सुयुध्द त्रिनेत्री आणि एक भयानक गुहा.
सुयुध्द त्रिनेत्री आणि एक भयानक गुहा. भाग- 2
सुयुध्द त्रिनेत्री आणि एक भयानक गुहा. भाग- 3
ह्या मागील तिन्ही भागात आपल्याला सुयुध्द त्रिनेत्री व त्याच्या भुतकाळाची माहिती कळाली. हे तिन्ही भाग मिळुन कथेचा पहिला चॅप्टर 'शोध' पुर्ण झाला आहे. मागील भाग- 3 मध्ये आजोबांनी सुयुध्दला त्यांच्या घराण्याचा खरा इतिहास सांगितला पण सर्वकाही सांगायच्या आत. त्यांच्या घरात दैत्य घुसले. काया ती पहिली व्यक्ती होती जी त्यांना दाराच्या फटीतून पाहते व प्रचंड घाबरते. तिला घाबरलेले पाहुन चिरंतर तिला विचारतो.
एका साधारण मुलाच्या आयुष्यात आता असाधारण वळण येणार होत. भाग- 4 ची सुरुवात होत आहे.
चॅप्टर दुसरा
'रक्षण'
चिरंतर कायाला विचारतो. ' काय गं काय झाल? सांग तरी कोण आहे बाहेर? '
घाबरलेला चेहरा, डोळ्यांत भिती पण कशीबशी हिम्मत करुन ती दबक्या आवाजात बोलते.
' बाहेर दैत्य आहेत. कसे काय पोहचले ते इथे ? आता काय होणार आपलं? ते मारुन टाकतील आपल्याला. हत्यारं आहेत त्यांच्याकडे. '
हे ऐकताच चिरंतर पेटीकडे वळ्तो. पेटी उघडून आत ठेवलेली एक छोटी एक फुटाची काठी बाहेर काढतो. काठी हातात घेऊन सर्वप्रथम तिला नमन करतो व काहीसा पुटपुटतो. एका क्षणात ती काठी 6 फुट मोठी होते. हे बघुन काया चकित होते. पण ती काही विचारण्याच्या मन:स्थितीत नसते. चिरंतर दरवाजा जवळ जाऊन उभा राहतो. आजोबा आज्जी मात्र आपाल्या नातवा जवळ जाऊन बसतात. तशी काया उठून चिरंतर जवळ जाते. त्याचा हात धरुन ती म्हणते .
' काय करताय तुम्ही? नका जाऊ बाहेर. ते तुम्हाला मारुन टाकतील. ' तिच्या बोलण्यात भिती स्पष्ट दिसत होती.
चिरंतरला काहिच भिती वाटत नसल्यानं तो धीर देत तिला बोलतो.
' घाबरु नकोस. हे बघ दरवाजा हळुच उघडुन मला सांग बाहेर किती जणं आहेत.'
कायाला कळतच नसते कि इतकी भयान स्थिती असताना त्याला बाहेर का जायचेय. ती बोलुन त्याला समजवायचा प्रयत्न्ं करते.
' अहो ऐका ना. प्लिज नका ना जाऊ बाहेर. तुम्ही कसे लढणार त्यांच्या बरोबर तुम्हाला तर दिसत नाही.'
तीचे बोलणे तो ऐकुन न ऐकल्या सारखे करतो. तो आता गंभीरपणे विचार करत होता. कायाला कळत नव्हते कि तो कसे लढणार होता. चिरंतर हात जोडुन भगवान शंकराचे स्मरण करत असतो. ती आपल्या सासऱ्याकडे व सासुकडे घाबऱ्या नजरेने बघते. सासु तिला मान हालवुन इशारा करते. अशा परिस्थितीत सासु निश्चिंत वाटत असल्याने हिला ही धीर येतो. ती चिरंतर ने सांगितल्या प्रमाणे दाराजवळ जाते. अलगद आवाज न करता ती दार उघडुन बाहेर पाहते व चिरंतर जवळ जाऊन बोलते.
