पण काय करणार, नाईलाज आहे. मला माझ्या लग्नाला पोलिसांची भानगड नकोय.
हो, जर मजाक मजाक मध्ये ९८ जण जमलात, तर उगाच पोलिसांची परवानगी घ्यायला लागेल.
अर्थात, साखरपुड्यालाही नाही बोलवता येणार. अगदी हळदीलाही नाही बोलवता येणार.
कारण आपले फडणवीस सरकार आणखी एक नवा कायदा करू बघतेय.
तो असा, की आता तुमच्या कोणत्याही घरगुती कार्यक्रमाला १०० पेक्षा जास्त माणसे जमा झाली तर पोलिसांची परवानगी आवश्यक.
http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/wedding-c...
लोकशाहीतून हळूहळू आपण सेमीहुकुमशाहीकडे जात आहोत.
ज्या देशाची लोकसंख्या शंभर करोडपेक्षा जास्त आहे तिथे शंभर माणस जमण्याचा कायदा. हास्यास्पद.
आमच्या बिल्डींमध्येच पाचशे लोकं राहतात. कधी सत्यनारायणाची पूजा ठेवली तर तीनशे तीर्थप्रसाद घेऊन जातात आणि दिडशे जेवून जातात. गणपतीला काका, मामा, आत्या, मावश्या, आपापल्या पोरांसह जमल्या तरी तो आकडा शंभरच्या पार जातो. ईतकेच काय उद्या मी पटकन मेलो तरी मैताला तासाभरात किमान शे दिडशे जमतील. कश्याकश्याला परवानगी काढायची?
अश्या एखाद्या आचरट कायद्याला येण्यापासून वेळीच रोखले नाही तर हळूहळू तुमच्या एकेक व्यक्ती आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा यायला वेळ लागणार नाही.
शक्य झाल्यास सोशलसाईटवर वा योग्य जागी निषेध नोंदवा, किंवा ऋन्मेषचा आणखी एक नवा धागा समजून इग्नोर मारा.
चांगलाय की हा
चांगलाय की हा कायदा.
सुरक्षिततेच्या दृष्टीने उत्तम!
(बाकी माबोवरच्या काही ठराविक १०० आयडींना बोलावलंस आणि ते सगळे आपापल्या जोडीदाराबरोबर आले आले तरी जास्तीत जास्त दहा ते बारा व्यक्तिच प्रत्यक्षात दिसतील. तेव्हा बिन्धास आमंत्रणे दे.)
भाजपा सरकार म्हणजे मुर्खांचा
भाजपा सरकार म्हणजे मुर्खांचा बाजार झाला आहे,देवेंद फडणवीस असो की मोदी ,सपशेल आपटले आहे.कसलेही कायदे करतात व त्याचे समर्थन करतात
तू नोंदवलास का निषेध? बातमीत
तू नोंदवलास का निषेध? बातमीत म्हटलंय >>
या प्रस्तावित कायद्याच्या मसुद्यावर राज्य सरकारनं नागरिकांच्या सूचना आणि हरकती मागवल्या आहेत. >> त्वरीत हालचाल करा.
(तुला इंग्लिश येत नाही म्हणून जनतेला मराठी शिकवणार हे छानच पण आपण जे मराठी लिहितोय ते निदान शुद्ध लिहितोय का हे बघावं. मजाक मजाकमध्ये असा कोणताही मराठी शब्द अस्तित्वात नाही. तसंच मैताला नाही तर मयताला म्हणतात.)
एवढा बाळबोध कायदा सरकार करेल
एवढा बाळबोध कायदा सरकार करेल असं वाटत नाही. भारतातल्या घरगुती समारंभांना १०० पेक्षा जास्त लोक सहज येतात हे काय कळत नाही का मुख्यमंत्र्यांना?
लग्न / मुंज इ समारंभ घरी (म्हणजे राहत्या घरी जिथे एरवी ४ लोक रहातात) होणार असेल तर १०० लोक एकावेळी कधीच येणार आणि मावणार नाहीत. पण तसे होत असेल तर शंकेला वाव आहे आणि अपघात झाल्यास धोका अधिक आहे म्हणून असा नियम असणे समजू शकतो. कार्यालयात लग्न / समारंभ असेल तर काही परवानगीची अट नसावी. आणि हो, बाहेरच्या देशात असे नियम आहेत. अग्निशामन दलाला कळवावे लागते कारण आग वगैरे लागल्यास मोठी हानी होऊ शकते.
