खुलता कळी खुलेना - नवी मालिका - झी मराठी

Submitted by योकु on 26 June, 2016 - 11:55

तर लोक्स, झी मराठी वाहीनीवर १८ जुलै पासून खुलता कळी खुलेना ही नवी मालिका सुरू होतेय. त्याबद्दल काथ्याकूट करायला, कधीकधी पिसं काढायला हा धागा!
हो जाओ शुरू... Wink

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

.ते अ‍ॅक्च्युअली दळवींच्या घरावर आज आली संक्रांत असे हवे होते बहुदा >>> अगदी तेच मनात आलं .
सगळे वैतागलेच की .

हॉरिबल आहे ती! इतकी कशी काय निर्लज्ज पणे सहज वागू शकत्ये? >>> त्या विक्रांताला ही याचाच त्रास होतोय .
आपण नीदान चॅनेल बदलू शकतो , पण त्याच काय ??
स्वतःहून गळ्यात बांधून घेतल्य म्हणा तिला .

किती भयानक आगाउ आहे ती बहिण .

ती हीरवीण जास्तच थोराड दिसतेय आणि विक्रांतपेक्षा उंचही आहे बहुतेक. त्याला दाढीच्या खुंटांसकट का दाखवलंय कळेना...
फारकाही ग्रेट सिरीअल वाटत नाहीये सध्यातरी पण स्टारकास्ट बडी आहे.

दक्षे, वाट कसली? पिसं काढायलाच तर असतात हे धागे. Biggrin
टिव्ही न पाहाताही सगळे अपडेट्स कळतात हा फायदाही Happy

नववधू मोकळेपणाने वागते याचा अर्थ विक्रांत काय काढतो , तर 'तिला अजून ती 'प्रेग्नंट'असल्याचं माहित नसावं' ! त्याच्या गायनॅक आत्या काय अर्थ काढते, तर 'ती मुद्दामच असं वागवून दाखवणार !'. पण या दोन्ही गायनॅकना जराही असं वाटत नाहीं कीं एकदां योग्य त्या टेस्ट करून निदान 'प्रेग्नन्सी' कन्फर्म तरी करावी !
<< लग्नाआधी एकदाही विक्रांत आणि मोनिका एकमेकांना भेटले नसल्यासारखे वाटताहेत. >> हें तर जगावेगळंच वाटतं आताच्या जमान्यात.

इथे सगळेच मालिकेची पिसे काढत आहेत. मग मी का मागे राहू?
तो नायक डॉक्टर दाखवला आहे ना? मग दाढीचे खुंट डॉक्टर वाढवलेले हे असले डॉक्टर मालिकेतच का दाखवतात? अजुनतरी मी प्रत्यक्षात असे दाढीचे खुंट वाढलेला एकही डॉक्टर पहिला नाही आहे.
स्वतःच्या लग्नात दाढीचे खुंट वाढवलेले नायक मालिकांमध्ये बऱ्याच वेळा पाहिले आहेत पण एक डॉक्टर, (ते ही स्वतःच्या लग्नात?) दाढीचे खुंट का वाढवतो हे मला समजले नाही. (जर श्रीबाळ व्हायची इच्छा होती तर मालिका सुरू होण्याआधी तरी व्यवस्थित दाढी वाढवायची ना!) Happy
शर्वरी पाटणकर मालिकेची संवाद लेखिका म्हणुन इतकी भयानक असेल असे वाटले नव्हते. Sad तो भयानक संक्रांतीचा उखाणा! Sad
आत्तापर्यंत झी मराठीच्या मालिकांचे किमान पाहिले दोन महिने तरी नायक नायिकेचे प्रेमप्रकरण दाखवुन नंतर (रविवारच्या एक तासाच्या विशेष भागात) लग्न झाल्यावर मालिका सुरू व्हायची. पण इथे तर मालिकेची सुरुवातच लग्नाने? हे काही पटले नाही.
बाकी, सध्यातरी, शशिकला बाईंसाठी ही मालिका थोडे दिवस बघायचे ठरवले आहे.

लग्नाआधी कळुन पण लग्न केलं हिरोने हे असं दाखवण्यापेक्शा अग्दी लग्न झाल्यावर त्याच दिवशी कळत ई. दाखवल असत तरी चालल असतं..

आधी कळाल आहे तर मोडायचा चान्स होता तो नाही घेतला तर हिरोला का सहनुभुती दाखवायची?

