तुम्हा सर्वांना माझ्या लग्नाला बोलवायची फार इच्छा होती परंतू ..

Submitted by ऋन्मेऽऽष on 24 August, 2016 - 14:11

पण काय करणार, नाईलाज आहे. मला माझ्या लग्नाला पोलिसांची भानगड नकोय.

हो, जर मजाक मजाक मध्ये ९८ जण जमलात, तर उगाच पोलिसांची परवानगी घ्यायला लागेल.

अर्थात, साखरपुड्यालाही नाही बोलवता येणार. अगदी हळदीलाही नाही बोलवता येणार.
कारण आपले फडणवीस सरकार आणखी एक नवा कायदा करू बघतेय.

तो असा, की आता तुमच्या कोणत्याही घरगुती कार्यक्रमाला १०० पेक्षा जास्त माणसे जमा झाली तर पोलिसांची परवानगी आवश्यक.

http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/wedding-c...

लोकशाहीतून हळूहळू आपण सेमीहुकुमशाहीकडे जात आहोत.
ज्या देशाची लोकसंख्या शंभर करोडपेक्षा जास्त आहे तिथे शंभर माणस जमण्याचा कायदा. हास्यास्पद.
आमच्या बिल्डींमध्येच पाचशे लोकं राहतात. कधी सत्यनारायणाची पूजा ठेवली तर तीनशे तीर्थप्रसाद घेऊन जातात आणि दिडशे जेवून जातात. गणपतीला काका, मामा, आत्या, मावश्या, आपापल्या पोरांसह जमल्या तरी तो आकडा शंभरच्या पार जातो. ईतकेच काय उद्या मी पटकन मेलो तरी मैताला तासाभरात किमान शे दिडशे जमतील. कश्याकश्याला परवानगी काढायची?

अश्या एखाद्या आचरट कायद्याला येण्यापासून वेळीच रोखले नाही तर हळूहळू तुमच्या एकेक व्यक्ती आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा यायला वेळ लागणार नाही.

शक्य झाल्यास सोशलसाईटवर वा योग्य जागी निषेध नोंदवा, किंवा ऋन्मेषचा आणखी एक नवा धागा समजून इग्नोर मारा.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

https://www.maharashtra.gov.in/Site/Upload/Acts%20Rules/Marathi/Notifica...

मॉल सुरू करण्य पूिी ककि 100 पेक्ष ज स्त लोक सहभ ग चे सम रांभ, मेळ िे, स िवजवनक सभ ,
इत्य दीस िी पोलीस ांची पूिवपरि नगी तसेच त्य ची सुरक्ष व्यिस्थेची जब बद री सांबांवधत
आयोजक िर सोपविण्य त येण र आहे. त्य वशि य
स िवजवनक विक णी सीसीटीव्ही बसविणे
बांधनक रक करण्य त येण र आहे.
(पी डी एफमधून कॉपी केल्यावर हे असं दिसतंय.) तोच मजकूर टंकित करून->

मॉल सुरू करण्यापूर्वी किंवा १०० पेक्षा जास्त लोकसहभागाचे समारंभ, मेळावे, सार्वजनिक सभा, इत्यादींसाठी पोलीसांची पूर्वपरवानगी तसेच त्याची सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी संबंधित आयोजकांवर सोपवण्यात येणार आहे. त्याशिवाय सार्वजनिक ठिकाणी सीसीटीव्ही बसवणे बंधनकारक करण्यात येणार आहे.

काय आहे कायद्यात?

