Submitted by दिनेश. on 19 July, 2016 - 08:25
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
१ तास
लागणारे जिन्नस:
क्ष
क्रमवार पाककृती:
क्ष
वाढणी/प्रमाण:
दोघांना पूर्ण जेवण म्हणून
अधिक टिपा:
क्ष
माहितीचा स्रोत:
नेट !
आहार:
पाककृती प्रकार:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बांबूच्या बिया हा तांदुळाचा
बांबूच्या बिया हा तांदुळाचा (भाताचा)प्रकार नव्हे. बांबू साधारण चाळीस किंवा साठ (ही मर्यादा १३० वर्षांपर्यंत आढळते.)वर्षांनी फुलतो. फुलोर्याच्या लोंब्या जाड फुलांच्या फिकट पोपटी रंगाच्या असतात. कालांतराने त्यात बिया धरतात. त्या गळून पडून जमिनीत रुजतात आणि मूळ झाड मरून जाते. मधल्या चाळीस, साठ, बाहात्तर, एकशे वीस वर्षांत बांबूची नवी रोपे वेजिटेटिव प्रॉपगेशन पद्धतीने होतात. म्हणजे आले, हळद, शेवंतीप्रमाणे जमिनीखालून खोड धावते (राय्झोम) आणि नोड्सवर धुमारे फुटून ते बाहेर येतात. बांबूच्या बिया हे उंदीरघुशींचे आवडते खाणे आहे. त्यामुळे बिया धरल्या की त्या खाऊन रोडंट्स माजतात आणि शेजारच्या धान्यशेतात घुसून धुडगूस घालतात तसेच रोगराईही पसरवतात. म्हणून बांबू फुलणे हे एकेकाळी अशुभ मानले जात असे. बांबूच्या बिया हे आदिवासी लोकांचेसुद्धा अन्न होते. ते लोक ह्या बिया वेचून साठवून ठेवीत आणि कांडून दळून त्याचे पीठही करीत असत. पण हे अगदीच भरड धान्य आहे. आपल्यासारख्यांना जमणार नाही. ठाणे-पालघरकडच्या आदिवासींमध्ये बांबूबियांचा भात आणि भेंडीआंबाडीची मिसळ भाजी हा अनेक वर्षांनी खायला मिळणारा मोठा बेत असे. या बिया शिजायला अतिशय वेळ लागतो. बांबूच्या एका खोडापासून निघालेले सगळे बांबू, मग ते कुठेही उपटून लावले तरी एकाच वेळी फुलतात. अख्ख्या रानात बांबूच्या बियांचा सडा पडतो. आदिवासी लोक गोण्या भरभरून तो वेचीत असत. सात आठ वर्षांपूर्वी मुंबईतल्या राष्ट्रीय उद्यानातले सगळे बांबू फुलले होते. दुसर्या वर्षी बांबूच्या छोट्याछोट्या रोपांनी जंगल भरून गेले. मला वाटते त्या दिवसांत बांबूचे कोवळे कोंब (वास्ते, वासोटे, किल्लां) खुडून विकायला बंदी होती. त्या वर्षापासून मुंबईत भाजीवाल्यांकडे बांबूचे कोंब दिसणे अगदी कमी झाले आहे. तसेही बियांपासून रुजलेले बांबूचे रोप फुल-फ्लेज्ड वाढून त्याच्या भूमिगत खोडापासून नवे कोंब फुटायला काही काळ लागतो. मग मात्र नव्या धुमार्यांची वाढ अतिशय भराभर होते.
वरती धूपाविषयी विचारणा झालीय.
वरती धूपाविषयी विचारणा झालीय. धूप हे एक रेझिन आहे. ते स्वतःहून जळत नाही. म्हणजे काडी लावली आणि कापरासारखा पेट घेतला असे धुपाच्या बाबतीत होत नाही. पटकन पेटण्यासाठी आणि संथपणे जळत राहाण्यासाठी धुपाच्या खड्यांमध्ये काही ज्वलनशील पदार्थांचे मिश्रण करतात. राळ हा असाच एक पदार्थ आहे.
