नणंदेच्या आग्रहाला बळी पडून तिच्याबरोबर १९ ते २५ नोवेंबर मलेशियाला जायला होकार दिला, तिकिटेही काढली गेली आणि आता ती मला सांगतेय की कुठे राहायचे, काय बघायचे हे तु ठरव, आपण बुक करू. हे " तु ठरव, आपण बुक करू" प्रकरण आहे हे मला माहित नव्हते, मला वाटलेले की तिने सगळा प्लान बनवलाय आणि मला नुसतेच भटकायचेय.
तर आता माझ्या गळ्यात प्लान करायची जबाबदारी आल्यावर मला मायबोलीची आठवण झाली. इथे मलेशिया गुगलुन पाहिले, पुर्ण माहिती नाहीय आणि जी आहे ती जुनी आहे. म्हणुन म्हटले धागाच काढुया आता. तसेही बरेच महिने मी धागे विणले नाहीयेतच.
तर मंडळी, मला या कामात जरा मदत करा.
प्लान असा आहे -
१९ ला क्वालालंपुरसाठी निघणार, २० ला सकाळी क्वालालपुरला पोहोचू. तिथुन २२ ला सकाळचे पेनांगला जायचे विमान तिकिट आहे. २५ चे परतीचे तिकिट लंकावीवरुन आहे. (langwaki) लंकावी ते क्वालालंपुर आणि क्वालालंपुर त मुंबई.
हॉटेल बुकिंङसाठी मी airbnb पाह्तेय. KL मध्ये genting highland पाहायचे याबद्दल नणंद ठाम आहे.. त्यात बहुतेक एक दिवस जाईल.
पेनांग ते लंकावी बोटीने जास्त जवळ आणि स्वस्त आहे असे नेटवर वाचलेय. नोवेंबर शेवट हा तिथे पावसाळ्याचाही शेवट असतो, त्यामुळे बोट प्रवास कितपत सुरक्षित? नेटवर तरी बरापैकी सेफ आहे असे वाचले.
पेनांगमध्ये १ दिवस पुरेसा होईल की २ दिवस राहावे? नेटवरचे वाचुन १ दिवस पुरेसा होईल असे वाटतेय. लाण्गवाकी मला जास्त बरे वाटतेय. तिथे काय काय पाहता येईल ते मी नेटवर शोधतेय, कोणाला काही माहिती असेल तर सांगा.
तिथे फिरण्यासाठी टॅक्सी केलेली बरी असेही वाचलेय. याबाबत काही अनुभव असेल तर सांगा. आम्ही ४ जण आहोत, एक टॅक्सी पुरण्यासारखी आहे.
साधना लंकावी ते पेनांग बोटी
साधना लंकावी ते पेनांग बोटी आहेत व सेफ आहेत..लंकावी खूपच सुंदर आहे..२,३ दिवस सहज लागतात..टँक्सी तिथे जाऊन बुक करता येते..साधारण 100 रिंगेट होतील दिवसाला..रोप वे, क्रोकोडाईल फार्म,agricullture फार्म,बीच activities,ईगल square,बोट राईड असे बरेच काहि बघता येईलआणि shopping बरेच स्वस्त आहे....हॉटेल बीच जवळ घेतले तर जरा महाग असेल ...पेनांग मध्ये फारसे काही बघण्यासारखे नाही..गेंटिंग ला एक दिवस राहिलात तरी चालेल..अजून काहीही माहिती हवी असेल तर नक्की विचारा
KL मध्ये दोन दिवस असल्याने
KL मध्ये दोन दिवस असल्याने KL & genting highland साठी प्रत्येकी एक दिवस लागेल. KL मध्ये ट्विन टॉवर च्या आसपास राहिल्यस वेळ जाणार नाही.
पेनांग मध्ये फक्त चीनी मंदीरे पाहाण्यासारखी आहेत. एक दिवस खुप झाला. चिनी मंदीरे बघण्यात interest नसेल तर नाही थंबलात तरी चालेल.