- ज्या कार्यक्रमात १०० पेक्षा अधिक लोक येतील, अशा कार्यक्रमांच्या आयोजनासाठी पोलिसांची परवानगी घेणं अनिवार्य

- पोलीस कारवाईत कोणत्याही प्रकारचा अडथळा आणणाऱ्याला ५ वर्षांची शिक्षा होणार

- सरकारी, निमसरकारी, खासगी प्रतिष्ठान, मॉल, हॉटेल, उद्योग, रेल्वे स्टेशन, सार्वजनिक ठिकाणं, पार्किंग, एसटी डेपो, धरणं, तलाव, पाण्याची पाइपलाइन आणि इतर ठिकाणी सुरक्षा तपास अनिवार्य

alt One easy trick to fair skin in 14 days
Ad Fit Mom Daily
- तपासणीनंतर आक्षेपार्ह गोष्टी दूर न केल्यास कठोर कारवाई होणार

- सार्वजनिक ठिकाणी सीसीटीव्ही बसवणं अनिवार्य

- कोणत्याही प्रकारची शंका आल्यास ट्रेन, बस, मेट्रो, बस अशा वाहनांना थांबवणं शक्य होणार

- या कायद्याअंतर्गत नोंद होणारे गुन्हे अजामीनपात्र, दखलपात्र असतील

या प्रस्तावित कायद्याबाबत माहिती मिळाल्यानंतर विरोधही सुरू झाल्याचं चित्र समोर आलं आहे. राज्यातील विरोधी पक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं या कायद्याला 'काळा कायदा' असं म्हटलं आहे. का कायदा मागे घ्यावा अशी मागणीही या पक्षांनी केली आहे.

काय वाईट आहे वरच्या कायद्यात ते सांगा. वर जे लिहिलेय ते भारतीय हुशार लोकांनि आधीच पाळले असते तर आजवर घडलेले कित्येक अपघात घडले नसते. लोकशाही आणि हुकूमशाही यात खूप अस्पष्ट रेषा असते, लोकशाही हुकूमशाहिकडे झुकू नये याची काळजी घेण्याची जबाबदारी जशी लोकांची आहे तशीच स्वतःशकत बाकीच्या लोकांची काळजी घेणे ही लोकांची जबाबदारी आहे. मूर्ख भारतीय हि काळजी घेऊ शकत नाहीत हे वेलोवेळी सिद्ध झालेय. म्हणून आता कायद्याची लाठी येतेय. तुम्ही जबाबदारीने वागला असता तर सरकारवर हि वेळ आली नसती.

काय आहे कायद्यात?

- ज्या कार्यक्रमात १०० पेक्षा अधिक लोक येतील, अशा कार्यक्रमांच्या आयोजनासाठी पोलिसांची परवानगी घेणं अनिवार्य

- पोलीस कारवाईत कोणत्याही प्रकारचा अडथळा आणणाऱ्याला ५ वर्षांची शिक्षा होणार

- सरकारी, निमसरकारी, खासगी प्रतिष्ठान, मॉल, हॉटेल, उद्योग, रेल्वे स्टेशन, सार्वजनिक ठिकाणं, पार्किंग, एसटी डेपो, धरणं, तलाव, पाण्याची पाइपलाइन आणि इतर ठिकाणी सुरक्षा तपास अनिवार्य

- तपासणीनंतर आक्षेपार्ह गोष्टी दूर न केल्यास कठोर कारवाई होणार

- सार्वजनिक ठिकाणी सीसीटीव्ही बसवणं अनिवार्य

- कोणत्याही प्रकारची शंका आल्यास ट्रेन, बस, मेट्रो, बस अशा वाहनांना थांबवणं शक्य होणार

- या कायद्याअंतर्गत नोंद होणारे गुन्हे अजामीनपात्र, दखलपात्र असतील

या प्रस्तावित कायद्याबाबत माहिती मिळाल्यानंतर विरोधही सुरू झाल्याचं चित्र समोर आलं आहे. राज्यातील विरोधी पक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं या कायद्याला 'काळा कायदा' असं म्हटलं आहे. का कायदा मागे घ्यावा अशी मागणीही या पक्षांनी केली आहे.

