आपल्या ३१ जुलै रोजी होणार्या वर्षाविहारात सहभागी होऊ ईच्छिणार्या सर्व सभासदांचं पुन्हा एकदा स्वागत.
टिशर्ट झाले, टिशर्ट मिळाले, वविचे पैसे गोळा झाले, आता ववि २ दिवसांवर आला... प्रतिक्षा संपली
आता झटपट बस मार्ग नोंदवून घ्या आणि आपल्याला सोयिस्कर असलेल्या थांब्यावर ठरवून दिलेल्या वेळेला या बघु...
३१ जुलै वर्षाविहार बस मार्ग मुंबई -
संयोजक - आनंद चव्हाण - ९७६९४५४४२९
मिनल गोडबोले - ८०८०८८८४४६
मुग्धा कुलकर्णी - ९३७१६३६३०९
०६.०० - बोरीवली मॅक्डोनाल्ड इथून सुरूवात.
०६.३० - मुलूंड, राजे संभाजी मैदान, माहामार्गाजवळ, लक्ष्मीबाई शाळेजवळ. (मार्गे जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड)
०६.४५ - मुलूंडहून प्रस्थान
०६.५० - ऐरोली लिंक रोड
०७.०० - सानपाडा
०७.२० - खारघर
०९.३० - पवना हट्स्
*********************************************************
३१ जुलै वर्षाविहार बस मार्ग पूणे
संयोजक - मल्लिनाथ करकंटी ९९६०३६६५६६
०६.४५ - खंडोबा माळ (चिंचवड)
०६.५५ - पिंपरी सर्कल
०७.२० - चांदणी चौक (हॉटेल विवा)
०७.३० - हॉटेल किनारा (पौड रस्ता)
०७.४५ - हॉटेल किमया (कर्वे पुतळा रस्ता)
०८.०० - सिंहगड रस्ता (राजाराम पूल)
०८.२० - आईचा पुतळा (मुंबई बंगळूरू महामार्गावर)
०९.२० - पवना हट्स
वरिल बसमार्गात काही बदल झाल्यास संयोजक कळवतील.
चला मग! तयारीला लागा... फक्त २ दिवस राहिलेत.
येय! धन्यवाद. मी किमयाच्या
येय! धन्यवाद. मी किमयाच्या स्टॉपवर येणार
बरेच ऑप्शन्स आहेत मला
बरेच ऑप्शन्स आहेत मला
यावर्षी बरेच नविन लोक
यावर्षी बरेच नविन लोक वर्षाविहाराला येत आहे, त्यांच्यासाठी + सर्वांसाठी काही सजेशन्स :-
* बस थांब्यावर वेळे आधी ५ मिनिटे या, म्हणजे तुमच्या मुळे इतरांचा खोळंबा होणार नाही.
* सोबत छोटी मुलं असतील तर त्यांच्या आवडीचा छोटा खाऊ, छोटी पाण्याची बाटली, त्यांची औषधं जरूर बाळगा. काही कारणास्तव रिसॉर्ट ला पोहोचायला उशिर झाला तर तोपर्यंत भुकेने तग धरला पाहिजे.
* वर्षाविहाराला येताना सुटसुटीत ड्रेस घाला (कॅज्युअल) (साडी, पंजाबी ड्रेस विथ ओढणी, सुट बुट टाळा)
* पाण्यात भिजताना जाड कॉटन, जिन्स टाळा, नायलॉन चे कपडे सोयीस्कर.
* पावसाळा असल्याने ओघाने चिखल असणारच त्यामुळे स्त्रियांनी उंच टाचांचे, पुरूषांनी स्लिपर सारखी पादत्राणे टाळून चिखलात आणि पाण्यात ग्रिप येईल अशी पादत्राणे घालावीत.
* एखादी छत्री, लहान मुलांचे रेनकोट (एखादा स्वेटर) सोबत असू द्यावा. भिजून झाल्यावर लहान मुलांना गरम कपडे उपयोगी पडतात, शिवाय रिसॉर्ट मध्ये बसपर्यंत जायला वगैरे छत्री उपयोगी पडते.
* सोबत छोट्या मोठ्या कॅरीबॅग्ज भरपूर आणा, भिजलेले कपडे त्यातून नेता येतात. आणि कुणाकडे नसतील तर देवाण घेवाण करता येते.