मी पेनांग ते लंकावी बोट नी दोन वेळा गेलो आहे. बोट सेफ असली तरी खुप रफ राईड असते . जर बोटीचा त्रास होणार असेल तर त्यासाठी औषधे जवळ असु द्या.
आजुन काही specific माहिती पाहिजे असल्यास जरुर विचारा.
माझाही प्लॅन आहेच . उपयुक्त
माझाही प्लॅन आहेच . उपयुक्त बाफ आहे. पाच दिवसांसाठी साधारण किती खर्च वगैरे येतो ते कोणी सांगाल का ? दोन जणांसाठी .
Taman Negara पण छान आहे
Taman Negara पण छान आहे
https://www.getyourguide.com/
https://www.getyourguide.com/kuala-lumpur-l171/day-trips-tc172/?cmp=ga&c...
कुठल्याही नव्या ठिकाणी जाताना मी डे एस्कर्शन्स फ्रॉम ... असे गुगल करतो. आलेल्या ठिकाणाचे रिव्ह्यू वाचतो आणि मग ठरवतो. ट्रिप अॅडव्हायजर वर लेटेस्ट वाचायचे.
हॉटेल बूकिंगसाठी पण असेच करायचे ( म्हणजे रिव्ह्यू वाचायचे )
तूम्हाला जायला अजून वेळ आहे, त्यामूळे टूअर कोटेशन्स पण मागवता येतील.
genting highland मध्ये कसिनोत
genting highland मध्ये कसिनोत जायचे असेल तरच जा. सगळ्या अॅक्टीव्हीटी या बंदीस्त इमारतीत आहेत. आकाश चुकूनही दिसत नाही. मला तरी बिलकुल आवडले नव्हते. मी थॉ.कु. मधून गेल्यामुळे आमचा प्रोग्रॅम फिक्स्ड होता. पण जर त्यांचे काही ट्रेल्स उपल्ब्ध असतील तर बघ. genting highland उंच डोंगरावर आहे आणि भोवती घनदाट रेन फॉरेस्ट आहे. त्यामुळे ट्रेल्स खूप मस्त असतील.
थीम पार्क / वॉटर पार्कची आवड असेल तर सनवे लगून चांगले आहे. २-३ राईड्स एकदम हटके वाटल्या. बाजूला सनवेचेच शॉपींग प्लाझा पण आहे. काही काही चांगली डील्स मिळतात.
KL -> Sunway Lagoon Water
KL -> Sunway Lagoon Water park aahe, 1 divas jato.
KL Tower, Twin tower - half day
Batu Caves (Kartikey Temple) - half day
Putra Jaya - Govt buildings, manmade lake - half day
Musjid India ( indian restaurants), Peking street (china town)
Genting -> Outdoor theme parks close aahet, so indoor theme park, casino.
Pan cable car aahe ti ekdam mast aahe, Genting la jatana Batu Caves watet lagate, tithe ja.
Penang -> we went to Pengang hill, Hong kong chya PEAK sarakhi chhotisi train aahe ethe, time pass aahe.
Penang to Langkawi fast boat ne 3 hrs lagataat, mast watate.
Langkawi -> cable car mast aahe, hanging bridge pan changala aahe.
Eagle square changale ahe.
साधना मलेशियावरून मित्र
साधना मलेशियावरून मित्र मैत्रिणींसाठी काय आणावे हे वरच्या हेडींगमध्ये अॅड कर. इथे लिस्ट आली की माझ्यासाठी तू काय आणायचे ते मला सांगता येईल.![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
सगळ्यांचे मनापासुन आभार.
सगळ्यांचे मनापासुन आभार. मला कॅसिनो, राईडस इत्यादी गोष्टींमध्ये अजिबात रस नाहीये. ट्रेल्सची चौकशी मात्र नक्की करेन. रेन फोरेस्टमध्ये फिरण्याचा अनुभव घ्यायला खुपच आवडेल.
