केरळची आमची सहल मीच स्वतः नेट वर बघुन वैगेरे प्लॅन केली होती. मला स्वतः प्लॅन करुन जायलाच आवडत . ते होम वर्क ही मी खुप एऩ्जॉय करते. माबोकराना ह्याचा उपयोग होईल अशी आशा करते.
दिवस पहिला : विमानाने मुंबई - त्रिवेंद्रम. सकाळचचं घेतल होत विमान. विमानाने गेल्यामुळे थकवा नाही जाणवला प्रवासाचा . त्रिवेंद्रम ते कोचिन अशी एअर पोर्ट टु एअर पोर्ट गाडी बुक केली होती. त्रिवेंद्रम विमानतळ तसा जवळच आहे शहरापसून. अकराच्या सुमारास पोचलो हॉटेल ( ऑफिसच गेस्ट हाऊस) वर . जरा आराम करुन शहर बघायला बाहेर पडलो. पद्म्नाभ मन्दिर , एक राजवाडा, राजा रविवर्मा चित्र गॅलरी वैगेरे बघितल. पद्म्नाभ मंदिरात लुंगी किंवा धोती लागतेच पुरषांना त्यामुळे घेऊन जाणे इष्ट. अर्थात तिथे ही विकत मिळतेच. त्रिवेंद्रम शहर खूप कोझी वाटले त्रिवेंद्रम मधली दागिन्यांची दुकान पहाच पहा. खूपच हेवी जुवेलरी असते त्यांची. संध्याकाळी त्रिवेंद्रम पासुन जवळ असलेल्या प्रसिध्द बीच वर गेलो. नाव विसरले आता त्या बीचच
दिवस दुसरा : सकाळी आवरुन कन्याकुमारीला जायला निघालो. वाटेत पुवर बॅक वॉटर मध्ये जवळ जवळ दोन तास बोटींग केल. तो अनुभव छान होता. वेगळ आणि कधी न बघितलेले बघायला मिळालं. कन्याकुमारीला दुपारी पोचलो. माझी कन्याकुमारी गावाबद्दलची कल्पना आणि प्रत्यक्ष गाव यात जमीन अस्मानाच अंतर पडल. भयानक गर्दी, लोटालोटी, बकालपणा, विवेकानंद स्मारक पहाण्याच्या तिकाटासाठी लागलेली मारुतीच्या शेपटासारखी लाईन वैगेरे सगळ फार निरुत्साही करणार होतं. अर्थात हा माझा वैयक्तिक अनुभव आहे. त्यामुळे त्या दिवशी विवेकानंद स्मारक बघायचं कॅन्सल केल आणि सुर्यास्त आणि चंद्रोदय( त्या दिवशी पौर्णिमा होती) तीन समुद्रांचा संगम, कन्याकुमारी मंदिर इ. बघितल.
दिवस तिसरा: सकाळी सुर्योदय बघितला हॉटेलच्या खिडकीतुन. मुंबईकरांना समुद्रातला सूर्योदय नाही बघायला मिळत. ते छान वाटल. दुसर्या दिवशी ही विवेकानंद स्मारका साठी तेवढीच लाईन होती म्हणुन ते ड्रॉपच केलं तसं ही मी अति गर्दीच्या अनोळखी ठिकाणी जायचं सहसा टाळते. त्यामुळे सकाळी कुमारकोम ला जायला निघालो. आम्ही अलेप्पी इथे न रहाता कुमारकोम इथे रहिलो होतो. ते एक शांत गाव आहे आणि आजूबाजुला बॅक वॉटर आहे सगळीकडे. इथे तुम्ही हाउस बोट मध्ये ही राहु शकता पण आम्ही नव्हतो रहिलो.
दिवस चवथा : सकाळी थेक्कडीला जायला निघालो आणि साधारण बाराच्या सुमारास तिथे पोचलो . ते थंड हवेच ठिकाण आहे. दुपारी तिथली स्पाईस गार्डन बघितली. नंतर हत्तीच्या राईड वगेरे होत्या तिथे ही गेलो. लोकल शॉपिग केल.
दिवस पाचवा : सकाळी हॉटेल मध्ये केरळी ब्रेकफास्ट घेतला आणि पेरियार नदीतल्या फेरफटक्याला निघालो. छान वाटल. पण आम्हाला प्राणी नाही फार दिसले. दुपार तशी मोकळीच होती त्या वेळेत तुम्ही केरळी मसाज, किंवा कथकली नृत्याचा कार्यक्रम पहाणे वैगेरे करु शकता.
