गॉड्स ओन कंट्री ..... अर्थात केरळ

Submitted by मनीमोहोर on 3 July, 2016 - 07:17

केरळची आमची सहल मीच स्वतः नेट वर बघुन वैगेरे प्लॅन केली होती. मला स्वतः प्लॅन करुन जायलाच आवडत . ते होम वर्क ही मी खुप एऩ्जॉय करते. माबोकराना ह्याचा उपयोग होईल अशी आशा करते.

दिवस पहिला : विमानाने मुंबई - त्रिवेंद्रम. सकाळचचं घेतल होत विमान. विमानाने गेल्यामुळे थकवा नाही जाणवला प्रवासाचा . त्रिवेंद्रम ते कोचिन अशी एअर पोर्ट टु एअर पोर्ट गाडी बुक केली होती. त्रिवेंद्रम विमानतळ तसा जवळच आहे शहरापसून. अकराच्या सुमारास पोचलो हॉटेल ( ऑफिसच गेस्ट हाऊस) वर . जरा आराम करुन शहर बघायला बाहेर पडलो. पद्म्नाभ मन्दिर , एक राजवाडा, राजा रविवर्मा चित्र गॅलरी वैगेरे बघितल. पद्म्नाभ मंदिरात लुंगी किंवा धोती लागतेच पुरषांना त्यामुळे घेऊन जाणे इष्ट. अर्थात तिथे ही विकत मिळतेच. त्रिवेंद्रम शहर खूप कोझी वाटले त्रिवेंद्रम मधली दागिन्यांची दुकान पहाच पहा. खूपच हेवी जुवेलरी असते त्यांची. संध्याकाळी त्रिवेंद्रम पासुन जवळ असलेल्या प्रसिध्द बीच वर गेलो. नाव विसरले आता त्या बीचच

दिवस दुसरा : सकाळी आवरुन कन्याकुमारीला जायला निघालो. वाटेत पुवर बॅक वॉटर मध्ये जवळ जवळ दोन तास बोटींग केल. तो अनुभव छान होता. वेगळ आणि कधी न बघितलेले बघायला मिळालं. कन्याकुमारीला दुपारी पोचलो. माझी कन्याकुमारी गावाबद्दलची कल्पना आणि प्रत्यक्ष गाव यात जमीन अस्मानाच अंतर पडल. भयानक गर्दी, लोटालोटी, बकालपणा, विवेकानंद स्मारक पहाण्याच्या तिकाटासाठी लागलेली मारुतीच्या शेपटासारखी लाईन वैगेरे सगळ फार निरुत्साही करणार होतं. अर्थात हा माझा वैयक्तिक अनुभव आहे. त्यामुळे त्या दिवशी विवेकानंद स्मारक बघायचं कॅन्सल केल आणि सुर्यास्त आणि चंद्रोदय( त्या दिवशी पौर्णिमा होती) तीन समुद्रांचा संगम, कन्याकुमारी मंदिर इ. बघितल.

दिवस तिसरा: सकाळी सुर्योदय बघितला हॉटेलच्या खिडकीतुन. मुंबईकरांना समुद्रातला सूर्योदय नाही बघायला मिळत. ते छान वाटल. दुसर्‍या दिवशी ही विवेकानंद स्मारका साठी तेवढीच लाईन होती म्हणुन ते ड्रॉपच केलं तसं ही मी अति गर्दीच्या अनोळखी ठिकाणी जायचं सहसा टाळते. त्यामुळे सकाळी कुमारकोम ला जायला निघालो. आम्ही अलेप्पी इथे न रहाता कुमारकोम इथे रहिलो होतो. ते एक शांत गाव आहे आणि आजूबाजुला बॅक वॉटर आहे सगळीकडे. इथे तुम्ही हाउस बोट मध्ये ही राहु शकता पण आम्ही नव्हतो रहिलो.

दिवस चवथा : सकाळी थेक्कडीला जायला निघालो आणि साधारण बाराच्या सुमारास तिथे पोचलो . ते थंड हवेच ठिकाण आहे. दुपारी तिथली स्पाईस गार्डन बघितली. नंतर हत्तीच्या राईड वगेरे होत्या तिथे ही गेलो. लोकल शॉपिग केल.

