Submitted by मनिषा लिमये on 8 February, 2011 - 01:26
काल माझ्या फोनवर एका वेगळ्याच नंबरवरुन कॉल आला. ९२ पासुन सुरु होणारा नंबर होता तो. मला मिसकॉल दिसल्यावर मी त्यावर फोन केला . तर पलिकडचा माणुस तुम्हाला लॉटरी लागली आहे आणि बरच काही बोलायला लागला. मी फोन ठेऊन दिला. नंतर नवर्याशी बोलताना तो ९२ म्हणजे पाकिस्तानी नंबर असावा अशी चर्चा झाली आणि आज नवर्याच्या फोनवरही अशाच ९२ ने सुरु होणार्या नम्बरवरुन कॉल आला. मग नेटवर शोधाशोध केली असता हे सापडले
http://cribb.in/airtel-customers-getting-fraud-calls-from-pakistan.htm
http://www.consumercomplaints.in/complaints/355670/page/4
http://www.google.co.in/search?hl=en&source=hp&q=airtel+nos+getting+call...
तेव्हा अशा नंबरचे कॉल्स घेऊ नका
मला आलेला नंबर९२३४७९०२७७०१
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मजेदार अनुभव लिहिते म्हणाले
मजेदार अनुभव लिहिते म्हणाले होते. राहूनच गेले.
तर हा एक फोनचा किस्सा -
संसद हल्ल्यानंतर ऑपरेशन पराक्रम सुरू झाले होते. तेव्हा आम्ही फिरोजपूरला होतो. माझे पहिलेच युनिट पोस्टिंग. बरेचसे ऑफिसर्स फॉरवर्ड एरियात होते आणि बायका एकट्या घरी. त्यावेळी अश्या बायकांना फोन येत आणि पलीकडील व्यक्ती आपण आर्मीतले सिनिअर ऑफिसर आहोत असे भासवून बायकांकडून बरीचशी माहिती काढून घेत असे. नंतर ते फोन सीमेपलिकडून आले असल्याचे कळत असे.
त्यामुळे, बायकांनी फोनवर कोणतीही माहिती देऊ नये अशी ऑर्डर आली होती. मी नवी असल्याने फारच सावध असे.

मग एकदा नवरा काही कामानिमित्त बंगलोरला गेला.
तो गेला त्याच दिवशी संध्याकाळी एक फोन आला. सुरुवातीला हाय हॅलो झाले आणि मग
पलीकडील व्यक्ती एकदम मराठीत बोलायला लागली.
प. व्य . - मॅम, मी कॅप्टन पाटील बोलतोय.
मी - मैं आपको नहीं जानती ( स्टेशन छोटे असल्याने साधारण सगळेच ओळखीचे होते. त्यातून मराठी माणसं तर मी आवर्जून शोधत असे. पण मी कोणा पाटील ला ओळखत नव्हते. मनात विचार केला - या लोकांचा अभ्यास तगडा आहे. नावपण मराठी शोधले आहे.)
प. व्य. - मॅम, मी कालच भेटलो सरांना. ( नवीन लग्न असल्याने नवरा बराच बोलत असे माझ्याशी, दिवसभराचा सगळा रिपोर्ट देत असे, पण त्यानेही असे काही सांगितले नव्हते)
मी - ओके. ( मी सावधच . मनात - या पाकिस्तान्यांनी मराठीपण शिकून घेतले की काय? :अओ:)
प. व्य. - सर गेले का बंगलोरला?
मी - (आता अजूनच सावध होऊन) नाही. कॅन्सल झाले. ( कसली मी हुश्शार!!!)
प. व्य. - ओके. काल म्हणाले होते की आज जाणार आहेत. असो. आमच्या घरी हळदीकुंकू आहे परवा. त्याचे आमंत्रण द्यायला फोन केला होता. मी ***** मध्ये राहतो. घर नंबर ****. मी तुम्हांला घ्यायला येऊ की तुम्ही येऊ शकाल?
मी - ( आता मात्र जरा गडबडले. तरी सावध होऊन) परवाचे काही नक्की नाही. मी उद्या सांगू शकेन.
प. व्य. - ओके. मी उद्या फोन करतो परत.
मग बाय बाय होऊन फोन ठेवला
रात्री नवर्याचा फोन आल्यावर विचारले तर तो म्हणाला," अगं हो, मी तुला सांगायला विसरलो. ते पाटील भेटले होते मला. ह.कुं. बद्दलही बोलले होते ते." :रागः
मग त्याच्यावर मस्त तोफ डागली मी.
दुसरे दिवशी दुपारी पाटलांचा फोन आल्यावर आधी 'सॉरी' म्हणाले.
तर ते म्हणाले," मॅम, अब तो आदत हो चुकी है. अब तो खुदके घरपे भी कभी फोन करो, तो बीबीभी ठीकसे साफ साफ बात नहीं करती."
तर ते म्हणाले," मॅम, अब तो
तर ते म्हणाले," मॅम, अब तो आदत हो चुकी है. अब तो खुदके घरपे भी कभी फोन करो, तो बीबीभी ठीकसे साफ साफ बात नहीं करती."
<<
ते कॅप्टन पाटील मराठी भाषिक होते तर मग हे वरचे वाक्य हिंदीतून का बोलले तुमच्याशी?
अहो, बाकीच्यांशी हिंदी बोलून
अहो, बाकीच्यांशी हिंदी बोलून बोलून इतकी सवय झालेली असते की कधी कधी हिंदीच बोलले जाते आपसांत.
शिवाय, कदाचित ऑफिसातून फोन केला असेल आणि आजूबाजूला कोणी अमराठी असेल तर हिंदी/इंग्रजीतच बोलतात फोनवर सगळे.
या माहितीबद्दल धन्यवाद.
या माहितीबद्दल धन्यवाद. माझ्याही नंबरवर असे मिसकॅाल्स दिसतात अधूनमधून. पण सुरुवातीचा ९२ संशय वाढवत असल्याने मी त्याला कधी प्रतिसाद दिलेला नाही. बऱ्याचदा इकडे रिंग होत नाही पण मिसकॅाल दिसतो.
पाकिस्तान्यांना आर्मीतल्या
पाकिस्तान्यांना आर्मीतल्या लोकांचे, त्यांच्या कुटुंबाचे नंबर कसे मिळत असतील?
खडसेंनी हा धागा वाचलेला दिसत
खडसेंनी हा धागा वाचलेला दिसत नाही का?
त्यांना जर आवडत असेल असे कॉल
त्यांना जर आवडत असेल असे कॉल आलेले तर?
USA मधुन Vonage च्या
USA मधुन Vonage च्या माध्यमातुन कॉल केला तर भारतात बर्याच वेळा कॉलर आयडी वर +९२ .... असे दिसते
Pages