दुसर की डॉक लोकाना किती प्रॉब्लेम होत असेल नाही.. साधं रोमँटिक म्हणुन बायकोचा / प्रेयसिचा हात पकडयला जायच आणि नाडी बिडी लक्षात यायची Lol

दुसर की डॉक लोकाना किती प्रॉब्लेम होत असेल नाही.. साधं रोमँटिक म्हणुन बायकोचा / प्रेयसिचा हात पकडयला जायच आणि नाडी बिडी लक्षात यायची Rofl
इथे कुणी डॉक नाहीये ना Wink

<< खरंच की बिचार्‍या डॉक्टरांची ही समस्या कधी लक्षात आली नाही! >> पण या नाण्याची दुसरी बाजूही आहे कीं या सिरीयलमधे - मेहूणी तयार असतेना हात पुढे करून नाडी तपासून घ्यायला ! Wink
इथं सर्वजण विक्रांतच्या नाडीपरिक्षेशीं सहमत दिसतात; मला मात्र दाट शंका आहे केवळ नाडीपरिक्षेवरून त्याने काढलेल्या निष्कर्षाबाबत !

हे पाहा, झी टीव्हीने एका सामाजिक समस्येला हात घातला आहे. स्त्रीविषयक गुलामगिरीच्या महत्वाच्या प्रश्नाला झी टीव्ही आपल्या शेरियलिच्या माध्यमातुन स्पर्ष करु पहाते आहे. कसे?

तर कोणि स्त्रीमुक्तिवादी असतील तर ते नक्कीच विचारतील, की नाडीपरिक्षेमुळे ती प्रेग्नंट आहे असे कळले तर त्यात इतका काय धक्का बसण्यासारखे झाले? त्याकरता तिनी स्वतःस कमीपणा का मानुन घ्यावा?
अर्थात मग तो विषय (संस्कृतीरक्षकांनी लादलेली) योनिशुचिता वगैरे वरही घसरू शकेल. अन शेवटी भारतातील तथाकथित संस्कृती संस्कृती म्हणून ढोल पिटली जाणारी , स्त्रीच्या गळ्यात लग्नाची बेडी अडकवणारी, "लग्नसंस्थाच " मोडीत काढण्याच्याच लायकीची कशी आहे यावर भाष्ये येतिल.

मला आपल असे वाटते हां, की असे असे होऊ शकेल..... माझे काहीही मत यावर नाही. Happy

अफकोर्स जर ती प्रेग्नंट असेल तर ते निषिद्ध आणि संतापजनक आणि फसवणूक करणारेच आहे!
कुणीही स्त्री वादी, संस्कृती रक्षक अथवा इतरही काही तत्ववादी कार्यकर्ते याच्या सहमत होतीलच होतील.

इथं सर्वजण विक्रांतच्या नाडीपरिक्षेशीं सहमत दिसतात; मला मात्र दाट शंका आहे केवळ नाडीपरिक्षेवरून त्याने काढलेल्या निष्कर्षाबाबत !

>> प्रेगान्युज वाल्यांचा धंदा बसणार या विक्रांतमुळे Lol

राधा बावरी मध्ये पण शरद पोंक्षे मिताली? प्रेग्नंट असल्याचे नाडीपरीक्षेवरुन ओळखतात. Happy ती असं काही नसल्याचे सांगते तर तिला दटावतात, माझ्या अनुभव/ज्ञानाला चॅलेंज करु नको वगैरे. पण ती खरंच प्रेग्नंट असते. Happy

हे दळवी घराणे Doc चे आहे, पण विक्रान्तचा मामा तम्बाखू (आरोग्याला हानीकारक )/कोळशाने तेही घराबाहेर दात घासतो! यक्स!
एवढ्या मोठया बन्गल्यात बेसीन, बाथरुम काहीच नाही वाटत. ती शिस्तीची भोक्ती आजी त्याला काहीच कसे बोलत नाही घराबाहेर दात घासण्यावरुन?

आणि कुठल्या काळात राहतात हे लोक, काय तर म्हणे अमावस्येच्या रात्री नवविवाहीत जोड्प्याने एकत्र येऊ नये (विक्रान्त म्हणेल,चला बर झाले :हाहा:)

सासू आणि आजेसासू ही साधी गोष्ट विक्रान्तला सान्गायला किती वेळ लावतात? Angry त्यापेक्षा ही गोष्ट त्यान्नी आधी मोनिकाला सान्गायची ना, नन्तर तीच ही गोष्ट विक्रान्तला सान्गेल. इतक सोप्प होत ते!

प्रेमात पडणं आणि मॅरिटल स्टेट्सचा संबंध नाही. >>> हो पण त्या व्यक्तीने ज्याच्याशी लग्न केलेय त्याची तो एकप्रकारे फसवणूकच करतोय ना extra marital affair करुन. त्या बायकोची किव्वा नवर्याची यात काय चूक? त्याने/तिने पण काही स्वप्ने बघीतली असतील सन्साराची. त्याचे/ तिचे प्रेम असू शकते त्या व्यक्तीवर.

