ब्लॉग दुवा - http://www.apurvaoka.com/2016/06/mother-tongue-education-india.html
विषय जुना आहे, काथ्या कुटून झालेला आहे. पण रहावलं नाही म्हणून पुन्हा तोच राग आळवतोय. ज्यांची मतं ठाम आहेत त्यांनी दुर्लक्ष करावं, डळमळीत आहेत त्यांनी जरूर वाचावं, आणि तटस्थ असलेल्यांनी क्षमा करावी किंवा मजा घ्यावी.
पुढचा लेख वाचला नाहीत तरी ही चार वाक्य कृपया वाचा. जरी शिक्षण म्हणजे इंग्रजी माध्यम असं पक्कं समीकरण आजकाल झालेलं असलं, तरीही मातृभाषा शिक्षणाबद्दल काही सत्य आणि त्यासंबंधी जगात बळावत असलेली भावना सांगण्याचा इथे प्रयत्न आहे. हा एखादा प्रादेशिक भाषेसंबंधीचा लेख न समजता वैश्विक विषयासंबंधी काहीतरी माहिती म्हणून इथला मजकूर लिहिलेला आहे. मुलांच्या शाळेच्या प्रवेशाच्या तारखा कदाचित उलटल्या असतील, कदाचित अजून प्रवेश बाकी असतील. तेंव्हा निर्णय घेण्याआधी लेखात दिलेले दुवे (लिंक्स) जरूर बघा, वाचा, विचार करा आणि जमलं तर पूर्वग्रह बाजूला ठेवून निर्णय घ्या.
आपण अनेकदा एखाद्या गोष्टीबद्दल काही मतं करून घेतलेली असतात. ही मतं बहुतांशी विचारांती केलेली नसतात तर ऐकीव, गोष्टींवर, किंवा कसल्यातरी प्रभाव किंवा दडपणामुळे केलेली असतात. आणि या मतांचा अणूस्फोटाप्रमाणे प्रसार होत जातो आणि त्याचं प्रथेत रुपांतर होतं. भारतातील लोक हे ठराविक बाबतीत इतके अनुकरणप्रिय आहेत की त्यांच्यावर कुठल्याही विचाराचा प्रभावच होत नाही. आणि भारतात, किंबहुना कुठेही एखादा नवा विचार साधारण तीन अवस्थांतून जातो. प्रथम काहीतरी नवीन, म्हणून त्याच्याकडे लोकं आकृष्ट होतात. नवं ते हवं, अशा भावनेने तो विचार अनेकांच्या मनत घर करतो. मग पुढे सगळेच जण त्या मार्गाने जाऊ लागले की त्याचा 'ट्रेंड' होतो. आणि मग तो ट्रेंड एखाद्या लाटेसारखा सगळ्यांना वाहून नेऊ लागला की त्याची पद्धत किंवा प्रथा होते, आणि इतर पर्यायच दिसेनासे होतात. असंच काहीसं शिक्षणाच्या बाबतीत झालेलं आहे.
हा विषय तसा नवीन नसला, आणि गेले काही महिन्यात याबद्दल बरंच लिहिलं गेलेलं असलं तरी याच्याशी निगडीत काही बाबी लक्षवेधी आहेत, प्रामुख्याने शिक्षणाच्या माध्यमाबद्दल. इंग्रजांपासून दाखला द्यायचा झाला तर इंग्रज अधिकारी लॉर्ड मॅकॉले याने इंग्रजीतून शिक्षणाची मुळं भारतात रोवली. भारतासारख्याच ब्रिटिशांच्या इतर कॉलन्या होत्या त्यांच्यावर अधिक चांगल्या प्रकारे राज्य करता यावं याकरता घेतलेला हा धोरणात्मक निर्णय होता. पुढे कॉलन्या संपल्या, देश स्वतंत्र झाले, जग खुलं झालं आणि लोकांना, देशांना काही गोष्टींचे परिणाम खुपायला, जाणवायला लागले. त्याबद्दल अभ्यास केला गेला, संशोधन केलं गेलं, आणि अनेक गोष्टी समोर आल्या.
