एक राहिलेले उत्तर

Submitted by Suyog Shilwant on 21 August, 2016 - 05:36

त्याच्या ह्रदयाचे ठोके वाढले होते. काय आणि कसं बोलु त्याला कळतंच नव्हते. पण त्याने आज मनाशी पक्का निर्धार केला होता. आज काही करुन विचारणारच तिला. एवढ्या वेळात तो भानावर आला. आता वर्ग खाली झाला होता. तो पटकन धावत बाहेर जातो. बघतो तर काय ती एका मैत्रीणी बरोबर बोलत मागे थांबली होती. तिला पाहताच तो मनोमन खुष होतो. काही वेळ वाट पाहत तो तिथेच उभा राहतो. आता तिचं मैत्रिणीशी बोलुन झालं होतं. तिच्याशी बोलायला म्हणुन हा पुढे सरसावतो.

"ऐक ना. "
तशी ती ह्याचा आवाज ऐकुन मागे वळते. मनाशी सर्व शक्ती एकवटून तो तिला म्हणतो.

" तु मला खुप आवडतेस."

तिला धक्का बसतो ति "काय" म्हणत डोळे विस्फारते .
तो गोंधळतच म्हणतो.

" म्हणजे मला…मी तुझ्यावर…खुप प्रेम करतो."

एवढ बोलुन तो थांबला होता अन एकटक तिला पाहत होता. ती ही त्याला पाहत विचार करत होती. असं अचानक कोणीतरी समोर येऊन असं बोलणं तिला अपेक्षित नव्हतं. पण का जाने त्याच्या मनातलं प्रेमाचं वादळ आता तिच्या ही मनात घुमु लागलं होतं. पण काय बोलावे हे तिला कळेना. एवढ्यात तिला पाहतच तो पुन्हा बोलला.
" मला माहित आहे तुला माझ्या प्रेमावर विश्वास नाही. पण मला माझ्या प्रेमावर पुर्ण विश्वास आहे. तुला सांगायचं असं किती वेळा ठरवलं पण हिम्मतच झाली नाही. पण आज न राहवुन बोल्लो. "
तिला आपल्याकडे गप्प उभी बघुन त्याचा आत्मविश्वास थोडा वाढला.
" तुला पाहिलं कि असं वाटतं पाहतंच रहावं.मनात एक वेगळीच खुशी होते ज्याची तुलना कशाशीच करता येत नाही..असं तुझ्याबद्दलच का वाटतं माहित नाही. पण जसं जगण्यासाठी श्वासाची गरज असते. तोच श्वास आहेस तु माझ्यासाठी. आत्मा प्रत्येकात असतो पण दिसत नाही तोच आत्मा आहेस तु माझ्यासाठी. कसं सांगु पण तुझ्याशिवाय जगण्यात काही अर्थच वाटत नाही. इतकं प्रेम करतो मी तुझ्यावर."

हे सगळं ऐकुन आता मात्र तिच्या डोक्यात फारच गोंधळ सुरु झाला होता. त्याच्या डोळ्यातुन वाहणारी ती प्रेमाची भावना तिलाही वाहवत नेत होती. बराच वेळ नजरा नजर झाली. तो ज्या प्रेमळ नजरेने तिला पाहत होता त्या नजरेने ती ही हळूहळू घायाळ होत चालली होती. तिच्या मनाच्या डोहात वेगळेच तरंग उठु लागले होते. मनातल्या मनात ती सुखावली होती. मनात उठणाऱ्या त्या तरंग तिला अजुन अनुभवायच्या होत्या. अचानक ती मनातच ठरवते की आपण उत्तर आत्ताच द्यायचे नाही आणि म्हणते.
" मला थोडा वेळ हवाय विचार करायला... "

हे उत्तर त्याला अपेक्षित नव्हतं. तो मनोमन सुखावला. त्याला वाटलं होतं कि ती सरळ नकार देईल किंवा आई बाबांना सांगायची धमकी देईल पण मुळात तसं काहीच झालं नाही. त्याला स्वतःच्या कानांवर विश्वासच बसत नव्हता.

मन भरुन दोघे एकमेकांना निहारत होते. क्षणभर त्यांना जगाचं भानच राहिलं नव्हतं . एका वेगळ्याच विश्वात ते हरवले होते. सगळं जग जसं थांबलं होतं त्यांच्यासाठी. पाहिल्या क्षणी प्रेम होतं खरं पण त्यात हरवुन जाण्याची नशाच वेगळी. किशोरवयात येताना ह्या भावना कदाचितच कोणाला चुकल्या असतील? अचानक बाजुने जाताना कोणी सायकलची घंटी वाजवली आणि ते दोघे या जगात परत खाडकन आले. त्याने लगेच आजुबाजुच्या परिस्थितीचा आढावा घेतला आणि एक निश्वास टाकला. त्यांना कोणीच पाहिले नव्हते. आता ती काही न बोलता मागे वळुन आपल्या मार्गी निघु लागली. तो मात्र तिला पाहत तिथेच उभा होता. तिला असं जाताना बघत त्याच्या चेहऱ्यावरचा भाव अनमोल होता. त्याचा आनंद गगनात मावेना झाला होता. पण एकाच गोष्टीची हुरहुरी होती त्याला…कि तिचं उत्तर काय येणारं…?

क्रमशः ...

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान आहे लव स्टोरी...आवडली...शाळेतल प्रेम आठवलं...पुढचा भाग लवकर येऊ द्या..

आयला मी विचारच करतोय की मी कधी १७:५८ ला प्रतिक्रीया दिली ते :-), काही अमानवीय तर नाही ना, युजर ईन्फो पाहिल्यावर कळालं की संदिप सिंह आहे म्हणून !

अवांतर साठी क्षमा Happy
पण छानच झालीये सुरूवात..

मनोमन दोघे एकमेकांना निहारत होते >>> एकतर मनोमन निहारत - न्हाहाळणे कसे शक्य आहे. अन हिंदी शब्द दाताखाली खडा आल्यासारखे वाटतात.
भान येते. >>> असे नाही हो म्हणत मराठीत.. तो भानावर आला. इ.इ. काळाचे भान ठेवा की.
वेगळीच खुशी >>> की वेगळाच आनंद ??

आधी मराठी बातम्या, नंतर डब केलेल्या मालिका, जाहिराती अरेरे... काय ही मराठीची दुरावस्था...
व्यथित झाले अगदी Sad

काही वैयक्तिक नाही, पण पुन्हा लिहून पहा कथा जमल्यास. Happy

तुम्ही अगदी चाणक्षत: निक्षिले...आणि सांगितले याबद्दल दंडवत...

स्तुति करीं जैसा नाहीं अधिकार | न कळे विचार योग्यतेचा ||१||
तुमचें मी दास संतांचें दुर्बळ | करुनि सांभाळ राखा पायीं ||धृ ||
रामकृष्णहरि मंत्र उच्चारणा | आवडी चरणा विठोबाच्या || २||
तुका म्हणे तुमचें सेवितों उच्छिष्ट | क्षमा करीं धीट होऊनियां || ३ ||