काय वाईट आहे वरच्या कायद्यात ते सांगा. वर जे लिहिलेय ते भारतीय हुशार लोकांनि आधीच पाळले असते तर आजवर घडलेले कित्येक अपघात घडले नसते. लोकशाही आणि हुकूमशाही यात खूप अस्पष्ट रेषा असते, लोकशाही हुकूमशाहिकडे झुकू नये याची काळजी घेण्याची जबाबदारी जशी लोकांची आहे तशीच स्वतःशकत बाकीच्या लोकांची काळजी घेणे ही लोकांची जबाबदारी आहे. मूर्ख भारतीय हि काळजी घेऊ शकत नाहीत हे वेलोवेळी सिद्ध झालेय. म्हणून आता कायद्याची लाठी येतेय. तुम्ही जबाबदारीने वागला असता तर सरकारवर हि वेळ आली नसती.

कायद्याची माहिती घ्या, जिथे दुरुपयोग होऊ शकतो तिथे दुरुस्ती सुचवा. वर लिहिलेय तसे काँग्रेस आणि राको सारखे डोळे मिटून नुसते तोंड आहे म्हणून ते विरोधासाठी उघडू नका. डोळे उघडा.

हे सगळं करण्यासाठी सरकार मोठ्या प्रमाणात पोलीसांची भरती करणार आहे की गोरक्षण जसं आउटसोर्स केलंय तसं हेही आउटसोर्स करणार आहे?

alt One easy trick to fair skin in 14 days
Ad Fit Mom Daily

बापरे, हे पण कायद्यात?
हा कायदा १४ दिवसात मराठी लोकांना सुरक्षित करण्याबरोबर गोरं पण करणार? आणि सगळ्यांच्या आयांना फीट पण करणार?

मज्जाय बुवा मराठी लोकांची!

ऋन्मेषच्या खांद्यावर बंदूक ठेवायचा अड्डेकरांचा प्रयत्न पहिल्या दोन प्रतिसादांनंतर फसलेला दिसतोय Lol

ज्या कार्यक्रमात १०० पेक्षा अधिक लोक येतील, अशा कार्यक्रमांच्या आयोजनासाठी पोलिसांची परवानगी घेणं अनिवार्य >>
साधना , बाकी कायद्यात काय आहे माहित नाही .
पण आमच्या इथे (कोल्हापुरात ) बाळाच्या वाढदिवसाला अन बारशाला ३०० -४०० सहज जमतात .
अन हो , मयत झाली तरी बांबवड्यात (पलूस) सहज १०० वर माणस असतात (अन हे गावात आठवड्याला १ २ दा सहज घडत)

मी काल एकाला एक आयडिया सुचवलेली. आजकाल सरकारनेच सगळ्या गोष्टींच्या सेल्फी काढायची प्रथा पाडलीय. सेल्फी विथ डॉटर.वृक्षारोपण करतानाचा सेल्फी. आता पर्यटन स्थळांसोबतच्या कचर्‍याबाबत सेल्फी इ.
तर सरकार मयतासाठी एक वेबसाइट तयार करेल. त्यात मयताचे फोटो, झालंच तर अंत्यविधीचे व्हिडियो अपलोड करायचे. नातलगांनी तिथे येण्याऐवजी आपापल्या श्रद्धांजल्या, रडणं तिथे अपलोड करायचं. आहे की नाही डिजिटल इंडिया?

मग तुम्ही दुरुस्ती म्हणून 1000 ही संख्या सुचवा.

केदार गावात 1-2 मयत दर आठवड्याला? फक्त म्हातारेच उरलेत का गावात आता?

साधना , बाकी कायद्यात काय आहे माहित नाही .> >>>>>

मग माहिती करून घ्या. सरकारी कायद्यांवर नजर ठेवून ते त्यातल्या पळवाटा दाखवणे आणि दुरुस्ती सुचवणे हेही जबाबदार नागरिकांचे कर्तव्य आहे.

नाहीतर सरकार एकतर स्वतःला सोयीचे कायदे बनवते नाहीतर सर्वासमावेशक कायदे बनवते जे कायदे बनवताना झोपलेल्या शहाण्यांच्या मते मूर्खपणाचे असतात.

