जवसाचे बिस्किट / क्रॅकर्स / वड्या

Submitted by नलिनी on 12 August, 2016 - 07:37
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३ तास
लागणारे जिन्नस: 

जवस ४ वाट्या
लाल भोपळ्याच्या सोललेल्या बीया १ वाटी
सुर्यफूलाच्या सोललेल्या बीया १ वाटी
तिळ अर्धी वाटी
मीठ चवीनुसार
बदाम पावडर १ वाटी
पाणी ४ वाट्या
नारळाचे तेल १ टेबल्स्पून ऐच्छीक

वरील साहित्यात आवडीनुसार कमी - अधिक बदल करू शकता.
मी कार्ब कमीत कमी घेत असल्याने बदाम पावडर वापरली आहे त्याऐवजी ओट्स, मक्याचे पीठ, हळद, ओवा, मिठाऐवजी साखर , मिरपूड असे हवे ते बदल इथे करू शकता.

क्रमवार पाककृती: 

जवस निवडून एका भांड्यात घ्या व त्यात पाणी घालून व्यवस्थित एकत्र करून घ्या. सधारण १ ते २ तास हे फ्रिज मध्ये कींवा फ्रिज बाहेर ठेवा.
तासा दोन तासात जवस सर्व पाणी शोषून घेते व मिश्रण चिकट (बुळबूळीत) होते.
ह्यात लाल भोपळ्याच्या बीया, सुर्यफूलाच्या, बीया बदाम पावडर, मीठ, वापरणार असलात तर नारळाचे तेल घालून मिश्रण (अगदी घोटतो त्याप्रमाणे) व्यवस्थित एकत्र करून घ्यावे.

ओव्हन १८० डीग्री तापमानाला प्रीहिट करून घ्यावा. एका ट्रेवर बटर पेपर ठेवून त्यावर ह्यातले काही मिश्रण एकसारखे (साधारण २ मिमि चा थर) पसरावे. त्यावर तिळ एकसारखे पसरावेत.

ओव्हनमध्ये २०-२५ मि. भाजावे.
ट्रे बाहेर काढून कटरने हव्या त्या आकारात वड्या कापाव्यात.
सर्व वड्या उलटून परत १५-२० मि. भाजावे.
हा प्रकार संपुर्ण सुकेपर्यंत भाजायला हवे आहे त्यामुळे एकदा तपासून लागेल तेवढावेळ (हवे असल्यास
ओव्हनचे तापमान कमी करून) भाजावे.
बाहेर काढून थंड झाल्यावर डब्यात भरून ठेवावे.

अधिक टिपा: 

बटर, चिज, चिज स्प्रेड, काकडी - सि. मिरचीचे सँडविच करून, अवाकाडो स्प्रेड, नटेला ह्यासोबत किंवा अगदी नुसतेच खायला मस्त लागते. पौष्टीक, पोटभरीचा, सहज सोबत बाळगता येण्यासारखा हा पदार्थ. लोहाची कमी असणार्‍यांसाठी अगदी खायला हवाच असा हा पदार्थ.

लाल भोपळ्याच्या तसेच सुर्यफूलाच्या सोललेल्या बीया इथे सर्वच दुकानात सहज विकत मिळतात.

माहितीचा स्रोत: 
मैत्रिण, युट्यूब
Group content visibility: 
Public - accessible to all site users

इन्टरेस्टिंग! कॉसकोत मिळणार्‍या ऑस्सी बाइट (वजा साखर) सारखे लागेल असे वाटतेय.

Mast

आहा, नलिनी, खुपच छान दिसतायत वड्या / क्रॅकर्स.
एकदा नक्की करून बघणार.
पण माझ्याकडे ओव्हन नाहीये. त्याला पर्याय सांग ना.

आमचा मायक्रोवेव्ह-कन्व्हेक्शन-ग्रिल ओव्हन आहे.
त्यात क्न्व्हेक्शनवर हे करता येईल का?

धन्यवाद सर्वांना!
सई, दिनेशदादाने सांगितल्याप्रमाणे तव्यावर होऊ शकतील. प्रायोगिक तत्वावर अगदीच २-४ चमचे साहित्य घेवून करता येईल. पण तव्यावर करायचे म्हटल्यास अगदी वेळखाऊ काम होईल असे वाटते आहे.

सायो, फोटो क्रोम व आय ई वर दिसतात.सफारीवर कधी दिसतात तर कधी नाही

त्यात क्न्व्हेक्शनवर हे करता येईल का?>> हो नक्की करता येतील. हवे तर सुरवातीला कमी प्रमाणात करून पाहा.

Back to top