Submitted by योकु on 26 June, 2016 - 11:55
तर लोक्स, झी मराठी वाहीनीवर १८ जुलै पासून खुलता कळी खुलेना ही नवी मालिका सुरू होतेय. त्याबद्दल काथ्याकूट करायला, कधीकधी पिसं काढायला हा धागा!
हो जाओ शुरू...
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हो. मी पण गाडीवाला प्रोमो
हो. मी पण गाडीवाला प्रोमो बघितला. ती बॅक सीट वर बसते आणि पुढे बसले तर लोक वेगळा अर्थ काढतात असं काहीतरी बोलते. ह्यावरून तरी नायक गरीब असावा असं वाटत नाही. असं पण असू शकेल की तो तिचा ड्राइव्हर कम मित्र असेल. त्या हिंदी कलर्स वरच्या 'मेरी आशिकी तुमसे ही' मालिकेसारखा
ती श्रीमंत बापाची लाडकी ईगो
ती श्रीमंत बापाची लाडकी ईगो नसलेली मुलगी असेल आणि तो तिच्या वडिलांचा सेक्रेटरी आणि तिचा मित्र असेल असा आमचा अंदाज आहे.
पण नायिका अगदीच कृत्रिम आणि नाटकी बोलते. ते ’थोडी लूज होईल का? (अंगठी)’ यात अगदी जाणवतं.
सोनीवर मागे एकदा एक टुकार
सोनीवर मागे एकदा एक टुकार मालिका असायची. त्यात अचाट श्रीमंत नायिका, सतत तिच्या सोबत असणारा तिचा मदतनीस-कम-बॉडीगार्ड-कम-हरकाम्या नायक, नायिकेचं लग्न ठरतं, पण नवरामुलगा काहीतरी फसवणूक करतो, प्रॉपर्टी डिस्प्यूट होतो, तो सॉल्व करण्यासाठी तात्पुरत्या बोलीवर नायक-नायिकेचं लग्न करून दिलं जातं...
मला तशी वाटतेय स्टोरी...
ती सोनीवरची मालिका मी पाहिली नव्हती... जाहिरातींमधून कळलेली स्टोरी सांगितली
सोनीवर मागे एकदा एक टुकार
सोनीवर मागे एकदा एक टुकार मालिका असायची. त्यात अचाट श्रीमंत नायिका, सतत तिच्या सोबत असणारा तिचा मदतनीस-कम-बॉडीगार्ड-कम-हरकाम्या नायक, नायिकेचं लग्न ठरतं, पण नवरामुलगा काहीतरी फसवणूक करतो, प्रॉपर्टी डिस्प्यूट होतो, तो सॉल्व करण्यासाठी तात्पुरत्या बोलीवर नायक-नायिकेचं लग्न करून दिलं जातं...>> झी वर होती ना ती मालिका?? नायकाचं नाव रघू असतं तीच ना. मी पण प्रोमो पाहिलेत फक्त.
मुलींनो प्रोमोवरुन कथानकाचे अंदाज बांधू नका.. आधीच्ये शिरेलींचा अणुभव आहे ना.
मलापण कथानक झी वरच्या " दो
मलापण कथानक झी वरच्या " दो दिल बंधे एक डोरी से" सारखं वाटतंय. रघू आणि बेबी'जी (तो तशीच हाक मारायचा तिला.)
पण नायिका अगदीच कृत्रिम आणि
पण नायिका अगदीच कृत्रिम आणि नाटकी बोलते. ते ’थोडी लूज होईल का? (अंगठी)’ यात अगदी जाणवतं>>>+११११
नायिकेची ऍक्टिंग चांगली
नायिकेची ऍक्टिंग चांगली सुद्धा असू शकेल. गौरी नाही का प्रोमो मध्ये किती छान वाटायची.. डोळे खूप बोलके वाटले होते तिचे. पण आता
रघू आणि बेबी'जी (तो तशीच हाक
रघू आणि बेबी'जी (तो तशीच हाक मारायचा तिला.) >>> हां... तीच मालिका
रघुजी आवडतो मला, प्रतिज्ञा
रघुजी आवडतो मला, प्रतिज्ञा सिरीयलचा हिरो तो, रघुची सिरीयल नाही बघितली पण प्रतिज्ञा मी बरेच दिवस बघितली होती त्याच्यासाठी. (त्यातली हिरोईन पण छान काम करायची).