जरा कुठेतरी काहीतरी वाचलं कि धागा पाडायचं बंद कर.
जाऊ दे टेन्शन घेऊ नकोस रे ,
जाऊ दे टेन्शन घेऊ नकोस रे , आम्हाला तुझा वाट्सॅप नंबर दे आणि त्यावर तुझ्या लग्नाचे फोटो टाक , तुझ्हीही बचत होईल आणि कायद्याच पालनही होईल.
कशी वाटते आयडीया ?
ऋन्मेष, टायटल वाचून आधी मला
ऋन्मेष, टायटल वाचून आधी मला वाटलं की तुझं लग्न झालं आणि बोलावता आलं नाही. हे वाचून समजलं नक्की काय ते.
काका, मामा, आत्या, मावश्या
काका, मामा, आत्या, मावश्या यांना आधी गर्भनिरोधके द्या मग काय ते पोलिस-कार्य-निषेध इ इ नोंदवा. ...
लोल , सी
लोल , सी
सी, मान्सून वेडींग आहे का?
सी, मान्सून वेडींग आहे का?
सीमंतिनी, काय चावटपणा आहे हा
सीमंतिनी, काय चावटपणा आहे हा
श्री, आम्हाला तुझा वाट्सॅप
श्री,
आम्हाला तुझा वाट्सॅप नंबर दे आणि त्यावर तुझ्या लग्नाचे फोटो टाक ,
>>>>>>
लवकरच व्हॉट्सपवर ग्रूपमध्ये ५० पेक्षा जास्त मेंबर घ्यायचे असल्यास अॅडमिनने घ्यावी पोलिस परवानगी असा नियम निघेल. बस्स त्या दिवशी मी व्हॉट्सपलाही रामराम ठोकेन.
अन्जू,
ऋन्मेष, टायटल वाचून आधी मला वाटलं की तुझं लग्न झालं आणि बोलावता आलं नाही.
>>>
हो, मलाही धागा काढल्यावर पेज रिफ्रेश करत पहिल्या पानावर गेलो तेव्हा असेच वाटले
लगोलग गर्लफ्रेंडला मेसेज टाकला, गैरसमज करून घ्यायच्या आधी धागा पुर्ण वाच. हल्ली ती सुद्धा माबोवर हलकीशी चक्कर टाकू लागलीय ना..
लवकरच व्हॉट्सपवर ग्रूपमध्ये
लवकरच व्हॉट्सपवर ग्रूपमध्ये ५० पेक्षा जास्त मेंबर घ्यायचे असल्यास अॅडमिनने घ्यावी पोलिस परवानगी असा नियम निघेल. बस्स त्या दिवशी मी व्हॉट्सपलाही रामराम ठोकेन >>> अडमिनने इथे धाग्यांसाठी असा काही नियम का बरं नाही काढला?
चौकट राजा, एवढा बाळबोध कायदा
चौकट राजा,
एवढा बाळबोध कायदा सरकार करेल असं वाटत नाही.
>>
बाळबोध कायदा करेल की नाही कल्पना नाही पण बाळबोध विचार तर नक्की केलाय हे तर मान्य कराल
आणि समजा जर ट्रायल पिरीअडवर सुरू केलाच असा कायदा (जसे केजरीवाल यांनी दिल्लीत वाहतूकीचा समविषम कायदा केलेला) तर काय हराल. सरकारला बाळबोध म्हणाल ?
कायदा करायचे सरकारच्या मनात आहे म्हणून तर बातमी आहे ना. महाराष्ट्र टाईम्स ईत्यादी न्यूजपेपरचा खप वाढावा किंवा ऋन्मेषला एखादा धागा काढता यावा, म्हणून तर नक्कीच नाही ही हवा केलीय.
@ कार्यालयात लग्न / समारंभ असेल तर काही परवानगीची अट नसावी.
>>>>
असे का वाटले? उलट शंभरच्या जास्त लोकं घराऐवजी कार्यालयातच जमायची शक्यता जास्त असेल ना?
कि हॉलवालेच आता पोलिस परवानगीसह हॉल म्हणत जास्तीचा चार्ज लावतील असे म्हणायचे आहे?
सायो, तू नोंदवलास का निषेध?
