तालाविषयी माझे काही प्रश्न आहेत त्याची उत्तरे लवकरात लवकर कुणी देऊ शकेल का? तुम्हा सर्व मित्रमैत्रिणींचे खूप खूप आभार.
१) समजा गाण्याचा ताल तीनताल आहे आणि जी व्यक्ती तबला वाजवत आहे ती व्यक्ती एक आवर्तन अतिशय हळूवार पण वाजवू शकते, मध्यम गतीमधेची वाजवू शकते आणि जलद गतीमधेही वाजवू शकते. म्हणजे, एक आवर्तन हे १ मिनिटात पुर्ण होऊ शकते तसे ते ३० सेकंदामधेही पुर्ण होईल. तर तबल्याची ही गती नक्की गायकाच्या आवाजावर अवलंबून असते? की ह्या गतीमधे गाणे गायचे हे आधीच संगीतकारानी ठरवलेले असते की हे तबला वाजवण्यावर ठरलेले असते?
आता आपण एक उदाहरण घेऊ, गाणे आहे - आज राणी पूर्वीची तू प्रीत तू मागू नको नको. हे गाणे कुठल्या स्केलमधे येते - संथ, जलद, मध्यम? हे गाणे मी जेंव्हा गायला सुरुवात केली तेंव्हा आधी मी मध्यम गतीने म्हंटले पण गाणे दुसर्या कडव्यात आले की माझी गती वाढते? असे का होते आहे?
२) पट्टी नक्की काय असते? मी सहजा समुहाने गाणे म्हणतो वर्गात कारण सहा मिळून आमचा एक वर्ग आहे. त्यामुळे कधी पट्टीचा प्रश्न आला नाही. पण जर मला सोलो गायचे असेल. आता वरचेच गाणे - आज राणी पूर्वीची तू प्रीत मागू नको - हेच गाणे मला गायचे असेल तर त्यासाठी माझी पट्टी कुठली आहे हे मला कसे कळेल? पट्टी ही गायकाच्या आवाजावर अवलंबून असते की गाण्याच्या गतीवर अवलंबून असते?
३) काळी पट्टी आणि पांढरी पट्टी ह्याबद्दल सोप्या शब्दात कुणी समजवून सांगेल का?
४) जेंव्हा आपण मैफीलीत गातो तेंव्हा समजा आपण भावगीत गात आहोत. परत वरचेच गाणे घेऊ - आज राणी -- तर हे भावगीत गाताना अमुक एक मात्रापासून सुरुवात करायला हवी की पहिल्या बीट पासून सुरवात करायची?
५) काही गाण्यांमधे तबला नसतो मग तालात कसे गायचे असते? जसे की - भय इथले संपत नाही ह्या गाण्यामधे तबल्याच्या काही बीट्स ऐकायला येतात पण अविरत तबला वाजतो आहे असे ऐकायला येत नाही. तर मग अशी गाणी गाताना ताल कसा ठरवायचा? गाण कसं गायच?
परत एकदा सर्वांचे आभार.
असो.. मूळ मुद्दा - एक करेक्शन
असो.. मूळ मुद्दा - एक करेक्शन - लय संगीतकार ठरवतो. गायकही नाही, वादकही नाही. गायक आणि वादक यांचे काम जसे शिकवले आहे तसे (च) गाणे, वाजविणे हे असते. या नियमाला अपवाद नक्कीच आहेत. पण तेवढी त्यांची -योग्यताही आहे. - हे फक्त सुगम साठी. शास्त्रीय गायनाचा संगीतकार खुद्द गायकच असतो. तोच लय ठरवतो.
पं. जसराजजींची कथा-
"तुम क्या जानो संगीत के बारेमें, तुम तो मरे हुए चमडेको पीटनेवाले हो"... असे त्या तबलजीला सुनावले गेले होते.
मेधावि, अगदी अगदी. एकुणात
मेधावि, अगदी अगदी.
एकुणात संगीत दिशादर्शक तत्व ठरवतं. बाकी फुलोरा ज्याचा त्याचा. मग त्या फुलोर्याचे परिणामही.
खयाल, बंदिशी ह्या बांधताना त्यांचां उपज सौदर्य कोणत्या लयीत खुलेल त्या लयीत त्या बांधल्या आहेत. ती लय समजून घेऊन त्या गायच्या आहेत. 'चार सेकंदांत सात मात्रा' अशा समीकरणात लिहिलेल्या नाहीत.
त्यासाठीच हे शिकणं गुरूमुखी आहे.
माझ्या लेकाचं पाश्चिमात्यं शास्त्रीय संगीताचं साहित्य बघून वाटलं.. आपलं संगीत निव्वळ गुरुमुखी रहायला नको होतं. त्यातला जो व्याख्येचा भाग आहे तो तरी लिहिलेला हवा. विशेषतः हा लयीचा भाग.
इन्टर्प्रिटेशनचा भाग अर्थात गायक, गुरू ह्यांच्यावर सोडायला हवा.
असो... भलतच विषयांतर झालय. माफ करा.
'भय इथले संपत नाही' चा ताल
'भय इथले संपत नाही' चा ताल काय आहे?
भय इथले - केरवा आहे, संथ लयीत
भय इथले - केरवा आहे, संथ लयीत
Pages