केदार एक पोलिस चौकीच बसवा ना तुमच्या गावात.
नायतर तालुक्याच्या गावातून घाऊकमध्ये आठवड्याला दोन मयती, दोन बारशी, एक सुपारी फोडणं अश्या परमिशन आण.

मयतासाठीच्या कार्यक्रमाची परमिशन किती दिवस आधी घ्यावी लागेल?

आजकाल मंत्रालयात मुलाच्या अंत्यविधीसाठी सुटी घेतली तर त्यासाठी रीतसर पूर्वपरवानगी घेतली नाही अशी संबंधित व्यक्तीच्या पर्सनल रेकॉर्डसमध्ये नोंद होते म्हणे.

साती माझी पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खरेच धन्यवाद. माबोवर मूळ बातमी न वाचताच प्रतिसाद द्यायची पद्धत आहे.

लोक फोटोवाल्या जाहिराती दिसू नयेत म्हणून ब्लॉकर टाकायला लागले त्यामुळे पेपरवाले आता अशा जाहिराती टाकतात. आता कॉपी पेस्ट करताना सगळेच होते.

साधना ,
केदार गावात 1-2 मयत दर आठवड्याला? फक्त म्हातारेच उरलेत का गावात आता?

>> कीस पाडायचा नाही पण त्यामुळेच तर ३ दिवसाच सुतक अन बुडखा फोडणे या गोष्टी झाल्या ना ? महिनो न महिने लग्न वाहयची नाहीत कारण सुतक असायच
अगदी स्टॅटिस्टेकल प्रॉबेबलिटी पाहिली तरी १५००० लोकसंख्या अन माणसाच आयुष्य सरासरी ८० वर्ष (३०००० दिवस) धरल तर २ दिवसाला १ मयत आलीच ना ? त्यासाठी म्हातारेच का हवेत ?

जाऊ दे , माझा कायद्याला विरोध नाही , इन फॅक्ट त्यात बर्याच चांगल्या गोष्टीही आहेत , फक्त १०० ही मर्यादा खूप कमी आहे अस स्वानुभवावरून वाटत इतकच Happy

प्रस्तावित कायद्याचा उद्देश चांगला असला/ वाटला तरीही तो राबवताना मात्र व्यक्तीस्वातंत्र्यावर अनावश्यक असं बंधन येणार, हें इथला एकंदर 'पोलिसी खाक्या' पहातां अपरिहार्यच वाटतं.
<<< तुम्हा सर्वांना माझ्या लग्नाला बोलवायची फार इच्छा होती परंतू .. >> ऋन्मेष, आपल्या इथल्या ' धागा प्रकरणा'चा लग्नांत तिकडच्या पार्टीला सुगावा लागूं नये, म्हणून तर आपण या कायद्याचा आधार घेवून माबोकराना दूर ठेवत नाही आहात ना ! Wink

१) १०० पर्यंत मर्यादा ही संख्या खुप कमी वाटतेय , ५०० च्या पुढे मर्यादा असावी.
२) वर भरत म्हणताहेत तसं पोलीस यंत्रणा हा कायदा राबवायला सक्षम आहे की नाही ह्याचा विचार करणं जरुरी आहे, अजुनतरी पुरेस पोलीस बळ आहे असं वाटत नाही , आधी त्यात सुधारणा व्हावी.
३) ५ वर्षांची शिक्षा अती होतय, ह्या तरतुदीचा गैरफायदा घेतला जाऊ शकतो.
४) बाकीचे मुद्दे चांगले आहेत.