सायो,
तू नोंदवलास का निषेध? बातमीत म्हटलंय
>>>>>>>>
सायो, येस्स ! आय मीन नो! आय मीन येस आय नो, सरकारने सूचना आणि हरकती मागवल्या आहेत, आणि म्हणूनच ईथे धागा काढलाय. कारण जर कोणीच हरकत घेतली नाही तर ते पटकन कायदा करून मोकळे होतील. मी अजून नाही नोंदवला निषेध, तुमची मते जाणून घेऊन मगच नोंदवेन.
तुला इंग्लिश येत नाही म्हणून जनतेला मराठी शिकवणार हे छानच पण आपण जे मराठी लिहितोय ते निदान शुद्ध लिहितोय का हे बघावं.
>>>>
सायो मी मराठी शिकवणार सोबत वापरायला उद्युक्त करणार असेही म्हणालेलो.
माझे स्वताचेच मराठी गंडलेले आहे. मीच मायबोलीवर शिकतोय. वेळोवेळी हे कबूलही केलेय आणि व्याकरण, शुद्धलेखनांच्या सूचनांचे स्वागतही केलेय.
पण तरीही ज्याला काहीच मराठी येत नाही अश्यांना थोडेबहुत नक्कीच शिकवू शकतो. तसेही ईंग्रजी कच्चे असूनही शेजारच्या बालवाडीच्या पोरांना अधूनमधून ‘ए फॉर अॅप्पल’ अने ‘बी फॉर बॅट’ असे टोचन देत असतोच
@ मजाक मजाक,
तर तो हिंदी शब्द आहे हे मला ठाऊक आहे. मुंबईकरांना असे अधूनमधून हिंदी, उर्दू, गुजराती शब्द पेरायची सवय असतेच. याला बंबैय्या मराठी बोलू शकता, किंवा मराठी कमी आणि हिंदी जास्त झाले तर बंबैय्या हिंदी बोलू शकता
हल्ली बर्याच घरात काका आहे
हल्ली बर्याच घरात काका आहे तर आत्या नाही, मावशी आहे तर मामा नाही अशी गत असते. अशावेळी शंभरी गाठायची म्हणजे कित्त्ती आते-मामेभावंड लागतील. एका-एका जोडप्याला ४-५ मुले लागतील तर १०० आकडा होईल.
बरं ते निषेधाचं काय झालं?
बरं ते निषेधाचं काय झालं? करणार ना? कारण फडणवीस काय मायबोलीवर नाहीत धाग्यांवरचे निषेध वाचायला.
सीमंतिनी प्लीज ईथेच थांबवा हा
सीमंतिनी प्लीज ईथेच थांबवा हा विषय...
मला यात नवीन धागा दिसतोय
फुरसतीने काढेनच, पण तुर्तास शुभरात्री. उद्या या बाळबोध कायद्याबद्दल सामान्य लोकं काय म्हणताहेत याची काही मार्मिक उदाहरणे टाकेन.
सायो उद्या नक्की आता ईथे
सायो उद्या नक्की
आता ईथे रात्रीचे एक दोन अडीज झालेत. सारे घोडे झोपले असतील. एवढ्या रात्रीचे सरकारला जागे करण्यात काही अर्थ नाही. तर उद्या नक्की. तुम्हालाही शुभरात्री
>>. मुंबईकरांना असे अधूनमधून
>>. मुंबईकरांना असे अधूनमधून हिंदी, उर्दू, गुजराती शब्द पेरायची सवय असतेच. याला बंबैय्या मराठी बोलू शकता, किंवा मराठी कमी आणि हिंदी जास्त झाले तर बंबैय्या हिंदी बोलू शकता>> ते मला माहिती आहे. मी मुंबईचीच आहे. बोलताना बरेच किंवा अधेमधे इंग्लिश शब्द पेरत बोलणं ही आता सवय झाली आहे जी फार खटकत नाही पण वाचताना हे असं धेडगुजरी झेपत नाही. तुम्ही इतरांना मराठी वाचायला उद्युक्त करणार म्हणताय तर निदान आदर्श तरी नीट ठेवा.
राहिला विषय निषेधाचा- तर आपल्याला नाही पटलं तर करावा की. लोकांचं मत काय आहे हे बघून आपलं मत का ठरवा?
आता ईथे रात्रीचे एक दोन अडीज
आता ईथे रात्रीचे एक दोन अडीज झालेत. सारे घोडे झोपले असतील.>>
ऋबाळा, 'बेचके' विसरलायस की हेतूतः वगळलंयस?
हेतूतः वगळलं असशील तर भारी!
