Submitted by मॅगी on 21 June, 2016 - 05:59
मंजूडीच्या पहिल्या धाग्यावर २००० हून अधिक पोस्ट्स झाल्यामुळे हा दुसरा धागा काढला आहे..
स्वयंपाकासाठी वापरायची भांडी आणि उपकरणे ह्याबद्दल हितगुज..
आता इथे वाजू देत भांड्याला भांडी
पहिल्या धाग्यावरची चर्चा इथे पहाता येईलः
http://www.maayboli.com/node/6204
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
माझा एफ एक्स टेन बजाज फूड
माझा एफ एक्स टेन बजाज फूड प्रोसेसर होता. तो बंद पडलाय, म्हणून आता बदलून दुसरा घ्ययाचा आहे. पण परत याच मॉडेलचा घेणार. मस्त आणि फारच उपयुक्त किचन हेल्पर आहे.
माझ्याकडे पण बजाजचा फु. प्रो.
माझ्याकडे पण बजाजचा फु. प्रो. आहे, त्यात पालेभाज्या कशा चिरायच्या ते कोणी तरी सांगा. मी एकदाच प्रयत्न केला होता पण नीट नाही जमलं
मानव, कणिक मळणीयंत्रासाठी
मानव, कणिक मळणीयंत्रासाठी माझ्याकडून वाढिव प्रतिसाद देत आहे
हे यंत्र खरोखरी उपयुक्त आहे, सोबत दिलेली भांडी मोजून पिठ पाणी आणि तेल घातले तरी आपल्या अंदाजाने अजून पाणी तेल घालावे लागते.
भांडे अधिक चिकट होऊ नये व नंतर धुवायला सोपे जावे म्हणून मी तळाला तेल घालून त्यात मीठ घोळवून मग वरून कणिक आणि पाणी घालून मळत असे. माझे आवडते यंत्र.
आणि तसं प्लॅस्टिक असल्याने धुणे कटकटीचे नाही फार. फक्त याचे हँडल वरून लावून फिरवायचे असल्याने थोडं जपून कधी कधी तुटू शकतं. त्यावर अतिरिक्त शक्तिप्रयोग होणार नाहीत याची काळजी घ्यावी.
बजाज एफ एक्स ११ आहे
बजाज एफ एक्स ११ आहे माझ्याकडे.
बजाज fx ७/11 च्या वर्जन मधे
बजाज fx ७/11 च्या वर्जन मधे वरच्या सगळ्या गोष्टी होतात.
नुकताच वाढदिवसानिमित्त दोन
नुकताच वाढदिवसानिमित्त दोन नणंदांकडून बजाज मॅजेस्टी एफ एक्स १३ फूड प्रोसेसर भेट मिळालाय. खरंच वापरला जाईल कि पडून राहील असा प्रश्न होता पण मनिमाउ, शरी, नंदिनी अंकु आणि इतर सर्वांचे प्रतिसाद पाहून वापरला जाईल असं वाटतंय. मनिमाऊने सांगितलेल्या सर्व ब्लेड्स, अॅटॅचमेंट्स, जार त्यात आहेत. आजच बजाजचा माणूसही येणार आहे डेमोकरता.
काय किमत आहे याची?भारतवारीत
काय किमत आहे याची?भारतवारीत काही गिफ्ट्स देण ड्यु आहे.
प्राजक्ता मूळ किंमत बजाज च्या
प्राजक्ता मूळ किंमत बजाज च्या वेबसाईटवर ७४९९ आहे आणि सध्या १०% डिस्काउंटही चालू आहे. पण आम्हाला विजय सेल्स मध्ये डिस्काउंटसहित ४९५० ला मिळाला.
>> त्यात पालेभाज्या कशा
>> त्यात पालेभाज्या कशा चिरायच्या ते कोणी तरी सांगा.
हे प्लिज सांगाच.
म्हणजे कोबीचा वगैरे अगदी चुरा नाही झाला पाहीजे.
भेळेमध्ये किंवा पावभाजीवर घालायला एकसारखा कांदा चिरता येतो का?
टण्या ...... .आणि ..जनरलच
टण्या ......
.आणि ..जनरलच फुप्रोवर लिहिते
माझ्याकड्च्या देशातल्या पहिल्या सिंगरच्या, आणि आता उषाच्य फुप्रोवर मी खूप च विसंबून आहे.
अगदी मॅग्झिमम उपयोग. आणि एकदा सवय झाली की काय पटापट होतं सगळं .