संदर्भ : झी २४ तास ‘खुलता
संदर्भ : झी २४ तास
‘खुलता कळी खुलेना’ या मालिकेची गोष्ट आहे देशपांडे आणि दळवी कुटुंबाची. प्रतिष्ठित दळवी कुटुंब हे आजी-मुलं-सुना-नातवंडांनी फुललेलं एकत्र कुटुंब आहे. आपल्या धारदार नजरेने समोरच्याला निरुत्तर करणारी पार्वती आजी या कुटुंबाचा आधारस्तंभ आहे. आजोबांची वैद्यकशास्त्राची धुरा त्यांचा नातू डॉ.विक्रांत समर्थपणे पेलतो आहे. विक्रांत हा अतिशय समजूतदार, तत्वनिष्ठ आणि व्यवहारी मुलगा आहे. काही वेळा तो स्वतः पेक्षा इतरांचाच विचार जास्त करतो.
विक्रांतचं लग्न ठरतं देशपांडे कुटुंबातल्या मोठ्या नातीशी म्हणजेच मोनिकाशी. देशपांडे कुटुंब हे आजी आजोबा आणि त्यांच्या दोन नाती असलेलं एक छोटं कुटुंब आहे. आई-वडिलांविना असलेल्या दोघींना आजी-आजोबांनीच मायेने मोठं केलंय. दळवी आणि देशपांडे ही दोन कुटुंबं या लग्नामुळे जोडली गेली आहेत खरी पण त्यांना सांधणारा खरा दुवा वेगळाच असेल तर? या कुटुंबांतल्या दोन व्यक्तींमध्ये एक नातं अलगद तयार होऊ लागतं. कोणाच्याही नकळत! कोणाचं? आणि कोणाशी? ते पहायला मिळेल “खुलता कळी खुलेना”मधे.
या मालिकेचं वैशिष्ट्य ठरणार आहे ते यातील दमदार स्टारकास्ट. केवळ मराठीच नाही तर हिंदीतही आपल्या कामाचा दबदबा निर्माण केलेल्या अभिनेत्री उषा नाडकर्णी आणि सविता प्रभुणे. मराठी नाटक, चित्रपट व मालिकांमधून अनेकविध भूमिकांचा अनुभव असलेले चतुरस्र अभिनेते संजय मोने, लोकेश गुप्ते, शर्वरी लोहकरे, मानसी माग्गीकर आणि आशा शेलार या अनुभवी कलाकारांच्या अभिनयाची जुगलबंदी यातून बघायला मिळणार आहे.
मालिकेत डॉ. विक्रांत दळवी ही मुख्य भूमिका ओमप्रकाश शिंदे या अभिनेत्याने साकारली असून अभिज्ञा नाईक आणि मयुरी देशपांडे या अभिेनेत्री मुख्य भूमिकेत बघायला मिळणार आहेत. आजवर अनेक यशस्वी मालिकांचे दिग्दर्शन करणारे हेमंत देवधर या मालिकेच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळत आहेत. संतोष भारत कणेकर यांच्या अथर्व थिएटर्स अॅंड इव्हेंट्स संस्थेने या मालिकेची निर्मिती केली आहे.
अबोल प्रेमातून तयार झालेल्या एका अनामिक ओढीची आणि नात्याची ही गोष्ट प्रेक्षकांची मने जिंकण्यास सज्ज झाली आहे
लग्न अभिज्ञा भावेशी ठरणार पण
लग्न अभिज्ञा भावेशी ठरणार पण बंध मयुरी देशमुखची जुळणार मनाचे. कदाचित अभिज्ञाचं प्रेम दुसर्यावर दाखवतील मग हिरो हिरोईनचा मार्ग मोकळा. किंवा आईना मुविसारखे असेल.
अभिनेत्री उषा नाडकर्णी आणि
अभिनेत्री उषा नाडकर्णी आणि सविता प्रभुणे. >>> पुन्हा एकदा पवित्र रिश्ता!
मालिकेत डॉ. विक्रांत दळवी ही मुख्य भूमिका ओमप्रकाश शिंदे या अभिनेत्याने साकारली असून>>> मुख्य नायक हा चान्गला doctor असताना तो driver सारखा वागताना का दाखवलाय? तो doctor आहे मग एवढी फकीरासारखी दाढी का ठेवलीय त्याने? maybe त्या होमिसुयाघ च्या श्री accountant सारखे असेल, तो त्या मोठ्या बहीणीची परी़क्षा घेण्यासाठी driver झाला असेल (म्हणजे हि आणखी एक खोटयाची मालिका ), पण त्याचे मन धाकटया बहीणीवर आले असेल.
विक्रांतचं लग्न ठरतं देशपांडे कुटुंबातल्या मोठ्या नातीशी म्हणजेच मोनिकाशी>>> मोनिका नावाची मुलगी हि जनरली खलनायिकाच असते. म्हणजे हि कथा एक फुल दो माली (एक हिरो दोन बहीणी )अशी टिपिकल असेल. मोठी बहीण नायक-नायिकेच्या प्रेमात खोडा घालेल.