जागु
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मलेशियामध्ये आवर्जुन विकत घेण्यासारखे काय असेल तर तेही कृपया सांगा. उगीच इथे जे मिळते तेच तिथे जाऊन घेण्यात अर्थ नाही. माझा भाऊ सकु. थायलंडला गेला तेव्हा तिकडुन भेटवस्तु म्हणुन पर्सेस घेऊन आला. काय घ्यावे हे त्यांना ना सुचले ना घेण्यासारखे काही दिसले.
पाच दिवसांसाठी साधारण किती
पाच दिवसांसाठी साधारण किती खर्च वगैरे येतो ते कोणी सांगाल का ? दोन जणांसाठी .
मी जाऊन आले की अपडेट करेनच. आम्हाला तिकिटे प्रत्येकी ३२५०० ला पडली.इन्स्युरन्चे, विमा, हॉटेल बुकिण्ङ वगैरे सगळेच आहे. फक्त तिकिटेच काढलीत.
साधना, तिथे ब्रँडेड वस्तूंवर
साधना, तिथे ब्रँडेड वस्तूंवर चांगली डील्स असतात. त्या वस्तूंत रस असेल तर त्या भारतापेक्षा थोड्या स्वस्त मिळतात. लोकल वस्तूत मला ऑर्कीडच्या वस्तू खूप मस्त वाटल्या. आपल्याकडे पूर्वी सोनचाफ्याची फुले बाटलीमध्ये कसले तरी द्रावण भरून साठवून ठेवायचे. वर्षानुवर्षे ती फुले टवटवीत रहायची. तिकडे काचेमध्ये काही खास पद्धतीने ऑर्कीडची फुले सोडतात... काही द्रव वगैरे नसतो. फ्रेम्स, लॉकेट्स खूप मस्त दिसतात त्याची. फक्त सगळी ओर्कीड्स किरमीजी रंगाचीच असतात. रंगात पर्याय नाही दिसला.
जरुरीपुरते रींगेट्सच इथे खरेदी कर. तिथे बहुतेक सगळ्या मोठ्या शॉपिंग काँप्लेक्सम्ध्ये currency exchange counters असतात. त्यांच्याकडे भारतापेक्षा चांगला भाव मिळतो.
एक चॉकलेट फॅक्टरी आहे त्यात फळे / बिया यांची चॉकलेट्स मस्त मिळतात. आणि मुख्य म्हणजे खोलीच्या तापमानाला जराही वितळत नाहीत. त्यांची तिळाची आणि हेझलनट घातलेली चॉकलेट्स फार मस्त होती.
पल्याकडे पूर्वी सोनचाफ्याची
पल्याकडे पूर्वी सोनचाफ्याची फुले बाटलीमध्ये कसले तरी द्रावण भरून साठवून ठेवायचे.
तुरटीच्या पाण्यात.
साधनाताई , लंकावीला जाताय ...
साधनाताई , लंकावीला जाताय ... ऑस्स्स्सम ! अतिशय सुन्दर जागा आहे.
आम्ही दोघ गेन्टीन्ग ला अगोदर जाउन आलो होतो . यावेळी सिनिअर सिटीजन सोबत होते म्हणून मी लंकावी सुचवलं and it was worth !! त्यानीही फार एन्जॉय केलं.
टॅक्सीने फिरता येतं . आम्ही हॉटेलमधूनच कार केली होती. २ दिवस , आठ तास प्रत्येकी . तिसर्यादिवशी ही त्यालाच बूक केलं , अर्धा दिवस फिरले , अर्धा दिवस नुसतं शॉपिन्ग
बघण्यासारखी ठिकाणे : ( जितकी आम्ही केली तितकी सांगते )
तिथे केबल कार आणि स्कायब्रिज चुकवू नका . फक्त साधारणत: पाउस नसेल तेन्व्हा जा नाहितर बहुतेक ब्रिज बन्द असतो . खालीच आजूबाजूला ३डी म्युजियम आहे .