' चार जणं दिसतायेत बाहेर'
' ठिक आहे. तू आई बाबांजवळ थांब. मी बघतो काय करायचं ते.'
एवढ बोलुन चिरंतर दार उघडुन बाहेर जातो. त्याच्या हातात काठी असते. काया मात्र दाराच्या मागे भिंतीला पाठ लावुन थांबते. चिरंतरला बाहेर येताना बघुन चारही दैत्य जोरात हसु लागतात. तो दृष्टिहीन आहे हे दैत्यांना आधीच माहिती असावं म्हणुन जवळच्या हसत उभ्या दैत्याने त्याच्यावर लगेच हल्ला केला. काया दाराच्या फटितुन हे सर्व पाहत असते. हल्ला होताना पाहुन पटकन एक विचार तिचा मनात येतो. (जर का चिरंतरला काही झाल तर त्यांच सर्वांच काय होणार?) ती पटकन डोळे मिटते. हल्ला होताच चिरंतर अगदी सहजतेने तो वार चुकवतो व काठीने दैत्याच्या हातातली तलवार खाली पाडतो. दैत्याला कळतच नाही काय झाल. चिरंतर अशा वेगाने त्याला काठीने मारा करत दुर फेकतो कि दैत्य भिंतीला जाऊन आपटतो. गुरु विश्वेश्वर हे सर्व घडताना दिव्यदृष्टिने पाहत असतात. त्यांच्या बाजुला उभ्या चैतन्यला ते लगेच तिथे जाण्यास सांगतात. चिरंतर खरचं दैत्यांशी लढु शकेल का? अस कायाला क्षणभर वाटल. ती डोळे उघडुन पुन्हा पाहु लागते.
काया दाराच्या कोपऱ्याहुन स्वतःच्या नवऱ्याला आज पहिल्यांदाच लढताना पाहत होती. दुर फेकला गेलेला दैत्य आता रागातच उठला. त्याने जवळ असलेलं टेबल एका हातात उचललं अन धाडकन खाली आपटलं. टेबलाचे अक्षरश: तुकडे तुकडे झाले. तो रागात घुरघुरत चिरंतरकडे बघु लागला. हसनारे दैत्य आता शांत झाले होते. सगळ्यांनी एकमेकांना नजरा नजर केली. सगळे एकदमच चिरंतरवर हल्ला करणार इतक्यात हॉलमध्ये प्रकाश पडू लागला. काया पाहते तर एक तरुण चिरंतरच्या पुढ्यात उभा असतो हातात काठी ज्याला घुंगरू बांधल्यात.. तो सोनेरी प्रकाश त्याच्यापासुनच येत असतो. दैत्यांसमोर हा तरुण अगदिच लहान वाटत होता. प्रकाशात तिला प्रथमच दैत्यांचे चेहरे दिसतात. जवळच उभ्या एकाला ती पाहते. लालबुंद डोळे ज्यात क्रुर भयानकता होती. दातांच्या जागी टोकदार सुळे, डोक्यावर शिंग, काळाकुट्ट ओबडधोबड चेहरा, अंगाला केसाचे आच्छादन ज्याचा उग्र वास घरभर पसरला होता. बघताच तिच्या अंगावर भितीचे शहारे वाहिले. तिने आता आपली नजर तरुणाकडे वळवली. त्याच्या चेहरा तेजोमय होता. तिला अचानक आलेल्या ह्या तरुणाबद्दल खुप प्रश्न पडु लागले होते. हा कोण? अचानक कसा इथे आला? वैगरे वैगरे. अचानक दैत्यांनी त्या तरुणावर व चिरंतर वर हमला केला. एका झटक्यात त्या तरुणाने एका दैत्याला काठीचा वार करत राख केले. हे पाहताच बाकि हल्लेकर्ते मागे सरकले. नजिकच्या खिडकीतुन एक दैत्य आत पाहत होता त्याने हातातला भाला चिरंतरच्या दिशेने फेकला. तरुणाने हे पाहिले आणि लगेच काठीने तो भाला त्याच्या दुसऱ्या बाजुस उभ्या दैत्यावर फेकला. भाला आरपार झाला तसा दैत्य खाली कोसळला. हे पाहताच दुसरा दैत्य घाबरुन अजुन मागे सरकला. बाहेरच्या दैत्याने एक वेगळ्याच आकाराचे शस्त्र चिरंतरच्या दिशेने फेकले. काया हे बघुन किंचाळली. आपल्या आईला किंचाळताना पाहुन सुयुध्द आज्जीच्या जवळुन उठला अन पटकन काया जवळ आला. पण त्याला बाहेर काय घडतय हे दिसलं नाही. चिरंतरच्या दिशेने येणारे शस्त्र तरुणाने पळत असलेल्या दैत्याकडे वळवले. शस्त्र लागताच दैत्य राख होतो. हे बघुन बाहेरचा दैत्य व उरलेला एक दैत्य पळून जातात. आता तरुण आजुबाजुला नजर फिरवत अंदाज घेतो कोणी असल्या-नसल्याचा. कोणीच नाही ह्याची खात्री करुन मग तरुण बोलतो.
