मी बी मंत्री होईन म्हणतो : नागपुरी तडका
लाल दिव्याची चमक पाहीन म्हणतो
मी बी मंत्री होईन म्हणतो...!!
शेतमालाला रास्त भाव
भेटला काय, न भेटला काय
शेतकर्याला दारिद्रीत जगायची
उपजत सवयच हाय
मी तरी आपलं जमवून
घेईन म्हणतो
मी बी मंत्री होईन म्हणतो...!!
शेतकर्याला कर्जमुक्ती
भेटली काय, न भेटली काय
शेतकर्याला कर्जात जगायची
उपजत सवयच हाय
मी तरी आपला खिसा भरून
घेईन म्हणतो
मी बी मंत्री होईन म्हणतो...!!
शेतीचे प्रश्न
सुटलेत काय, न सुटलेत काय
या बैताडबेलण्या शेतकर्याले
उपजत अक्कलच नाय
संघटनेची सीडी करून
सत्तेच्या बोहल्यावर चढेन म्हणतो
मी बी मंत्री होईन म्हणतो...!!
शेतीशी प्रतारणा करून
सत्तेत येता येते
शेतकर्याशी इमान राखणारा
खड्ड्यामधी जाते
शेतकर्याचे नाव फक्त
कामापुरते घ्यावे
सीडी चढून झाली की
खुशाल सोडून द्यावे
सत्ताकारण करावे
तरच मिळते अभय....!!
एकमुखाने बोला भाऊ!
सत्तासुंदरी की जय....!!!
- गंगाधर मुटे "अभय"
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
मुटेजी, भारीच आहे. रोख
मुटेजी, भारीच आहे. रोख कोणाकडे आहे ? रा.आ. की काय ?
महेशजी वाचकांच्या आकलनानुसार
महेशजी
वाचकांच्या आकलनानुसार रोख ठरू शकेल.
कवितेत काय घातले की तिचा
कवितेत काय घातले की तिचा नागपुरी तडका होतो?
हे महाराष्ट्रातील शेतकरी सतत,
हे महाराष्ट्रातील शेतकरी सतत, सरकार कडे आम्हाला 'हे द्या', आम्हाला 'ते द्या' म्हणत सारखे रडत का आसतात हेच कळत नाही. इथे आंध्रात एवढ्या वर्षात एकाही शेतकर्याला असे रडताना मी तरी पाहिले नाही.
महाराष्ट्रात शेतकरी नेते बरेच
महाराष्ट्रात शेतकरी नेते बरेच आहेत. त्यामुळे असेल.
श्री सदाअभाव खोत मंत्री पदी
श्री सदाअभाव खोत मंत्री पदी निवड...
प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार!
प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार!