नमस्कार मित्रानो…
सोशल मीडिया मार्केटिंग मध्ये आपण वेगवेगळ्या सोशल साईट वर ज्या गोष्टी अपलोड करतो त्याला आपण पोस्ट (POST) म्हणतो. कोणी फोटो पोस्ट करतात तर कोणी व्हिडीओ, कोणी व्यवसायाची माहिती पोस्ट करतात तर कोणी आपली सामाजिक कामे लोकांपुढे पोचवण्यासाठी पोस्ट करतात आणि सध्या तर काही लोकसमूह आपली वैयक्तिक भावनासुद्धा या सोशल मीडियावर व्यक्त करतात. वैयक्तिक आणि व्यवसाईक दृष्ट्या या सोशल मीडिया चा वापर सारेच करत असतात पण नक्की पोस्ट म्हणजे काय ? याचा शब्दाचा सोशल मीडिया मध्ये खूप मोठा अर्थ आहे. चला बघूया…
P : People (लोकसमूह)
सोशल मीडिया मार्केटिंग मध्ये Target Audience कोण आहेत. ज्या लोकांना तुमची माहिती पोचली पाहिजे तो कोणत्या प्रकारचा लोकसमूह असेल याची तुम्हाला माहिती असणे खूप गरजेची आहेत.
O : Objectives (उद्दिष्ट)
सोशल मीडिया मध्ये तुम्ही जर पाऊल ठेवलाय आणि ज्या लोकसमूहाला तुम्ही भेट देताय त्याचा उद्दिष्ट काय आहे हे तुम्हाला माहित असणे गरजेचे आहे. विक्री, माहिती पुरवणे, समाज सेवा इत्यादी प्रकारची उद्दिष्टे असतात त्या पैकी तुमचे उद्दिष्ट काय आहे ?
S : Strategy (योजना / धोरणे)
गरज असलेल्या लोकसमूहापर्यंत पोचण्यासाठी काही योजना आखले का ? त्यांच्यापर्यंत तुमची माहिती कोणत्या प्रकारे पोचेल याची आखणी केले का ?
T : Technology (तंत्रज्ञान)
सोशल मीडिया मार्केटिंगसाठी किंवा त्या लोकसमूहापर्यंत पोचण्यासाठी कोणत्या प्रकारचे तंत्रज्ञान वापरणार याची माहिती तयार करा.
जेव्हा या गोष्टी तुम्ही स्पष्ट कराल तेव्हा तुमच्या सोशल मार्केटिंग योग्य स्वरूप येईल, योग्य वेग प्राप्त होईल आणि तुमचे POST योग्य ठिकाणी पोचेल.
चांगले आहे.अजून लिहा. पी ओ टी
चांगले आहे.अजून लिहा.
पी ओ टी बर्यापैकी करत असतोच, एस कसे साध्य करायचे याबद्दल लिहा.
छान !
छान !
कै पण! हे एक्सप्लेनेशन मला
कै पण!
हे एक्सप्लेनेशन मला INDIA आणि SIR च्या एक्सप्लेनेशन सारखे वाटतेय.
पण चांगलंय!
सोशल मीडीया मॅनेजमेंटमध्ये
सोशल मीडीया मॅनेजमेंटमध्ये पोस्ट म्हणजे काय यावर असेच पीळ मारून शिकवतात. एमबीए टाईप अभ्यासक्रमांमध्ये याचा हल्ली बोलबाला आहे. सुरूवातीला पोरं सोशल मीडीया एक्झिक्युटीव्ह म्हनून हुरळून जातात, नम्तर दिवसभर कंपनीह्च्या पोस्टीला वेगवेगळ्या अकाऊंटने लॉगिन ज्करून लायकी ठोकायचे काम करावं लागतं, पगार तर वाढत नाही, आणि कंपनीची अवस्था वाईट आली की सर्वात आधी जाणार्यांमध्ये यांचा नंबर लागतोच. तस्मात, सोशल मीडीया मार्केटिंग या नावाला फार भुलण्यात काही अर्थ नाही.
तसंही माझ्या माहितीनुसार फेसबूक "पोस्ट" ही संज्ञा वापरतं. इतर सोशल मीडीया वेगवेगळ्या संज्ञा वापरतात. त्यांचे पण फुलफॉर्म कुणीतरी तयार करेलच.
ऑर्कूटवर पण पोस्टच करायचे
ऑर्कूटवर पण पोस्टच करायचे ना?
इथं प्रतिसाद लिहितो.
प्र- प्रत्येकापर्यंत पोहोचण्यासाठी
ति- तिस्मारखांच्या आवेशात
सा- सार्वजनिक व्यासपीठावरून
द- दणका!
साती
साती![Biggrin](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/biggrin.gif)
प्रतिसाद
प्रतिसाद![Rofl](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/rofl.gif)
प्र- प्रकांडपंडित्य
प्र- प्रकांडपंडित्य दाखविणारे
ति- तिरकस
सा- साळसूद
द- दळण दळणारे
असे प्रतिसादाचे चार प्रकार असतात.
साती, झब्बू![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अतरंगी, मस्तच!
अतरंगी,
मस्तच!
प्रतिसाद: मस्त साती आणि
प्रतिसाद: मस्त साती आणि अंतरंगी!![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
आजकाल हा फुलफॉर्म करण्याचा प्रकार खूप पहायला मिळतो.
धाग्याचा उद्देश: सोशल मिडियाचा योग्य वापर - पोस्ट कशा असाव्या हा चांगलाच आहे.