" नमस्कार चिरंतर….मला गुरुजींनी इथे पाठवले आहे. "
हात जोडुन तो तरुण उभा असतो. त्याचा आवाज ऐकुन काया डोळे उघडते. इकडे तिकडे पाहते पण एकही दैत्य तिला दिसत नाही. सुयुध्द पटकन त्याचा आई जवळ येऊन उभा राहतो. आत बसलेले आज्जी आजोबा बाहेर येतात. आजोबांच्या हातात छोटा संदुक असतो. काया त्या तरुणाला विचारते.
"कोण आहात तुम्ही? " अजुन काही विचारण्या आधी चिरंतर बोलतो
" हा चैतन्य आहे. गुरु विश्वेश्वरांचा शिष्य आपल्या कुटुंबाच्या रक्षणाचे काम हाच करतो." काया चैतन्यला पाहत राहते. सुयुध्द गप्प सर्वकाही समजण्याचा प्रयत्न करत होता. काया मात्र खुप घाबरलेली असते. कधी नाही असा प्रसंग पहिल्यांदाच तिच्या आयुष्यात घडत होता.
म्हातारा खोलीतुन बाहेर येतो. त्याला पाहुन चैतन्य बोलतो.
" हे पहा त्रिनेत्री अजुनही आपल्यावरचे संकट टळलं नाही. ते दैत्य पुन्हा येऊन हल्ला करतील. ते येण्याच्या आत आपल्याला सुरक्षित ठिकाणी जायला हवं. गुरुजींनी मला आदेश दिला आहे. तुम्हाला आश्रमात नेण्याची जबाबदारी माझी आहे. ते दैत्य पुन्हा मोठ्या संख्येने येतील. म्हणुन आता लगेचच आपल्याला इथुन निघायला पाहीजे."
इतकं ऐकल्यावर आज्जी सुयुध्दला खोलीत नेते. म्हातारा चिरंतरला म्हणतो.
' हे बघ चिरंतर. अस काही घडेल याची कल्पना आपल्याला नव्हती. पण जसा गुरुजींचा आदेश आहे. इथे राहणं आता आपल्यासाठी सुरक्षित राहीलं नाही. चैतन्य जे काही बोलतोय तस व्हायच्या आत लवकरात लवकर आपण इथुन निघालं पाहीजे. '
काया विचारात गुंग झालेली असते. ती जे काही घडल ते पाहुन फार घाबरलेली असते. तिच्या चेहऱ्यावर भिती दाटलेली असते. जिव घाबरा झालेला असतो. तिला काळजी वाटत असते कि आता निभावुन नेले पण पुढे काय? चिरंतर तिला हाक मारतो.
' काया….. कुठे आहेस?' त्याची हाक ऐकताच ती भानावर येते.
'अं…इथेच आहे. काय झाल बोला?'
' अगं ऐकलं नाहीस बाबा काय म्हणाले. आपल्याला लगेच इथुन आश्रमाकडे निघायला हवे.'