एक जिओ फॉरेस्ट पार्क आहे . एक तास्/दोन तास बोटीतून फिरवून आणतात . परिसर मस्त आहे .
आयलंड हॉपिन्ग म्हणून एक प्रकार असतो . ३ तास बोटीतून , ३ वेगवेगळ्या आयलड वर घेउन जातात . २०-३० मिन. स्टॉप असतो.
आयलंड्स फार काही ग्रेट वाटत नाहीत पण एकंदरितच सोबतच्या सिनिअर सिटीझन्स ना मज्जा आली , वेगळा अनुभव स्पीड बोटचा.
बाकी आम्ही लेकासाठी एक झू ,अक्वरियम पण केलं . लहान मुले असतिल तर त्याना मज्जा येते.
खरेदीच म्हणाल तर लंकावीला भरपूर खरेदी करा . ड्युटी फ्री आहे.कपडे वगैरे खूप स्वस्त पडतील . टी शर्ट्स , पायजमे , वन पीसेस.
आणि सगळ्यात महत्वाच , घरी जर फ्लेवर्ड कॉफी पिणारे लोक असतिल , तर व्हाईट कॉफी नक्की आणा .
केबल कारच्या रस्त्यावर एक चॉकॉफी म्हणोन शॉप आहे , जिथे मस्त चॉकलेट आणि कॉफी मिळते . टेस्टिन्गला ही देतात. आम्ही जवळजवळ ४-५ किलो वेगवेगळ्या चवीच्या कॉफीज आणल्या.
." you have raised our standards " म्हणे.
तिरामसू , हेझलनट , मोका , प्लेन कॉफी. वेनिला बर्याच.
नातलगांना , मित्रमैत्रीणीना ४-५ वेगवेगळे सॅशेस दिले, एकदम हीट!!! मैत्रिणी तर आता, ऑफिसमधली कॉफी प्यायला बघत नाहीत
विचित्र वाटेल पण , लंकावी मधूनच आम्ही ४ किलो शेंगदाणे घेतले.( खरतर मलेशिया एअरलाईन्स मध्ये पहिल्यांदा खाल्लेले , तेव्हा फार आवडले) आपल्या ईकडच्या शेंगदाण्याहून मोठे टपोरे आणि चविला गोड असतात. ३ किलो वाटून संपवले . एक किलो घरच्यांसाठी .
आम्ही बटीक व्हिलेज मध्येही गेलो होतो . बटिक प्रिन्टचे मस्त ताग्यातली कापडं आणली ड्रेस शिवायला.
पेनान्ग ला जाताय तर चहा कॉफी तिथेही चांगली मिळावी.
केएल मध्ये आम्ही ट्विन टॉवरच्या जवळ राहिलेलो. सकाळी ,रात्री दोन्ही वेळेला बघितला , बाहेरून.
आम्ही ट्विन टॉवरमध्ये नाही पण केएल टॉवर मध्ये गेलेलो . तिथे सगळ्यात वरच्या मजल्याला जायला देतात आणि वेळेचे बंधन नाही.फक्त १२ वरशाखालील मुलाना अगदी बाहेर गॅलरीत जाउ देत नाही. त्यामुळे त्यांच तिकिट ही घेत नाही. बाहेर एक काचेचा बॉक्स आहे . त्यात बसून फोटो काढता येतात. स्कायबॉक्स म्हणतात. आम्ही भर दूपारी गेलो होतो . दिवेलागणीला नजारा मस्त असेल असं वाटतय. साधारण ७ च्या मानाने जायच आणि अंधार पडून दिवे लागणी पर्यन्त थांबायच .
केएल मध्ये फिरायला गोकेएल च्या बसेस असतात. एक स्टॉप ट्वीन टॉवर जवळच आहे. त्या फ्री आहेत , नो टिकेट. पण त्यांचे ठराविकच रूट आहेत . आणि घाईत असताना उपयोगी नाही.