शुभरात्री.
(आमच्यात गागु घ्यायची पद्धत असती तर तुझे चार पाच तरी घेतले असते.)
गागु म्हणजे गालगुच्चा
गागु म्हणजे गालगुच्चा काय???!!!!
साती
साती
>>बाळबोध कायदा करेल की नाही
>>बाळबोध कायदा करेल की नाही कल्पना नाही पण बाळबोध विचार तर नक्की केलाय हे तर मान्य कराल >> परत एकदा बेसिक मधे वांदा. १०० पेक्षा जास्त लोक छोट्या जागेत जमणार असल्यास सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलीसांना कळवावे / परवानगी घ्यावी असा विचार असल्यास तो बाळबोध अजिबात नाही उलट रास्तच आहे. लग्न वगैरे समारंभांना गर्दी होते म्हणून असा नियम करायचा घाट घातला असला तर ते बाळबोध होईल (तसं असेल असं वाटत नाही, हे आधीच म्हणालो होतो)
>>महाराष्ट्र टाईम्स ईत्यादी न्यूजपेपरचा खप वाढावा किंवा ऋन्मेषला एखादा धागा काढता यावा, म्हणून तर नक्कीच नाही ही हवा केलीय.>> खप वाढावा म्हणूनच हल्ली अर्धवट किंवा आगा पिछा सोडून काहीतरी छापून टाकायचं हा प्रघात पडला आहे. मग तो म टा असो कि, लोकसत्ता असो वा सकाळ. आणि तुला धागा काढायला काय लागतय? त्यासाठी सरकारला विचार करायचीही गरज नाही.. तू तसेही काहीतरी बरळत असतोच माबो वर. ते काय मुख्यमंत्री वाचत बसतात होय?
>>उलट शंभरच्या जास्त लोकं घराऐवजी कार्यालयातच जमायची शक्यता जास्त असेल ना?
कि हॉलवालेच आता पोलिस परवानगीसह हॉल म्हणत जास्तीचा चार्ज लावतील असे म्हणायचे आहे?>> अरे म्हणजे जिथे गर्दी जमणं अपेक्षितच आहे अशा ठिकाणी हा नियम लागू नसावा असा अंदाज आहे. (नक्कि माहिती नाही कार अजून "विचार चालू" आहे ना).. प्रतिसादाच्या सुरुवातीला नाही का सुरक्षितते बद्दल बोललो? त्या दॄष्टीनी विचार कर जमल्यास! नसेल जमत तर चालू देत तुझं किर्तन..शुभेच्छा!
ता. क - तुझं शुद्धलेखन सुधारावं, तू "स्वता" ऐवजी "स्वतः" लिहावस यासाठी तळ्यातल्या गणपतीला नवस बोललोय. बघूयात त्याला तरी जमतय का काही प्रकाश पाडायला!
चौकट राजा अहो असं काय
चौकट राजा अहो असं काय करता.
'सकाळ वाक्य प्रमाणम' किंवा 'मटा वाक्य प्रमाणम' मानून माबोवरचे ९३% धागी निघतात.
तुम्ही तर माबोच्या जीवावरच ऊठलात की, जिस थाली में वगैरे..... कुठे फेडाल हे पाप.
९० % जनता प्रातर्विधी ऊरकायच्या आधीच सकाळ , मटा (दादर/ठाणे मात्रं सामना बरका) लोकमत, टाईम्स वाचून जगाचा अपडेटेड एन्सायक्लोपिडिया वाचल्यासारखी सहर्वहज्ञह झालेली असते त्यांच्याशी कायदे/ राजकारण/ आयुर्वेद/ ऑलिंपिक्स वगैरे बद्दल बोलून कशाला आपण आपल्या अज्ञानाची शोभा काढायची.
सुरक्षेसाठी जर असेल तर चांगला
सुरक्षेसाठी जर असेल तर चांगला निर्णय आहे.
उद्या जर परवानगी घेतलेल्या समारंभात काही बरे वाईट झाले तर पोलिस आणि सरकार याची जबाबदारी राहिल.
हायझेनबर्ग, अगदी अगदी. त्यात
हायझेनबर्ग, अगदी अगदी. त्यात फेसबुक, ट्विटरच्या चिकटपट्ट्या राहिल्याच की.
पुन्हा अमेरिकेत राहणार्यांना भारतातलं काही म्हणजे काहीच कळत नाही त्यामुळे....
