Submitted by मॅगी on 21 June, 2016 - 05:59
मंजूडीच्या पहिल्या धाग्यावर २००० हून अधिक पोस्ट्स झाल्यामुळे हा दुसरा धागा काढला आहे..
स्वयंपाकासाठी वापरायची भांडी आणि उपकरणे ह्याबद्दल हितगुज..
आता इथे वाजू देत भांड्याला भांडी
पहिल्या धाग्यावरची चर्चा इथे पहाता येईलः
http://www.maayboli.com/node/6204
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मला टोस्टर घ्यायचा आहे. कोणता
मला टोस्टर घ्यायचा आहे. कोणता ब्रँड चांगला? आंजा वर खुपच ऑप्शन्स दिसत असल्यामुळे गोंधळुन गेलो आहे.
मॉलमध्ये सामान वाहून
मॉलमध्ये सामान वाहून नेण्यासाठी ज्या ट्रॉल्या असतात त्याची खेळण्यातली वाटावी अशी आवृती हल्ली डीमार्टमध्ये विकायला ठेवलेली असते. ती खेळणे म्हणूनच आहे की तिचा काही दुसरा उपयोगही आहे?
दोन-तीन वेगवेगळ्या ठिकाणी ते विकायला ठेवलेले दिसले, म्हणून कुतूहल वाटले.
गजानन, त्या ट्रॉल्यांचं माहीत
गजानन, त्या ट्रॉल्यांचं माहीत नाही पण ह्या अशा ट्रॉलीज भयंकर उपयोगी असतात. विशेषतः चालत जाऊन खरेदी करता तेव्हा.
हो, जर रस्ते जास्त चढ उताराचे
हो, जर रस्ते जास्त चढ उताराचे नसतील तर, आणि विशेषतः सिनीयर सिटीझन्स ना चालत जाऊन सामान आणायला उपयोगाची पडते.परदेशात एकदम भरपूर वापर होतो कारण तिथे फूटपाथ वर टु व्हिलर किंवा पाणेपुरीवाल्याशी टक्कर न होता व्यवस्तित चालत घरी पोहचता येते.
अगो, हो ती ट्रॉली भारी
अगो, हो ती ट्रॉली भारी आहे.
(विषयांतर झाले, माफ करा.)
अगोनं लिन्क दिली आहे तशा
अगोनं लिन्क दिली आहे तशा ट्रॉलीज पिकनिक/बीचवर जाताना पण खूप सोयीच्या पडतात.
गजानन, तुम्ही म्हणतात त्या ट्रॉलीज खेळण्यातल्याच आहेत.
इथे इंग्रोमध्ये मिळतो तो
इथे इंग्रोमध्ये मिळतो तो स्टेनलेस स्टीलचा इडली-मेकर ग्लासटॉप स्टववर कुणी वापरला आहे का? डायरेक्ट ग्लासटॉपवर ठेवता का?
घरगुती वापरासाठी बजाजचा otg
घरगुती वापरासाठी बजाजचा otg घ्यायचा आहे कीती लिटरचा घ्यावा.. आम्ही घरात तीन माणसे आहोत ..
सिंडरेला मी कॉईल वर वापरला
सिंडरेला मी कॉईल वर वापरला आहे खूप वेळा त्यामुळे ग्लासटॉप वर चालेल अस वाटतय.
थँक्स अनुश्री. नवा वापरायला
थँक्स अनुश्री. नवा वापरायला काढते आता
गेल्या तीन चार दिवसात मी
गेल्या तीन चार दिवसात मी पहिला भाग म्हणजे 67 पाने पूर्ण वाचून काढली, खूप छान माहिती मिळाली.
Amazon is running huge
Amazon is running huge discount on home appliances.
माझा कास्ट आयर्न चा पॅन न
माझा कास्ट आयर्न चा पॅन न वापरल्याने गंजला आहे. री सिझन करायला मावेलसा अवन नाही. गॅस वर करता येईल का? तुनळी वर सगळे विडीओ अवन चे आहेत. प्लीज मदत करा.
इथे अमेरिकेत ईन्डियन कुकिन्ग
इथे अमेरिकेत ईन्डियन कुकिन्ग साठी उपयुक्त असा कोणत्या कंपनी चा फूड प्रोसेसर बेस्ट आहे...ज्यात १)एक नेडर(?) ..कणीक भिजवण्यासाठी सेपरेट जार...ज्यात ब्लेड बदलल्यावर भाज्या ही कापल्या जातात,
२) ड्राय ग्राइन्डिन्ग चा जार...भांडं ...काहीही म्हणा
३) वेट ग्राइन्डिन्ग चं भान्डं....ज्यात आपल्या पद्धतीच्या कान्दा टोमॅतो आल लसूण इ. वापरून ग्रेव्ही करता येईल. व त्यातच ओल्या खोबर्याचे वाटण किंवा चटणी करता येईल?
