"सर्वकाही बदलायचंय मला...."
"किंमत द्यावी लागेल."
"कबूल.."
"बरं साल?"
"२०१६"
"तारीख?"
"१२ जून "
"ठीक आहे.."
त्याने हातातील कागदावर तारीख लिहिली. कागद मशीनमध्ये ठेवला.मशीन चालू केलं.
"आज वेळ लागतोय."
"हो मशीन जरा स्लो चाललंय."
श्रीराम कॉलेजमध्ये गर्दी वाढली होती. आज इंजिनियर मंडळी बरीच निवांत होती. पेपर्स संपले होते.
"एक्सक्यूज मी!"
"येस?"
"आज १२ जून ना?"
"हो..."
"थँक्स!"
तो झपझप पाऊले टाकत मेकेनिक हॉल मध्ये गेला.
विराज, शुभ आणि राज तिघेही निवांत बसले होते.
"आज तिला विचारणारच आहे."
"अरे राज पण विचार कर ती नाही म्हणाली तर?"
"मग रात्री रूमवर ओढून नेऊ तिला!"
तिघेही कुत्सित हसले.
ती हॉलमध्ये आली. तशी ती दिसायला छानच होती. आज घातलेल्या काळ्या टॉप व पांढऱ्या स्कर्टवर अजूनच खूलून दिसत होती.
"हाय किर्ती!"
एव्हाना शुभ व विराज दोन्हीही गायब झाले होते.
दोन्ही सुरुवातीस बिचकत होते, पण आग दोन्हीकडे लागली होती!
चित्रपटातील सर्व प्रेमवाक्ये म्हणून झाल्यावर त्याने सरळ मुद्द्याला हात घातला!
रात्री रूमवर येशील?
"हो. पण कुणाला कळणार तर नाही ना?"
आणि त्याला स्वर्ग दोन बोटेच उरला...
"विराज ड्रिंक आणल्या आहेत ना?"
"हो!"
"आणि ड्रग्स?"
"ते कसं विसरू मी?"
"हे बघ मी सुरुवात करतो. तिने एक पेग घेतल्यावर आधी मी चांस मारेल. आणि ती अर्धवट बेशुध्द झाल्यावर तुम्ही दोन्ही या. काय?"
"राज पण रेकॉर्डिंग नीट कर. ती छायाची रेकॉर्डिंग नीट झाली नव्हती."
"ए गेट उघडला. तुम्ही रूमच्या मागच्या बाजूला जा."
गेट उघडून ती आत आली
राजने दरवाजा उघडला.
धश!
तो जमिनीवर कोसळला.
काहीतरी पडण्याचा आवाज ऐकून शुभ आणि विराज दोन्ही रुमवर आले.
धश! धश!
दोन्हीही कोसळले!
एक जोडपं रस्त्याने निवांत चाललं होतं.
"तुला सायलंट गन कुठून मिळाली?"
"सहा वर्षानंतर हा शोध लागलाच होता."
"ओह!"
"येस!"
"थँक्स!"
"व्हाय?"
"माझं आयुष्य वाचवल्याबद्दल."
"बिकॉज़ यू आर माय लाईफ."
दोन्हीही खळखळून हसले.
"बरं त्या मूर्खाने कुणाला कळू दिलं नाही." "त्याला मीच सांगितलं होतं ना, कुणाला कळू देऊ नको म्हणून!"
२१ जून २०२२
"पप्पा ही कीत्री मला त्रास देतेय."
"कीत्री नाही बाळा किर्ती."
"हो तेच."
"बरं तुझा पप्पा आलाय ना? तो बघ काय करतो ते."
"लव यू पप्पा."
किर्ती किचनमध्ये काम करत होती.
"तुला २१ जून २०१६ ला काय झालं होतं आठवतंय?"
"नाही का रे?"
"नीट आठव."
"नाही आठवत रे."
"मी तुला हजेरी चा कागद दिला होता. तोही हातात!"
"वा! एवढ्या गोष्टी लक्षात ठेवायला मी काही शास्त्रज्ञ नाही तुझ्यासारखी."
"यू कील देम?"
"येस."
"थँक्स!"
"बट व्हाय फोर्स मी टू डू इट. मला फक्त कीर्तीला वाचवायचं होतं."
"तिला ती तारीख आठवतेय आता?"
"नाही."
"हा १३ जून २०१६ चा पेपर बघ."
'तीन कॉलेज तरुणांची गोळ्या घालून हत्या.'
"ओह!"
"छायाने कधी आत्महत्या केली होती?"
"१८ जून २०१६"
"तोही बघ."
"ती बातमीच नाही आहे यांत."
"जे घडलेच नाही त्याची बातमी कशी येणार?"
तेव्हाच एक स्त्री कॉफी घेऊन आत आली.
"डॉक्टर, मीट माय वाईफ, छाया....."
एक नंबर! कडक!
एक नंबर!
कडक!
थँक्स जव्हेरभाऊ!
थँक्स जव्हेरभाऊ!
मस्त
मस्त
थँक्स अश्वीनीजी!