' काय ….? आता लगेच…?
' हो… आत्ताच…आपल्या सर्वांच्या सुरक्षेसाठी जाव लागेलचं. '
आधीच घाबरलेल्या कायाला काहीच कळत नव्हते. आत्ता थोड्यावेळा पुर्वी तर ती गोष्ट ऐकत होती. एकाएकी दैत्य आले काय? चिरंतर त्यांच्यांशी लढला काय? का घडतयं अस? हे सर्व विचार करत असताना आज्जी सुयुध्दला तयार करुन खोलीच्या बाहेर घेउन येते. ती कायाला हाक मारते तशी काया पुन्हा सद्यस्थितीत येते.
' काया….सुयुध्दची तयारी केली आहे मी. आता निघायला हवं…चल. ' सुयुध्द मधेच बोलतो.
' आज्जी आपण कुठे जाणार आहोत?' तशी सुनैना आज्जी त्याच्या डोक्यावर हात फिरवत त्याला समजावते.
' आपण गुरु विश्वेश्वरांच्या आश्रमात चाललो आहोत. एकदा का आपण तिथे पोहचलो कि तुला सर्व काही कळेल.'
सुयुध्दचे लक्ष एका वेगळ्याच गोष्टीकडे असते. त्याला घडलेला प्रसंग गंभीर आहे हे कळत असते. पण ते का घडलं हे शोधण्यासाठी उत्सुकताही वाटत असते. त्याच जग आता साधारण राहिल नव्हत. राक्षस, दैत्य आतापर्यंत त्याने ग्रंथातच ऐकलेले होते; पण ते आता त्याच्या खऱ्या जिवनात ही अचानक प्रकट झाले होते. ह्या सर्व गोष्टींमागे काय गुढ होत हे शोधण्याची त्याला आता जास्त उत्सुकता होती.
सर्वजण तयार होऊन घराबाहेर निघतात. मगाशी घडलेल सगळं काही इथे कायाच्या मनात घोळत असत. तिला भिती वाटत असते कि दैत्य अचानक कुठूनही हल्ला करतील. बाहेर निघुन चैतन्य सगळीकडे नजर फिरवतो. कोणीच नाही याची खात्री होता तो सर्वांना नदिकडे जाण्याचा इशारा करतो. सर्वजण आता नदीकडे जाणऱ्या वाटेला चालु लागतात. सर्वात पुढे चैतन्य आणि त्या मागे आजोबा व सुयुध्द नंतर त्याच्या मागे काया व सुनैना आज्जी असे ते दबकत दबकत चालत असतात. चैतन्य रस्त्याने चालताना सावधपणे सर्वीकडे नजर ठेवून असतो. चिरंतर त्याच्या बरोबरच चालत विचार करत असतो काही मनाशी ठरवून तो चैतन्य शी बोलतो.
' चैतन्य ... मला एक सांग आपण कसे जाणार आहोत. '
' गुरुंचा आदेश आहे कि तुम्हाला सुरक्षित आश्रमात न्यावे. पण मला ही प्रश्न पडलाय कि इतक्या जणांना नेऊ कस. मला वाटतय मी गुरुंशी बोलुन घ्यायला हवं.'
' बरं…तुझ म्हणण बरोबर आहे. तु आताच गुरुंशी बोलुन मार्गदर्शन घे.'
हे संभाषण होई पर्यंत ते नदीजवळ पोहचले होते. नदी अगदी 10-12 फुटाच्या अंतरावर होती. चिरंतर घरी आल्यापासून ते त्यांचा भुतकाळ सुयुध्दला सांगुन होई पर्यंत बराच वेळ झालेला असतो. दुपार उलटुन गेलेली असते. सुर्य मावळायला आता तासभर राहिला होता. नदीजवळचे वातावरण शांत होते. चैतन्यला शंका येऊ लागते कि येताना आपल्याला गावातील एकही माणुस कसा दिसला नाही. तो जवळच्या सर्व झाड झुडपांवर नजर फिरवतो. एवढ्यात त्याला गुरुंचा आवाज ऐकु येतो. तो चिरंतरला जवळ खेचुन त्याचा कानात बोलतो.