#macaulayism
युनेस्को ही जागतिक स्तरावरची संस्था मातृभाषेतून शिक्षणाबद्दल आग्रही आहे. १९९० च्या दशकापासून युनेस्को ने यासंबंधी अनेक लेख, अनेक पेपर प्रकाशित केले असून बहुभाषिक देशांना मातृभाषेतून शिक्षणाचा पुरस्कार करण्याचं सतत आवाहन केलेलं आहे. जगातील ४०% मुलं अशा भाषेत शिक्षण घेतात जी त्यांना सहज समजत नाही आणि जी त्यांची मातृभाषा नाही. पण पुलंनी म्हटल्याप्रमाणे, सायबाची मुंबई म्हटलं की जसा आजही मुंबईकराचा ऊर भरून येतो, तसंच इंग्रजीत बोललं की अजूनही त्या माणसाबद्दल आपल्या मनात श्रेष्ठत्वाची भावना येते. परंतु युनेस्कोच्या या आवाहनांमुळे असेल किंवा स्वजाणिवेतून असेल, इतर अनेक देशांनी मात्र मातृभाषेतून प्राथमिक शिक्षणाचा पुरस्कार केला आहे. काही देशात तर तसे कायदेही आहेत.
नेमके दाखले द्यायचे म्हटले तर, ज्या इंग्लंड देशाची ही भाषा आहे, तिथलीच नावाजलेली संस्था ब्रिटिश काउन्सिल आपल्या 'व्हॉईसेस' मासिकात 'व्हाय स्कूल्स शुड टीच यंग लर्नर्स इन होम लँग्वेज' या शीर्षकाने लेख लिहिते आणि त्यात मातृभाषेतून शिक्षणाचा आकलनशक्ती, बौद्धिक विकास यावर होणारा सकारात्मक परिणाम सांगते. गव्हर्नमेंट ऑफ हाँग काँग ने आपल्या शैक्षणिक धोरणात स्पष्टपणे या विषयी तरतुदी केलेल्या आहेत. युनायटेड अरब अमिराती, अनेक अफ्रिकन देश, जर्मनी, टर्की यासारख्या देशातही या विषयी आवाज उठवला जातोय, बदल घडत आहेत. अफ्रिकेत आणि अनेक युरोपियन देशात तर लोकांनी चळवळी उभा केलेल्या आहेत. आंतरजालावर, सोशल मिडियावर या संबंधीची मुबलक माहिती मिळते.
सोयीस्करपणे एखाद्या गोष्टीकडे दुर्लक्ष करायचा स्वभाव समजू शकतो. परंतु आपल्या मुलाच्या भविष्यासाठी, वाढीसाठी, प्रगतीसाठी जर एखादी गोष्ट चुकीची आहे, आणि जे जागतिक स्तरावर वारंवार सिद्ध होत आहे, तरीही तीच गोष्ट योग्य आहे म्हणण्याला काय म्हणावं हे समजत नाही. हे कुणाला सांगायचा प्रयत्न केला की मात्र मराठी मराठी करणार्या कुठल्यातरी राजकीय पक्षाचे कार्यकर्ते असल्यासारखं सांगणार्याकडे बघितलं जातं. हा झाला महाराष्ट्राचा भाग. इतर राज्यातही बहुतेक इंग्रजीचाच पगडा आहे त्यामुळे भाषिक वैविध्यतेतून खुलणारी संस्कृती आणि तिची संपन्नता ही नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.
वैज्ञानिक दृष्ट्या हे मानवजातीच्या वाढत्या वैफल्याचं मुख्य कारण होऊ शकतं कारण व्यक्त होता येणं ही नुसती भावनिक गरज नसून आरोग्यासाठी अनिवार्य अशी गोष्ट आहे. बहुभाषिक व्यक्तीलाही व्यक्त होण्यास मदत करते ती म्हणजे मातृभाषा. परंतु मातृभाषेतून ज्यांचं शिक्षण झालेलं नसतं त्यांना इतर भाषा शिकणंही अतिशय कठीण जातं आणि मेंदू आणि जग यात भक्कम असा दुवाच निर्माण होत नाही. त्याचं पर्यवसान वैफल्य आणि मानसिक दुर्बलतेत होतं.
या गोष्टी भंपक वाटू शकतात, किंवा वैयक्तिक मतं वाटू शकतात. परंतु याबद्दल अनेक पुस्तकं, अनेक लेख प्रकाशित झालेले आहेत. त्यापैकी काहींचे दुवे खाली दिलेले आहेत. ते वाचावेत अशी विनंती आहे.