* मौल्यवान दागिने, वस्तू अगदीच गरज असल्याखेरीज आणू नका. (जसं की महागडा कॅमेरा)
* आपले फोन्स फुल चार्ज्ड ठेवा, चार्जर सोबत ठेवा, घरच्यांचे एक दोन नंबर पाठ असू देत. जेणेकरून फोन बंद झाला तर दुसर्याच्या फोनवरून घरी ख्यालीखुशालीचा फोन करता येईल.
मुंबई अन पुण्याच्या गाड्या
मुंबई अन पुण्याच्या गाड्या पवना हट्स ला पोहोचायच्या वेळेत १० मिनिटांचा फरक आहे. म्हणजे पुण्याची आधी, तर मुम्बईची नंतर....
प्रत्यक्षात बघणे उत्सुकतेचे असेल की कोणती गाडी आधी येते......
बेट लावायच्या का?
दक्षिणा, अत्यंत उपयुक्त
दक्षिणा, अत्यंत उपयुक्त सुचना.
लिंब्या, तसेच पुण्याची गाडी
लिंब्या, तसेच पुण्याची गाडी चिंचवड-पिंपरीतुन आधी सुटून मग पुण्यात जाऊन परत कामशेतकडे जाणार आहे असे दिसत आहे
१.ववि बस रूट बघा २. आपापल्या
१.ववि बस रूट बघा
२. आपापल्या स्टॉप ला वेळेत येऊन थांबा
३.आपल्या संयोजकांशी संपर्कात रहा
४.आपापले सामान सांभाळा, जरुरीची औषधे, कोरडे कपडे, कोरडा खाऊ बरोबर असुदे
५. शेवटी हा उत्साहाचा , आनंदाचा प्रसंग आहे, बेशिस्त वर्तनाने त्याला गालबोट लावूया नको
मी सर्वांना माहीती व्हॅट्सप
मी सर्वांना माहीती व्हॅट्सप वर पाठवली आहे. ज्यांना मिळाली नाहीय, त्यांनी दिलेल्या नंबर वर संपर्क साधा किंवा नंबर सेव्ह करुन ठेवा म्हणजे अपडेट्स येत राहतील.
धन्यवाद!
धन्यवाद!
सनक्रिम (उन्हापासुन संरक्षण)
सनक्रिम (उन्हापासुन संरक्षण) सारखे रेनक्रिम (पावसापासुन संरक्षण) अस्ते काय?

मुळात सनक्रिम असा काही प्रकार अस्तो काय?
चिखलात खेळताना कापडि
चिखलात खेळताना कापडि चिंध्यान्चे चेंडू आणावेत काय?
उन्हात असलेल्या अल्ट्रावायलेट
उन्हात असलेल्या अल्ट्रावायलेट किरणांनी त्वचा काळवंडते, त्यापासून संरक्षण करण्यासाठी सनक्रीम लावतात.
मी पुणेकर नाही, पण पुण्याविषयी थोडीफार माहिती आहे.
आईचा पुतळा हे नाव पहिल्यांदाच वाचले.
आईचा पुतळा हे ठिकाण पुण्यात नेमके कुठे आहे. कुतूहल म्हणून विचारतोय.
आईचा पुतळा - आता नसलेला
आईचा पुतळा - आता नसलेला लिहायचे राहिले का ?
खरेच, आईचा पुतळा मलाही आठवत
खरेच, आईचा पुतळा मलाही आठवत नाही.
एक आठवते ते म्हणजे देहू-कात्रज बायपास वरुन कात्रज नविन बोगद्याकडे रस्ता वळतो त्या तिठ्ठ्यावर एक जाळिचा पुतळा होता, पण तो आईचा की कशाचा ते ही आठवत नाही.
तोच पुतळा, आता काढला आहे, आई
तोच पुतळा, आता काढला आहे, आई आणि बाळाचा पुतळा होता
हो का? तरीच कात्रजकडे जाताना
हो का? तरीच कात्रजकडे जाताना तिथे ओकेबोके वाटते.
बर, पण मग वरिल पाचसहा थांबे आहेत, ते मॅपच्या इमेजवर नेमके दाखविता येतिल का? थोडे कष्ट होतिल, पण सुंदर होईल.
