स्विट कॉर्न आणि लाल कांदा सॅलड

Submitted by धनि on 21 July, 2016 - 14:03
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

स्वीट कॉर्न (कणसे उकडून दाणे काढून)
लाल कांदा १ लहान बारीक कापून
स्वीट पेपर्स (लहान विविधरंगी ढोबळ्या मिरच्या) २ - ३ बारीक कापून
कोथिंबीर बारीक चिरून
हिरवी मिरची जितके तिखट हवे आहे त्या प्रमाणात बारीक चिरून
लिंबाचा रस (शक्यतो ताजा)
मीठ
चाट मसाला

क्रमवार पाककृती: 

सध्या उन्हाळ्यामुळे काही तरी ताजे खाण्यात असावे असे वाटते. त्याचबरोबर थोडेसे थंड - कमी मसालेदार असे काही तरी तोंडी लावणे चांगले वाटते. बेत काय करावा वर अमांनी सुचवल्यामुळे तिथे ही पाककृती टाकली पण म्हणालो की इथेही टाकून देऊयात Wink इथे उन्हाळ्यात ताजी मक्याची कणसं मिळतात. मग कधी कधी आणली जातात. हे सॅलड ऐनवेळेस कणसं होती आणि काही इकडची लोकं जेवायला येणार होती तर त्यांना काय द्यावं या विचारातून सुचलेलं आहे!

कणसं उकडून घेऊन त्यातले दाणे काढून घेतले. कांदा, मिरची, पेपर्स, आणि कोथिंबीर बारीक चिरून घेतले.
सगळे जिन्नस एकत्र करून त्यात मिठ आणि चाट मसाला घातला.
वरतून लिंबाचा रस पिळून मस्त एकत्र करून घेतले.

मसालेदार जेवण असेल तर कोशिंबीर / सॅलड म्हणून उपयुक्त डीश आहे.

इकडच्या काही लोकांनी तर मिटक्या मारत अजुन घेऊन खाल्ल्ले.

वाढणी/प्रमाण: 
ज्याला जितके आवडते तितके.
अधिक टिपा: 

१) तुम्हाला बार्बेक्यु स्वाद आवडत असेल तर कणसं आणि पेपर्स शेगडीवर बार्बेक्यु करून घेऊ शकतात. मग उकडायची गरज नाही.
२) यात ब** आणि प** घालू नका शक्यतो !
३) तिखट खाणारी लोकं नसतील तर मिरची बाद करून मिरपूड घाला थोडी
४) चाट मसाला आणि लिंबाचा रस यात काही सब्स्टिट्युशन नाही !

माहितीचा स्रोत: 
स्वयंपाकघरातील प्रयोग
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे वा!

>> इकडची लोकं जेवायला येणार होती

म्हणजे कोण रे? Proud

मी पण करते असं सॅलॅड. ह्यात मोड आलेले मूगही घालते ( बोगातू स्टाईल ;))

मस्त. असं फ्रोजन कणसाच्या दाण्याचं करतो. मंजूडीच्या रेसिपीने.
अगदीच भाप्र: कणसं कशी उकडतात? कुकर मध्ये? का पाण्यात टाकून उकळवायची? आणि दाणे सहज निघतात का?

कणसं इकडं मिळतात ती तर नुसती पाण्यात उकळली तरी शिजतात. आणि दाणे मी तरी सुरीनी कापून काढतो. सोपे पडते आणि पटकन होते काम.

परत कणसं आणली की फोटू टाकेन Wink मस्त रंग दिसतात खरंच !

अरे वा भारी सॅलड आहे.

आमच्या त्या ह्यांची कोथिंबीर चटणी लावून ग्रिल केलेलं प** या सॅलडमध्ये चांगलं लागेल असं सांगतेच.

अमित, प्रेशरकुकरमध्ये मीठ घातलेल्या पाण्यात उकडायची कणसं. फार भारी लागतात.

भारी रेस्पी. सध्या इकडे मिळतायत कणसं.

भाप्रलाउपप्र - आख्खं कणीस/ एकाचे दोन तुकडे करून कुकरच्या भांड्यात थोडं पाणी घालून उकडायचं ना?
नेहेमी दाणे काढून मग उकळ/डणे केलेलं असल्यानी आणि ही पद्धत सोपी वाटल्यानी एव्हढे भाप्र.

>>मसालेदार जेवण असेल तर कोशिंबीर / सॅलड म्हणून उपयुक्त डीश आहे.<<

चखणा म्हणुन पण खपुन जाईल... Wink

फोटु टाकलायच कुठे दिसायला?:फिदी: पण फोटु पुढल्या वेळी जरुर टाका. रेसेपी चविष्ट आहे. इथे असेच मक्याचे दाणे उकडुन त्यात कांदा, टॉमेटो बारीक चिरुन टाकते आणी चाट मसाला व लाल तिखट घालते. पण लाल कांदा तिखट नसतो म्हणून बरे, आपला भारतीय कांदा फार जहाल.

यात ब** आणि प** घालू नका शक्यतो !>>>>>:फिदी:

मस्त रेसीपी धन्यवाद धनि. इथे सिनेप्लेक्सात उकडलेले मका दाणे मिळतात ते एक आणून त्यात कांदा मिरची कापून घातली तरी चालेल.

मके उकडायला मी दाणे चाळणीत ठेवते व खाली पाणी उकळायला ठेवते. वर झाकण. दहा मिनिटात मस्त उकडून होतात. मग वाटीत घेउन वरून मीठ व बटर घालून खायचे. गरम असतानाच. अमेरिकन स्वीट कॉर्न नावाने मिळतात इथे.

मस्त. एका मेक्सिकन शेफने टिव्हीवर अशीच रेसिपी दाखवली होती, तेव्हापासून करून बघायची होती. आता नक्कीच करणार Happy

धन्यु सगळ्यांना !

निखाऱ्यावर चरचरीत भाजलेल्या कणसाचे दाणे >> हो तेच बार्बेक्यु मध्ये अपेक्षित आहे Wink

ब** आणि प** >> हे खुप गाजलेले प्रश्न आहेत त्यामुळे आधीच खबरदारी घेतलेली चांगली Lol

ब** आणि प** >> हे खुप गाजलेले प्रश्न आहेत त्यामुळे आधीच खबरदारी घेतलेली चांगली

अगदी अगदी Biggrin

तरी यात बोगातु राहीलंय बरं का! Proud

ब** आणि प** मायबोलीवर ब्याडवर्ड म्हणून क्लासिफाय करण्यात आले आहेत.