आपण अनेकदा समाजाच्या विरुद्ध जायला घाबरतो. सगळे एकीकडे जात असतील तर आपण दुसरीकडे तोंड करायला कचरतो. पण मेंढरं आणि आपण मानव यात फरक आहे हे सिद्ध होत असेल तर ते या एकाच गोष्टीतून आणि ती गोष्ट म्हणजे विचार. विचार केला तर पटतं, की इंग्रजी माध्यमातून न शिकल्याने आपलं काहीही अडलं नाही. वाचलं तर कळतं, की आपल्यासारखेच अनेक आहेत ज्यांचंही काही अडलं नाही. पण 'सगळे' नावाची मंडळी आपापल्या मुलांना इंग्रजी माध्यमातून शिकवतात मग आपणहही तेच केलं पाहिजे हे ठरवताना विचार होत नाही, कारण वेगळं पडणं म्हणजे मागे पडणं नव्हे हेच मुळी लक्षात घेतलं जात नाही. जे योग्य ते योग्यच म्हटलं पाहिजे, कारण मुलांच्या भविष्याचा प्रश्न आहे. भविष्य हे मिळणारी नोकरी, आणि पैसे इथेच संपत असेल तर मात्र मातृभाषेचं स्थान भविष्यात न दिसणं स्वाभाविक आहे.
मुंबई पुण्यातही मातृभाषेचं महत्व पटतंय. हळू हळू का होईना, मनं बदलतायत. इंग्रजी'च्या' शिक्षणासाठी इंग्रजी'तून' शिकण्याची गरज नाही याची जाणीव होते आहे. शासनाकडूनही याला प्रोत्साहन मिळेल अशी आशा करायला हरकत नाही. पण त्या आधी एकत्र यायची तयारी दाखवायला हवी. मग शाळांची अवस्था, तिथली मुलं, तिथले शिक्षक या सगळ्या सबबी सहज दूर होण्यासारख्या वाटायला लागतील. पण एकत्र यायला हवं. मराठीसाठीच नव्हे, प्रत्येक प्रादेशिक भाषेसाठी. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मुलांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी. शेवटी माणसं घडवायची आहेत; शर्यतीचे घोडे नव्हेत.
https://www.britishcouncil.org/voices-magazine/why-schools-should-teach-...
http://www.edb.gov.hk/en/edu-system/primary-secondary/applicable-to-seco...
http://timesofindia.indiatimes.com/home/education/news/Kids-fare-better-...
http://www.thenational.ae/opinion/comment/learning-in-your-mother-tongue...
https://www.culturalsurvival.org/news/mother-tongue-based-education-phil...
http://www.fremdsprachendidaktik.rwth-aachen.de/Ww/programmatisches/pach...
http://www.sbs.com.au/news/article/2016/04/01/calls-increased-mother-ton...
http://www.cu.edu.ph/?page_id=3290
https://www.linkedin.com/pulse/contribution-mother-tongue-reference-prim...
https://www.linkedin.com/pulse/contribution-mother-tongue-reference-prim...
http://www.un.org/apps/news/story.asp?NewsID=50147
http://www.isaet.org/images/extraimages/P1214011.pdf
.
.
मातृभूमी पुण्यभूमी यांची
मातृभूमी पुण्यभूमी यांची लेक्चरं देणारे लोक हमखास लंडनमध्ये सेटल झालेले असतात.
हिंदुत्व , मोघलविरोध यावर तावातावाने बोलणारे लोक गल्फात दिनार मिळवत असतात.
मराठी / मातृभाशा विषयावर राडे करणार्यांची मुले डोण भोस्कोत शिकत असतात.
मायबोलीवर पुर्वी एका धाग्यावर
मायबोलीवर पुर्वी एका धाग्यावर हाच विषय हिरिरीने मांडणारे एक सद्गृहस्थ , तुमचे / मुलांचे शिक्षण माध्यम कोणते आहे , हा प्रश्न विचारताच धूम ठोकून पळाले होते.
...
...
बरं, मग?
बरं, मग?
कोण काय म्हणतो आणि काय करतो
कोण काय म्हणतो आणि काय करतो हे महत्वाचं आहे की विषय महत्वाचा आहे?
विषय महत्वाचा आहे , तर जे लोक
विषय महत्वाचा आहे , तर जे लोक त्याबद्दल लिहितात , त्याचे पालन ते स्वतःच का करत नाहीत ?