दिवस पाचवा : सकाळी हॉटेल मध्ये केरळी ब्रेकफास्ट घेतला आणि पेरियार नदीतल्या फेरफटक्याला निघालो. छान वाटल. पण आम्हाला प्राणी नाही फार दिसले. दुपार तशी मोकळीच होती त्या वेळेत तुम्ही केरळी मसाज, किंवा कथकली नृत्याचा कार्यक्रम पहाणे वैगेरे करु शकता.

दिवस सहावा : सकाळी मुन्नार ला जायला निघालो. वाटेत चहाचे मळे खूप दिसले . खूप सुंदर दृश्य होते . दुपारी बाराच्या सुमारास मुन्नारला पोचलो . त्यादिवशी जवळपास फिरुन आरामच केला

दिवस सातवा : मुन्नार दर्शन ला सकाळी बाहेर पडलो. मुट्टापाटी धरण आणि टी म्युझियम वैगेरे बघुन दुपारी हॉटेल वर आलो . हॉटेल छान होत. आयुर काउंटी नावाच. पण फुड जस्ट ओके. मला वाटत त्यांनी वेज मेनू कडे विषेष लक्ष नव्हत दिलं ( स्मित) रिसोर्ट चा कँपस छान असल्यामुळे वेळ गेला चांगला

दिवस आठवा : सकाळी गुरुवायुर ला जायला निघालो. मुन्नार ते गुरुवायुर अंतर खूप नसले तरी रस्ते अरूंद आणि सततची मनुष्य्वस्ती. त्यामूळे केरळमध्ये कुठे ही वेग घेता येतच नाही गाडीला. आम्ही साधारण एक च्या सुमारास पोचलो तिथे पण दिड वाजता दुपारी देऊळ बंद झाल ते चार वाजता उघडण्यासाठी. जेवण, खरेदी वैगेरे टाइम पास केला मग. तिथे आम्हाला पहिल्यांदा केळीच्या पानावर केरळी जेवण मिळाले. नाहीतर हॉटेल मध्ये जनरली फक्त ब्रेकफास्ट केरळी आणि लंच , डिनर पंजाबी असा प्रकार आहे तिथे. गुरुवायुरच मंदिर फार सुंदर आहे. दर्शन घेईपर्यंत संध्याकाळ होतच आली होती म्हणून मग आणखी थोडा वेळ थांबून तेलाच्या दिव्यात प्रकाशलेले मंदिर बघितल आणि मग कोचीन ला यायला निघालो. तुम्ही पाहिजे तर एक दिवस मुकाम करा गुरुवायुरला . लक्ष लक्ष तेलाच्या दिव्यांच्या प्रकाशात उजळलेले मंदिर बघणे हा एक अविस्मरणीय अनुभव आहे फार सुंदर आहे ते. चुकवु नका. दुसर्‍या दिवशे लवकर उठुन कोचीनला येऊ शकता

दिवस नववा : दिवस भर कोचीन बघितले. मला हे शहर फार आवडले. अगदी मॉडर्न आहे तरी ही छान आहे. कोची फोर्ट मिस नका करु. तिथल्या लेन मधुन थोड तरी चालाच फार छान वाटत

संध्याकाळच्या विमानाने रात्रि मुंबईला परत.

एक रात्र त्रिवेंद्रम, एक रात्र कन्यकुमारी, एक रात्र कुमारकोम, दोन रात्री थेक्काडी, दोन रात्रि मुन्नार आणि एक रात्र कोचीन ---- ( नऊ दिवस आणि आठ रात्री)

हे काही फोटो

त्रिवेंद्रम म्युझियम

From mayboli

पाऊस खूप, झाडं ही खूप, त्यामुळे हे असं खूप बघायला मिळत

From mayboli

पद्मनाभ मन्दिराची गोपुरं

From mayboli

पुवर बॅक वॉटर

From mayboli

आणि शेवटी बीच

From mayboli

६)

From mayboli

७) कन्याकुमारी

From mayboli

८) हॉटेल मधील खास केरळी स्वागत

From mayboli

कथकली नृत्य

From mayboli

थेक्कडी स्पाइस गार्डन ...... कॉफी सीड्स

From mayboli

ह्या वाळत घातलेल्या

From mayboli

ही वेलचीची लागवड

From mayboli

आणि ह्या वेलच्या . खाऊन बघितली मी एक ,पण जराही वास नव्हता

From mayboli

चहाचे मळे

From mayboli

From mayboli

ही तिकडे पाहिलेली काही फुल

From mayboli

From mayboli

From mayboli

From mayboli

मुन्नारच हॉटेल

From mayboli

From mayboli

हाऊस बोट

From mayboli

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अर्रे व्वा..... मस्तं आखलीयेस ट्रिप.. खूप सुंदर आलेत फोटोज..
केरळ कधीपासून विशलिस्ट वर आहे.......... तुला संपर्क करीनच कधी जायचा योग आला तर..