आणि ऑनलाइन घेता येईल का?
प्लीज गाइड करा. सल्ले द्या.
धन्यवाद.
अल्पकिमतीत मिळणारा असं
अल्पकिमतीत मिळणारा असं लिहायचं राहिलं का
एवढे सगळे एकातच होईल असं मशीन मी तरी पाहिलं नाही.
ड्राय ग्राइन्डिन्ग चा जार...भांडं ...काहीही म्हणा
३) वेट ग्राइन्डिन्ग चं भान्डं....ज्यात आपल्या पद्धतीच्या कान्दा टोमॅतो आल लसूण इ. वापरून ग्रेव्ही करता येईल. व त्यातच ओल्या खोबर्याचे वाटण किंवा चटणी करता येईल? >>
या दोन्ही साठी ऑस्टर च्या ब्लेंडर वर फिट होणारे छोटे जार मला बेस्ट वाटतात. मुंबैत भांड्या कुंड्याच्या दुकानात सहज मिळतात. मी एक कॉफी साठी आणि एक इतर मसाल्यांसाठी असे दोन वापरते. कोरड्या चटण्या, गोडा मसाला , सांबार मसाला , मेतकूट, ओल्या / सुक्या खोबर्याचे वाटण सगळे यात मस्त होते.
Cuisinart च्या ह्या फूड प्रोसेसर मधे कणीक मळता येईल.
https://www.amazon.com/Cuisinart-DLC-8S-Processor-DISCONTINUED-MANUFACTU...
याचा Extra Work Bowl वेगळा घेउ शकता म्हणजे एकात कणीक मळणे आणि एकात भाज्या चिरणे होऊ शकते.
३-४ जणांचा स्वैपाक असेल तर ५-७ कप च्या फूड प्रोसेसर पुरेसा होईल. ११ कप, १४ कप वाले फारच मोठे असतात . काऊंटर वर जागा जास्त व्यापतात. कॅबिनेट मधे आत ठेवले तर काढ - घाल करायला त्रास.
धन्यवाद मेधा...बघते तू
धन्यवाद मेधा...बघते तू सुचवलेलं.
तुला विपु च करणार होते. असो..Cuisinart चा बहुतेक आम्ही ऑनलाइन पाहिलाय..थोडा सर्च चालूये.
<<<अल्पकिमतीत मिळणारा असं लिहायचं राहिलं का स्मित>>>> हे गृहित आहे.
वरील वर्णनाचा फुप्रो देशात खूप वेगवेगळ्या कं. चा आहे. माझ्याकडे आधी सिंगर होता. आता उषा आहे.
वरील सर्व + ज्युसर अॅटेचमेन्ट...हे ऑप्शनल.
मायक्रोवेव ला केक करताना
मायक्रोवेव ला केक करताना कोणते भांडे वापरायचे असते?
काचेचे की अजुन एखादे?
एअर फ्रायर वापरलं आहे का कोणी
एअर फ्रायर वापरलं आहे का कोणी ? कितपत सोपे/ कमी तेलाचे आहे? खूप वेळखाऊ आहे का? ...
मागल्या धाग्यावर कोणीतरी विचारलं होतं.. पण कोणीच प्रतिक्रीया दिलेली नाही... कोणी सांगु शकेल काय?
आटा मेकर कुणी वापरतं
आटा मेकर कुणी वापरतं का?

खालील चित्रात दाखवलेला.
काय अनुभव आहे त्याचा.? उपयोगी की दुप्पट काम वगैरे?
माझ्याकडे आहे हे प्रकरण. आईनं
माझ्याकडे आहे हे प्रकरण. आईनं कुठल्यातरी प्रदर्शनामधून आणलं आणि माझ्याकडे सुपूर्त केलं. अगदी सुरूवातीला कणिक मिळताना हाताची जी चिकटाचिकटी होते ती यामध्ये होत नाही. मळायला भरपूर वेळ आणि हाताचा जोर लागतो. एकदा का कणिक मळून झाली की तेल लावून हाताने तिंबावी लागते.
टीव्ही बघत असताना नवरा बर्याचदा यामध्ये मला साधारण कणिक मळून देतो. मग मी ती तेल लावून परातीमध्ये व्यवस्थित मला हवी तशी तिंबून घेते. कणिक मळल्यावर लगेच धुतलं तर स्वच्छ करायला फारसा त्रास होत नाही.
मला प्लीज़ प्लीज़ प्लीज़ सांगा न
मला प्लीज़ प्लीज़ प्लीज़ सांगा न ....
मायक्रोवेव ला केक करताना कोणते भांडे वापरायचे असते? माबो वर खुप पाकृ येत आहेत ..करुन बघायची खुप घाई झालीय
मायक्रोवेवच्या मायक्रो मोडवर
मायक्रोवेवच्या मायक्रो मोडवर केक करताना काचेचेच भांडे वापरायचे असते.
मायक्रोवेवच्या कन्वेक्शन मोडवर केक करायचा असल्यास काच किंवा अॅल्युमिनिअमचे भांडे चालते.
धन्यवाद नंदिनी. घ्यायला हरकत
धन्यवाद नंदिनी.
घ्यायला हरकत नाही असा निष्कर्ष काढतो.
धन्स् मंजुडि माझ्या मावे ला
धन्स् मंजुडि
माझ्या मावे ला कॉन्वेक्शन मोड आहे .पण एल्युमीनियम चे भांडे वापरायची भिती वाटत होती
काचेची भांडी मावे मधे
काचेची भांडी मावे मधे वापरताना ती मावे सेफ आहेत का ते बघून घ्यावे, अन्यथा ती तडकतात. मावे सेफ असली तर त्यावर तसा शिक्का असतो. लाकडी, मातीची, चिनी मातीची भांडी चालू शकतात.
मावे सोबत जी पुस्तिका येते त्यात सर्व सूचना दिलेल्या असतात. त्या तंतोतंत पाळणे अत्यंत गरजेचे आहे.
एवढे सगळे एकातच होईल असं मशीन
एवढे सगळे एकातच होईल असं मशीन मी तरी पाहिलं नाही. >>> आमच्या इन्ड्यात आहे असं मशिन.
बजाज फुड प्रोसेसर वर मानुषीने लिहिलेल सगळं आणि वर बरच काही बाही होतं. आटा निडिंग होतं, त्याच मोठ्या पसरट जारमधे लोणी काढता येतं, शार्प ब्लेड लावुन भाज्या कट करता येतात, गोल गोल एकब्लेड आहे त्याने सिट्रस फ्रुट्सचं ज्युस निघतं. ड्राय ग्रायडिंग आणि वेट ग्रायडिंग साठी दोन वेगळे जार आहेत, मिल्क शेकसाठी एक उभा मोठा जार आहे. शिवाय असंख्य ब्लेड्स, अॅटॅचमेंट्स आहेत, ज्या टाइप करायचा कंटाळा आला आता.
अल्पकिमतीत मिळणारा असं लिहायचं राहिलं का स्मित >>> मेधा हे सगळं वरचं लिहिलेलं मशीन - ५१०० रुपये फक्त आणि कधी कधी ऑनलाइनवाल्यांना मुड असेल तर अजुन २००-३०० रुपये कमी.
पण दिनेशदा केक साठीही वापरता
पण दिनेशदा केक साठीही वापरता येतील का अशी भांडी?
मनिमाऊ, बजाज फूड प्रोसेसर
मनिमाऊ,
बजाज फूड प्रोसेसर मधे नारळ खवणी असते का? आणि किती रिअलाएब्ली खवता येतो?
प्लस ते मिक्सर सारखेही वापरता येते का? चटण्या / इडली पीठ वगैरे साठी?
प्लस ते मिक्सर सारखेही वापरता
प्लस ते मिक्सर सारखेही वापरता येते का? चटण्या / इडली पीठ वगैरे साठी?>>> हो. बजाज फूड प्रोसेसर मिक्सर सारखेही वापरता येते. एकदम उपयुक्त मशिन आहे. २५-३० पोळ्यांची कणिक पण पटकन तिंबली जाते,कणिक एकदम एकसारखी आणि मऊ होते. पुन्हा मळायची गरज नाही लागत. गाजर, काकडी, बीट वगैरे गोष्टी फटाफट खिसून होतात. गाजराच्या हलव्यासाठी किलोभर गाजरे ५ मिन मध्ये खिसुन होतात. सगळ्या पालेभाज्या, कोबी वगैरे भाज्या अगदीच २-३ मिन मध्ये चिरून होतात.
मी तर अगदीच खुश आहे त्या फूड प्रोसेसर वर.
बजाज फूड प्रोसेसर मधे नारळ खवणी असते. पण मी घेतला तेव्हा ते मॉडेल उपलब्ध नव्हतं. त्यामुळे ती कशी चालते हे माहित नाही.
शरी / मनिमाऊ तुम्ही वापरता ते
शरी / मनिमाऊ तुम्ही वापरता ते कुठलं पर्टीकुलर मॉडेल आहे का बजाज फुड प्रोसेसरचे, म्हणजे घ्यायला गेल्यावर दुकानात तसे सांगायला?
Pages