' चिरंतर गुरु माझ्याशी बोलु इच्छीतात. त्यांना आपल्याला नक्कीच पुढचा मार्ग सांगायचा असेल. तुम्ही सर्व निश्चिंत रहा गुरुजी योग्य मार्गदर्शन करतील.'
चिरंतर वळून आपल्या बाबांना बोलतो. 'बाबा चैतन्य गुरुंशी आता बोलणार आहे.'
सगळे शांत होतात. सगळ्यांचे लक्ष आता एकाच गोष्टीकडे असते गुरू त्यांना काय मार्ग सुचवणार आहेत. चैतन्य हात जोडुन डोळे मिटतो इतक्यात त्याला जवळच्या झाडीत हालचाल जाणवते. नदीजवळ उग्र वास येऊ लागतो. चैतन्य समझतो कि दैत्य इथे दबा धरुन आपली वाट बघत बसले आहेत. गुरुंशी आता बोलावे का? असा विचारही तो करतो पण इतक्यात झाडीतुन एक बाण सुयुध्दच्या दिशेने मारला जातो. हे पाहताच चैतन्य क्षणाचाही विलंब न करता त्याच्या हातातली काठी फेकतो. बाण काठीला लागून सुयुध्द पासुन 2-4 फुटावर खाली पडतो. तसा झाडीत लपलेला दैत्य अचानक बाहेर येतो. काया दैत्याला बघुन किंचाळते. ती धावत सुयुध्द जवळ जाऊन त्याला मागे खेचते. चैतन्य आपल्या आराध्याचे स्मरण करुन पुन्हा लढायला सज्ज होतो. चिरंतर आहे तिथेच उभा राहुन काठीला जोरात फिरवतो. सुयुध्दवर येणाऱ्या या संकटांमुळे घरातील सर्वच काहिसे घाबरलेले असतात. पण सुयुध्द मात्र घाबरलेला नसतो. त्याच्या डोळ्यात भिती ऐवजी आता उत्सुकता भरली होती. तो झाडीतुन बाहेर आलेल्या दैत्याकडे बघतो. 7-8 फुट उंच दैत्य भयंकर दिसत होता. लाल डोळे, टोकदार दात, काळे शरीर आणि शरीरातुन उग्र वास येत होता. त्याच्या हातात धनुष्य होता. पाठीला बाणवत बांधल होत त्यात काही बाण दिसत होते. तो दैत्य सुयुध्द कडेच बघत असतो. त्याच्या डोळ्यातला क्रुर भाव बघुन सुयुध्द घाबरतो. तो खाली पडलेल्या बाणाकडे बघतो. हा बाण जर मला लागला असता तर…असा विचार त्याला येतो. पण चैतन्य त्यांना येणाऱ्या प्रत्येक संकटापासुन वाचवण्यास समर्थ दिसत होता. घरात आलेल्या दैत्यांना त्याने अगदी सहज मारुन टाकलं होत. अचानक तो दैत्य सुयुध्दच्या दिशेने धावतो. तो पोहचणार ह्याच्या आत चिरंतर सुयुध्द समोर उभा राहतो. धावत येणारा दैत्य आता थांबतो. चिरंतर कडे रागाने बघतो. बाजुच्या झाडीतुन पुन्हा हालचाल होऊ लागते. झाडीतुन एकएक करुन इतर दैत्य बाहेर येतात. हे पाहताच चैतन्य त्रिनेत्रींकडे धावत जातो. चिरंतर आणि चैतन्यच्या मधे आता बाकी सर्व लोक असतात. आता त्यांना चहुबाजूने दैत्यांनी गराडा घातला होता. त्यांच्या हातातल्या धारेदार शस्त्रांनी व क्रुर हास्याने त्यांच्या मनात काय आहे ते स्पष्ट दिसत होते. त्यांना त्रिनेत्री परिवाराला संपवायचे होते.
