जयमल्हार

Submitted by अ भि अ भि on 4 August, 2016 - 18:42

जय मल्हार बद्दल मी धागा शोधत होतो पण मला काही तो मिळाला नाही म्हणून मी येथे विचारणा करायला हा धागा उलगडत आहे.

जश्या मला या मालिकेबद्दल शंका आहेत तश्याच इतर माबोकारांना असतील तर त्यांनी येथे त्या मांडाव्यात

Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रत्यक्ष खंडोबालाही स्वता: बद्दल नव्याने समजत असल्यामुळे देव कन्फ्युज्ड आहेत Uhoh
अशी आतल्या गोटातली खबर आहे. Proud

जश्या मला या मालिकेबद्दल शंका आहेत तश्याच इतर माबोकारांना असतील तर त्यांनी येथे त्या मांडाव्यात >>>>

आधी तुमच्या शंका तर सांगा

आंबट गोड | 5 August, 2016 - 04:56 नवीन
आता काय जय मल्हार बद्दल ? संपत आली शिरेल....( होपफुली!) <<<<

काय... केव्हा, कधी, कशी काय..??????????????

बरं झालं एकदाचं, मी तर पेढेच वाटीन बाई.

महेश कोठारे छाप बाललीला विनोदी चित्रपटांची आवृत्ती म्हणजे ही सिरीयल.

जौद्या. या मालिकेच्या कमाईवर त्यांनी आपल्या म्हातारपणाची सोय केली Happy

जश्या मला या मालिकेबद्दल शंका आहेत तश्याच इतर माबोकारांना असतील तर त्यांनी येथे त्या मांडाव्यात>>
तुमच्या शंका कितीही असू दे, महेश कोठारेंनी एका वाक्यात उत्तर दिले आहे, "हि मालिका आहे"
- source माझी आई. मीही अनेक शंका उपस्थित केल्यावर तिने मला हे सांगितलं Happy

म्हाळसा अन् बानू या दोघीही बालिश, अडाणी आहेत. त्यांना त्यांच्या गत जन्माविषयी कधीच काही कळणार नाही. जेव्हा त्या खंडोबाला गतजन्माविषयी काही विचारतात तेव्हा देव म्हणतात,"योग्य वेळ आल्यावर सगळं कळेल." पण ती वेळ कधीच येणार नाही अशी आतली बातमी आहे.
आणि अजून विचाराल तर टाइमपास सुरू आहे.

अजून विचाराल तर टाइमपास सुरू आहे.
तो तर केव्हा पासून सुरू आहे. Lol
बाकी ह्या सिरियल मुळे ज्येष्ठ नागरिकांना अगदी धार्मिक काहीतरी पाहिल्याचा आनंद मिळतो. इतक्या भक्ती भावाने बघतात.

म्या अजूनपत्तुर काय बाय कळल या आशेवर बघत व्हते, ती म्हाळसा ताय आणी बानूबया दोघी प्रेक्षक म्हातारे व्हईपर्यंत अडाणीच र्हातीला.

अरे त्या विष्णूचं काम करणारा कलाकार कितीदा बदलतात?? बिचार्‍या लक्ष्मीला सारखं अॅडजेस्ट करुन घ्यावं लागत असेल.

आॅ, परत बदलला? आधी विष्णूचे काम करणारा अभिनेता हार्ट अॅटॅकने गेला, म्हणून नकुल घाणेकरला हा रोल दिला होता.
आता नकुल घाणेकरने पण सिरीयल सोडली काय?

काही म्हणा पण काल सगळेच फार सुरेख दिसत होते. द्येव व म्हाळसा शुभ्र कपड्यात. व म्हाळसा व गणेश बा ळाचा एक सीन होता त्यात तर म्हाळसेचा गेटप केवळ अप्रतिम. साडी शेला. दागिने एकदम
भारी. आई मूल एकत्र छान दिसत होते. ती मध्येच एक देवी टाइ प बाई म्हाळसेशी बोलून जाते तीपण हिरव्या साडीत सुरेख दिसत होती. पण ती जरा स्पूकी वाट ते. मळवट भरला तर उग्र दिसेल अशी. मी पण घरी आल्यावर उद्योग नाही म्हणून बघायला सुरुवात केली आहे नेमाने.