जर त्या व्यकतीचे दुसर्यावर प्रेम असेल तर त्याने/तिने आपल्या आधीच्या जोडीदाराला घटस्फोट दयावा ना, आणि मग त्याला/तिला हव ते कराव. उगाच आधीच्या जोडीदाराची काहीच चुक नसताना त्याची/तिची फरफट कशाला? त्या व्यकतीने त्याच्या आधीच्या जोडीदाराच्या भावनान्चा विचार करावा.

लोकांना अशा कथा आवडतात हे अनेक सिरियल्सनी प्रुव केलं आहे. >>> नाही, एकता कपूर च्या मालिकान्ना लोक शिव्या देत आहेत. कारण त्या मालीकान्चे concepts ( एका नवर्याच्या दोन तीन बायका, लग्नाआधीची girlfriend, हिरोचे किव्वा इतर character चे extra marital affair वै वै.)

जेव्हा कमला ही सिरीयल चालू होती तेव्हा प्रेक्षकान्नी फेसबुकवर "बन्द करा ही सिरीयल, बन्द करा ही फालतूगीरी" म्हणत अक्षरक्षः गोन्धळ घातला होता. म्हणूनची ति सिरीयल दिड वर्षाच्या आतच बन्द पडली.

सुलु, सॉरी, पण तु अगदीच आदर्शवादी आहेस की>>>> इथे प्रश्न आदर्शान्चा नाही, प्रश्न भावनान्चा आहे.

जेव्हा कमला ही सिरीयल चालू होती तेव्हा प्रेक्षकान्नी फेसबुकवर "बन्द करा ही सिरीयल, बन्द करा ही फालतूगीरी" म्हणत अक्षरक्षः गोन्धळ घातला होता. म्हणूनची ति सिरीयल दिड वर्षाच्या आतच बन्द पडली. >> बंद झाली Uhoh आमच्याकडे तर रोज रात्री ९ वाजता सुरु असतात या कमलाबाई

झालं बाई ! शेवटी एक्दाच त्या विक्रांतने मॉनिका ल रागाच खरं कारण सांगितलं.
मोनिका ने अर्थातच अस काही नाही वगैरे चालु केलं .
तो म्हणाला , तुझ्ह्या समाधानासाठी हवं तर टेस्ट करूया.

बंद झाली की निल्सन, आता 'तुझ्यावचून करमेना' ९ वाजता असते. अर्थात आमच्याकडे ती वेळ अशोकाला अर्पण असते.

काल मी एक दोन एपिसोड्स सलग पाहिले Uhoh
अरे देवा.. अत्याचार फक्त.
हिरो अत्यंत एक्स्प्रेशनलेस दाखवला आहे. घरच्यांना इतकं ही कळत नाही का की ह्याच्या चेहर्‍यावर लग्नाचं नाविन्य किंवा उत्सुकता अजिबात दिसत नाहिये. त्याने सांगितलंय म्हणून आत्याला माहित आहे की हा असा का तोंडावर बारा वाजवून आहे ते पण बाकि कुणाच्याच लक्षात येऊ नये त्याचा हा मख्खपणा?

मोनिका ला सगळे म्हणतात , निर्मलानंतर घरात कोणी मुलगी नाही म्हणून सगळे तिचे लाड करतात.
पण निर्मलानंतर आणि मोनिकाच्या आधी घरात २ सुना आल्याच की . आणि त्यात शर्वरी सारखी ईतकी गोड सून !
त्यान्चे पण लाड केलेच असतिल की .

गेल्या भागात नवरे चक्क नाचले Happy .

लग्नाच्या रात्री , मोनिकाला शर्वरी तिच्या रूम मध्ये पाठवते.
त्यानंतर आत्या आणि विक्रांत , आरामात दिवाणखान्यात प्रॉब्लेम डिस्कस करत असतात .
घरातली सगळी माणस> अशीच झोपायला जातात ??
नवरा त्याच्या रूम मध्ये गेला की नाही हे कोणी बघतच नाही .

कालच्या भागात तर हाईट होती. Sad
एक तर या सिरियलचे भाग अतिशय संथ आहेत. मोजले तर एकूण संवाद लिहिता येईल इतकेच असतात. Uhoh
मॉनिकाला म्हणे माहितच नाही ती प्रेग्नंट आहे ते Uhoh
ती आपली सायकल अतिशय अनियमित आहे असं सांगते.. आणि विक्रांत म्हणतो तु साडेतीन महिन्यांची प्रेग्नंट आहेस. नाडीवरून इतके कळते? Uhoh आणि चला धरून चालू की हे लॉजिक बरोबर आहे की ती ३ महिने प्रेग्नंट आहे, एखाद दुसरा महिना पिरियड्स आले नाहीत ठिक, पण दोन महिने आले नाहीत तर मॉनिकाला काहीच वाटू नये? Uhoh इतकी माठे ती?