कणिक मळण्याच्या भांड्यात प्लॅस्टिकचे ब्लेड बदलून दुसरे स्टीलचे इग्रजी S आकाराचे ब्लेड लावायचे. कोबीचा खालचा देठ काढून मोठ्या सुरीने कोबीची मोठमोठे तुकडे करून मिक्सरच्या भांड्यात घालून झाकण लावून बटण फिरवावे. पण ते एकदम कन्टिन्युअस न चालवता अग्दी दोन दोन / तीन तीन सेकन्द फिरवावे/प्रेस करावे. ते बटण एक्झॅक्ट किती सेकन्द चालवावे हे हळूहळू समजेल. कदाचित एक दोन गड्डे धारातीर्थी पडू शकतात. म्हणजे कोबी ज्यूस , कोबी भरीत वगिअरे होऊ शकतं.
पण त्याचंही काही तरी पदार्थात रूपांतर आपण करू शकतो. ....वाया घालवायचं नसल्यास( ओल्ड स्कूल थिन्किन्ग)
हळूहळू भाजीसाठी हव्या/योग्य त्या साईज् चा कोबी नक्की मिळतो.
तसंच कान्द्याचं. कांद्याचे शेन्डे बुडखे सालं काढून चार तुकडे करून वरचीच प्रोसेस.(मोठे कांदे असल्यास जास्त तुकडे करावे लागतील.)कधी जर फार बारीक झालासं वाटलं तर चक्क थोडा पिळून (एक्सेस पाणी काढून टाकून) फोडणीत किंवा कशात तो वापरायचा.
हळूहळू अंदाज येतो. आणि हो...भेळेवर आणि पावभाजीवर घालण्यासाठी अॅज गुड अॅज हाताने कापल्यासारखा होतो.
सेम फॉर पालेभाजी. एकदम कन्टिन्युअस फिरवत राहिलात तर कुठल्याही हिरव्या पालेभाजीचा ज्यूससदृश काही तरी मिळू शकतं. पण त्याचा एक फायदाही आहे. मेथी पालक पराठ्यासाठी भाज्या धुवून फुप्रोच्या भान्ड्यात भरपूर फिरवल्या की त्यातच तुम्ही काय ती पिठं मसाले घालून पुन्हा एकदा फिरवून पराठ्यांचा गोळा( डो)बनवू शकता.
पण मेथी पालक व इतर सर्व पालेभाज्या यात भाजीसाठी छान कापल्या जातात.
धन्यवाद दक्षिणा, शरी,
धन्यवाद दक्षिणा, शरी, अंकु.
छान टिप्स मानुषी.
मी कोबी चिरण्यासाठी चक्क
मी कोबी चिरण्यासाठी चक्क स्लाईसर attachment वापरते. (shredder nahi , cutter naahi , slicer chi baju vapraychi). हवे तितके लांबीचे आणी जाडीचे मोठे तुकडे करुन कोबी प्रोसेसर च्या chute मधुन खाली ढकलायचा.
बजाज फूड प्रोसेसर मधे नारळ
बजाज फूड प्रोसेसर मधे नारळ खवणी असते का? आणि किती रिअलाएब्ली खवता येतो? >> आंबट गोड, हो अगदी रिलाएबल खोवणी आहे.
मानव, माझ्याकडे बजाज FX-10 आहे गेली ९ वर्ष. ( अजुनही चालु आहे, पण कंटाळा आला म्हणुन बदलला) आताच बदलुन ११ कि १२ घेतला. पहावं लागेल किचन मधे जावुन.
माझ्याकडे पण बजाजचा फु. प्रो. आहे, त्यात पालेभाज्या कशा चिरायच्या ते कोणी तरी सांगा. >>>स्निग्धा, पालेभाजी धुवुन निथळली कि आटा निडिंगच्या जारमधे ब्लेड बदलुन ( प्लास्टिकचं निडिंगचं काढुन, स्टीलचं शार्प ब्लेड लावायचं) मिक्सरचं बटन उल्ट फिरवायचं. म्हणजे १-२-३ स्पीड नाही, उलट बाजुला स्प्रिंगवालं बटन, जे सोडलं कि बंद होतं ते. त्याने सगळ्याच भाज्या ज्युस न निघता छान चॉप होतात. लोणी काढताना पण मी तेच बटण वापरते, फक्त ब्लेड प्लास्टिकचं. मग त्याच जार मधे कणिक मळली कि जार एकदम तेल्कट न होता मस्त साफ.
आशिता, वापरच तु बजाज. माझा किचन फ्रेंड आहे बजाज फुप्रो. निडिंग केलं तर जारला चिकटत सुद्धा नाही. छान जाड प्ल्साटिकचा स्टर्डी जार आहे. मी तर तेलही वापरत नाही. नुसता आटा आणि पाणी. अर्थात experience ९ वर्शाचा आहे
भेळेमध्ये किंवा पावभाजीवर घालायला एकसारखा कांदा चिरता येतो का? >> हो तर. अगदी एक नंबर. कोबी पण मस्त होतो. एकसारखा, फाइन पण भुगा नाही. फक्त वर लिहिलं तसं ब्लेड उलट बाजुला फिरवअ, अन्दाज घेत चिरायचं. स्पीडवर केलं तर मग ज्युस होतो भा़ज्यांचा.