हीरा, माझ्या माहितीप्रमाणे
हीरा, माझ्या माहितीप्रमाणे बांबूचे कोंब बाजारात विकायला सध्या बंदी आहे. अमर्याद तोडीमूळे बांबूची बनेच नष्ट व्हायला लागली म्हणून असा नियम केला असावा. तसेही ते कोंब, लगेच खाता येत नाहीत. त्यात सायनाइडचा अंश असतो. ( हत्ती वगैरेने ती खाऊ नयेत, म्हणून निसर्गाची योजना असावी ती ) त्याचे काप करून ते २४ तास पाण्यात भिजवून, ते पाणी टाकून वगैरे वापरावे लागतात.
बांबूच्या बियांची खीर, गुरुदेव टागोरांना आवडत असे, असे कुठेतरी वाचल्यासारखे आठवतेय. तूम्ही सात आठ वर्षांपुर्वी म्हणतात, तेव्हा मी मुंबई विद्यापिठातला बांबू फुलल्याचे बघितले होते. पण त्याचे चित्रण एका जून्या बंगाली
चित्रपटातच बघितले होते.
हीरा, सुरेख माहिती! धन्यवाद!
हीरा, सुरेख माहिती!
धन्यवाद!
फॉरबिडन राईस म्हणून मी करते.
फॉरबिडन राईस म्हणून मी करते. मणीपूर भातासारखाच आहे. मणीपूर, आसाम, नेपाल इथे तर भुतान, चायना वगैर ठिकाणी सुद्धा होतो.
मी ऑनलाईन मागवते.
त्यात फक्त धूवून घेतला तांदूळ की, बटर टाकायचा आणि वरून कडकडीत पाणी ओतोन्न झाकून ठेवायचा.
मी रात्री करायचे. सकाळी मस्त फुललेला असायचा. तेच पातेलं गॅसवर ठेवून जरासा एक वाफ आली की, त्यात भरपूर कोथिंबीर , उकडलेले छोले, मिरची कापून, मीठ कमीच घालोक्न, सिमला मिरची बारीक कापून, टोमॅटो, लिंबू पिळून डब्यात घेवून जायची.
ज्यास्त शिजवला की जीवनसत्वे मरतात.
अप्रतिम चव. पौष्तिक सुद्धा. काळा नाहितर डार्क चॉकलेटी असतो.
https://draxe.com/forbidden-rice/
मी खालाय बांबू भात. इतका नाही आवडला. शिजवताना बांबूचा सुगंध मात्र येतो. त्यात हळदीचे पान टाकून बंगाली लोकं करातात आणि मधेच मासा टाकून उकडवतात.
अरे व्वा.. खूपच छान आहे
अरे व्वा.. खूपच छान आहे रेसिपी.. अगदी मिनिमम मसाल्याचा वापर असल्याने चव अजूनच खुलत असेल. क्फोटो एकदम तोंपासु.. नक्कीच ट्राय करणार!!!
हीरा खूप सुंदर माहिती..
ऋयाम.. क्या याद दिलाई तूने.. काळे राळे गोरे राळे..
वॉव, हेच ते राळे ,आत्ता समजले .. मस्तं!!!
झंपी ची रेसिपी पण छान वाटतीये..
सुलु, अन्जू, डॉ साती, वर्षू ,
सुलु, अन्जू, डॉ साती, वर्षू , तुम्हा सगळ्यांचे आभार.
हीरा, सुंदर पोस्ट
हीरा, सुंदर पोस्ट
बांबूच्या बिया हे
बांबूच्या बिया हे उंदीरघुशींचे आवडते खाणे आहे. त्यामुळे बिया धरल्या की त्या खाऊन रोडंट्स माजतात आणि शेजारच्या धान्यशेतात घुसून धुडगूस घालतात तसेच रोगराईही पसरवतात. म्हणून बांबू फुलणे हे एकेकाळी अशुभ मानले जात असे.
>>>>
या विषयावर एक कथा तरी आहे किंवा कुठल्याश्या सिनेमात हे रुपक वापरले आहे. जाम आठवत नाहिये मात्र
हीरा, पोस्ट आवडली.
हीरा, पोस्ट आवडली. इंटरेस्टिंग माहिती.
Pages