Submitted by admin on 26 May, 2009 - 21:08
तुळशीबाग, शनिपार, मंडई, लक्ष्मीरोड भागात कुठं काय चांगलं मिळतं?
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
तुळशीबाग, शनिपार, मंडई, लक्ष्मीरोड भागात कुठं काय चांगलं मिळतं?
या पानावर
या पानावर पहिला मान मिसळीला!
पुण्यात मिसळ खावी ती खालील ठिकाणी :
१. श्रीकृष्ण मिसळ (तुळशीबाग)
२. बेडेकर मिसळ (पत्र्या मारुती जवळ)
३. श्री मिसळ (शनिपाराजवळ)
४. रामनाथ (टिळक रोड)
भेळ खायची
भेळ खायची असेल तर पुष्करणी ला पर्याय नाही. पुष्करणी विश्रामबाग वाड्यासमोर आहे. चितळे दही चक्का दुकान आहे त्याच्या जवळ.
ग्रीन
ग्रीन बेकरी - चितळ्यांचे पलिकडे, शनिपार ला लागून, पॅटीस आणि कसली कसली नावे आहेत, वाचायला नी खायला झक्कास...
मंडई त एक "हॉटेल मंडई" आहे, रात्रभर चालू असते [FYI]
शनिवार वाड्याच्या समोर, पोलीस चौकीजवळ एक अण्णाची टपरी आहे - पोहे, इडली, वडा चांगला असतो - इथे चहा पिऊ नये, बकवास असतो
शनिपारा
शनिपारा कडुन तुळ्शी बागे कडे जाणार्या रस्त्याला -अनोखा केंद्रा चा डोसा
कांता बेन चे खाकरा, तिथेच बाहेर भजी वडे मस्त गरम गरम असतात तिथेच आत अमृततुल्य चा चहा छान असतो
श्री मिसळ च्या समोर अणि सुजाता मस्तानी ची स्तुती वर झालेलीच आहे त्या समोर ची पाणिपुरी ही मस्त असते
विश्राम
विश्राम बाग वाड्याच्या समोर वडापाव छान मिळतो
मन्डईच्या
मन्डईच्या आजू बाजूला - देसाइ बन्धुच्या बाजूला एक उसाच्या रसाचे गु-र्हाळ आहे. साधरण १९७५ च्या पासुन आईने घेउन दिलेला अर्धा ग्लास रस आठवतो.
श्रीक्रिष्ण ची मिसळ फरच उत्तम. तसेच कावरे कोल्ड्रिन्क्स आणि स्वीट होम - हया दोन आठवणी कायम लक्षात रहतिल - जवळ फरसे पैसे नसताना आइ वडिला.बरोबर केलेलि मजा आणि बालपण..
नॉस्टाल्गिया
वामन
रामचन्द्र भगवन्त चिवदा खुप
रामचन्द्र भगवन्त चिवदा खुप फेमस आहे . फरास खाना चॉका मधला. कान्दा चिवदा झकास.
विस वर्शा पुरवी पुन्यात्त खुप
विस वर्शा पुरवी पुन्यात्त खुप पैसा कोनाहि काडे नवता. अमेरिकेतुन येनारा तर अजिबात नवता . पन ते दीवस परत कधि येनार नाहित. फास्त फूद च्या जमान्यात आप्ले बालपान आथवते . आपले मन मारुन मुलान ची हाउस पुरवनारए पालक हि गेले. त्या मुले पुन्यात कधि कधि पोरके वाताते.
लक्ष्मीरोडला कॅनरा बँकेसमोर
लक्ष्मीरोडला कॅनरा बँकेसमोर पूना गेस्टहाऊस मध्ये (पहिला मजला) ग्रामीण थाळी मिळते. भरली वांगी, भाकरी, मिर्चीचा खर्डा, चटण्यांची रेलचेल असते. स्पेअर रुमाल घेऊनच जावे ग्रामीण थाळी जेवायला. आणि शनिवारी गेलात तर बरे! मिर्चीचा खर्डा चेपला तर दुस-या दिवशीचा रविवार घरी आराम करण्यास सोयीचा होतो.
विश्रामबाग वाड्यासमोरचा वडापाव छान. पण वडेवाले जोश्यांचा वडा; म्हणजे त्याच्या समोर खरवस चमचमित असा गुळचट म्हणावा लागेल. असो!
ए , अनोखाची सुरळीची वडी खा रे
ए , अनोखाची सुरळीची वडी खा रे . एकतर मला फार आवडते. आणि आनोखाची तिखट असते .
ग्रीन बेकरि शेजारी गौरव
ग्रीन बेकरि शेजारी गौरव स्नौक्स मधे पन खुप छान पदार्थ असतात.
गौरव स्नॅक्स-मोदक, सुरळीच्या
गौरव स्नॅक्स-मोदक, सुरळीच्या वड्या, मटार करंजी.
मुरलीधर मध्ये उसाचा रस.
या पानावर पहिला मान
या पानावर पहिला मान मिसळीला!
पुण्यात मिसळ खावी ती खालील ठिकाणी :
१. श्रीकृष्ण मिसळ (तुळशीबाग) --- मस्तच!!!
२. बेडेकर मिसळ (पत्र्या मारुती जवळ)----आरारा...हि काय मिसळ आहे.फ्रिज मध्ये ठेवुन खाल्ली तर स्विट डिश होइल
३. श्री मिसळ (शनिपाराजवळ) --- ठिक
४. रामनाथ (टिळक रोड)--- सगळि कडुन पाणि पाणि होते.. लैच भारी...
जोगेश्वरीच्या गल्लीतले
जोगेश्वरीच्या गल्लीतले sandwich ची गाडी - मसाला टोस्ट , बॉम्बे sandwich
@सुयाशतात्या : नशिबाने आपण लिहिलेल्या चारही मिसळी खाण्याचे योग आले . उत्तम !
महबँकेकडु तुळशीबागेत शिरताना
महबँकेकडु तुळशीबागेत शिरताना पूर्वी दवे स्वीट लागायचे. इथे मिळणारी पापडी (जेठालालचा फाफडा) व चटणी म्हणजे स्वर्गसुख होते. काळाच्या ओघात दवे स्वीटच गायब झाले.
२. बेडेकर मिसळ (पत्र्या
२. बेडेकर मिसळ (पत्र्या मारुती जवळ)----आरारा...हि काय मिसळ आहे.फ्रिज मध्ये ठेवुन खाल्ली तर स्विट डिश होइल
३. श्री मिसळ (शनिपाराजवळ) --- ठिक
>>>>> अनुमोदन..
(No subject)
आज सकाळी 10-30 च्या सुमारास
आज सकाळी 10-30 च्या सुमारास बाजीराव रोड वरच्या वाडेश्वरभुवन समोर पार्सल साठी 7-8 लोकांची रांग पाहिली ...
चला पुणं पुन्हा एकदा नेहमीसारखं सुरू झालं..