निदान प्रार्थमिक शिक्षण तरी
निदान प्रार्थमिक शिक्षण तरी आपापल्या मातॄभाषेतून घेतले जावे हे सुयोग्यच.
शिक्षणाचं माध्यम मातृभाषा
शिक्षणाचं माध्यम मातृभाषा असावी हे मान्य आहेच. (कॉन्व्हेंट वा अन्य इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश न मिळाल्याने वा देणगी द्यायची पालकांची ऐपत नसल्याने का होईना) मराठी माध्यमातून शिकून माझं अगदी छान भलं झालंय.
लेखात संदर्भ म्हणून दिलेले स्क्रीनशॉट्स आवडले. त्यामानाने हा संदर्भ काही तितकासा भारी नाही.
मेकॉलेने अगदी बालवाडीपासून नेटिव्ह लोकांच्या पोरांना इंग्रजी शिकवा असं सांगितलेलं का? माझ्या आईवडिलांच्या काळात व्हर्नाक्युलर फायनल पास होऊन पोरं इंग्रजी पहिलीत जात.
केंद्रीय मानव संसाधन मंत्री आदरणीय स्मृती इराणी सीबीएसईसारखंच वैदिक बोर्ड आणायच्या तयारीत आहेत. आदरणीय बाबा रामदेव हेही असे बोर्ड व त्यांतर्गत शाळा चालवायला उत्सुक आहेत असे कानावर पडले आहे.
अभिजन आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या (शक्यतो कॉन्व्हेंट) शाळांत घालतात व त्यांचे अंधानुकरण बहुजन वर्ग करतो असे दिसते.
वैदिक बोर्ड सुरू होताच अभिजनांनी आपली मुले त्या शाळांत घालावीत असे आवाहन या निमित्ताने करावेसे वाटते. तसेच वैदिक बोर्डाच्या शाळा विदेशांतही उघडाव्यांत जेणेकरून अनिवासी भारतीयांना आपल्या महान संस्कृतीचा ओघ खळाळत ठेवता येईल असेही वाटते.
अपूर्व | 6 June, 2016 - 09:44
अपूर्व | 6 June, 2016 - 09:44 नवीन
बरं, मग?
अपूर्व | 6 June, 2016 - 09:59 नवीन
कोण काय म्हणतो आणि काय करतो हे महत्वाचं आहे की विषय महत्वाचा आहे
<<<
मला वाटते, लोकांना ब्रह्मज्ञान सांगणारा कोरडा पाषाण असेल तर विषयाचे गामभीर्य संपते.
वर एक लिहायचं राहायलं. आपल्या
वर एक लिहायचं राहायलं. आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून शिकवून वर मराठी माध्यमाच्या शाळा बंद पडताहेत म्हणून हळहळ दाखवणारे आणि 'या लोकांना अकला नाहीत. त्यांच्या मुलांना मातृभाषेतीलच शिक्षण योग्य' असे तारे तोडणारे लोक ओळखीत आहेत.
मला वाटते मुलांना एकतर
मला वाटते मुलांना एकतर संपूर्ण मराठी माध्यमातुन शिक्षण घेऊ द्यावे किंव्हा संपूर्ण इंग्रजी माध्यमातून. आजकाल सेमी इंग्रजीचे जे काहि फॅड निघालेय त्यांने मुलांच्या बोलीभाषेवर इतका फरक पडतोय कि विचारु नका.
आज एकाच सेमी इंग्रजी शाळेत हिंदी भाषिक, मराठी भाषिक व इतर मुले एकत्र शिकत असल्याने त्यांच्या रोजच्या बोलण्यात हिंदी, इंग्रजी व मराठी भाषेची सर्रास भेसळ आढळते.
विषय महत्वाचा आहे , तर जे लोक
विषय महत्वाचा आहे , तर जे लोक त्याबद्दल लिहितात , त्याचे पालन ते स्वतःच का करत नाहीत ?
तुम्हाला नेमकं काही बोलायचंय की फाटे फोडायचेत कळत नाही.
प्रसाद - एकदम बरोबर भ्रम -
प्रसाद - एकदम बरोबर
भ्रम - बरोबर मुद्दा आहे. वैदिक बोर्डाबद्दल मत राखीव ठेवतो. पण हे प्रत्येक गोष्टीला धार्मिक वळण का देतात कळत नाही.