मी मलेशियामधे सहा महिने होतो.
मी मलेशियामधे सहा महिने होतो. त्यावरुन सांगतो की जेन्टींग आणि कोलालंपुर कदाचित तुला आवडणार नाही. त्यापेक्षा मी तुला हे सुचवेनः
१) नवीन आणि जुने पेनांग असे दोन भाग पडतात पेनांगचे. नवीन पेनांग फार छान आहे. जुना पेनांग निदान पावसाळ्यात तर फार गचपच वाटतो. चिनी मंदिरे इतकी काही खास नाही वाटली. पेनांगमधील लोकवस्ती छान शांत असतात. एक अनुभव म्हणून एखाद्या कॉलनीत जा. वेळ कमी असेल तर फक्त शहरात आपल्या मनासारखे फिरलो तरी फार आनंद मिळतो. इतक्या दुर जाऊन फक्त एकाच गोष्टीसाठे पुर्ण एक दिवस घालवणे म्हणजे वेळेचा अपव्यय करणे आहे. त्यापेक्षा तिथे तुला जे बघावसं वाटत तिथे उतरुन पायी जा. लोकांशी बोल. तिथल्या भाजीबाजारात पहाटे जा म्हणजे स्थानिक गोष्टी नजरेस पडतील. पेनांग मधे उत्तम तमिळ अन्न मिळत.
२) मलाक्का छान आहे.
३) मलेशियामधे पाम ट्रीची भरपुर शेती आहे. एखाद्या पामशेतीमधे जा. आणि पाम वृक्षापासून बनवलेला गुळ घरी ने आणि नीरा पी.
४) मलेशियापसून इंडोनेशिया अगदी जवळ आहे. ६ दिवस मलेशियासारख्या देशात घालवण्यापेक्षा ४ दिवस ईंडोनेशियाला जा. विसा ऑन अराईव्हल आहे. तिथे बोरोबुदुर बघ. बाली बघ. थक्क होशील. मलेशायात काय पडले आहे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मलेशियात खर्च फार येत नाही.
मलेशियात खर्च फार येत नाही. जर हॉटेल बुक झाले असेल तर फिरायचा आणि जेवण खाण्यासाठी KL मध्ये २०० रिंगिट खुप झाले. लंकावी मध्ये पुर्ण दिवस कार हायर केले तर थोडा जास्त खर्च येईल . दोन कपल्स असल्यास कार चा खर्च शेअर होईल.
पुर्ण मलेशियात गुड्स वर कसलाही कर नसल्याने कुठेही खरेदी केली तरी चालेल. (फक्त सर्विस टॅक्स आहे आणि माझ्या मते लंकावी मध्ये तो पण नाही).
नकली रोलेक्स ची घड्याळे आणि ब्रॅडेड पर्स चायना टाउन मध्ये खुप स्वस्त मिळतात. (घासघिस करावी लागते) . एतक्या हुबेहुब असतात की सामन्य माणसाना खरे -खोटे हे ओळखता येत नाही.
जरुरीपुरते रींगेट्सच इथे
जरुरीपुरते रींगेट्सच इथे खरेदी कर. तिथे बहुतेक सगळ्या मोठ्या शॉपिंग काँप्लेक्सम्ध्ये currency exchange counters असतात. त्यांच्याकडे भारतापेक्षा चांगला भाव मिळतो
हे सगळ्यात महत्वाचे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
माधव, स्वस्ती, केया, साहिल शहा, तुम्ही इतक्या डिटेलमध्ये लिहिलेय, खरेच मनापासुन आभार. माधव, नक्कीच तसल्या वस्तु पाहिन. मला अशाच हटके वस्तु आणायच्यात. बाकी इथे मिळते सगळे. रोलेक्स तिथुन आणुन इथे इम्प्रेशन पाडायला मस्त![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
स्वस्ती, तुम्ही लंकावीबद्दल लिहिलेय ना? पेनांन्ग बद्दल वरचे वाचुन सकाळी तिथे पोचल्यावर संध्याकाळीच लंकावीला कल्टी मारावीशी वाटतेय.