हे सर्व पाहुन काया खुप घाबरते. ती सुयुध्दला आपल्या जवळ खेचुन त्याला बिलगते. चिरंतर समोरचा दैत्य काही बोलतो. ती भाषा काही कळत नव्हती बसलेल्या घोगऱ्या आवाजात तो सुयुध्द कडे बोट करत ओरडतो. त्याच्या बोलण्याने इतर दैत्य जास्त आक्रमक झाले. ते ही जोरात कर्कश आवाजात ओरडु लागले. चिरंतर समोरच्या दैत्याने लगेच त्याच्यावर हल्ला केला. दुसऱ्या बाजुच्या दैत्याने चैतन्यवर हमला केला. सुयुध्द हे सर्व पाहत होता. त्याच्या आजोबांनी त्याला व इतरांना आपल्या जवळ खेचुन घेतले. चिरंतरने आपल्या हातातल्या काठीने दोन फटक्यात त्या दैत्याला धुळ चाटवली. इथे चैतन्य दैत्याच्या मानेवर पाय ठेवून उभा होता. बाकिचे तीन दैत्य हे पाहताच चिरंतर च्या दिशेने धावले. आंधळा चिरंतर त्या दैत्यांसह अगदी शिताफिने लढा देत होता. काया आणि सुयुध्द पहिल्यांदाच लढाई करण्यात अत्यंत सराईत चिरंतरला पाहत होते. त्याच्या हातातली काठी प्रत्येक दिशेने येणारे वार सहजतेने रोखत होती. खाली पडलेल्या दैत्याने पुन्हा उठून त्याच्या शस्त्राने चिरंतरवर अनेक वेळा वार करण्याचे प्रयत्न केले पण तो वार सहजतेने चुकवत तो बाजुला हटत होता. चैतन्यशी लढणारा दैत्य अजुन जमिनीवरच पडलेला होता. आपल्या काठीला त्याने भाल्यात रुपांतरीत केले आणि भाला दैत्याच्या डोक्यात घुसवुन आरपार केला. दैत्य तडफडत तिथेच मेला. त्याच क्षणी चिरंतर सोबत लढणारे दैत्य सुयुध्द कडे धावले. ते जवळ असलेल्या काया कडे वळले. पण तिच्याकडे येणाऱ्या दैत्याला हे दिसले नाही कि चैतन्य ने त्याच्या दिशेने भाला फेकला आहे. धावत येणारा दैत्य भाला लागताच खाली कोसळला. त्याच्या मागे येणारे दोन दैत्य हे पाहता जागीच थांबले. ते घाबरुन मागे सरकले. इकडे चिरंतरने काठीने दैत्याच्या हातातले शस्त्र खाली पाडले. शस्त्र पडताच दैत्य मागे सरकला व पळु लागला. इथे चैतन्यने कोसळलेल्या दैत्याला लागलेला भाला उपसुन काढला होता. त्याने लगेच तो भाला पळणाऱ्या दैत्याच्या दिशेने फेकला. भाला दैत्याच्या पाठीतून आरपार घुसला. धडपडत तो जमिनीवर घसरत पडला. उरलेले दैत्य हातात तलवारी घेऊन सुयुध्द कडे धावले. चिरंतर असलेल्या ठिकाणाहून उडी मारुन सुयुध्द जवळ उभा राहिला. हातातली काठी त्याने येणाऱ्या दैत्याच्या दिशेने उचलली. तलवारीने त्यानी चिरंतरवर मारा केला पण काठीने वार रोखत दुसऱ्याच फटक्यात मानेवर मारा करुन दैत्याला खाली पाडले. त्याच्या मागच्या दैत्याने जागीच थांबुन हातातले शस्त्र चिरंतरवर फेकले. चिरंतर ने काठीच्या झटक्याने ते खाली पाडले. इथे चैतन्य मारलेल्या दैत्याच्या पाठीत घुसलेला भाला काढत होता. भाला काढताच त्याने मागे वळुन पाहिले. चिरंतरच्या पायाशी पडलेला दैत्य समोर काही अंतरावर असलेल्या तलवारी कडे सरकत होता. चैतन्य ने आजुबाजुला नजर फिरवली. आकाशातला सुर्य आता मावळतीला आला होता. हे पाहताच तो चिरंतरच्या दिशेने धावला. समोर उभ्या दैत्याने त्याला आपल्या जवळ येताना पाहीले. दैत्याच्या चेहऱ्यावर क्रुरपणा कमी आणि भिती जास्त दिसत होती.