पोलाईट घोस्ट - जे कोरडे पाषाण आहेत ते राहूदेत आपण आपलं आपल्या आजूबाजूच्या लोकांचं बघावं. तुमचं मत काय ते सांगा जमल्यास; बाकीच्यांकडे बोटं दाखवतोच आपण एरवी
सगळ्या भाषेची जननी संस्कृत
सगळ्या भाषेची जननी संस्कृत असल्या मुळे मराठी पेक्षा संस्कृत ला जास्त महत्व द्यावे
संस्कृत आली की बाकी भाषा शिकणे सोपे जाईल..
मेकॉलिझम नावाच्या काविळी
मेकॉलिझम नावाच्या काविळी विकीपेजवर सुद्धा "उच्च शिक्षण इंग्रजी माध्यमातून देण्याची सुरुवात करण्यात मेकॉलेचा हात होता" असे म्हटले आहे.
तसंच इंग्रजीत बोललं की अजूनही
तसंच इंग्रजीत बोललं की अजूनही त्या माणसाबद्दल आपल्या मनात श्रेष्ठत्वाची भावना येते.
१९६० च्या द्शकात आम्हालाहि तसेच वाटायचे. पुढे १९७० नंतर अमेरिका, इंग्लंड इथे गेल्यावर कळले की तसे
काही नसते. दहा बारा वर्षांनंतर तर अशीहि शंका यायला लागली की इंग्रजी बोलणार्यांना बहुधा कमीच अक्कल असावी - अहो इंग्रजी सुद्धा धड बोलता लिहिता येत नाही हो.
तीच गोष्ट गोर्या कातडीची.
बाकी भाषा हा शिकायचा विषय आहे - बरेच वाचन करावे लागते, शिकलेल्यांच्या सहवासात फिरावे लागते, मग खरी भाषा यायला लागते. तर मातृभाषा आहे म्हणून आपोआप येईल असे नसते - ती पण नीट अभ्यासावी लागते, वाचन करायला पाहिजे, म्हणजे भाषेचे निरनिराळे प्रकार - जसे नागपुरी मराठी, पुणेरी मराठी इ. असे कळतात.
आजकाल जर कुणी मराठी पुस्तके फारच कमी वाचत असतील तर बिचार्यांना मराठी शब्द कसे सुचणार?
नि आजकाल मराठी पुस्तकांत तरी मराठी किती नि इंग्रजी किती?
शिवाय जरी मराठीत लिहीले तरी ते लोकांना वाचावेसेच वाटले नाही तर?
मग बोलताना - परवानगी शब्द लक्षात यायच्या आधी परमिशन च आठवतो. मग काहीतरी धेडगुजरी बोलायचे - ना धड इंग्लिश, ना धड मराठी - बरेचसे शब्द इंग्रजी, त्यांना मराठी प्रत्यय, व्याकरणाचा पत्ता नाही!
जाउ दे - व्यवहाराची भाषा म्हणून काही पण चालते! तिथे दुसर्याला समजेल असेच बोलले पाहिजे.
वाचण्याजोगे लिखाण कुठल्याहि भाषेत असेल तर ते समजण्यापुरती तरी ती भाषा शिकायचा उत्साह येईल -
तसे आहे का मराठीत? आजकालच्या जगात जाहिरात केल्याशिवाय त्याबद्दल कुणाला काही कळत नाही!
नि वाचन, लेखन मराठीत वाढले नाही तर मराठीची गोडी लागणार कशी?
संस्कृतचे काय झाले? कारणे माहित नाहीत पण हळू हळू लिखाण कमी झाले, मनोरंजक असे काही लिहीलेले, ज्या योगे भाषेची गोडी लागेल असे कमी होता होता जवळपास संपले. वास्तविक जे संस्कृत शिकले त्यांना माहित आहे की संस्कृत किती छान भाषा आहे. म्हणून आजकाल अमेरिकेत, युरोपमधे पण बरेचसे अभारतीय संस्कृत शिकतात.
वाटल्यास निदान दिवसाचा एखादा तास तरी मराठी भाषेसाठी ठेवावा. फक्त मराठी शिकू इच्छिणार्या लोकांसाठी. नि वाचन, लेखन मराठीत वाढले नाही तर मराठीची गोडी लागणार कशी?
हटकेश्वर. हटकेश्वर!!
हटकेश्वर. हटकेश्वर!!