अभिज्ञाची ग्रे शेडची असेल
अभिज्ञाची ग्रे शेडची असेल कदाचित भूमिका, तिची असते बऱ्याच ठिकाणी. दिसायला सुंदर आहे ती.
उषा नाडकर्णी आणि आशा शेलार
उषा नाडकर्णी आणि आशा शेलार (जान्हवीची सावत्र आई) एकाच मालिकेत! अरे वा! हा तर चान्गलाच योग जुळून आलाय!
आता ती पार्वती आजी नक्की कोण साकारणार आहे, उषा नाडकर्णी कि आशा शेलार,ते बघायला हवे.
कितीही भारी कपडे आणि दागिने
कितीही भारी कपडे आणि दागिने घातले तरी उषा नाडकर्णी "श्रीमंत घरातील दरारा ठेऊन असलेली आजी" म्हणून शोभत नाहीत. त्यांच्या एकंदर व्यक्तित्वातच परिस्थिती ने गांजलेल्या व्यक्तीचा आक्रमकपणा दिसतो.
पूर्वी एका अशोक सराफ च्या चित्रपटात सिल्क ची पांढरी साडी आणि मोत्यांचे दागिने घालून एक उद्योजिका झाल्या होत्या, खूप विचित्र वाटलं पाहताना.
तसेच प्रभुणे बाईंच्या बाबतीत, कितीही हेअर स्टाईल बदलली तरी त्या करारी, बाणेदार वाटत नाहीत. मागे, "मला सासू हवीये" मध्ये आसावरी जोशींची रिप्लेसमेंट म्हणून आल्या होत्या, तिकडे हा फरक जास्तच उठून दिसायचा.
सिम्बा +१.
सिम्बा +१.
आता ती पार्वती आजी नक्की कोण
आता ती पार्वती आजी नक्की कोण साकारणार आहे, उषा नाडकर्णी कि आशा शेलार,ते बघायला हवे.>>> आजी म्हणुन उषा नाडकर्णीच शोभतील..
आपल्या आवडत्या आईआजी पण
आपल्या आवडत्या आईआजी पण चालतील. म्हणजे दाढीबाळ, आईआजी, नाटकी बोलणारी हिरवीण आणि आशा शेलार पण आहेत म्हणे. मग देजावु फिलींग इतर मालिकेत येतच असतं त्यापेक्षा जास्तच येइल.
सस्मित.... नाटकी लाडेलाडे
सस्मित....:-)
नाटकी लाडेलाडे बोलणारी हिरॉईन......
ए पण मला उषा नाडकर्णी अजिबात आवडत नाहीत. अती लाऊड अॅक्टींगे त्यांची. त्या ग्रेसफुल आजी वगैरे मुळीच शोभत नाहीत. चरचरीत बोलतात. मृदू नाही. आशा शेलार .....बद्दल तर काय बोलायलाच नको.
आशा शेलार प्रचंड ताकदीच्या
आशा शेलार प्रचंड ताकदीच्या अभिनेत्री आहेत. ग्रेसफुल आजी व्यवस्थीत करू शकतील.
कुणाला अग्निहोत्र मधला त्यांचा रोल आठवतोय का? होसूयाघ पेक्षा प्रचंड वेगळा होता - नवर्याच्या दरार्याखाली दबून असलेली पण तरी अन्यायाविरुद्ध लढायची ठीणगी असलेली स्त्री.
सुलू, श्री अकाऊंटंट...?
सुलू, श्री अकाऊंटंट...? ओ...!!! हो!!! आठवलं....होसुमियाघ मधे श्री आधी आधी त्या नंदन ला मालक दाखवून स्वत: अकाऊंटंट झालेला........काय मेमरी ए !!
सस्मित --- दाढीबाळ ...........
आशा शेलार उत्तम अभिनेत्री
आशा शेलार उत्तम अभिनेत्री आहेत.
अग्नीहोत्रमधे होत्या का त्या? मला आठवत नाहीयेत. गुंतता हृदय हे मध्ये होत्या हे आठवतंय.
जर नायिकेची आजे सासू उषा
जर नायिकेची आजे सासू उषा नाडकर्णी आणि सासू आशा शेलार असेल, तर मग त्या नायिकेचे काही खरे नाही बाबा! "दे माय,धरणी ठाय" असे होईल तिला रोज.
मस्त पोस्ट्स सर्वांच्याच .
मस्त पोस्ट्स सर्वांच्याच . मायबोलीचा एक फायदा तो म्हणजे सिरीयल न बघताही पोस्ट्स वाचून सर्व अप टू डेट माहिती मिळते .