दिवस सहावा : सकाळी मुन्नार ला जायला निघालो. वाटेत चहाचे मळे खूप दिसले . खूप सुंदर दृश्य होते . दुपारी बाराच्या सुमारास मुन्नारला पोचलो . त्यादिवशी जवळपास फिरुन आरामच केला
दिवस सातवा : मुन्नार दर्शन ला सकाळी बाहेर पडलो. मुट्टापाटी धरण आणि टी म्युझियम वैगेरे बघुन दुपारी हॉटेल वर आलो . हॉटेल छान होत. आयुर काउंटी नावाच. पण फुड जस्ट ओके. मला वाटत त्यांनी वेज मेनू कडे विषेष लक्ष नव्हत दिलं ( स्मित) रिसोर्ट चा कँपस छान असल्यामुळे वेळ गेला चांगला
दिवस आठवा : सकाळी गुरुवायुर ला जायला निघालो. मुन्नार ते गुरुवायुर अंतर खूप नसले तरी रस्ते अरूंद आणि सततची मनुष्य्वस्ती. त्यामूळे केरळमध्ये कुठे ही वेग घेता येतच नाही गाडीला. आम्ही साधारण एक च्या सुमारास पोचलो तिथे पण दिड वाजता दुपारी देऊळ बंद झाल ते चार वाजता उघडण्यासाठी. जेवण, खरेदी वैगेरे टाइम पास केला मग. तिथे आम्हाला पहिल्यांदा केळीच्या पानावर केरळी जेवण मिळाले. नाहीतर हॉटेल मध्ये जनरली फक्त ब्रेकफास्ट केरळी आणि लंच , डिनर पंजाबी असा प्रकार आहे तिथे. गुरुवायुरच मंदिर फार सुंदर आहे. दर्शन घेईपर्यंत संध्याकाळ होतच आली होती म्हणून मग आणखी थोडा वेळ थांबून तेलाच्या दिव्यात प्रकाशलेले मंदिर बघितल आणि मग कोचीन ला यायला निघालो. तुम्ही पाहिजे तर एक दिवस मुकाम करा गुरुवायुरला . लक्ष लक्ष तेलाच्या दिव्यांच्या प्रकाशात उजळलेले मंदिर बघणे हा एक अविस्मरणीय अनुभव आहे फार सुंदर आहे ते. चुकवु नका. दुसर्या दिवशे लवकर उठुन कोचीनला येऊ शकता
दिवस नववा : दिवस भर कोचीन बघितले. मला हे शहर फार आवडले. अगदी मॉडर्न आहे तरी ही छान आहे. कोची फोर्ट मिस नका करु. तिथल्या लेन मधुन थोड तरी चालाच फार छान वाटत
संध्याकाळच्या विमानाने रात्रि मुंबईला परत.
एक रात्र त्रिवेंद्रम, एक रात्र कन्यकुमारी, एक रात्र कुमारकोम, दोन रात्री थेक्काडी, दोन रात्रि मुन्नार आणि एक रात्र कोचीन ---- ( नऊ दिवस आणि आठ रात्री)
हे काही फोटो
त्रिवेंद्रम म्युझियम
From mayboli
पाऊस खूप, झाडं ही खूप, त्यामुळे हे असं खूप बघायला मिळत
From mayboli
पद्मनाभ मन्दिराची गोपुरं
From mayboli
पुवर बॅक वॉटर
From mayboli
आणि शेवटी बीच
From mayboli
६)
From mayboli
७) कन्याकुमारी
From mayboli
८) हॉटेल मधील खास केरळी स्वागत
From mayboli
कथकली नृत्य
From mayboli
थेक्कडी स्पाइस गार्डन ...... कॉफी सीड्स
From mayboli
ह्या वाळत घातलेल्या
From mayboli
ही वेलचीची लागवड
From mayboli
आणि ह्या वेलच्या . खाऊन बघितली मी एक ,पण जराही वास नव्हता
From mayboli
चहाचे मळे
From mayboli
From mayboli
ही तिकडे पाहिलेली काही फुल
From mayboli
From mayboli
From mayboli
From mayboli
मुन्नारच हॉटेल
From mayboli
From mayboli
हाऊस बोट
From mayboli
मस्त फोटो! गुरूवायुरला ड्रेस
मस्त फोटो! गुरूवायुरला ड्रेस कोड लागला नाही का तुम्हाला? २००५ च्या सुमाराला तरी होता. बायकांना साडी आणि पुरूषांना धोती/लुंगी कंपल्सरी होती तिथे.
rmd, पुरषांना आहे धोती
rmd, पुरषांना आहे धोती कंपलसरी गुरुवायुरला पण बायकाना पंजाबी ड्रेस चालतो.