कैच्याकैच बाई लॉजिक शिरेल्वाल्यांचं

मॉनिका...... Biggrin
किती खप्पड दिसत्ये ती! आणि नाकपुड्या अशा विस्फारत काहीतरी बोलत होती काल... आणि व्ही गळ्याच्या सॅटीन गाऊन मधे गळ्याच्या शिरा वरखाली करत आर्ग्यू करत होती...अजिबातच चांगली दिसत नाहीये. बंडल शिरेल आणि बंडल लॉजिक!

काल नक्की काय झाल ? उडत उडत कळलं .
मोनिका त्याला म्हणते , मला हे बाळ नकोय . तु गायनॅक आहेस . तु नक्की मदत करू शकतोस .
कोणाला काही सांगायची गरज नाही. कोणाला काही कळणार नाही.
तो तिला " मी एक डॉक्टर आहे" असे म्हणवून उडवून लावतो .

ईकडे नवरा-बायकोत काहितरी खटकल्याच नाना-मामा , सप्र आणि संमो याना संशय येतो .

तो नाना मामा किती लोचट दाखवलाय. नवीन लग्न झालेल्या जोडप्याचे बोलणे चोरुन ऐकतोय म्हणजे हाइटच झाली. ह्याला स्वत:चा सन्सार, घरदार नाहीये का?

मोनिका त्याला म्हणते , मला हे बाळ नकोय . तु गायनॅक आहेस . तु नक्की मदत करू शकतोस .
कोणाला काही सांगायची गरज नाही. कोणाला काही कळणार नाही.
तो तिला " मी एक डॉक्टर आहे" असे म्हणवून उडवून लावतो .

>> ऑ? Uhoh मग म्हणूनच ती तुला सांगतेय ना मठ्ठा..
डॉक्टर नाही तर काय जडीबुटीवाल्याकडे जाणार का या कामासाठी?

आता विक्रांतमध्ये नको तिथे आणि नको तेव्हा डॉक्टर आणि माणूस दोन्ही जागं होणार.
पण मॉनिका सारख्या लग्नाला आलेल्या मुलिचं प्रेग्नन्सी बद्दलचं आज्ञान पाहू Uhoh झालं

<< पण मॉनिका सारख्या लग्नाला आलेल्या मुलिचं प्रेग्नन्सी बद्दलचं आज्ञान पाहू >> नुसत्याच लग्नाला आलेल्या नाहीं , तर पार्ट्याना जावून दारू घेणं निषिद्ध न समजणार्‍या !!
दुसरं, विक्रांतची आत्या एक ज्येष्ठ गायनॅक आहे. पण 'प्रेग्नन्सी' कळल्यावर तीचं नववधूशीं बोलणं, वागणं हें एखाद्या अगदीं जुन्या वळणाच्या अशिक्षित बाईसारखंच ! कां, तर खलनायिकी भुमिका हें शशिकलाबाईंचं बलस्थान आहे म्हणून ? Wink

दुसरं, विक्रांतची आत्या एक ज्येष्ठ गायनॅक आहे. पण 'प्रेग्नन्सी' कळल्यावर तीचं नववधूशीं बोलणं, वागणं हें एखाद्या अगदीं जुन्या वळणाच्या अशिक्षित बाईसारखंच ! कां, तर खलनायिकी भुमिका हें शशिकलाबाईंचं बलस्थान आहे म्हणून ?>>> लग्नाआधी आपल्या भाच्याची बायको प्रेगनंट आहे म्हणल्यावर अशी प्रतिक्रिया सहाजिकच आहे ना. ती विक्रांतची आत्या आहे इथे. तिच्या क्लिनिक मधे पेशंट म्हणून आलेल्या अविवाहित प्रेगनंट मुलीशी ती वेगळी वागेल.

पण 'प्रेग्नन्सी' कळल्यावर तीचं नववधूशीं बोलणं, वागणं हें एखाद्या अगदीं जुन्या वळणाच्या अशिक्षित बाईसारखंच ! कां, तर खलनायिकी भुमिका हें शशिकलाबाईंचं बलस्थान आहे म्हणून >>>>> काय चुकलं तिचं फसवणूक आहे ही. लग्नाआधी जे काहि गोंधळ घालायचे ते घालावेत पण प्रेग्नंट असताना ते लपवून दुसर्याशी लग्न करणं ही फसवणुक आहे ... आणि मी प्रेग्नंट आहे हे मला माहितच नाहि असं म्ह्ट्ल्याने फसवणुकीची तीव्रता कमी होत नाही...

Pages