मनीमोहोर, मस्त आहेत फोटोज. स्वतः प्लॅन करुन ट्रिप केलीत हे वाचूनही छान वाटलं.
बीचेस किती स्वच्छ आहेत. चहाचे मळे, बॅकवॉटरचे फोटो सुंदर. मुन्नरच्या हॉटेलमधून दिसणारा व्ह्यू आवडला.

तुम्ही कुठल्या सीझनमध्ये गेला होतात. केरळला आठ महिने पाऊस असतो ना ?

मस्त !
गर्दीची जागा टाळलीत हे चांगले केलेत.

केरळ आम्हा दोघांचेही फेव्हरेट आहे. तिथे कधीही न जाता फेव्हरेट आहे हे विशेष. पण जाणे होईलच हे नक्की.

मस्त झाली तुमची ट्रीप. Happy आणि फोटो पण एकदम मस्त.
कुठल्या हॉटेल्स मधे रहिला होता आणि अनुभव कसा होता, त्याची माहिती द्याल का? धन्यवाद.

छान फोटो. मला अजून जमलेले नाही. केरळ मध्ये पर्यटन जाणीवपूर्वक विकसित केलेले आहे, पण त्यामुळेच फार गर्दी आहे. अनोळखी ठिकाणे असणारच तिथेही.
भाषेचा प्रश्न नाही आला का ?

अरे अजून आले फोटोज, मस्तं छान छान फुलं.. डान्सिंग गर्ल्स फ्लॉवर्स पण आहेत..
होटेल आणी इतर व्ह्यूज फारच देखणे आहेत..
भाषेचा प्रश्न कदाचित येणार नाही.. इंग्लिश चालतं का तिकडे??
आता केरळी cuisine बद्दलही सांग काही... त्यांचे stew खूप टेस्टी असतात.. वेज आणी नॉन वेज दोन्ही ..
बरोबर अप्पम.. Happy

धन्यवाद सर्वाना .

अगो हो, मुन्नार हॉटेल खूप छान होत. रुमच्या बाहेर नजरेच्या टप्यात मनुष्य वस्तीच नाव नव्हत त्यामुळे रात्री समोर मस्त कळोख. . आम्ही झोपल्यावर रात्री गॅलरीच्या दारावर धडके देतय कोणीतरी असा आवाज यायला लागला. आम्ही घाबरलो म्हणजे आम्हाला हत्ती धडका देत आहेत असं वाटल पण तसेच झोपुन राहिलो. दुसर्‍या दिवशी कळल हत्ती वैगेरे कोणी नव्हत. जोरात वहाणार्‍या वार्‍यामूळे तस वाटल आम्हाला ( स्मित)

रच्याकने, मी गिरला गेले होते तेव्हा ही मला हॉटेलच्या खोलीवर सिंहाच्या डरकाळ्यांचा सारखा भास होत होता प्रत्यक्षात एक ही नाही ऐकु आली. ( स्मित)

आम्ही जानेवारी महिन्यात गेलो होतो पाऊस नाही मिळाला जरा ही

दिनेश वर्षु तिथे इंग्लिश आणि हिंदी दोन्ही येत कामचलाऊ सगळ्यांना

केरळ मध्ये पर्यटन जाणीवपूर्वक विकसित केलेले आहे, पण त्यामुळेच फार गर्दी आहे >>> हो बरोबर आहे दिनेश.

ऋन्मेष, केरळला तरुण मुल मुली खुप दिसली. हनीमूनर्स फेवरेट बहुतेक. मी मुनारला त्या डॅम च्या इथे टाइम पास करत होते तर एक मुलगा आला माझ्या जवळ आणि म्हणाला काकू ओळख्लत का? मी बुचकळ्यात पडले कारण नव्ह्त ओळखल त्याला . मग तोच म्हणाला आम्ही एकच विमानात होतो तो केसरी बरोबर हनीमूनला आला होता आणि मुंबई विमान तळावर विमानाच्या बॅक ग्राउंडवर मी त्या दोघांचा एक फोटो काढुन दिला होता.

जिप्सी, तु जेव्हा फोटो छान आलेत असं म्हणतोस तेव्हा काय वाटत काय सांगु ?