मला वाटते, लोकांना
मला वाटते, लोकांना ब्रह्मज्ञान सांगणारा कोरडा पाषाण असेल तर विषयाचे गामभीर्य संपते.
असे लोक असतातच - ते कुठल्याहि विषयावर बोलतात.
म्हणून विषयाचे गांभीर्य कसे संपेल? चर्चेचे गांभीर्य संपेल.
पण स्वतःला जर विषय गंभीर आहे असे वाटत असेल तर असल्या लोकांकडे दुर्लक्ष करून आपण लिहावे.
नसेल लिहायचे तर नाही लिहीले तरी चालेल - विषयच गंभीर नाही हे स्वतःचे (बनवलेले) मत सांगायलाहि हरकत नाही. ज्यांना वाटेल विषय गंभीर आहे, ते लिहीतील. ( त्यांच्या भावना का दुखावता? :))
मेकॉलेला लोक का शिव्या देतात
मेकॉलेला लोक का शिव्या देतात ?
वर वर चाळला. आता स्टॅमिना
वर वर चाळला. आता स्टॅमिना नाही उरला. मेंदूची क्षमता दिवसाला १३ हजार शब्दांची आहे, आज १३ लाख आदळले असावेत...
तर मेकॉ लेला काही न काही दूषणे दिलीत कि नाही ? म्हणजे वाचायला निवांत...
बिच्चारा
ज्या देशात शिकायलाच बंदी होती तिथल्या लोकांना शिकवायला गेला, त्यासाठी त्याच्या मंदबुद्धीप्रमाणे काही मॉडेल्स बनवली, आता त्याला काय कल्पना कि पुढे अत्यंत विद्वान मंडली या शिक्षणातून निपजतीला आणि मेकॉलेलाच आरोपी करतील.
त्याने इंग्रजी मधलं ज्ञान भाषांतरीत करून द्यायला हवं होतं, भारतीय गौरवशाली परंपरा , ज्या संस्कृतसारख्या बुरख्यातल्या भाषेत कुलूपबंद होत्या, वाचून इंग्लीशच ज्ञान कसं साधारण आहे हे सांगायला हवं होतं.... हे सर्व नाही केलं म्हणून त्याला आता झोडून घेणं गरजेचंच आहे.
एक शंका आहे.
मूल मातृभाषेतून विचार करतं , किती दिवस ? कधी न कधी त्याला इतर भाषेतून शिकायची वेळ येईलच ना ? त्या वेळी त्याला विचार मातृभाषेत करून परकीय भाषेतून शिकायची पाळी येईलच.
याबाबतीत आपलं मार्गदर्शन हवं आहे.
इंग्रजी सत्तेल्ला नोकर
इंग्रजी सत्तेल्ला नोकर निर्माण करता यावेत म्हणून लोकाना इंग्रजी शिकवावे , या मेकॉलेच्या वाक्यात गैर काय आहे म्हणे ? सत्ताधीश इंग्रज असेल तर तो त्याला हवी ती भाषाच नोकाराना शिइकवणार ना? की, महाराष्ट्रातील इंग्रजानी मराठी आणि बंगालातील इंग्रजानी बंगाली शिकायला हवी होती ?
इंग्रज आणि मेकॉले यांच्यामुळे आजची पिढी मुक्त ज्ञान , मुक्त करियर यांचा अनुभव घेत आहे, हे वास्तव आहे.
आणि समजा, गुरुकुल व मातृभाषा अधिक गुणकारी असेलच, तर तशी व्यवस्था निर्माण करुन दाखवावी. एम बी बी एस च्या एकवीस विषयातील एकेका चॅप्टरचे जरी मराठी भाषांतर कुणी करुन दाखवेल तर ..... तर .... मी त्याला १०० रु बक्षिस देईन .
इंग्रजी शाळा, इंग्रजी शिक्षण इतके वाइट आहे व आश्रम गुरुकुल इतके चांगले आहे, तर टिळक आगरकरांनी इंग्रजी शाळा का सुरु केल्या - आश्रम का नाही स्थापन केले? सावरकर आंबेडकर संस्कृत गुरुकुलात जायचे सोडून इंग्रजी डिग्र्या का घेत बसले ?