Ata kayda aala tar bolavta yenar nai mhantos... jasa kai nasta aala tar tu bolavnarach ahes saglyana (mabokar na)...ugach kahihi vishay milto tula dhaga kadayla......

rar , runmesh cha aaher mast Happy

साती हेतूतः वगळले आहे. आपल्या गागुचा विनम्रपणे स्विकार करतो Happy

चौकट राजा, हेतू लग्न समारंभाची गर्दी टाळणे नसून सुरक्षिततेचा असला तरी त्यासाठी करत असलेली कृती नक्कीच बाळबोध आहे.
बाकी स्वता ऐवजी स्वत: असे मी जवळपास शंभरात चाळीस वेळा लिहू लागलोय. त्यामुळे तुम्ही मला पास करू शकता Happy

साहिल शहा,
उद्या जर परवानगी घेतलेल्या समारंभात काही बरे वाईट झाले तर पोलिस आणि सरकार याची जबाबदारी राहिल.
>>>>
हा मुद्दा इंटरेस्टींग आहे. सरकार जबाबदारी घेणार म्हणजे नक्की काय करणार?
बाकी कुठलीही गोष्ट फुकट येत नाही. मायबाप सरकार कडून तर नाहीच नाही. उद्या समजायचे की स्वच्छता टॅक्सप्रमाणे लग्नसमारंभसुरक्षाकर तुमच्या आमच्या पगारातून कापून जात आहे. अर्थात कापून गेलेला पैसा वसूल असेल तर हरकत नाहीच.

रार, आहेर एक नंबर Proud
जतन करून ठेवतो Happy
गर्लफ्रेंडही वाचून खुश होईल आणि आता लग्न करीन तर रुनम्याशीच असे बोलेन.

साधना,
लोकशाही आणि हुकूमशाही यात खूप अस्पष्ट रेषा असते, लोकशाही हुकूमशाहिकडे झुकू नये याची काळजी घेण्याची जबाबदारी जशी लोकांची आहे तशीच स्वतःशकत बाकीच्या लोकांची काळजी घेणे ही लोकांची जबाबदारी आहे. मूर्ख भारतीय हि काळजी घेऊ शकत नाहीत हे वेलोवेळी सिद्ध झालेय. म्हणून आता कायद्याची लाठी येतेय. तुम्ही जबाबदारीने वागला असता तर सरकारवर हि वेळ आली नसती.
>>>>>
साधनाजी, शंभर टक्के कबूल!
पण त्या मुर्ख भारतीयांच्या चुकीची शिक्षा आपण सर्व हुशार भारतीयांनी का भोगायची हा माझा प्रश्न आहे.

बाकी कायदा पुस्तकात जसा लिहिला जातो अगदी तसाच नसतो. त्यात बरेच छुप्या गोष्टी असतात ज्या सामान्य माणसाला पटकन समजत नाहीत, सरकारला बरोबर फायदा कसा उचलायचा हे माहीत असते. म्हणून तर जाणकार लोकं लागलीच त्याविरुद्ध आघाडी उघडतात. नुसते विरोधाला विरोध करायला विरोधी पक्षही काही बावळट नसतात. जिथे धग दिसते तिथेच हातोडा मारतात. येत्या दोनचार दिवसांत मी माझ्या वकील मित्रांशी चर्चा करतोय, बघूया काय बोलतात ते.

As per my knowledge if you're conveying police about gathering of more than stipulated number of people; you have to request police bandobast and pay for that bandobast. Police station send jeep/ van / tempo full of police during period of such gathering for lookout.

सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?
हरकत आणि सूचनांसाठीचा इमेल आयडी शेअर केल्याबद्दल धन्यवाद! फडणवीस सरकारला चांगला खरमरीत इमेल पाठवावा लागेल. सुरक्षेच्या नावाखाली काहीही करायचं चालू आहे. सीसीटीव्हीचा मुद्दा स्वागतार्ह आहे. परंतु १०० जणांसाठी पोलिस परवानगी मात्र थट्टा आहे. ह्या कायद्यामुळे प्रत्येक कार्यक्रमाच्या परवानगीसाठी गावागावात पोलिसांचं दे शंभर, दे दोनशे नाही सुरू झालं तर नवलच.

One get receipt from police department for availing such police bandobast. It's not under the table transaction. Maybe if police start getting extra money for additional services rendered then there would be less time/need for bribes etc.

Pages