चैतन्यने आपल्या हातातला भाला उचलला; भाला पुन्हा काठीत रुपांतरीत झाला. चिरंतरच्या पायाशी पडलेल्या दैत्याने आता तलवारीवर हात पुरवला होता. क्षणाचाही विलंब न करता त्याने दैत्याच्या डोक्यात काठी मारली पण मारता क्षणी दिसणारी काठी आता लांब अनुकुचिदार भाल्यात रुपांतरीत झाली होती. जसा तो भाला दैत्याच्या डोक्यात घुसला तो जागीच ठार झाला. चिरंतर ने भाला उपसुन बाहेर काढला. आता दोन्ही बाजुंनी चैतन्य व चिरंतर उरलेल्या एका दैत्याशी सामना करायला तयार होते. एका बाजुने चैतन्य तर दुसऱ्या बाजुने चिरंतर दोघांनी दैत्याला घेरले. चैतन्य हातातली काठी फिरवत होता; पण चिरंतर मात्र एकाच ठिकाणी शांत उभा होता. स्वतःला घरलेल बघुन दैत्याने उंच उडी मारली. उडी मारताच त्याच्या पाठीतुन पंख निघाले. नक्कीच त्याला लढण्यापेक्षा पळुन जाणे सोयीस्कर वाटत होते. चैतन्यने हे पाहताच आपल्या हातातली काठी फिरवणे थांबवले. काठी जमिनीवर आपटुन तो वर उडणाऱ्या दैत्याकडे पाहू लागला. चिरंतरने आपली काठी दोन धारी तलवारीत रुपांतरीत केली व दैत्याच्या दिशेने जोरात फेकली. उडत उडत दैत्य आता बराच वर गेला होता. पण चिरंतरने फेकलेली तलवार त्याच्या दिशेने गोल गोल फिरत जात होती. अगदी क्षणातच ती फिरती तलवार दैत्याच्या पाठीतुन आरपार झाली. दैत्याचे हवेतच दोन तुकडे झाले. तो खाली तड्फ़डत पडला. तलवार फिरत पुन्हा चिरंतर च्या हातात येते. तो तिला पुन्हा काठीत रुपांतरीत करतो. आता एकही दैत्य जिवंत उरला नव्हता.
दोघे आता इतरांच्या दिशेने येऊ लागले. घडलेला सर्व प्रकार सुयुध्द ने डोळ्यांनी पाहिला होता. त्याला विश्वासच बसत नव्हता. काया ही थक्क झाली होती. सुयुध्दच्या मनात अनेक प्रश्न घोळु लागले पण त्याने ते न विचारण्याचे ठरवले. परिस्थितीची गंभीरता लक्षात घेता सगळेच शांत बसले होते. तेवढ्यात अभिनव आजोबा बोलला.
' चैतन्य….तु आता लवकरात लवकर गुरुंशी बोलुन घे.'
चालत ते दोघे आता इतरांजवळ पोहचले होते. हातातली काठी आपटत चैतन्य जवळच्या एका दगडावर बसला. काठी त्याने बाजुला ठेवली. हात जोडले, डोळे मिटले व ध्यान लावुन बसला. चिरंतर सुयुध्द जवळ गेला. सुयुध्द्ला खुप प्रश्न पडले होते; पण त्याला ते आत्ताच विचारायचे नव्हते. इकडे चैतन्य गुरुंशी ध्यान लावुन बोलत होता. सुयुध्दने आपली नजर चिरंतरच्या हातातल्या काठीकडे वळवली. तो काठीला पाहु लागला. (कशी काय काठी रुपांतरीत झाली? त्याच्या वडिलांना कसे कळले कि कोणत्या दिशेने दैत्य हल्ला करत आहेत? आपल्या बापाला दिसत असेल का?) असे अनेक प्रश्न त्याला पडत होते. गुरुंशी बोलत असलेला चैतन्य तेवढ्यात बोलला.