जर नायिकेची आजे सासू उषा
जर नायिकेची आजे सासू उषा नाडकर्णी आणि सासू आशा शेलार असेल, तर मग त्या नायिकेचे काही खरे नाही बाबा! "दे माय,धरणी ठाय" असे होईल तिला रोज>>>
शिर्षक गित श्रेया घोषाल ने
शिर्षक गित श्रेया घोषाल ने गायले आहे. Wow! माझी फेवरीट!
अन्जू 13 July, 2016 -
अन्जू 13 July, 2016 - 16:27
लग्न अभिज्ञा भावेशी ठरणार पण बंध मयुरी देशमुखची जुळणार मनाचे. कदाचित अभिज्ञाचं प्रेम दुसर्यावर दाखवतील मग हिरो हिरोईनचा मार्ग मोकळा. किंवा आईना मुविसारखे असेल....
काल्चा १ला पीए कोणी पाहिला? अन्जू चं 'आईना' चं भविष्य खरं ठरणार असं दिस्तयं..
आणि त्या हीरोला त्या मुलिच्या हाताला हात लावल्याबरोब्बर कळलं की ती प्रेग्नंट आहे? आपण फसवले गेलोय हे कळुनही तो इतका शांत..
सविता प्रभुणे मुलाची आई आहे ना? मग ती कोणा परक्याच्या लग्नाला आल्यासारखी लांब, खुर्चीवर बसुन काय होती, नंतर रडायला काय लागली..!!
एकच एपिसोड पाहून मत व्यक्त
एकच एपिसोड पाहून मत व्यक्त करणं योग्य नाही. तरी पण तीन गोष्टी खूपच खटकल्या -
१] देशपांडे आजोबा नातीच्या आई-वडीलांच्या फोटोला नमस्कार करायला नवदांपत्याला नेतात आणि सांगतात काय तर- ' मुलीला श्रीमंत घर मिळावं अशीच तुमची ईच्छा होती ती सफल झालीय !' . मग नवर्या मुलाचं हॉस्पिटल आहे, औषधाचं दुकान आहे, शेती आहे इ.इ.तपशीलही भरीला घालतात. पण नवरा मुलगा सुविद्य आहे, गुणी आहे याचा उल्लेखही नाही ! म्हणजे, 'श्रीमंती' हा केवळ एकच निकष पुरेसा होता का या वरनिवडीसाठी ?;
२] ओवाळताना निरंजन विझणे, तेंहीं तीन-तीनदां, हें तर फारच सवंग वाटलं; व
३] फक्त नाडी परिक्षेने 'प्रेग्नन्सी' इतक्या खात्रीपूर्वक सांगता येते ? त्याची शक्यता वाटली तरीही त्याची पडताळणी न करतां एखाद्या नववधूवर असा गंभीर आरोप कसा होवूं शकतो !
आणि हो, <<या मालिकेचं वैशिष्ट्य ठरणार आहे ते यातील दमदार स्टारकास्ट.>> हा निकष आतां मालिकांचा दर्जेदारपणा ठरवायला केंव्हांच मोडीत निघाला आहे; .बघूंया या स्टारकास्टचा उपयोग कसा करून घेतलाय तें; मालिकेस शुभेच्छा.
बहिणी-बहिणींचा साड्यांचा सीन
बहिणी-बहिणींचा साड्यांचा सीन अजिबात नाही पटला. वधू आपल्या बहिणीला सांगते की तुझी साडी माझ्यापेक्शा चांगली दिसते आहे, जा जाऊन बदलून ये
लग्नात कोण कुठली साडी कधी नेसणार याचे बहिणी-बहिणींचे प्लॅन्स किती आधीपासून चालू असतात! मग वधूला आधी नाही सांगता आलं की एकावेळी एकसारख्या रंगांच्या साड्या नको नेसायला ??!!
आणि नंतरही दोघींच्याही पिवळ्याच साड्या होत्या की
हिरॉईनची एंट्रीची हेअरस्टाईल, मेक-अप, गेट-अप भीषण वाटला मला... डाव्या खांद्यापाशी केसांत कसल्या जास्वंदीच्या लाल मोठ्या पाकळ्या लावून ठेवल्या होत्या
या सगळ्यात नवरदेव घरातून निघतानाच मुंडावळ्या बांधूनच निघतो या बाबीचा अनुल्लेख करावा लागला मला...
हा निकष आतां मालिकांचा
हा निकष आतां मालिकांचा दर्जेदारपणा ठरवायला केंव्हांच मोडीत निघाला आहे >>> +१
Pages