Submitted by अ भि अ भि on 4 August, 2016 - 18:42
जय मल्हार बद्दल मी धागा शोधत होतो पण मला काही तो मिळाला नाही म्हणून मी येथे विचारणा करायला हा धागा उलगडत आहे.
जश्या मला या मालिकेबद्दल शंका आहेत तश्याच इतर माबोकारांना असतील तर त्यांनी येथे त्या मांडाव्यात
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
निधी, माधव
निधी, माधव
हसून हसून पुरेवाट!
हसून हसून पुरेवाट!
माधव
माधव
मुख्य युद्ध विसरून च गेले
मुख्य युद्ध विसरून च गेले आहेत हे लोक
फक्त दोन दिवस दाखवले कुठले तरी दोन राक्षस मारले आणि मग लक्ष्मी चा शाप समुद्र मन्थन चे आख्यान सुरु केले
हे म्हणजे सत्य नारायण कथे सारखे झाले ........ मूळ मुद्दा बाजूला युद्ध दाखवा आणि संपवा मालिका नाहितर रामायण महाभारत पण दाखवतिल आख्यानात...:D
(No subject)
कुठले युद्ध अन कसले
कुठले युद्ध अन कसले काय.........खंडोबाला त्याच्या दोन बायकां मधूनच वेळ मिळेना.....
अक्षरशः सेम स्टोरी पुन्हा रिपीट करताहेत ........काही शेंडा न बुडखा असलेले कथानक टाकून....
आज महालक्ष्मी ची ओटी भरताना
आज महालक्ष्मी ची ओटी भरताना
म्हाळसानी (त्या नटीने) नख किती वाढवल्येत हे दिसले
एक बरे आहे इथले सगळे नट निदान दाढी करून येतात, त्या "खु क खु" आणि "मा न बा" च्या नटांसारखे खुंट वाढवून नाही येत.
आज तर ह्या लोकांनी गौतम
आज तर ह्या लोकांनी गौतम ऋषीच्या तोंडून चुकीचे संस्कृत वदवले
"अग्नये" स्वाहा च्या ऐवजी अग्नेय स्वाहा म्हणत होते
कृपया लेखक आणि संवाद लिहीणार्या व्यक्तींनी जरा लक्ष द्यावे
ईथे कोणाला माहीत आहे का खर्या
ईथे कोणाला माहीत आहे का खर्या कथेत खंडोबासोबत कैलासावर म्हाळसा गेलीये की बानु?
शेवटचा मास म्हणायला लागले
शेवटचा मास म्हणायला लागले आहेत आता
म्हाळसा नि पैज च लावली आहे
जिकडे तिकडे पैज !!
जिकडे तिकडे पैज !!
कधी संपणार ही
कधी संपणार ही मालिका.....?
अरे एकदा म्हाळसा गड सोडून जाते, एकदा खंडोबा, एकदा बानू.. मग पुन्हा म्हाळसा......अरे राम! प्रेक्षक कधीच मालिका सोडून गेलेत त्याचे काय?
प्रेक्षक कधीच मालिका सोडून
प्रेक्षक कधीच मालिका सोडून गेलेत त्याचे काय?
प्रेक्षक कधीच मालिका सोडून
प्रेक्षक कधीच मालिका सोडून गेलेत त्याचे काय?
(No subject)
कैलासावर म्हाळसा गेलीये की
कैलासावर म्हाळसा गेलीये की बानु?>>> बहुतेक म्हाळसा असावी कारण आपण कैलासावर शंकर पार्वती राहतात असं ऐकलंय ना लहानपणापासून मग म्हाळसा पार्वतीचं रूप आहेना. मग तीच.
बानू बहुतेक एका जन्मापुरती बायको शंकराची, मल्हार अवतारातली.
कैलासावर म्हाळसा गेलीये की
कैलासावर म्हाळसा गेलीये की बानु? >>>>>
बहुतेक दोघीही जातात.. कारण कैलासावर शंकर व पार्वती रहातात व म्हाळसा पर्वतीचे रुप आहे हे सुद्धा बरोबर आहे. पन बानू ही पार्वतीची सखी म्हना किंवा दासी म्हना आहे.. तर बानू ही पार्वतीबरोबरच आसते कैलासात तीची सेवा करायला. माझ्या मते तरी म्हाळसा व बानू दोघीही गेलेल्या असाव्यात केलासात...
अरे अजुन चालूये का ही सिरिअल
अरे अजुन चालूये का ही सिरिअल
हो ती असणारच. महेश कोठारींची
हो ती असणारच. महेश कोठारींची निर्मिती आहे ना ?
काही काही निर्माते लाडातले असतात .
चुकीचा प्रतिसाद. संपादित.
चुकीचा प्रतिसाद. संपादित.
पण आता मालिका जरा वेगात आलीय.