चांगलेत फोटो.
विवेकानंदला सुट्ट्या नसल्या की नसते गर्दी फारशी.पद्मनाभपुरमचा राजवाडा राहिलाच.पोनमुडीला गर्दी नसते.तो बीच शंखुमुगम एरपोर्टला लागूनच आहे॥तिशुरच्या वडक्कुनाथन प्रचंड देवळात पंचविसेक लोकच असतात.

छान लेख आणि फोटोही मस्त! त्रिवेंद्रमजवळचा बीच कोवालम ना?
आम्ही एकदा कोचीन- मुन्नार- ठेक्कडी-कुमारकोम-अलेप्पी (हाऊसबोटीत मुक्काम)- त्रिवेंद्रम- कन्याकुमारी अशी ८ दिवसांची सहल केली, तर दुसर्या वेळी ठेक्कडी-मुन्नार स्किप करून ( कारण सोबत लहान मुलं होती आणि कमी दिवस हाताशी होते) ४ दिवसांची सहल केली. दोन्ही वेळी ऑफ सीझनला गेलो त्यामुळे गर्दीचा त्रास झाला नाही. तुम्ही कन्याकुमारी मिस केलंत मात्र Sad फार छान वाटतं विवेकानंद स्मारकावर गेल्यावर. दक्षिणेकडे तोंड करून उभं राहिलं की संपूर्ण भारत आपल्या मागे उभा अाहे असा फील येतो. तसं तर अगदी दिवेआगरच्या किनार्यावरही ते खरं असतं पण तो फील येत नाही Happy
जेवणं आम्हाला हाऊसबोटीतलं सर्वात जास्त आवडलं.

हेमाताई, मस्त प्लॅन अहे ट्रीपचा.

सगळीकडे कुठल्या हॉटेलेवर राहीलात आणि त्याबद्दलचा तुमचा अनिभव पण सांगा. आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे transportation कसे अरेंज केले ते पण लिहा.

ममो, वर्णन ..... फारच आखडता हात घेतलाय Happy फोटो सुंदर ! दोनदा कन्याकुमारीला जाणं झालं पण केरळ पहायच राहून जातं....

मस्तच फोटो आणि वर्णनही, पण हात आखडता घेतलाय असे मलाही वाटलं : )
मलापण केरळ्ला जायची फार इच्छा आहे.
जमल्यास किती खर्च आला , कोणत्या वेबसाइट रेफरन्स म्हणून वापरल्यात ते लिहा +१११११

मस्त फोटो. छान झाली तुमची ट्रीप. आम्ही पण नेहमी स्वतः च ठरवतो ट्रीप म्हणजे आखतो. आणि मलाही हे सगळं करायला खूप आवडतं. आम्ही केरळचा थोडाच भाग बघितलाय. आम्ही २००१ मधे कोडाइकनाल केले होते तेव्हा त्यात त्रिवेंद्रम आणि कन्याकुमारी पण केले होते. जर रहाण्याचा पर्याय साधी व्यवस्था चालणार असेल तर कन्याकुमारीचे विवेकानंद केंद्र चांगला पर्याय आहे. परिसर तर खूप छान आहे. आम्ही तिथेच राहून त्रिवेंद्रम आणि कन्याकुमारी स्थलदर्शन केले होते.

आहाहा हेमाताई खुप सुंदर.

वेलचीच रोप पहिल्यांदा पाहील.

मस्त लेख! माझी ट्रिप आठवली.
आम्हि गेलेलो तेव्हा सुद्धा खुप गर्दी होती, काळे कपडे, काळे केस, दाढी वाढवलेले तरुण सगळीकडे फिरत होते. भितीदायक वाटते. ते म्हणे गुरुवायुर तीर्थयात्री आहेत. त्या काळात काही विशिष्ट तिर्थे करुन मग शेवटी गुरुवायुरची भेट. पण त्याकाळात जवळजवळ सर्व पर्यटनस्थळी त्यांची गर्दी असते. पुढल्या वेळेस गेलो तर संक्रांत झाल्यावर (गुरुवायुर तीर्थयात्रा काल संपल्यावर) जाण्याचा इरादा आहे.

