१ वाटी तांदूळ, १/२ वाटी हरबरा डाळ, १/२ वाटी उडीद डाळ, २ हिरव्या मिरच्या, ३-४ लसणीच्या पाकळ्या, अर्धा इंच आले, मीठ, पाव चमचा हळद. फोडणीसाठी तेल, मोहोरी, जिरं, हिंग. सजावटीसाठी खोबरं, कोथिंबीर.
तांदुळ आणि दोन्ही डाळी ५-६ तास एकत्र भिजवावे. पाणी उपसून टाकुन इडली/डोशासाठी वाटतो तसे वाटुन घ्यावे. थोडे मीठ घालुन ७-८तास आंबवुन घ्यावे. पीठ छान फसफसले पाहिजे.
ह्या पीठात १ टे स्पून तेल, हळद, बारीक वाटलेले- हिरव्या मिरच्या + आल्याचा तुकडा + लसूण आणि चवीप्रमाणे मीठ हे सर्व नीट मिसळुन घ्यावे. एका थाळ्याला (किंवा ढोकळे करायचे काही उपकरण असल्यास त्यात) तेलाचा हात लावुन पीठाचा हव्या त्या जाडीचा थर द्यावा. ढोकळा छान फुलतो. थाळा नीट बसेल अशा पातेल्यात अथवा कढईत घट्ट घाकण लावुन २० मिन वाफवुन घ्यावे. चांगली आंच लागली पाहिजे. ढोकळा झाला की पांढरी वाफ यायला लागते. पहिल्यांदाच करत असाल तर "नाइफ टेस्ट" करुन बघायला हरकत नाही.
गुजराथी पद्धतीने थोडा गोडसर ढोकळा करायचा असेल तर चमचाभर साखर घालावी. ताटात अगदी पातळ थर द्यावा. साधारण एक सेमिचा थर पुरेल. मिरची,लसणाची पाकळी एखादी कमी घालावी तसेच हळद घालु नये.
दोन्ही प्रकारात हिंग, मोहोरी, जिर्याची फोडणी आणि खोबरं/कोथिंबीर घालुन सजवावे.
प्रकाशचित्रात पहिले चित्र आहे आईने केलेल्या ढोकळ्याचे. दुसरे आहे ते मी गुजराथी पद्धतीने केलेल्या गोडसर ढोकळ्याचे. आईने केलेला अर्थातच जास्त छान लागतो
१. पीठ उन्हाळ्यात ५-६ तासांत छान फसफसते. एरवी मी रात्री ओवनमधे ठेवुन देते ढोकळे सकाळी करायचे असतील तर. अवन प्री-हीट करायची गरज नाही.
२. पीठ छान फसफसले नसेल तर मिश्रण ताटात घालण्याआधी अगदी एक मिनिट चिमुटभर सोडा घालावा.
सिंडे, फोटु आणि कृती दोन्ही
सिंडे, फोटु आणि कृती दोन्ही मस्तच दिस्तंय!
करून बघते आजच.
तांदळाचा रवा चालेल का ग
तांदळाचा रवा चालेल का ग वापरलेला? माझा ढोकळा नेहमीच पिठल्याच्या वड्या होतो. तांदळाचा रवा आहे घरात म्हणून हा उद्याच करून बघावं म्हणते.
श्यामले, तू विचारलंस तरी. मी
श्यामले, तू विचारलंस तरी. मी (न विचारताच) तांदळाचा रवा वापरणार आहे.:P (दुकानात उपमा करायला म्हणून रव्याचं पाकीट उचललं,तो तांदळाचा रवा निघाला.) चांगले झाले नाही तर सिंडीच्या माथी खापर..
मस्त दिसतं आहेत ढोकळे.
मस्त दिसतं आहेत ढोकळे.
अग हा ढोकळा आहे म्हणत्ये ही
अग हा ढोकळा आहे म्हणत्ये ही म्हणून विचारत्ये ,इडली म्हणाली असती तर मीपण वापरून मोकळी झाली असते
मृ, धन्यवाद मी इडली रवा
मृ, धन्यवाद
मी इडली रवा वापरुन करुन बघितला आहे एकदा. चांगला झाला होता. तांदळाच्या रव्याचं मला माहिती नाही. आईने सांगितलेली कृती मी जशीच्या तशी दिली आहे. बाकी मला काही विचारु नका, पस्तावाल
ढोकळयाचे फोटो मस्त आहेत, लाँग
ढोकळयाचे फोटो मस्त आहेत, लाँग वीकेंड असल्याने वेळ पण आहे लगेच करून बघायला
इडली रवा म्हणजेच तांदळाचा
इडली रवा म्हणजेच तांदळाचा रवा. ढोकळे मस्तच दिसताहेत. पण सिंडे पीठ व्यवस्थित फसफसले असेल तर सोडा, इनो काहीच घालायचे नाही?
ढोकळा किंवा तत्सम प्रकार
ढोकळा किंवा तत्सम प्रकार करताना पिठ फसफसणे आवश्यक आहे. नाहितर पदार्थ दड्दडीत होतो. रात्री भांड्यात पिठ टाकल्यावर, त्याची पातळी लक्षात ठेवावी, दुसर्या दिवशी किमान दुप्पट झालेली असेल तरच ढोकळा करावा, नाहीतर वाट बघावी.