बाकी स्लाइसेस, किसणं, मोसंब्याचा ज्युस, इ इ अनेक गोष्टी मस्त होताहेत आणि फारशी स्किल्स न वापरता. नाही तर बहुतेक वेळा डेमोवाला करामती करुन दाखवतो, ज्या आपल्याला तो गेला कि कधीच जमत नाहीत.
मिक्सरचं बटन उल्ट फिरवायचं.
मिक्सरचं बटन उल्ट फिरवायचं. म्हणजे १-२-३ स्पीड नाही, उलट बाजुला स्प्रिंगवालं बटन, >>> ओके आता चिरुन पाहीनच. ते १-२-३ वाल वापरल होत आधी त्यात मानुषीताई म्हणाल्या तसं चोथा कम ज्युस असा प्रकार झाला होता त्यामुळे पालेभाज्या हातानेच चिरायला सुरवात केली.
कोबी साठी मी सुध्दा स्लायसर वापरते. भाजीसाठी कोबी उभटं चिरलेलाच आवडतो. चोचवल्या सारखा नाही.
बाकी पावभाजीसाठी कांदा चिरणे, काकडी चोचवणे, गाजर किसणे इ. सगळ्याला फु.प्रो.च सोपा
माझी फक्त एकच तक्रार आहे
माझी फक्त एकच तक्रार आहे .बजाज मधे पिठ + पाणी ची मापाची भांडी मिळत नाही.आपल्याला ट्रायल अॅन्ड एरर वर ते प्रमाण शिकुन घ्याव लागत.एकदा हात बसला की काहीही प्रोब्लेम नाही येत.लोणी काढणे ही खुप सोपे होते.नारळ आमच्या सा.बा विळीवर च खोवतात (मोदकासाठी ) मिक्सी मधे केलेल्या खोबर्याचे पाठीचे काळे कण येतात.बाकी सगळी वाटण-घाटण आरामात होतात.
दुसर म्हण्जे शेजारच प्लॅस्टीक भांड लावुन मशिन लॉक झाल्याशिवाय सुरु होत नाही.पन हे आता वापरा मुळे मायनर गोष्ट वाटते.बजाज चा फुप्रो आहे उपयोगी.
बजाजचा फूडप्रोसेसर चांगलाच
बजाजचा फूडप्रोसेसर चांगलाच आहे पण त्याची निडींग ब्लेड स्वच्छ करणं जरा तापदायक वाटतं विशेषतः पराठ्याची कणिक मळल्यावर. त्यावरचे हळदीचे डाग लवकर जातंच नाहीत. ब्लेड आतून स्वच्छ करणं पण वेळखाऊ आहे. पण घाईच्या वेळी आणि जेवायला खूप लोक येणार असतील तर खूप मदत होते.
आंबटगोड, खवणीवाले मॉडेल आहे,
आंबटगोड, खवणीवाले मॉडेल आहे, खोबरे मस्त खवुन निघते. फक्त खवताना खुप आवाज येतो. तो त्रास सहन केला तर बाकी काहीही प्रॉब्लेम नाही.
बजाज मधे पिठ + पाणी ची मापाची
बजाज मधे पिठ + पाणी ची मापाची भांडी मिळत नाही.आपल्याला ट्रायल अॅन्ड एरर वर ते प्रमाण शिकुन घ्याव लागत
कुठेही गव्हाचे पिठ भिजवताना पिठः पाणी हे प्रमाण २:१ असे घ्यावे. मग कुठलेही भांडे असले तरी काहीही फरक पडत नाही. मी पाणी वरच्या १ पेक्षा दोन चमचे कमी घालते, ओन सेफर साईड. पण तेवढ्यात होते.
सारेग दोन्ही ब्लेड्स
सारेग
दोन्ही ब्लेड्स पाण्यातुन काढुन ठेवता येतात.घासताना पटकन स्वच्छ निघतात.मी तर बाळाची बाटली स्वच्छ करण्यासाथी जो लांबडा ब्रश आणला होता, तो वापरुन प्लॅस्टीक ब्लेड स्वच्छ करते.अजिबात पिठाचे कण राहत नाही त्यामधे.
कुठेही गव्हाचे पिठ भिजवताना
कुठेही गव्हाचे पिठ भिजवताना पिठः पाणी हे प्रमाण २:१ असे घ्यावे.>>>>> अगदी...पन हे मी अनुभवातुन शिकले.