पण आता मालिका जरा वेगात आलीय. म्हाळसेला पूर्व जन्म आठवला आहे (परंतु खरं तर लक्ख आठवालाय असं काही वाटत नाही...ती कंफ्यूज्ड वाटत्ये!)..पण बानूला जर हे कळलं आणि सॉफ्ट कॉर्नर दाखविला तर तिची 'अपेक्षित' अध्यत्मिक उन्नती होणार नाही म्हणे! म्हणून तेच दळण पुन्हा पुढे चाललंय..'हे' गड सोडून गेले ते तुझ्यामुळे! तू ह्यांना गडावर येउन भेटायचं नाहीस. हा माझा अंतीम निर्णय आहे..." वगैरे वगैरे... फक्त म्हाळसा चा गेटप बदललाय.....
पण आता मालिका जरा वेगात आलीय.
पण आता मालिका जरा वेगात आलीय. म्हाळसेला पूर्व जन्म आठवला आहे (परंतु खरं तर लक्ख आठवालाय असं काही वाटत नाही...ती कंफ्यूज्ड वाटत्ये!)..पण बानूला जर हे कळलं आणि सॉफ्ट कॉर्नर दाखविला तर तिची 'अपेक्षित' अध्यत्मिक उन्नती होणार नाही म्हणे! म्हणून तेच दळण पुन्हा पुढे चाललंय..'हे' गड सोडून गेले ते तुझ्यामुळे! तू ह्यांना गडावर येउन भेटायचं नाहीस. हा माझा अंतीम निर्णय आहे..." वगैरे वगैरे... फक्त म्हाळसा चा गेटप बदललाय.....>>>
कोठारेंचा कोटा संपला नाही पुन्हा अजून एखादे देवर्षी नारदाचे आख्याण टाकावे असा विचार आहे! नंतर मग सारीपाटाचा एक डाव.. मग बानुला साडी चोळीचा आहेर किती तरी एपिसोडस बाकी आहेत!
प्रेक्षक कधीच मालिका सोडून
प्रेक्षक कधीच मालिका सोडून गेलेत त्याचे काय? <<<<
गुरुनाथ म्हणेल "योssग्य वेळ
गुरुनाथ म्हणेल "योssग्य वेळ आल्यावर राधिकेला कळून राहील की हिच तिची गतजन्मीची फ्रेण्ड अल्पाद्री आम्ही तेव्हा आल्प्स मधे राहून् होतो."
हे असल काही सुचण्याच कारण
काही दिवसांपुर्वी माझ्या मित्राची मुलगी म्हणालेली " बाबा!!! हि बानू ना त्या काळातली शनाया होती"
Submitted by गुगु on 17 January, 2017 - 22:17>>
Copy paste from mazya navryachi bayko thread
आता काय चालू आहे?
आता काय चालू आहे?
काल थोडी पाहिली...तर गणेश
काल थोडी पाहिली...तर गणेश जन्माचं मागल्या वर्षीचंच दाखवत होते...तेच स्नान, तोच सोहोळा!
हरे राम! मोठारेंना कुणीतरी स्पेशल निरोप देऊन ही शिरेल बंद करायला हवी!
म्हाळसेला काही कळलं नाही
म्हाळसेला काही कळलं नाही संकेतांमधून. मग गणेश ने डाय्रेक्ट शक्तीपात करवून स्मृती परत आणली. पण येवढं होउनही खंडेराय बानूला सहाय्य म्हणून शक्तीरूपाच्या कथा सांगताहेत. यावरून मला कसे कळणार असं बानूने एकदा विचारलं सुद्धा! त्यावर देव म्हणाले या शक्तीरूपाशी तुझी ओळख आहे कि असेच काहीतरी! बिचारी बानू!
पुराणात नसलेले वाँगे शिजवून
पुराणात नसलेले वाँगे शिजवून भरीत बनवत आहेत!
किती ते काय काय करणार मालिका लाँबवायला
सारखे आख्यान आणि काय काय दाखवित बसतात तेच तेच परत परत... मोठारेंच्या कोठारातल्या कथा वापरून मालिका लाँबविण्याचा प्रयत्न!
म्हाळसेला पूर्वजन्म आठवलाय.
म्हाळसेला पूर्वजन्म आठवलाय. मग आता तिला खंडोबासोबत कैलासात धाडून शिरेल संपवायची तर नाही. आता म्हाळसेलाच बानूला पूर्वजन्म आठवत नाही म्हणून काळजी लागलीय.
फक्त म्हाळसा चा गेटप बदललाय..
फक्त म्हाळसा चा गेटप बदललाय.....>>> सुसह्य केलाय, तिला आधीच्या गेटपात बघताना मलाच अवघडायला व्हायच. एका एपिमधे तर लक्ष्मीची नौवार शिवलेली आहे हे स्पष्ट कळत होत. इतक्या पार्लरवाल्या आहेत त्यांच्याकडुन नेसवुन का घेत नाहीत नौवार काय म्हैत!
Pages