कुछ रंग प्यार के ऐसे भी - सोनी वाहिनीवरची नवीन मालीका

Submitted by मिरची on 29 June, 2016 - 03:38

कुछ रंग प्यार के ऐसे भी सोनी वाहिनीवरची ९.३० वाजता प्रक्षेपित होणार्‍या मालिकेविषयी चर्चा करण्यासाठी हा धागा. कोण कोण बघतं हि मालिका? कशी वाटतेय?

नायक-नायिका आणि सर्वच कलाकार अतिशय उत्तम करत आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे फारशी वास्तवापासून दूर न जाता ही मालिका सादर केली आहे...अजूनतरी....

सहज सुंदर अभिनय व संवाद या मालीकेची बलस्थानं वाटतात...

कलाकार - शहीर शेख, एरिका फर्नांडीस, सुप्रिया पिळ्गावकर

krp.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

काही गोष्टी पटत नाहीत, पण त्या कुठेल्या मालिकेतल्या पटतात? फिदीफिदी >> हो ना...पण कलाकार चांगले आहेत...आणि सध्याच्या मालिका दुश्काळात ही मालिका बरी वाट्ते आहे.... Happy

प्रेमात पडल्यापासुन फारच लाडिक बोलते ती शोना. आधी थोडी सेंन्सिबल वागायची.

सुप्रिया, मस्त काम करते.

मी बघते अधुन मधुन पण सुप्रियासाठी..ह्या director ची चॅनल व्ही वरची सिरीयल मला जाम आवडली होती म्हणुन ही पण पहायला सुरूवात केली.

प्रेमात पडल्यापासुन फारच लाडिक बोलते ती शोना. आधी थोडी सेंन्सिबल वागायची... +१

प्रेमात पडल्यापासुन फारच लाडिक बोलते ती शोना. आधी थोडी सेंन्सिबल वागायची.>>> मी त्यांचे प्रेम जमण्याचा आधी बघत होते. गेले २-३ आठवडे नाही बघितली.

हिरो-हिरॉईन दोघेही आवडतात. जनरली सगळेच जण चांगले काम करतात.

हो ती जाम क्युट आहे पण.
तिच ते ओभद्रो (की असच काहिच) म्हणजे खडुस हे फार म्हणजे फारच आवडत मला.
ती चिडली रागावली की बेंगॉलीत बोलते ते पण मस्तच.

माणूस भावना मातृभाषेतुन व्यक्त करतो हे फार छान दाखवलय त्यांनी.

हिरो-हिरॉईन दोघेही आवडतात. जनरली सगळेच जण चांगले काम करतात.>>>> +१११

मी काहे .....बघत होते काही दिवस...पण कुछ रंग ....पहायला सुरु केल्यापासून काहे नाही पाह्वत.:D ...काही गोष्टी खट्कल्यातरी अभिनय तरी उत्तम करतात ही कुछ रंगवाली सर्व मंडळी....

मि. ओबोड्रो...जे काही ती म्हणते ते फारचं गोड म्हणते....सध्याचे प्रसंग तर चांगले सुरु आहेत....दिवस संपताना काहीतरी romantic बघून झोपणे बरे आहे....

नवीन रंग लवकरचं पहायला मिळणार असं दिसतयं....आईला हळू ह्ळू संशय येऊ लागला आहे...देव-सोनाचे भांडे काही दिवसात फुटेल बहुतेक...

काल बघितली, मागे एका मैत्रिणीने सांगितलं तेव्हापण एक शॉट बघितला होता. त्या वेळेला काहीना काही कामे असतात त्यामुळे नीट बघता येत नाही.

आज ती आई त्याने दिलेली साडी नेसणार नाही बहुतेक.