आधी अंजली चा फुप्रो वापरताना त्यांनी मापाची भांडी दिली होती.त्याची सवय झाली होती.
तुम्ही सर्वांनी इतक्या मस्त
तुम्ही सर्वांनी इतक्या मस्त उपयुक्त टिप्स शेअर केल्यात ना कि आता खरंच माझा फुप्रो जास्तवेळा वापरला जाईल.
मनिमाउ.... नक्कीच. कालच डेमो वाल्याने सगळे ऑप्शन्स, ब्लेड्स, अॅटॅचमेंट्स इतक्या सहजतेने चालवून दाखवल्यात कि वाटतंय हे नक्की जमेल आपल्याला.
साधनाताई... एकदम महत्वाची टीप आणि अगदी योग्य वेळी मिळाली. कालच डेमोवाल्याने अर्धा ग्लास पाणी आणि पाव किलो ते ३०० ग्रॅम पीठ असं प्रमाण सांगितलं होतं तेव्हाच विचार करत होते कपचं प्रमाण मिळालं असतं तर किती बरं झालं असतं आणि लगेचच तुझी मदत मिळाली. थँक्स.
माझ्याकडेही आहे बजाज, नारळ
माझ्याकडेही आहे बजाज, नारळ खोवणे पण आहे पण मी वापरले नाहीये, सध्या कणीक, भाज्या चिरणे , ईडली बॅटर वगैरे साठी खुपदा वापरले जातेय. कणीक मळुन झाली की लगेच भिजत घातल्यास धुवायला सोपे जाते. क्णीक मळताना जरासे तेल घालायचे .
थँक्स अंकु! ब्रशची आयडिया छान
थँक्स अंकु! ब्रशची आयडिया छान आहे.
थँक्यू साधना.....आवाजा बद्दल
थँक्यू साधना.....आवाजा बद्दल मला विचारायचेच होते. बाकीही मिक्सर सारखा वगैरे वापरतांना खूप आवाज होतो का? की 'सायलेंट' आहे?

बाकी बजाज ची इतकी स्तुती वाचून लवकरच घेण्याचा प्लॅन आहे. राखीला मे बी!
कोणी komo grain mill वापरली
कोणी komo grain mill वापरली आहे का
इथे कोणी साउथमधला
इथे कोणी साउथमधला फुप्रो/मिक्सीचा फेमस ब्रँड 'प्रीती/थी' बद्दल ऐकलं, वाचलं किवा वापरला आहे का? मी बजाजची फॅन असुनही, यावेळेस रिव्ह्युज वाचुन आणि साउथ इंडियन कलिग्जच्या रेकमंडेशनवरुन प्रीतीचा फुप्रो घेतला. इतका भयानक आवाज आहे कि रोज सकाळी कणिक मळुन मी एका आठवड्यात ठार बहिरी होवु शकते. अगदीच सहन होण्याच्या पलिकडचा आवाज आहे. उद्या टेक्निशिअन येवुन चेक करणार आहे कि पिस फॉल्टी आहे का? पण फोनवर त्याने सांगितल्याप्रमाणे 750W ची पॉवर्फुल मोटर असेल तर जास्त आवाज येणारच. क्रेझी !
( प्रीती हा लोकल पॉप्युलर ब्रँड असल्यामुळे फिलिप्सने हा विकत घेतल्यावरही नाव बदललं नाही.)
मी पुण्यात विजय सेल्स व
मी पुण्यात विजय सेल्स व क्रोमा मधे चेक केलं. कुणाकडेही बजाज चे फु प्रो विथ नारळ खवणी नाहीये! त्यांना हे मॉडेलच माहिती नाही.
खरे तर मला नुसतीही इलेक्टीक वर चालणारी नारळ खवणी मिळाली तरी चालणारे. कंव्हिनीअंट , रिलाएबल व सेफ हवी मात्र.
पण तशीही कुठे उपलब्ध दिसत नाही. कुणाला माहिती आहे का?
कुणाकडेही बजाज चे फु प्रो विथ
कुणाकडेही बजाज चे फु प्रो विथ नारळ खवणी नाहीये>>>>>. एफएक्स ७ आनि ११ मधे नारळ खवण्याचा ब्लेड आहे.
एफएक्स ११ चा आवाज फार जास्त
एफएक्स ११ चा आवाज फार जास्त आहे असे अनेक रिव्यूज अमेझॉनवर वाचले. कुणी वापरलाय का? अनुभव असेल तर लिहा प्लीज. मी एफएक्स ११ फायनल केला होता, आता डळमळतोय बेत.
रोनाल्डमधे नारळ सुरेख खवून
रोनाल्डमधे नारळ सुरेख खवून मिळतो.
Pages