एकदा आठवडी बाजारात एक मनुष्य घोडा विकत घ्या, घोडा असे ओरडत होता. त्याच्या समोर काही ग्राहकही दिसत होते आणि घासाघीस करत होते. लोक त्या दृश्याकडे पाहून हसत होते. काही तसेच पुढे जात तर काही तिथे रेंगाळत.यातल्या काहींना शांत बसून गंमत पहायची होती तर काही मात्र न राहवून विचारत होते कि
"अहो घोडा कुठेय इथे ? "
त्यावर त्या विक्रेत्याने अतिशय तुच्छ कटाक्ष टाकत सोबतच्या चतुष्पाद प्राण्याकडे अंगुलीनिर्देश केला. त्याबरोबर प्रश्नकर्ता खो खो हसू लागला. विक्रेत्याबरोबरच आधीपासून असलेले ग्राहक आणि इतर लोक चिडून त्याच्याकडे पाहू लागले .
हसणे थांबवून प्रश्नकर्ता म्हणाला "अहो ते गाढव आहे. त्याला घोडा काय म्हणताय ?"
विक्रेता अत्यंत तिरस्काराने म्हणाला, " तुम्हाला काय माहीत घोडा आणि गाढवातला फरक ? हा घोडा आहे "
ग्राहक आणि पूर्वीपासून थांबलेल्या लोकांनीही ते गाढव नसून घोडा आहे याला दुजोरा दिला. शांतपणे उभे असलेले लोक अद्याप गंमत पाहत होते.
प्रश्नकर्ता आता भांबावला " अहो तुम्ही चक्क गाढवाला घोडा ठरवताय ! "
विक्रेत्याने आता त्या प्राण्याचा फोटो असलेलं एक पत्रक दाखवलं. त्यावर घोडा विकणे आहे. किंमत पाच हजार रूपये असं लिहीलेलं होतं.
त्याने पेप्रात दिलेल्या जाहीराती दाखवल्या. अनेक शहरात जाहीराती लावलेल्या त्याचे फोटो दाखवले.
"इतक्या ठिकाणी फोटो लावले, जर गाढव असतं तर लोकांनी ऐकून घेतलं असतं का ? तुम्हाला घोडा कसा असतो हे माहीत आहे का ?"
यावर प्रश्नकर्त्याने घोड्याचे वर्णन केले. त्यातले चार पाय, तोंडाचे वर्णन इत्यादी सर्व या प्राण्याला लागू पडत होते. पण कुणाचे समाधान होत नव्हते.
आता विक्रेता म्हणाला आतापर्यंत माझा खर्चच दहा हजार झाला आहे. त्यामुळे हा घोडा आता पंधरा हजाराच्या खाली मिळणार नाही. ग्राहक आणि विक्रेता यांच्यातला सौदा पुन्हा चालू झाला.
आता प्रश्नकर्ताही गोंधळला. त्यालाही आपल्या स्वतःबद्दल शंका येऊ लागली. इतक्या ठामपणे म्हणताहेत तर त्यांचं खरं नसेल ना ? आपणच लहानपणापासून भलत्याच प्राण्याला घोडा समजत असलो तर अशा शंकेने त्याच्या मनाला ग्रासले.
इतक्यात आणखी एक गंमत झाली. एक मनुष्य आला आणि घोडा घ्या घोडा असे म्हणू लागला. त्याबरोबर शांत असलेले लोक तिकडे गेले. घोड्याची किंमत पाच हजार सांगितली. पण चार ग्राहक निघाले. त्यामुळे जादा किंमत देणारास घोडा असे ठरले. तो घोडा दहा हजारात विकला गेला. पंधरा मिनिटात पाच हजाराचा फायदा कमावून मनुष्य जाऊ लागला.
त्याबरोबर प्रश्नकर्त्याने त्याला थांबवले.
"तुम्ही आता कोणता प्राणी विकला ?"
नवा विक्रेता म्हणाला " घोडा"
यावर आनंदाने उसळून प्रश्नकर्ता म्हणाला " आणि हा कोणता प्राणी आहे ?"
नवा विक्रेता त्या प्राण्याला हसून म्हणाला " अहो हे गळ्यात घोडा अशी पाटी लावलेले गाढव आहे. कोण घेणार त्याला पंधरा हजार देऊन ? फारतर एक हजार खूप झाले "
आता प्रश्नकर्ता चेकाळून म्हणाला "पाहीलंत ? मी म्हणत होतो ना हे गाढव आहे म्हणून, आणि यांनी या गाढवाला घोडा म्हणण्यासाठी दहा हजार रूपये जाहीरातीसाठी खर्च केलेत "
त्यावर पूर्वीचे ग्राहक वाद घालू लागले. नवा विक्रेता म्हणाला यांच्याशी वाद घालून फायदा नाही. यांचा त्या माणसावर विश्वास आहे आणि तो माणूस चक्क खोटे बोलतोय हे ज्यांना कळतेय ते शांतपणे गंमत पाहत आहेत. दहा हजार जाहिरातींवर खर्च करण्याऐवजी त्याने पंधरा हजारात उत्तम प्रतीचे तीन घोडे आणले असते तर आतापर्यंत तीस हजाराची कमाई करून तो घरी गेला असता...