माझा एक मित्र १२ वी होऊन व कुठलीतरी जुजबी कॉम्प्युटरची डिग्री घेऊन एका कंपनीत कामाला होता. एच आर बोलली ... हल्ली सगळे प्रेझेंटेशन वगैरे चांगल्या इंग्रजीत झाले पाहिजे, नुसते काँप्युटरचे ज्ञ्यान उपयोगी नाही. त्याला ते जमेना.... इंग्रजी कच्चे आहे.... व्हायचे तेच झाले, कंपनीने इंग्रजी चांगला येणारा दुसरा माणूस नेमला तोही त्याच्यापेक्षा जास्त पगार देऊन.
मराठीतुन शिक्षण घ्या, इंग्रजी नको वगैरे बोलणारे लोक त्या मित्राला नोकरी देऊ शकतील का?
इंग्रजीतूनच शिका हा सरकारचा अट्टहास नाही. सरकारने मराठी इंग्रजी सेमी माध्यमे उपलब्ध केलेली आहेत, तसेच उपलब्धतेनुसार इतर भारतीय भाषातील माध्यमेही भारतभर आहेत.. तुम्ही तुमचा चॉईस निवडायचा आहे. सरकार , समाज , मेकॉले , व्हिक्टोरिया आज्जी .. इत्यादीवर विनाकारण चिखलफेक कशाला करायची ?
mugdhagode, तुमच्या प्रत्येक
mugdhagode, तुमच्या प्रत्येक पोस्ट ला अनुमोदन.
मराठी बोलणार्याची किंवा मराठीतुन शिकणार्याची मनसोक्त खिल्ली उडवली जाते तथाकथित विंग्रजी उच्च शिक्षिता कडुन
गावाकडच्या मुलांमधे इग्लिश न येण्या मुळे एक प्रकारचा न्युनगंड निर्मान होतो किंवा तो निर्मान करवला जातो..
जे मराठी भाषेच गुन्गान करतात ते स्वःता हा इग्लिश धारक असतात व त्यांच्या मुलांना ते इग्लिश माध्यमातुन शिकवतात पण त्यांच्या मनात एक सुप्त इच्छा असते की बहुजनांतिल इतरांनी ही भाषा शिकु नये ..त्या मुळे ते मातृभाषेचे व संस्कृत चे गोडवे गात असतात..
आपली मुलं इंग्रजी शाळेत घालून
आपली मुलं इंग्रजी शाळेत घालून मराठीचं महत्व पटवून देण्याचं महान कार्य करावं वाटतं. परदेशात सेटल होऊन भारत सुधारावा असं वाटतं तसंच. आपल्याला सर्वांचंच पटतं, म्हणून मुलांना सांगितलेलं आहे कि भारत सुधारता येत नसेल तर सुधारलेल्या देशात जा. तुमच्या मुलांना मातृभाषेतून शिकता यावं यासाठी त्यांची मातृभाषा इंग्रजी असेल याची काळजी घ्या. म्हणजे ते मातृभाषेतच विचार करेल. त्याला एक्स्ट्रा विषय म्हणून मराठी, संस्कृत, पाली , अर्धमागधी शिकवा आणि भारतात येऊन मराठी भाषेचं संवर्धन याबद्दल काम करा. जेव्हां मराठी भाषेत जर्मनी सारखं ज्ञान उपलब्ध होईल तेव्हां आम्ही पुन्हा महाराष्ट्रात परतू आणि मराठी शिकू. हाकानाका.
जे मराठी भाषेच गुन्गान करतात
जे मराठी भाषेच गुन्गान करतात ते स्वःता हा इग्लिश धारक असतात व त्यांच्या मुलांना ते इग्लिश माध्यमातुन शिकवतात पण त्यांच्या मनात एक सुप्त इच्छा असते की बहुजनांतिल इतरांनी ही भाषा शिकु नये ..त्या मुळे ते मातृभाषेचे व संस्कृत चे गोडवे गात असतात.
अनुमोदन.
धागा वाचल्यावर सर्वप्रथम मी लिहिणार्याचे पूर्ण नाव पाहिले होते.
असे धागे काढणारे लोक हे नेमके ठराविकच असतात व ' तुमची मुले कुठल्या माध्यमात शिकतात , हे विचारले की तोंड काळे करतात.
मेकॉलेने जे केले ते त्याच्या
मेकॉलेने जे केले ते त्याच्या वसाहतवादी विचारांना साजेसेच होते. त्याच्या या पद्धतीमुळे मोजक्याच पण जन्मजात प्रतिभावान लोकांनाच शिक्षण देणारी आपली उच्च संस्कृती मोडीत निघाली व वाट्टेल ते लोक शाळेत जाउ लागले. आध्यात्म, व्याकरण, तत्वज्ञान, ज्योतिष इत्यादी जीवनोपयोगी विषय मागे पडून विज्ञान, तंत्रज्ञान इत्यादी पाश्चात्य थेरे वाढली. (ज्यातल्या अनेक गोष्टी आमच्या ऋषींनी हजारो वर्षापूर्वीच सांगीतल्या होत्या)
पण स्वातंत्र्य मिळाल्यावर तरी ती पद्धती का बदलली नाही? हा सगळा गेल्या ६० वर्षातील गोंधळाचा परिणाम आहे. पण आता गेल्या दोन वर्षापासून हळूहळु बदल होतो आहे.
mugdhagode | 7 June, 2016 -
mugdhagode | 7 June, 2016 - 04:53 नवीन>>>> जामोप्यांशी सहमत.
मराठी मराठी करण्यार्यानी आधी अकरावी बारावीमध्ये मराठी माध्यमात शिकलेल्या विज्ञान शाखेतल्या मुलांचे काय हाल होतात ते बघावं . रुपारेलमध्ये माझ्या मित्रमैत्रिणीची हालत जवळून बघितलीये. आधी तो शब्द समजून घ्या . मग तो लक्षात ठेवा वगैरे सव्यापसव्य.
ते प्रेझेंटेशनमध्ये कमी पडायचं उदाहरण तर माझ्याही ऑफिसात आहे. ऑफिसतला एकाला कंपनी law च उच्च दर्जाचं नॉलेज असूनही केवळ इंग्लिश कच्चे असल्याने एमडी समोर प्रेझेंटेशन नीट देता येत नाही. अश्या वेळी मायमराठीचे गोडवे प्रमोशनला अडथळे आणतात
मराठी मराठी अभिमान म्हणून ठीक आहे पण जर कॉर्पोरेटमध्ये तगायच असेल तर सफाईदार इंग्रजीला पर्याय नाही.
याचा अर्थ मराठीला कमी लेखणे होत नाही. पण आजच्या जगात उत्तम इंग्रजी येणं ही अपरिहार्यता आहे
मी माझे वाक्य जरा बदलतोय
मी माझे वाक्य जरा बदलतोय मंडळी
प्रार्थमिक शिक्षण आपापल्या मातृभाषेतून घेतले जावे हे सुयोग्य.
मराठी मराठी करण्यार्यानी आधी
मराठी मराठी करण्यार्यानी आधी अकरावी बारावीमध्ये मराठी माध्यमात शिकलेल्या विज्ञान शाखेतल्या मुलांचे काय हाल होतात ते बघावं >> सहमत. मला तर पहिला महिनाभर काहीच कळत नव्हतं. खरं तर फिजिक्स मधे जे शिकवले जात होते ते १०वी मधे 'भौतिक' मधे झालेलेच होते. पण संज्ञा काहीच कळत नव्हत्या. मग पुन्हा दहावीची पुस्तके काढली. त्यात शेवटी मराठी संज्ञांसाठी इंग्रजी प्रतिशब्द होताच. ते वाचुन वाचुन मग थोडे कळु लागले. कठोर परीश्रमास पर्याय नाही याचा अर्थ तेव्हा कळला.
त्यात शेवटी मराठी संज्ञांसाठी
त्यात शेवटी मराठी संज्ञांसाठी इंग्रजी प्रतिशब्द होताच. ते वाचुन वाचुन मग थोडे कळु लागले. कठोर परीश्रमास पर्याय नाही याचा अर्थ तेव्हा कळला.>> मीही हेच केले होते पण ७ वी नंतर कारण माझे सेमी ईंग्रजी माध्यम होते. आमची बॅच सेमी घेणारी पहिली बॅच होती. मी सातवीच्या उन्हाळ्याच्या सुट्यांमधे पुस्तकामागचे सगळे शब्द पाठ केलेत. मला अजूनही आठवते जडत्व = इनर्शिया - हा शब्द मी पहिल्यांदा पाठ केला होती. त्यानंतर उत्प्रेरक = कॅटॅलिस्ट हा दुसरा शब्द होता पेशी = सेल.. असे अनेक शब्द आठवतात.
Pages