अशीच एक सुचलेली सुचना, एकटेच
अशीच एक सुचलेली सुचना,
एकटेच प्रवासात असाल ( आणि काही अलर्जी वगैरे असेल वा त्रास ) तर जवळच्या ओळखीच्या व्यक्तीचा नंबर असावा. सगळ्यांना सांगायची आवश्यकता नाही की काय त्रास वा नंबर पण
बॅगेत तश्या सुचना असाव्या.
एका पिकनिकला एका आजींना धाप लागली दमा अटॅकने आणि आम्हाला सुचतच न्हवते नक्की कशाने काय होतेय व काय करावे. बस मध्येच घाटात थांबवून शक्य न्हवते. शेवटी त्यांची बॅग धुंडाळली तेव्हा पंप सापडला.
२) चाव्यांचा जुडगा, चष्मे सांभाळावे
मी स्वतःचे स्वतःकडे सुका मेवा, चिक्की, चिवडा, आलेपाक, क्रोसीन, विक्स, हाजमोला ( दुसर्यासांठी :फिदी:) , पेपर टॉवेल, एक दोन पेपर प्लेटस व प्लॅस्टीक चमचे , भरपूर ट्रॅश बॅग्स , रुमाल, छोटा टॉवेल , पातळ चादर हँडी नेहमीच ठेवते बाहेर पिकनिकला जाताना.
सर्वांना शुभेच्छा!
>>> मी स्वतःचे स्वतःकडे सुका
>>> मी स्वतःचे स्वतःकडे सुका मेवा, चिक्की, चिवडा, आलेपाक, क्रोसीन, विक्स, हाजमोला ( दुसर्यासांठी फिदीफिदी) , पेपर टॉवेल, एक दोन पेपर प्लेटस व प्लॅस्टीक चमचे , भरपूर ट्रॅश बॅग्स , रुमाल, छोटा टॉवेल , पातळ चादर हँडी नेहमीच ठेवते बाहेर पिकनिकला जाताना. <<<<
व्वा व्वा व्वा.... माझ्यासारखे कोणीतरी आहे म्हणायचे या जगात.....
नैतर मी सहल वगैरेला निघालो की बाकी लोक म्हणतात, अरे सहलीला चालला आहेस की बदली झाल्याने बिर्हाड घेऊन चालला आहेस...
वरील पैकी बर्याच बाबी तर रोज ऑफिसला जातानाच्या बॅगेतही असतात.
लिम्ब्या एंजॉय.... वेळेकडे
लिम्ब्या एंजॉय....
वेळेकडे लक्ष देऊ नये... कारण ती फसवी आहे.. प्रत्यक्षात जास्त वेळ लागेल कारण आपण थांबत थांबत सगळ्यांना घेऊन जाणार आहोत..
वा हिम्या, लग्गेच नकाशा दिलास
वा हिम्या, लग्गेच नकाशा दिलास की....
छान मजा करा लोक हो सुंदर
छान मजा करा लोक हो
सुंदर वातावरण आहे, मस्त धमाल करा.
स्वतःची आणि इतरांचीही काळजी घ्या.
झाली का तयारी
झाली का तयारी सर्वांची??
माझ्या सर्वान्ना खूप खूप शुभेच्छा! मज्जा करा खूप सारी!
सई, तू नै का या वेळेस? आपण
सई, तू नै का या वेळेस? आपण यूकेज रिसॉर्टला भेटलो होतो, आठवतय का?
मुग्धा >> गालबोट लावूया ??
मुग्धा >> गालबोट लावूया ??
एल्टी??? कोण तुम्ही? काही
एल्टी??? कोण तुम्ही? काही आठवत नाही मला! जरा ओळख सांगाल काय?
सै तूका नै म्हणे?
सै तूका नै म्हणे?
सर्वाना वविच्या शुभेच्छा
सर्वाना वविच्या शुभेच्छा


मस्त मज्जा करा
आणि लवकरात लवकर वृतांत टाका
ऑफिस ऑफिस रिया.
ऑफिस ऑफिस रिया.
.
.
वविला जाणार्या सर्व पब्लिकला
वविला जाणार्या सर्व पब्लिकला खुप खुप शुभेच्छा.
उद्या वविची लाईव्ह क्षणचित्रे इथे टाकायला विसरु नका.
Pages