थँक्स अश्वीनीजी!
कळाली नाही.
कळाली नाही.
संभाषणा मधे फार गुंतागुंत
संभाषणा मधे फार गुंतागुंत आहे. सरासर चांगली वाटली.
जबरदस्त
जबरदस्त
२१ जून २०२२ "पप्पा ही कीत्री
२१ जून २०२२
"पप्पा ही कीत्री मला त्रास देतेय."
"कीत्री नाही बाळा किर्ती."
"हो तेच."
"बरं तुझा पप्पा आलाय ना? तो बघ काय करतो ते."
"लव यू पप्पा."
किर्ती किचनमध्ये काम करत होती.
"तुला २१ जून २०१६ ला काय झालं होतं आठवतंय?"
"नाही का रे?"
"नीट आठव."
"नाही आठवत रे."
"मी तुला हजेरी चा कागद दिला होता. तोही हातात!"
"वा! एवढ्या गोष्टी लक्षात ठेवायला मी काही शास्त्रज्ञ नाही तुझ्यासारखी."
हा भाग नाही समजला ...
मला काही म्हणजे, काहीच नाही
मला काही म्हणजे, काहीच नाही समजलं. कदाचित माझ्या आकलनापलीकडचं असावं. साधं, सोप्पं, आणि सरळ लिहिता नसतं आलं का?
I agree with Vaishali tai,plz
I agree with Vaishali tai,plz to para cleare kara na Ironman.plz......................................
plz konitari clear kara
plz konitari clear kara na,konalach kalali nahi ka?
छान आहे
छान आहे
छान आहे. त्रोट्क पण तितकीच
छान आहे. त्रोट्क पण तितकीच परीणामकारक!
रोचक!
रोचक!
किर्ती म्हणजेच लग्नाआधीची
किर्ती म्हणजेच लग्नाआधीची छाया. जिला विराजनी बोलावलं असतं
किर्ती म्हणजेच लग्नाआधीची
किर्ती म्हणजेच लग्नाआधीची छाया >> छाया च रेकॉर्डिंग नीट झाले नव्हते अस ते किर्ती यायच्या आधी बोलतात. म्हणजे दोघी वेगळ्या..
ही कथा मी लिहिलिय, याचं आता
ही कथा मी लिहिलिय, याचं आता मलाच आश्चर्य वाटतंय!
हे सगळं इतक्या दिवसानंतर वाचल्यावर मलाच आश्चर्य वाटतंय.
राज आणि त्याची टोळी, मुलींना फसवून त्यांची रेकॉर्डिंग काढतात. छाया नावाच्या मुलीची रेकॉर्डिंग त्याने आधीच काढलेली असते, त्यामुळे ती आत्महत्या करते.
किर्तीही त्याच कॉलेजमध्ये शिकते. तिलाही हे फसवतात, मग ती त्याच्याशी लग्न करते, तो टाइम मशीनचा शोध लावतो, भूतकाळात जातो, आणि जेव्हा ते किर्तीला फसवणार, त्याआधी किर्तीला विश्वासात घेऊन तो त्यांना मारतो.
त्यांचा मृत्यू झाला, न्याय मिळाला म्हणून छाया आत्महत्या नाही करत!
आणि हे सर्व घडवून आणतात डॉक्टर, ज्यांच छायावर प्रेम असतं.
छायाने आत्महत्या न केल्याने तीच लग्न त्यांच्याशी होतं.
आणि हे सर्व घडवून आणतात
आणि हे सर्व घडवून आणतात डॉक्टर, ज्यांच छायावर प्रेम असतं.
छायाने आत्महत्या न केल्याने तीच लग्न त्यांच्याशी होतं. <<< पण "तो" शेवटी "डॉक्टर, मीट माय वाईफ, छाया....." म्हणतो ना? आणी मधे किर्ती, लहान मुलग तो असा संवाद आहे ना?
ते दोन्हीही एकमेकांना डॉक्टर
ते दोन्हीही एकमेकांना डॉक्टर म्हणूनच संबोधताय!!!
he farach dokyavarun jatay...
he farach dokyavarun jatay..................
He first likhan ahe ka Mb
He first likhan ahe ka Mb varch?
<<< तो टाइम मशीनचा शोध लावतो,
<<< तो टाइम मशीनचा शोध लावतो, भूतकाळात जातो, आणि जेव्हा ते किर्तीला फसवणार, त्याआधी किर्तीला विश्वासात घेऊन तो त्यांना मारतो. >>>
बळंबळं केलेली गोष्ट.
@श्रद्धा - येस....
@श्रद्धा - येस....
तेव्हा मी काहीबाही लिहायचो याची ही पावती
काहीबाही =अनाकलनीय
काहीबाही =अनाकलनीय
काहीबाही>> i don't think so.
काहीबाही>> i don't think so.
काहीबाही =अनाकलनीय
काहीबाही =अनाकलनीय
>>>>>
वा, यालाच पुणेरी शालजोडे म्हणत असावेत का?
श्रद्धा तुला time game
अज्ञा! हो. हेच ते मायेने दिलेले शालजोडे!