त्या विष्णूचं काम करणारा कलाकार कितीदा बदलतात??>>>>

अवातर कार्य बदलले असेल....

ही सिरियल बहुदा चारी वेद, उपनिषदे, १८ पुराणे संगळ्यांचा अन्तर्भाव करुन सुरु ठेवायचा विचार दिसतोय...
खंडोबाचे पात्राला दुसरा आवतार घ्यायची वेळ आली की संपेल बहुदा!!

अरे त्या विष्णूचं काम करणारा कलाकार कितीदा बदलतात?? बिचार्‍या लक्ष्मीला सारखं अॅडजेस्ट करुन घ्यावं लागत असेल. >>>

असं म्हणतात की लक्ष्मी चंचल असते.

आता ओंकार कर्वेला ( वहिनीसाहेब फेम, ज्यात तो भार्गवी चिरमुलेचा नवरा आणी विनय आपटेचा मोठा मुलगा दाखवलाय) विष्णु बनवले. पण त्याचे उच्चार सदोष वाटले. नकुल घाणेकर बेस्ट होता, पण तो ही कंटाळला असेल बहुतेक.

खंडोबा १२ वर्षे बानुकडे राहतो, तो भाग २-३ महिन्यात आटोपला, तेव्हा वाटलेले की बानू म्हाळसा यांचा समेट अजून २-३ महिन्यात संपवतील.
पण कसले काय. चालूच आहे यांचे पाणी घालणे.

मागच्या वर्षी मी ही मालिका बघायचे.
ऑगस्ट मध्ये आख्यान सुरू झालं आणि आम्ही सप्टेंबर मध्ये भारतदौरा केला...आल्यावर वाटलं संपली असेल मालिका तर कसलं काय...पुढचा सप्टेंबर आला तरी त्यांच ''मै कौन हू?'' हे सुरूच आहे...

विकिपिडिया आणि जयमल्हारनुसार खंडोबाला पाच (किंवा अनेक) बायका होत्या : सगळ्यांची नावे दिलेली नाहीत. अद्याप पहिल्या दोन बायकांचेच दळण चालू आहे. बाकीच्या तीन अजून यायच्या आहेत. म्हाळसा, बाणाई, रंभाई, फुलाई आणि पाचवी चंदाई अशी नावे जयमल्हार साईटवर आढळतात.

बाणाई, रंभाई, फुला आणि पाचवी चंदा अशी नावे जयमल्हार साईटवर आढळतात.>>>>>म्हाळसाने बाणाईला हाणायला ( शाब्दिक ) सुरुवात केल्याने बाकीच्या ई ई करत पळालेल्या दिसतायत.:दिवा:

विष्णु बनवले. पण त्याचे उच्चार सदोष वाटले. नकुल घाणेकर बेस्ट होता>>>>

अगदी अगदी.. खूपच सदोष उच्चार!!

पार्वती आततायी आहेच आधी पासून. तिचाच अवतार म्हाळसा ना?

आवरा या शिरेअल्ला Happy कुटून च्या कुटं चालली बघा....
कुटं कुटं न्येऊन ठिवला माजा खंडेराया !!
या कलाकारांना हसू येत असेल बहुतेक आता तेच ते डायलॉग्ज बोलतांना.....कशी जिरवली प्रेक्षकांची ...असे म्हणत असतील मनातल्या मनात! Happy
नंदेशराव........सो फनी!!!! Biggrin

ही सिरेल का लांबवतायेत? की कलाकार फ्री ऑफ कॉस्ट कास्टिंग करतायेत? काहीच कळत नाही आहे...

रोज पाहताना वाटते हा भाग आपण आधी पाहिलेला आहे...

नाही...सूर्यदेव तर आहेत दुसरे त्यांच्या कडे डेडिकेटेड!!>> हो ना! आणि म्हाळसा स्टीलच्या तांब्यातून वरच्या मजल्यावरुन अर्घ्यही देते त्यांना त्यांच्याशी गप्पा मारता मारता.

आणि म्हाळसा स्टीलच्या तांब्यातून वरच्या मजल्यावरुन अर्घ्यही देते त्यांना त्यांच्याशी गप्पा मारता मारता. >>> Rofl

लोकं मॉर्निंग वॉक करतात तसे म्हाळसा मॉर्निंग टॉक करते.

Pages