अल्पावधीत साडी कशी फेडावी?

Submitted by केदार on 12 July, 2016 - 15:52

त्याचे झाले काय, पुढच्या विकांताला आमचा कॉलेजग्रूप नाटक करणार आहे. महाभारतावर ! अन मी दु:शासन !

फुल्ल टू दंगा घालायचा प्लान आहे. या आधी आम्ही असे फार वर्षापूर्वी पुरूषोत्तमच्यावेळी आणि नुकतेच फिरोदिया मध्ये केले होते. यण्दा हा मान चक्क कान्सने पटकावला आहे. पण एक गोची आहे.

धिंगाणा डान्स करायला पोषक अशी झिंगाट किंवा झिंदगी सारखी गाणी आमच्या नाटकात नाहीत. म्हणून मग काहीतरी नविनच टाकून साडी फेडून अन पॅन्ट सोडून दु:शासनाच्या आवेश आणायचा प्लान बनला आहे. मात्र साडी फेडली की आतमधला परकर दिसणार. त्यामुळे नवा ब्रांडेड परकर घेणे आले. किती वेळा छोट्या छोट्या गोष्टींसाठी मायबोलीकरांना त्रास देणार. म्हणून यंदा सरळ आमच्या बेबी नंदाला विचारले. म्हणजे गर्लफ्रेंड हो. तर तिने यापेक्षा भारी आयडीया दिली. म्हणाली परकर हवाच कशाला? मी ऊडालोच. म्हणलं मग सगळ डायरेक? महभारता ऐवजी पोर्नोभारत होईल की !

मग ती उतरली, सीधी बात नो बकवास! साडी फेडायची आणि सरळ उघडे व्हायचे. नाटक तसेही महाभारत आहे. दु:शासनाला लाज वाटत नाही तर तुम्ही का लाजत आहात? कमॉन, मन साफ तन साफ तर उघडे होण्यात कसले आलेय पाप! शिवाय एक साडी फेडायची नाही, १०-१२ प्रति द्रोपद्या उभ्या करायच्या. प्रत्येकीला साडी मध्ये स्किन टाईट सुट घालायला सांगायचे साडी फेडली रे फेडली, की दुसरी द्रोपदी हजर, परत साडी फेडायला ! कृष्णाची मग गरज नाही.

ऑस्सम आहे माझी नंदीबैल !

बस्स संध्याकाळ होताच हाच डायलॉग 'रात्रीस खेळ चाले' या आमच्या व्हॉटसप ग्रूपवर चिपकवला. एकेक भूत पिशाच्च उगवू लागले आणि प्रत्येकीला ही दरिद्री आयडीया आवड्यायला लागली. हो हो करता सारेच जण त्या दिवशी घरून आंघोळ करून यायला आणि साडी फेडायला तयार झाले. ठराव पास झाला. तिकिटे लागलीच बूक झाली. आणि इथे माझ्या डोक्यात उदबत्ती पेटली..

तर अंतर आत्मा म्हणाला, भावा तो तर दु:शासन होता. तेंव्हाचा शक्तीकपुर . आपण पाप्याचे पितर. लोकांची साडी कशी फेडणार? साडीला हात घातला की लाज ही जाणारच.

पोरांना तर समोर द्रोपदीच्या स्वरूपातील डेरी मिल्क सिल्क दिसत असताना त्या आजूबाजुच्या Gem's च्या गोळ्या काही टिपणार नाहीतच. कोणाची साडी फेडली जाते तेच बघणार. साडी फेडताना इज्जतीचा पंचनामा होईल तो वेगळाच. मन शैतानाचे घर, वासना काय कुठूनही प्रवेश करते..

तर, आता ऐनवेळी फजिती होऊ नये म्हणून,

१) दहा दिवसांत साडी फेडूनही काहीच "अपघात" होणार नाही ह्याची तयारी कशी करावी?

२) यापुढेही मन साफ ठेवून साडी फेडताना काही त्रास होऊ नये ह्याबद्दल काय उपाय योजता येतील?

३.) महत्वाचे म्हणजे नाटकात, इतरांना कळायच्या आधी पहिलीची साडी कशी फेडावी अन दुसरीने समोर कसे यावे? म्हणजे कंटिन्युटी राहिल? अन कृष्ण आपला एक हात धरून उभा राहिल. पण अल्पावधीत साडीही फेडली जाईल.

माहिती सर्व गरजेची असली तरी कृपया आधी नंबर ३, बाबत सुचवा.

१० दिवस तरी दु:शासन होऊन जगायचे ठरविले आहे. दु:शासन होण्यास वय नसते.. फक्त द्रोपदी हवी असते.

थॅन्क्स इन अ‍ॅडव्हान्स,
आगाऊ धन्यवाद !

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त.

आयला याला म्हणतात विडंबन....निदान नवीन धागे येणे थांबेल...फक्त हसून खुर्चीवरून पडायचा बाकी होतो....

केदार, हसुन हसुन मेले. पण या सगळ्याचा उपयोग होणार आहे का काही?
उद्या परत ढेकूण कसा मारावा असा बीबी निघणार नाही कशावरून?

काहीतरी गल्लत होतेय का? माझ्या लेखावरची विडंबने मला व्यथित करतात असा गैरसमज होतोय का? व्यथित तर मी कश्यानेही होत नाही ती गोष्ट वेगळी म्हणा, पण एखादे छानसे विडंबन माझ्या लेखावर जमले तर मला मनापासून आनंदच होतो. विडंबनकारही स्वता हे एंजॉय करत असतीलच. त्यामुळे त्यांना छानसे मटेरीयल मी पुरवू शकलो याचाही एक आनंद असतो. ओवरऑल याने माझा नवनवीन धागे काढायचा हुरूप वाढतोच. कमी कसा होईल?

Pages