पण त्यासाठी POST चा एक फुलफॉर्म तयार करुन त्यातच तो बसवावा का?
फुलफॉर्म बसवलाच पाहिजे असे
फुलफॉर्म बसवलाच पाहिजे असे काही नाही...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मला हि पद्धत आवडली म्हणून या पद्धतीमध्ये तुम्हाला ही माहिती शेअर करण्याचा प्रयत्न केला.
अंतरंगी आणि साती... खूप छान
अंतरंगी आणि साती... खूप छान![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
mi_anu मला आपला ईमेल आयडी
mi_anu
मला आपला ईमेल आयडी द्याल तर तुम्हाला एक वर्ड फाईल मेल करतो. त्या मध्ये स्ट्रॅटेजि आखू शकता आणि त्याची तुम्हाला मदत होईल.
P : पाणचट / Phaaltu O :
P : पाणचट / Phaaltu![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
O : ओढूनताणून
S : सोडलेली
T : ठुसकी.
नंदिनी ताई... तुम्ही
नंदिनी ताई... तुम्ही म्हटल्याप्रमाणे खूप साऱ्या कंपनीची अशी अवस्था असतेच. मी स्वतः: या फिल्ड मध्ये असल्या कारणाने याबद्दल मला कल्पना आहे.
(No subject)
हे एक्सप्लेनेशन मला INDIA आणि
हे एक्सप्लेनेशन मला INDIA आणि SIR च्या एक्सप्लेनेशन सारखे वाटतेय.>> हो ना कशाचाही बळच फुल फॉर्म करायचा
प्र- प्रत्येकापर्यंत पोहोचण्यासाठी
![Rofl](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/rofl.gif)
ति- तिस्मारखांच्या आवेशात
सा- सार्वजनिक व्यासपीठावरून
द- दणका!
स्मार्ट प्रोजेक्ट आणि फास्ट
स्मार्ट प्रोजेक्ट आणि फास्ट माहिती आहे ना?
स्पेसिफिक्,मेझरेबल,अटेनेबल,रिटेनेबल,टाईम बाऊंड
फेस ड्रूपिंग,आर्म वीकनेस,स्पीच डिफिकल्टिज,टाईम(म्हणजे टाईम न घालवता ९११ डायल करा, भारतात असाल तर शेजार्याला डायल करा.)
SMART हे शक्यतो Goals साठी
SMART हे शक्यतो Goals साठी वापरले जाते,
मंगलाष्टकात वधु वराचे
मंगलाष्टकात वधु वराचे व्याह्यांची नावे गुंफता येत असतीलच तुम्हाला. येखांदा शाम्पल युंद्याच....
नावे द्या, श्याम्पल देतो.
नावे द्या, श्याम्पल देतो.
हे एक्सप्लेनेशन मला INDIA आणि
हे एक्सप्लेनेशन मला INDIA आणि SIR च्या एक्सप्लेनेशन सारखे वाटतेय.
<<
इंडीया चा फुलफॉर्म सोशल मिडीयात "Independent Nation Declared In August" असा अनेक वेळा वाचलाय, खरा आहे का तो?
होय, खरं आहे. इस्ट इंडिया
होय, खरं आहे.
इस्ट इंडिया कंपनीची स्थापना करताना कुठल्यातरी ऑगस्टमधे स्वातंत्र्य द्यायचं असं ठरवून टाकलं होतं त्यांनी.
- प्रतिसाद सौजन्य - एक अड्डेकर.
Inspiring Nation Divided In
Inspiring Nation Divided In August.
: (
नावे द्या, श्याम्पल
नावे द्या, श्याम्पल देतो.
>>
हे घ्या.
अभिषेक, ऐश्वर्या, अमिताभ, जया, श्वेता. लिहा मंगलाष्टक आता ::फिदी:
अनावर झाली 'प्रतीक्षा' हिट ची
अनावर झाली 'प्रतीक्षा' हिट ची ||
मिडास राजा करेल स्पर्श याची ||
तातडीने लिहा कथा नव्या 'धूम' ची ||
भरोश्याची पुंजी मिळावी स्वतः:ची ||
जरी मिळाली ताडमाड वारश्याने उंची ||
आताची वेळ मिड लाईफ क्रायसिस ची ||
(वृत्त मीटर बीटर आम्ही मानत नै, पहिले कापऱ्या आणि नंतर गळा बसल्यावर, गाडीवर हात बसतो तसा दमदार सूर काढून हे पण तालासुरात म्हणणाऱ्या एखाद्या काकू नक्कीच शोधता येतील.)
इंडीया चा फुलफॉर्म सोशल
इंडीया चा फुलफॉर्म सोशल मिडीयात "Independent Nation Declared In August" असा अनेक वेळा वाचलाय, खरा आहे का तो?>>>>>>>>>>>
दीपा अंतिम फेरीत पोचली त्या दिवशीच अंतिम फेरी 14ला आहे हे कळले होते, तरी दुसऱ्या दिवसापासून निम्म्या पब्लिकने तिचा फोटो, ऑलिम्पिक निकाल वगैरे सगळे फोटोशॉप करून तिला सुवर्णपदक मिळाले हे सांगायला सुरुवात केली आणि उरलेल्या निम्मया पब्लिकने ते मेसेज दुसर्यांना पाठवून हे खरे आहे का विचारायला सुरवात केली. वरचा प्रतिसाद वाचून नेमके हेच आठवले.