जवस ४ वाट्या
लाल भोपळ्याच्या सोललेल्या बीया १ वाटी
सुर्यफूलाच्या सोललेल्या बीया १ वाटी
तिळ अर्धी वाटी
मीठ चवीनुसार
बदाम पावडर १ वाटी
पाणी ४ वाट्या
नारळाचे तेल १ टेबल्स्पून ऐच्छीक
वरील साहित्यात आवडीनुसार कमी - अधिक बदल करू शकता.
मी कार्ब कमीत कमी घेत असल्याने बदाम पावडर वापरली आहे त्याऐवजी ओट्स, मक्याचे पीठ, हळद, ओवा, मिठाऐवजी साखर , मिरपूड असे हवे ते बदल इथे करू शकता.
जवस निवडून एका भांड्यात घ्या व त्यात पाणी घालून व्यवस्थित एकत्र करून घ्या. सधारण १ ते २ तास हे फ्रिज मध्ये कींवा फ्रिज बाहेर ठेवा.
तासा दोन तासात जवस सर्व पाणी शोषून घेते व मिश्रण चिकट (बुळबूळीत) होते.
ह्यात लाल भोपळ्याच्या बीया, सुर्यफूलाच्या, बीया बदाम पावडर, मीठ, वापरणार असलात तर नारळाचे तेल घालून मिश्रण (अगदी घोटतो त्याप्रमाणे) व्यवस्थित एकत्र करून घ्यावे.
ओव्हन १८० डीग्री तापमानाला प्रीहिट करून घ्यावा. एका ट्रेवर बटर पेपर ठेवून त्यावर ह्यातले काही मिश्रण एकसारखे (साधारण २ मिमि चा थर) पसरावे. त्यावर तिळ एकसारखे पसरावेत.
ओव्हनमध्ये २०-२५ मि. भाजावे.
ट्रे बाहेर काढून कटरने हव्या त्या आकारात वड्या कापाव्यात.
सर्व वड्या उलटून परत १५-२० मि. भाजावे.
हा प्रकार संपुर्ण सुकेपर्यंत भाजायला हवे आहे त्यामुळे एकदा तपासून लागेल तेवढावेळ (हवे असल्यास
ओव्हनचे तापमान कमी करून) भाजावे.
बाहेर काढून थंड झाल्यावर डब्यात भरून ठेवावे.
बटर, चिज, चिज स्प्रेड, काकडी - सि. मिरचीचे सँडविच करून, अवाकाडो स्प्रेड, नटेला ह्यासोबत किंवा अगदी नुसतेच खायला मस्त लागते. पौष्टीक, पोटभरीचा, सहज सोबत बाळगता येण्यासारखा हा पदार्थ. लोहाची कमी असणार्यांसाठी अगदी खायला हवाच असा हा पदार्थ.
लाल भोपळ्याच्या तसेच सुर्यफूलाच्या सोललेल्या बीया इथे सर्वच दुकानात सहज विकत मिळतात.
छान करुन बघायला हवे
छान करुन बघायला हवे
अरे वा.. मस्त आहे ही कृती.
अरे वा.. मस्त आहे ही कृती. सगळे घटक पोषक आहेत शरिराला. ओमेगा-०३ विपुल प्रमाणात मिळेल.
मस्त आहे.
मस्त आहे.
इन्टरेस्टिंग! कॉसकोत
इन्टरेस्टिंग! कॉसकोत मिळणार्या ऑस्सी बाइट (वजा साखर) सारखे लागेल असे वाटतेय.
Mast
Mast
Chaan ahe. Try Karin. Baryach
Chaan ahe. Try Karin.
Baryach divasanni vegli pakakruti ali maaybolivar!
मस्त दिसताहेत.. आमच्याकडे
मस्त दिसताहेत.. आमच्याकडे यातले काय काय मिळतेय बघायला हवे !
इंटरेस्टींग!
इंटरेस्टींग!
फारच छान!
फारच छान!
व्वा! पौष्टिक आणि चविष्ट!
व्वा! पौष्टिक आणि चविष्ट!
भारीच. ग्रेट नलिनी.
भारीच. ग्रेट नलिनी.
आहा, नलिनी, खुपच छान दिसतायत
आहा, नलिनी, खुपच छान दिसतायत वड्या / क्रॅकर्स.
एकदा नक्की करून बघणार.
पण माझ्याकडे ओव्हन नाहीये. त्याला पर्याय सांग ना.
आमचा
आमचा मायक्रोवेव्ह-कन्व्हेक्शन-ग्रिल ओव्हन आहे.
त्यात क्न्व्हेक्शनवर हे करता येईल का?
सपाट तव्यावर अगदी मंद आचेवर
सपाट तव्यावर अगदी मंद आचेवर ठेवून होतील, वर मोठी चाळण झाकण ठेवायची.
फोटो दिसत नाहीयेत त्यामुळे
फोटो दिसत नाहीयेत त्यामुळे एंड प्रॉडक्टचा अंदाज येत नाहीये पण पौष्टिक आहे नक्कीच.
धन्यवाद सर्वांना! सई,
धन्यवाद सर्वांना!
सई, दिनेशदादाने सांगितल्याप्रमाणे तव्यावर होऊ शकतील. प्रायोगिक तत्वावर अगदीच २-४ चमचे साहित्य घेवून करता येईल. पण तव्यावर करायचे म्हटल्यास अगदी वेळखाऊ काम होईल असे वाटते आहे.
सायो, फोटो क्रोम व आय ई वर दिसतात.सफारीवर कधी दिसतात तर कधी नाही
त्यात क्न्व्हेक्शनवर हे करता येईल का?>> हो नक्की करता येतील. हवे तर सुरवातीला कमी प्रमाणात करून पाहा.