औषधांची चाचणी?

Submitted by मानव पृथ्वीकर on 7 July, 2016 - 03:36

आपल्याला जर एखद्या औषधाच्या क्वालिटी बद्दल अथवा त्यात जे दावे केले आहेत त्या व्यतिरिक्त त्यात असे काही आहे का जे अशा औषधात असायला नको, अशी शंका आल्यास, त्या औषधाची चाचणी करुन घेता येते का कुठल्या लॅब मधून?
अशा लॅब्ज असतात का जिथे सामान्य माणुस अशी चाचणी करुन घेऊ शकतो?
हैद्राबाद, बंगलोर अथवा मुंबईत अशी कुठली लॅब असल्यास तिची माहिती हवीय.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझ्या अल्प माहितीनुसार सामान्य माणूस अशी चाचणी करुन घेऊ शकत नाही.मला स्वतःला अशी चाचणी १६ वर्षांपूर्वी हवी होती.पण एका डॉक्टरांनी वर दिल्याप्रमाणे सांगितले.के.ई.एम.मधे अशा चाचण्या होत असत(पण वैयक्तिक विनंतीवरून नाही) अशी एका लेखात वाचल्याचे अंधुक आठवते.डहाणूकरांचा लेख होता बहुदा

>>>आपल्याला जर एखद्या औषधाच्या क्वालिटी बद्दल अथवा त्यात जे दावे केले आहेत त्या व्यतिरिक्त त्यात असे काही आहे का जे अशा औषधात असायला नको, अशी शंका आल्यास, त्या औषधाची चाचणी करुन घेता येते का कुठल्या लॅब मधून?<<<

मानव, हे काम तर डॉक्टर स्वतःच करत असतात ना औषध प्रिस्क्राईब करताना? हे काम म्हणजे चाचणीचे नव्हे, पण ते औषध रुग्णाला लागू पडेल ही खात्री डॉक्टर देतातच ना?

तुम्ही जे म्हणत आहात तशी चाचणी औषध निर्मात्याला शासनाच्या नियमांनुसार विशिष्ट प्रयोगशाळेतून करून घ्यावी लागत असेल. (औषध प्रथम बाजारात आणण्याआधी व नंतरही नियमीतपणे). पण एका इनडिव्हिज्युअलने ही चाचणी का करावी?

जर मुळातच औषध कोण्या ऐर्‍यागैर्‍याने भेट दिले असेल किंवा तयार करून दिले असेल तर त्याची चाचणी करावीशी वाटणे समजू शकतो. उदाहरणार्थ बुवा वगैरेंची औषधे! पण ती मुळात घेऊच नयेत.

कदाचित डॉक्टरवर किंवा औषध बनवणार्‍या कंपनीवर विश्वास नसेल.
भेसळ करणार्‍या कंपन्या अश्याच पकडल्या जातात ना? तसा काहीसा प्रकार असेल..

माझ्या अल्प माहितीनुसार सामान्य माणुस अशी चाचणी करुन घेऊ शकत नाही.
>>>
माझ्या लॉजिकनुसार सुद्धा सामान्य माणसाला अशी परवानगी न देणे हेच योग्य ठरेल.

माझ्या लॉजिकनुसार सुद्धा सामान्य माणसाला अशी परवानगी न देणे हेच योग्य ठरेल. >>>>

कसं ते इस्कटुन सांगान का?

Back to top