तिकिटे काढताना पेनांगचे काढल्याने आता काही बदल करता येणार नाही. मला नेटावर वाचुन लंकावीला आठवडा तरी काढावा असे वाटायला लागलेय. मला तिथे नक्की आवडेल याची खात्री आहे.
बी, धन्यवाद. gentinge ला नणंदेला जायचेच आहे त्यामुळे इलाज नाही. पण पेनांगचा एक दिवस कमी करुन मी तो लंकावीला देईन.
पुण्या हून कुआला लुम्पुरला
पुण्या हून कुआला लुम्पुरला जायला मुंबईवरून जाण्या ऐवजी पुणे - चेन्नै - के एल असा प्रवास केल्यास तिकीट बरेच कमी लागते असे दिसते. याबत काय मत आहे? मलिंडा एअर लाईनची तिकीटे सगळ्यात स्वस्त आहेत.
साधना मस्तच, तुम्हाला
साधना मस्तच, तुम्हाला शुभेच्छा.
माझ्या भावाने मलेशियावरून पर्स, रिस्टवॉच, सेंट, कि चेन आणि मुलासाठी टीशर्ट ह्या गिफ्टस आणल्या होत्या आमच्यासाठी. खाऊ चॉकलेटस.
आम्ही Cameron Highlands ला
आम्ही Cameron Highlands ला गेलो हा भाग खु च्चान आहे. तेथे strawberryचे मळे आहेत. पेनांगचे मन्दिर आम्हाला अवडले. वर लिहिल्याप्रमणे आवड असेल तरच तेथे जाण्यात मजा आआम्हल्म्हाला पेनान्ग आवडले तेथे दोनदा गेलो आहोत. तुमची तूर सुखाचि होवो.
KLचीचॉकलेट छान आहेत जरुर विकत
KLचीचॉकलेट छान आहेत जरुर विकत घ्या. तेथे तुमचा अर्धा दिवस जाइल
तियोमान बीच सुंदर आहे.. जरूर
तियोमान बीच सुंदर आहे.. जरूर विजिट कर.. सुंदर निळे पाणी, वॉटर स्पोर्ट्स !!
पेनान्ग इज वर्थ विजिटिंग टू![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
क्वालांलंपूर च्या चायना टाऊन मधे तुला रिझनेबली प्राईस्ड फेक ब्रॅण्डेड पर्सेस, हँडबॅग्स आणी भेटवस्तूंची वरायटी स्वस्त दरात मिळतील. तुला के एल मधील इकत च्या ( गवर्न्मेंट )शो रूम्स मधे सुंदर ड्रेस्स मटिरिअल मिळेल.
मला पर्सनली बाटिक पेक्षा इकत जास्त आवडतं. कॉटन sarong मस्त मिळतात इकत स्टाईल मधे .
तियोमान बहुतेक कॅन्सल करावं
तियोमान बहुतेक कॅन्सल करावं लागेल, कारण नोवेंबर ही रेनी सीझन असल्यामुळे फेरी सर्विस बंद असेल.
लंकावी शुड बी ओके. पाऊस असेल पण
मोस्टली ड्राय सीझन असेल.
तू फूड्स बद्दल विचारलं
तू फूड्स बद्दल विचारलं नाहीये.. तरी सांगतेच![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
स्ट्रीट फूड इज यम्मी..
तेथील लोकल फूड कोर्ट्स मधे किंवा रेस्टॉरेंट्स मधे जरूर ट्राय कर
१) आयाम लाक्सा. ( चिकन नूडल सूप)
(मला यात फिश सॉस आवडत नाही. म्हणून मी विदाऊट फिश सॉस घेते)पण तुला बाल्चाओ चालत असेल तर हे नक्की आवडेल.
२) रुजाक ( फ्रूट आणी वेजिटेबल सलाद) ऑस्सम!! लाईट स्नॅक
३)Cendol चेंडोल ( कोकोनट मिल्क, पाम शुगर पासून बनवलेले चिल्ल्ड ड्रिंक- टू रिफ्रेशिंग)
४) चिकन साते
५) हॉट पॉट
६) स्टर फ्राईड फ्लॅट नूडल्स ( कुए त्याओ)
७) वॉन टॉन मी ( नूडल सूप विथ डंपलिंग्स)
८) ओताक ओताक ( फिश केक्स- सॉल्टी अर्थातच)
९) Glutinous Rice and Coconut Dessert- अ मस्ट ट्राय.
१०) मी गोरेंग - फ्राईड नूडल्स
लन्काविला पुर्वीचे मुख्य
लन्काविला पुर्वीचे मुख्य मन्त्री महाथीर यानी त्याना मिळालेल्या वस्तून्चे सन्ग्रहालय बान्धले आहे ते म्हणतात या वस्तु माझ्या नसून देशाच्या आहेत. महाथीर जवळजवळ २३ वर्शे पन्तप्रधान होते त्यामुळेसन्ग्रहाक्लय खूप मोठे आहे. ५-६ तास लागतील सर्व पहायला. आम्ही तेथे दोन वेळा गेलो तेथल्या वास्तव्यात. लन्कावीला गेलात तर जरुर भेट द्या.
दिगोची, वर्षु धन्स ग. आणि
दिगोची, वर्षु धन्स ग.
आणि वर्षु खादाडीबद्दल स्पेशल थँक्यू. मला आवडते वेगवेगळे try करून पाहायला. तिथलेलोकल फूड नक्की खाणार आहेच.
लंकावी ला हॉटॅल चांगले कोणते
लंकावी ला हॉटॅल चांगले कोणते आहे?
सिंगापूर आणि मलेशिया हे एकत्र
सिंगापूर आणि मलेशिया हे एकत्र करायचे झाल्यास व्हिसा कसा काढावा लागतो?
आमची फ्लाईट मुंबई-सिंगापूर-मुंबई अशी असणार आहे. सिंगापूर पाहून मग मलेशिया ला जायचे आणि परत येऊन सिंगापूर वरून मुंबईला फ्लाईट आहे.
फारच बावळट प्रश्न असेल पण आम्ही सिंगापुरचा जो व्हिसा काढू त्यात आधी सिंगापूरला राहून मग मलेशिया ला जाऊन परत सिंगापूर मध्ये येता येईल ना ? तिथे जाऊन ऐनवेळी घोळ नको.
प्रश्न अस्थानी वाटेल पण नेटवर शोधाशोध करून काही मिळाले नाही. कोणाला माहित असल्यास सांगा प्लिज.
सिंगापूर आणि मलेशिया
सिंगापूर आणि मलेशिया दोघांनाही वेगवेगळा विसा लागतो. (दोन वेगळे देश)
हो माधव माझ्या प्रश्नातली
हो माधव
माझ्या प्रश्नातली शब्दरचना चुकली आहे. मलेशिया आणि सिंगापूर हे दोन वेगळे देश आहेत माहित आहे म्हणूनच हा प्रश्न पडला आहे.
प्रश्न असा आहे की मी सिंगापुरचा जो व्हिसा काढेन त्याच व्हिसा वर मी दुसऱ्या देशात(मलेशिया) परत सिंगापूरला येऊ शकेन ना ?
सिंगापुरचा व्हिसा घेताना
सिंगापुरचा व्हिसा घेताना short term multiple entry म्हणुन नमुद करा.
जर व्हिसा घेतला असेल तर त्यावर multiple entry असे लिहले आहे का ते बघा. नाही मागितला तरी सिंगापुर चा व्हिसा बर्याच वेळा multiple entry असतो.
Pages