व्वा! ममो फोटो ंमस्त. पण
व्वा! ममो फोटो ंमस्त. पण वर्णन चाल्लं असतं की अजून तुझ्या शैलीत!
मस्त! मागच्या वर्षीच जाऊन
मस्त! मागच्या वर्षीच जाऊन आले. रम्य आहे केरळ! (अर्थात कोस्टल कर्नाटक आणि तळकोकण ही या बाबतीत तेव्हढेच छान आहे). कन्याकुमारीला जाऊन फक्त विवेकानंद स्मारक बघता आलं कारण खूप वेळ रांगेत थांबण्यात गेला. मला तरी ते टाळलं असतं आणि नुस्तं मनसोक्त समुद्रदर्शान आणि तिथला सुर्योदय आणि सूर्यास्त हे पाहिलं अस्तं तरी चाललं अस्त. जाताना आणि येताना रेल्वेनेच गेलो होतो. कोकण रेल्वे प्रवास मस्त झाला. पण परत येताना कन्याकुमारी एक्सप्रेस ने येऊन पस्तावलो. डब्यात अत्यंत अस्वछता. मेन स्टेशन्स वर सुद्धा गाडी अगदी २, २.५ मिनिटे थांबते; पण मधे मधे उगाचच खूप वेळ थांबते. येताना तामिळ्नाडू, केरळ, कर्नाटक, आंध्र , महाराष्ट्र अशी पूर्ण फिरून येते. प्रवास संपता संपत नाही आणि तो ही अतिशय कंटाळ्वाणा! कोणी प्लॅन करणार असेल तर उपयोगी पडेल म्ह्णून लिहितेय. कन्याकुमारी एक्स्प्रेस टाळता आली तर बरं.
हेमाताई, मस्त लिहिलं आहे.
हेमाताई, मस्त लिहिलं आहे. तुम्ही अगदी डिट्टेलात आयटिनररी दिलीत, आम्ही कधी जाऊ तेव्हा हीच रिफर करणार.
सुरेखच लिहिलंय... पुवर बॅक
सुरेखच लिहिलंय... पुवर बॅक वॉटरचा फोटो तर अप्रतिम आहे.
वाह! मस्त!
वाह! मस्त!
प्रतिसादाबद्दल सगळ्यांचे
प्रतिसादाबद्दल सगळ्यांचे मनापसुन आभार.
रावी अगदी करेक्ट आहे . केरळला जायला कोकण रेल्वेच बेस्ट आहे. कन्या कुमारीला जायला अगदी डायरेक्ट गाडी आहे पण ती खूपच वेळ घेते त्यापेक्षा को रे ने त्रिवेन्द्रम ला जायच आणि तिथुन मोटारीने कन्याकुमारी !
अगदी डिट्टेलात आयटिनररी दिलीत, >>> मंजूडी, ही आयटिनररी योग्य होते . कुठे ही घाई ही नाही आणि कंटाळा ही नाही.
इंद्रा, तुमच्या सारख्या दिग्गज फोटोग्राफरनी फोटोच कौतुक केल की लय भारी वाटत
मस्त वर्णन आणि फोटो . मी अजून
मस्त वर्णन आणि फोटो . मी अजून गेलेली नाहीये. जायचंय
बॅक वाटरच्या बोटीच्या
बॅक वाटरच्या बोटीच्या मुक्कामात डासांचा फार त्रास असतो हे खरे आहे काय? मी अलेप्पीला जाऊन कॅनालच्या कडेला उभे राहून उशीर झाल्याने परत कोचीला आलो. बोटींग करायचे नव्हतेच. पण किनार्यावरही सायंकाळी बरेच डास होते . पाणीही घाणेरडेच वाटले. शिवाय तिथे बोट वाल्यांच्या , बसवाल्यांच्या युनियनच्या मारामार्या भांडणेही असतात वाटते . प्रायवेत विरुद्ध सोसायट्या. मागे केसरीची की कुणाचे बस गेली होती तर यांचे पॅसेंजर नेण्यावरून टॅक्सीवाळ्यांच्या मारामार्या झाल्या होट्या म्हणए....
Pages