मी पण हल्लीच सुरू केली आहे...सुप्रिया साठीच मी पण बघते...
प्रेमात पडल्यापासुन फारच लाडिक बोलते ती शोना> +१
हो...जरा खटकले...पण दोघेही फार क्युट आहेत...:)

हो ना....शोना फारचं बदलली आहे...प्रेमात पडल्यापासून ....आपल्या गवरीला शोनाकडे ट्रेनींगला पाठवलं पाहीजे... Wink Lol

खरोखर, दोनही मालिका एकाच ट्रॅकवर आहेत सध्या पण केवढा फरक आहे दोन्हिच्या प्रेझेंटेशनमधे. Uhoh
यातलं कास्टिंग फारच भारी आहे.

शोना प्रेमात पडल्यावर बदलली Proud असू दे की प्रेमात पडलेली माणसं बावळटपणाच करत अस्त्येत Lol बरोब्बर दाखवतोय दिगदर्शक एकदम.आता पुढे जाऊन टिपिकल सास-बहू सिरिअल होणार नाही अशी अपेक्षा करावी का Uhoh

थंडाक्का Lol Lol हो गं....आधी होप्स होत्या मला थंडाक्का कडून त्यामुळे तुलना होते मनात....

मी सध्या जुने भाग बघतेय कुछ रंगचे...मज्जा येतेय.... Happy

बुत थे फच्त इस व्हतेवेर शे दो इत सुइत्स हेर>>>> ??? मला नाही कळलं

जुन्या भागात सोनाक्षी मस्त दिसलिये आणि मिस्टर दिक्षित पण.
फक्त ते मामी आणि तिचा तो कामचोर मुलगा फार इरिटेटिंग आहेत

Lol Lol ....हो...फारंच गोड आहेत ते दोघे....:) अजून एक....यांच स्वतःचं मस्त गाणं आहे...उगाचं फिल्मी आणि उसनी गाणी वापरत नाहीत बाकी मालिकांसारखी...

मामी खूपच निगेटीव्ह दाखवली आहे...इतकं नसतं कोणी....पण बाकी सगळ्या गोड गोश्टींकडे बघून मी माफ करते त्यांना.... Wink

अजुन ह्या दोघांच अफेअर कळायचच आहे का घरी? मग खरी सुरूवात तर अजुन व्हायची आहे...
मला वाट्लं हे कारण सांगुनच हीरोने लग्न मोडलं.. मधले बरेच एपी मिसले मी बोअर व्हायला लागलं म्हणुन..

मला त्या मामीपेक्षा हीरोच्या बहीणींचा पार्ट बोअर होतो..त्यांना का घेतलयं? फक्त आई-मुलाच प्रेम हायलाईट करायला?

हम्म्म, नाहीच नेसलीना.

लग्न झाल्यावर नेहेमीसारखी टिपिकल सास-बहु ड्रामा होईल बहुतेक, मामेसासू पण आहेच आगीत तेल ओतायला.

मुळात लग्न होणार की नाही कुणास ठाऊक....प्रोमोप्रमाणे जर मालीका पुढे गेली तर लग्न होणार नाही पण देवाक्षीच नातं सुरू राहील...वेगळेपण जपावं.... मालीका टीपिकल होवू नये....

फक्त कानातलेच नाही तर तिचे ड्रेस, हेअरस्टाइल्स पण मला खूप आवड्तात...

देव पण प्रेमात पड्ल्यापासून खुपच वेड्यासारखा वागतो आहे....लाडिक आवाजात बोलणे, कामाकडे दुर्लक्श, सोना म्ह्णेल ते करणे....(कालचा एपिसोड)...:) :D....त्यामुळे एकट्या सोनाला काही म्हणण्यात अर्थ नाही Wink

सुप्रिया पण मस्तचं करत आहे काम....जेलस आईच्या भावना खुप छान दा़खवते आहे ती....तिला मुलाबद्द्ल खुप अभिमान आणि विश्वास आहे...पण अजुन देवने तिला काही सांगीतले नाहीये सो जेव्हा तिला कळेल तेव्हा, ती मुलगी शोना आहे यापेक्शा देवने सांगीतले नाही या विचाराने ती जास्त विरोध करेल असे वाट्ते....त्यात मामीमुळे आगीत तेल ओतले जाईल....मधली बहीण (रिया बहुतेक) थोडि सेन्सिबल वाट्ते....

Pages