' गुरुंनी मार्ग सांगितला आहे. आपल्याला नदीवाटे आश्रमापर्यंत जावे लागेल. '
त्याने आकाशाकडे बघितले आता सुर्य मावळतीला आला होता. सुर्याचा थोडासा मंद प्रकाश क्षितिजावर दिसत होता.
' सुर्य ही मावळला आहे. आपल्याला लगेच निघायला हवे. उद्या सकाळ पर्यंत आपण आश्रमाजवळ पोहचु.'
क्रमशः
हा भाग तुम्हाला कसा वाटला.
हा भाग तुम्हाला कसा वाटला. जरुर कळवा.
सुयोग.. परत एकदा तेच.. कथाबीज
सुयोग..
परत एकदा तेच.. कथाबीज छान आहे पण तिला गोष्टीरुपात उतरवता येत नाहीए अस वाटतयं.. एका मोड मधे चालतच नाहीए ती.. कधी ती घडत असते, तर कधी तू ती सांगत असतो तर कधी तू ती डीरेक्ट करत असतो एखाद्याला आता हा पार्ट कसा प्ले करायचा आहे अस डिरेक्टर ने अॅक्टर ला सांगितल्याप्रमाणे..
जेवताना खडा लागल्यासारख वाटतयं सॉरी..
पण प्लीज तुम्ही लिखानावर मेहनत घ्याच.. कुणी ओळखीच असेल तर त्याच्याकडून चेक करुन घेत चला.. सगळी कथा एकाच काळात चालु दे..
पुलेशु,..
महाभारत मोड ऑन झाला की
महाभारत मोड ऑन झाला की काय?
हा भाग तितका आवडला नाही.
प्रतीसादा बद्दल धन्यवाद. टिना
प्रतीसादा बद्दल धन्यवाद. टिना व आनंदा...
टीना + १ लवकर टाका पुढचा भाग,
टीना + १
लवकर टाका पुढचा भाग,
thanks anku...keep reading.
thanks anku...keep reading.
सुयोग एक काळ पकडा...होतो करतो
सुयोग एक काळ पकडा...होतो करतो ही भाषा नको.. झालं केलं असं लिहा.
अजून चांगले परिच्छेद पाडा. कथा बीज छान वाटतय.. कथेची मांडणी अजुन छान हवी.
@vel आपल्या प्रतिसादाबद्दल
@vel
आपल्या प्रतिसादाबद्दल खुप खुप धन्यवाद.. नविन भागात अजुन सुधार करत आहे. आपला मोल्यवान सल्ला मदत करत आहे. अजुन काही चुका असतील तर जरुर सांगा.
आपल्याकडे खुप चांगले कथा लेखक
आपल्याकडे खुप चांगले कथा लेखक आहेत. त्यांनी सांगितले तर अजून फायदा होईल.
पण तोवर मी काय करते ते सांगते. लिहुन झालं की ते मोठ्याने किंवा कमीत कमी मनातल्या मनात तरी वाचायचं. आपण गोष्ट सांगतो त्या प्रकारे. मग आपल्यालाच कळत जातं की वाचताना कुठे अडकतोय आपण. आणि तिथे काय बदल करायचे ते सुचत जातात.
मायबोलीवरच्या गाजलेल्या कथा वाचा. बेफिकिर, नंदिनी, चाफा, विशाल ही त्यातली काही महत्त्वाची लेखकांची नावे. ह्यांची भाषा कशा आहे बघा.
शुभेच्छा.. पुढील भागांच्या प्रतिक्षेत
खुप खुप धन्यवाद, आपल्या
खुप खुप धन्यवाद, आपल्या अमुल्य सल्ल्याबद्दल आभार वेल. वाचत रहा.