बोधकथा येथे संपली.
एक हजार करोड घालवून ज्याची जाहीरात आणि उत्सव चालला आहे तो विकास गाढव आहे की घोडा याच्या बद्दल काही लोक शांतपणे गंमत पाहत आहेत...
(No subject)
मार्मिक शब्दांत सत्य कथन.
मार्मिक शब्दांत सत्य कथन.
मस्त आहे बोधकथा तो विकास
मस्त आहे बोधकथा
तो विकास गाढव आहे की घोडा >>>>>>+ १
मस्तं! खूप छान आहे
मस्तं!
खूप छान आहे गोष्ट.
तुमच्या आयडीसह व्हॉटसॅपवर शेअर केले तर चालेल का?
हो . नक्कीच. आयडी नाही दिला
हो . नक्कीच. आयडी नाही दिला तरी चालेल.
(No subject)
धन्यवाद!
धन्यवाद!
आतां घोड्यालाच "गाढव" ही पाटी
आतां घोड्यालाच "गाढव" ही पाटी गळ्यात अडकवून मिरवायची हौस आली, तर कोण काय करणार !
असो. ज्यापासून कुणी कांहींच बोध घेत नाहीं, तिलाच बोधकथा म्हणायचे दिवस आलेत !!
भाऊ तुमच्या प्रतिसादामुळे
भाऊ
तुमच्या प्रतिसादामुळे अडल्या नडलेल्यांची सोय झाली.
मी तर अस ऐकलय की वैष्णोदेवी
मी तर अस ऐकलय की वैष्णोदेवी वगैरे सारक्या धार्मिक ठिकाणी खेचर जास्त उपयुक्त असते. तिथे दर्शन वा यात्रा हा मुख्य उद्देश असल्याने ते गाढव की घोडा या फंदात पडत नाही व पुण्य पदरात पाडून घेतात.
वा , जख्मी दिलकी दास्तां! मान
वा , जख्मी दिलकी दास्तां! मान गये उस्ताद
घाटपांडेजी तुमचा उद्देश
घाटपांडेजी
तुमचा उद्देश धार्मिक असेल तर तर्क करायचाच कशाला ? श्रद्धा महत्वाची, नाही का ? घोडा म्हटलं की घोडाच !! प्रश्नच नाही येत.
स्वतःला घोडा व पूर्वीच्या
स्वतःला घोडा व पूर्वीच्या सरकारला गाढव म्हणणारा नवा घोडा जुन्यागाढवाना आपल्या पक्षात घेत आहे.
म्हणजे संकरातून खेचर तयार होणार का ?
मला वाटते ती शांतपणे गंम्मत
मला वाटते ती शांतपणे गंम्मत पाहणारी लोक, सोकॉल्ड पुरोगामी "गाढवे" असावीत.
अरेच्चा, कथेत कुठेही
अरेच्चा, कथेत कुठेही पुरोगामी , सेक्युलर हे शब्द नसताना काहींची तडफड का सुरू व्हावी ?
आयडी उगाच नाही घेतला असे काही लोक म्हणताहेत त्याची प्रचिती आली.
दुगाण्या झाडत आलंच नवा गाढव!
दुगाण्या झाडत आलंच नवा गाढव!
घोड्यावरुन एक किस्सा
घोड्यावरुन एक किस्सा आठवला
दोन विद्वान लोकांचे रस्त्यावर् एका झाडाखाली वाद चाललेला असतो. घोड्याला दात किती? एक म्हणतो अमुक अमुक ग्रंथानुसार घोड्याला दात अमुक अमुक.दुसरा म्हणतो 'नाहि' तमुक तमुक ग्रंथानुसार घोड्याला दात तमुक. मग दोघे एकमेकांच्या विद्वत्ते बद्दल शंका घेतात. तेवड्यात एक वाटसरु तेथुन चाललेला असतो तो म्हणतो कि जवळच येथे पागा आहे आपण जाउन तिथे पाहु. दोघे एक होतात व त्या वाटसरुला म्हणतात अरे विद्वान तु कि आम्हि?
विठ्ठल | 4 June, 2016 - 10:48
विठ्ठल | 4 June, 2016 - 10:48 नवीन
दुगाण्या झाडत आलंच नवा गाढव!
<<
अहो "जामोप्या" तुम्हाला नाही म्हटले मी, पुरोगामी गाढव. तुम्ही का उगाच चिडताय?
(No subject)
नवीन वाचक अचानक पुरोगाम्यांवर
नवीन वाचक अचानक पुरोगाम्यांवर का घ्सरले बरं?
कोण चिडतंय ते दिसतंय, का ते त्यांनीच सांगावं
नाथाभौना गाडाव नाही आवाडलं.
नाथाभौना गाडाव नाही आवाडलं. राजीनामा दिला ना भौ त्येंनी.
बोधकथा आवडली.
बोधकथा आवडली.