिवसात हल्ली बरेच पैसे कापतात .

आत्ता बंगलोर मध्ये चालू असलेल्या आंदोलना मुळे व दिवाळीची सुट्टी ४ किंवा ५ दिवसच असल्या बेंगलोर, म्हैसुर, उटी ला जावं किंवा नाही हे समजत नाही. ४ ते ५ दिवसांच्या सुट्टीत बसणारे आजुन काही ट्रीप चे पर्याय कृपया सांगाल का? ह्या दिवाळीत किंवा पुढच्या दिवाळीत जर बेंगलोर, म्हैसुर, उटी ला जायला जमल तर तुम्ही दिलेल्या माहितीचा खूप उपयोग होईल व आमची हि ट्रीपपण हैदराबाद ट्रीप प्रमाणे नक्कीच चांगली होईल याची खात्री आहे.

उटीचे बरेच काँक्रीतीकरण झाल्याने उटीला आता पहिला मझा राहिला नाही म्हणे . त्यापेक्षा कुन्नूर चांगले आहे म्हणे. काय म्हणाल यावर ?

अजय सहमत.
उटीमध्ये बॉटनीकल गार्डन व्यतिरिक्त इतर काही खास वाटले नाही. लेक भोवती फिरताना जरा ठीक आहे.
कुन्नुर त्यापेक्षा चांगले. आम्ही आरामात पहावे म्हणुन ४ दिवस उटी असे प्लान केलेले. कार घेउन गेलो होतो.
वरिल ठिकाणांव्यतिरिक्त काही विशेष वाटत नव्हते, म्हणुन लेक भोवती फिरता फिरता, आम्ही अचानक उटीवरुन कलटी मारण्याचा निर्णय घेतला आणि मुनार कडे कूच केले. अर्थात तिथे दोन दिवस जास्तीचे द्यावे लागले.

४ ते ५ दिवसांच्या सुट्टीत बसणारे आजुन काही ट्रीप चे पर्याय कृपया सांगाल का?

>>> इथे बघा .....

पिकनिकला जायचंय.....?? इथे माहिती मिळेल. : http://www.maayboli.com/node/16690

त्रिशुर-कालडी -अथरापल्ली -तट्टेखाद अरण्य- कोचि परत. २८ तारखेला त्रिशुरच्या वडक्कुनाथन देवळातले दिवे पाहा. चार दिवसांत इतकेच होईल.मुन्नार नाही होणार.