नीट आंबण्यासाठी, त्यात थोडे नारळाचे पाणी, कांदा, ड्राय यीष्ट यापैकी काहितरी टाकावे. किंवा भांड्यावर केळीचे पान झाकून ठेवावे.
सिंडे, मस्त पाकृ. मी बर्याच
सिंडे, मस्त पाकृ. मी बर्याच दिवसांपासून योग्य प्रमाण शोधत होते. आता नक्की करून पाहीन. फोटो पन कसला सही आलाय..
कसली सुटसुटीत आणि छान पा.कृ.
कसली सुटसुटीत आणि छान पा.कृ. आहे. आत्ताच ऑफिसातून घरी जाऊन डाळ्-तांदुळ भिजत घालावेसे वाटताहेत
अश्विनी, (आई म्हणाली) जर जाड
अश्विनी, (आई म्हणाली) जर जाड लेयर देऊन (म्हणजे तिने केलाय तसा) करायचा असेल तर पीठ फसफसल्यानंतरही चिमूटभर सोडा घालावा म्हणजे छान हलका होतो ढोकळा. मी त्या चपट्या ढोकळ्यासाठी सोडा नाही घालत.
सिंडे, ढोकळा छान झाला जाळीदार
सिंडे, ढोकळा छान झाला जाळीदार वगैरे...मला आवडला.(नवर्याला ते इडलीचं चौकोनी रुप वाटलं). उद्या परवा फोटो टाकते.
अरे वा!! सुग्रणीने हा ढोकळा
अरे वा!! सुग्रणीने हा ढोकळा कधी टाकला??
करून बघायलाच हवा!!
हा ढोकळा मस्त होतो आणि मुख्य
हा ढोकळा मस्त होतो आणि मुख्य म्हणजे पौष्टीक पण आहे. मी नेहमी असाच करते पण इनो घालुन. इनो न घालता सुद्धा तुझा हलका झाला म्हणतेस मग करु बघते तसा पुढच्यावेळी.
सिंडे, घे तुझ्या पद्धतीने
सिंडे, घे तुझ्या पद्धतीने केलेल्या ढोकळ्याचा फोटो
सायोनारा, मस्त दिसत आहेत
सायोनारा, मस्त दिसत आहेत ढोकळे.
मीपण करुन पाहिला गं, फार छान झाला
जरा जास्तच भिजवेले डाळी आणि इडली रवा, त्यातले निम्मे ढोकळ्याला वापरले आणि रहिलेले निम्म्या पिठाचे मग दुसर्या दिवशी अप्पे केले, ते पण मस्त झाले. थँक्स!
सायो, मस्तच. तुझा डोकळा तर
सायो, मस्तच. तुझा डोकळा तर अगदी खमण सारखा दिसतोय.
पुणेकर, आईला सांगते
माझी हळद जरा जास्त झाली
माझी हळद जरा जास्त झाली म्हणून रंग अगदी पिवळा धम्मक आलाय.
वा. सुंदर फोटो सिंडी आणि
वा. सुंदर फोटो सिंडी आणि सायो.
करुन पाहते.
सायो, फारच पिवळा धम्म झाला
सायो, फारच पिवळा धम्म झाला ढोकळा पण जाळी छान आली एकदम..
मी केलेला ढोकळा नेहमीच चुकतो,
मी केलेला ढोकळा नेहमीच चुकतो, विकतचे मिक्स आणले तरी तो कुकरमधुन बाहेर काढला की चपटच होऊन जातो.
असा करुन बघेन आता.
मी केला होता रविवारी, मस्त
मी केला होता रविवारी, मस्त झाला होता
Thanks! फार दिवसापासून ही
Thanks! फार दिवसापासून ही रेसिपी शोधत होते. हा प्रकार करुन बरेच दिवस झल्याने विसरले होते.
मी पण केला होता शुक्रवारी.
मी पण केला होता शुक्रवारी. मस्त झाला होता.
मी ढोकळा केला होता पण जाळीदार
मी ढोकळा केला होता पण जाळीदार नाही झाला.पीठ फुगले होते.मी सोडा पण घातला होता. नक्की काय चुकले तेच कळले नाही.
वाव
वाव
खुप छान आहे! माझी आई पन असच
खुप छान आहे!
माझी आई पन असच धोकला बनवते,
फख्त एक फरक, तन्दुल आनी दाल वाटत असतअना दही घलाव, नन्तर मग आंबवाव,
म्हनजे धोकला मस्त होतो!
मस्त आहे कृती.. काल रात्री
मस्त आहे कृती..
काल रात्री अचानक इतकी इच्छा झाली ढोकळा खायची..
मग झटपट ढोकळ्याच्या दोन कृत्या सापडल्या युट्युबवर, त्या मिक्स करून केला ढोकळा!
चांगला होता ढोकळा, पण विकतच्याची मजा नाही आली
आता पुढच्या वेळेस ह्या पद्धतीनं करून बघेन आणि रिपोर्ट देईन.
झटपट ढोकळ्याच्या इथे पण २-३
झटपट ढोकळ्याच्या इथे पण २-३ कृती आहेत. हा म्हणजे भिजवा-वाटा-फर्मंटा
Pages