चौकटराजा, एवढं सिरियसली घेऊ नका. त्याला मुळात करायचं नाहीच आहे काही. इथे येऊन धागा काढला की कसं नावावर एक धागा जमा होतो. त्याला हँडल मारणारी लोकंही इथेच भेटतात त्याला.
प्रातर्विधी उरकायच्या आधी तो
प्रातर्विधी उरकायच्या आधी तो पेपर वाचते पण होय जनता. मला वाटलं फक्त ... जाउद्या.
रुन्मेश, निषेध व्यक्त करायला तो कायदा नीट वाचला आहेस का? त्यातल्या कुठल्या कलमाचा निषेध व्यक्त करतोयस काही कल्पना आहे का? निषेध व्यक्त करतात म्हणजे नक्की काय करतात काही माहिती आहे का? मला वाटतं, माबोकाराना वाटतं म्हणून निषेध व्यक्त करत नाहीत तर तो कायदा खालील मूलभूत हक्कांवर गदा आणतोय म्हणून तो या या कलमानुसार बेकायदा आहे असं नीट स्वच्छ निःसंदिग्ध भाषेत मराठी / हिंदी/ इंग्रजीत लिहावं लागेल.
कायदा वाचलास की त्या कायद्यात इतर काय काय गोष्टी आहेत हे समजवणारा आणखी एक धागा नक्की काढ. माहितीपूर्ण धागे वाचायला आवडतील.
ऋन्मेष, तुला लग्नाचा
ऋन्मेष, तुला लग्नाचा आहेर.
चाल : माझ्या नानाचं लगीन
सरकार बदलले, मोदी सरकार आले
नवे कायदे आले, कानून आले
फडणवीस राज्य आले, हो, फडणवीस राज्य आले, फडणवीस राज्य आले
आणि इथे मायबोलीवर..
(चाल : श्रीगणराय नर्तन करी)
ऋन्म्या हातात कीबोर्ड धरी
माबोवर धागे वाढती भारी ||
वाजवा रे वाजवा ...
माबोलीवर ऋन्म्याच्या लग्नाची तयारी चाले
तयारी चाले, तयारी चाले
ऋन्म्याच्या लग्नाची तयारी चाले
लग्नाची तयारी चाले
आमच्या ऋन्म्याचं लगीन
आमच्या ऋन्म्याचं लगीन
गर्लफ्रेंट वाटते भोळी भाळी
परंतु करते कागाळी
माबोवर येते कधी काळी
व्हॉट्सॅप करी संध्याकाळी
माबोकरांना गर्लफ्रेंड याची
वाटे अगदी महान
अन ... आमच्या ऋन्म्याचं लगीन ||
माबोकर आले धागा निघाला
वर्हाडी ठेचा मेनू ठरला
चर्चेचाही थाट मांडला
प्रतिक्रीया वाढती ssss
अन ... आमच्या ऋन्म्याचं लगीन ||
माबोचा हा स्पायडरमॅन
धागे काढी छप्पन |
वापरी ब्रँडेड रूमाल
प्रश्न विचारी कमाल |
कालचे धागे दहा
त्यानं भागत नाही पहा
म्हणून काढला नवा
अन त्याची झाली हवा ||
म्हणून लग्नाला चला, तुम्ही लग्नाला चला, तुम्ही लग्नाला चला
रारबाई, रमडबाई, सिमूबाई, सशलबाई लग्नाला चला
ऋन्म्या आला वेशीपाशी
म्हणतो चिंता नाही कशी
काढीन धागा करीन चर्चा
लग्न तरी ही करीन
हे sss आमच्या ऋन्म्याचं लगीन
आमच्या ऋन्म्याचं लगीन ||
ऋन्म्या आला बोहल्यापाशी
म्हणतो चिंता नाही कशी
बोलवीन पाहुणे पाचशेदहा
अन कायदा मी मोडीनं
आमच्या ऋन्म्याचं लगीन
आमच्या ऋन्म्याचं लगीन
लग्नाला चला, तुम्ही लग्नाला चला, तुम्ही लग्नाला चला
रारबाई, रमडबाई, सिमूबाई, सशलबाई लग्नाला चला
लय भारी
लय भारी
एखादा धागा शंभरी गाठणार असं
एखादा धागा शंभरी गाठणार असं वाटल्यास, माबो प्रशासकांची परवानगी सक्तीची करायला हवी. इथले बरेच जण सुटतील
Pages