मनीमोहोर, मस्तच! Happy

आम्हीही अलीकडेच जाऊन आलो. फार सुंदर आहे केरळ! जिकडे पाहावे तिकडे निसर्गाची उधळण बघून आनंदाच्या उकळ्या फुटतात.
मुन्नरवरून एका फनफॉरेस्टला गेलो होतो तेंव्हा तो रस्ता गच्च जंगलातून नागमोडीने खोल खोल उतरत जातो ते भारी आहे. एक मुक्काम वॉटरबोटमध्ये.

त्रिवेंद्रम आणि तो भाग राहिला फिरायचा.

जाताना झुकुझुकु आगीन गाडीने गेलो.होतो. Happy
zukuzuku.JPG

मनीमोहोर छान फोटो. ट्रीपचे प्लॅनिंग एकदम झकास दिसतेय. स्वतःच प्लॅन केल्यामुळे गर्दीचे ठिकाण टाळणे वगैरे करता आले.

मी गेले नाही अजुन केरळला, पण असं ऐकलंय की मुन्नार खेरीज इतर सर्व ठिकाणी प्रचंड गरम होत असतं, हे खरं आहे का?

शक्य असल्यास तेलाच्या दिव्यांच्या उजेडात उजळलेल्या मंदिराचा फोटोही द्या ना इथे.

vt220 ,ते काळे कपडेवाले सबरिमलै ( केरळातले कोटायमजवळ ) यात्रावाले असतात. १ ते २५ जानेवारी तामिळनाडूत पोंगलची ( संक्रातीची) मोठी सुट्टी असते त्यामुळे कन्याकुमारीला गर्दी असते.२५नंतर फेब्रु शेवट उत्तम काळ.

आभार सर्वांचे परत एकदा. सर्वांचे प्रतिसाद किती छान आहेत.

तस तर एक साईट सांगण कठिण आहे जाई , कारण मी खूप सर्फ करते कुठे काय महिती मिळतेय ते पहाण्यासाठी.

त्रिवेन्द्रम विमानतळ ते कोचीन विमानतळ अशी गाडी बुक केली होती. पब्लिक ट्रांसपोर्ट ने इतक्या कमी दिवसात इतक फिरण अशक्य आहे.

या वेळेस मी ऑफिसच्या गेस्ट हऊस मध्ये रहिले होते खूप ठिकाणी त्यामुळे खर्चाचा अंदाज देणे योग्य होणार नाही. परंतु मी इतर ट्रिपच्या अनुभवावरुन सांगते की केसरी पेक्षा निम्म्या खर्चात आणि दुप्प्ट आनंदात होते ट्रिप

वावे, मंजूताई, हो.... मला ही विवेकानंद स्मारक पहायचे होते पण शक्यच नव्हते गर्दीमुळे. येस, कोवलम बीचच त्रिवेंद्रमचा. आभार वावे.

vt220 , करेक्ट , तो २५ जानेवारीच्या आसपासचा काळ होता तुम्ही म्हणताय तस. त्यामुळे असेल गर्दी खूप कदाचित.

गजानन, मस्त आलाय फोटो. ग्रुप असेल मोठा तर ट्रेन ने खूप मजा येते पण या वेळेस कंपनी नव्हती म्हणून आम्ही विमानाने गेलो.

आशिका, गुरुवायुरच्या मंदिरात कॅमेरा अलाऊड नाहिये. नेट वर आहे एखाद दुसरा फोटो. पण फोटोतुन एक टक्क्का ही कल्प्ना नाही येत आहे. देवळाच्या सगळ्या भिंतींवर बाहेरच्या बाजूने , भल्या मोठ्या दीपमाळांवर पितळेच्या पट्ट्या मारुन त्यात पितळी दिवे फिक्स केले आहेत. दुपारी तीन वाजल्या पासुन त्यात तेल वात घालणे सुरु असते. आणि अंधार पडायला लागला की मशालीने दिवे लावायला सुरवात होते. दिवे लावण्यासाठी भक्त गण धडपडत असतात कारण आपण हे दिवे उजळले तर आपली पापं जळून जातील अशी श्रद्धा आहे भाविकांची. तसेच मंदिराच्या प्रांगणात एका भल्या मोठ्या घंगाळात गुंजा ठेवलेल्या असतात . श्रीकृष्ण लहानपणी गुंजा खेळत असे म्हणून प्रत्येक जण त्यात हात फिरवून गुंजा खेळतो आणि प्रौढत्वात ही शैशवाला जपण्याचा प्रयन करतो .
आम्ही जानेवारी महिन्यात गेलो होतो तेव्हा वातावरण छान होतं सगळ्या केरळ मध्ये

Pages