'फॅण्ड्री' च्या शेवटी जब्या आणि त्याचं पूर्ण कुटुंब डुक्कराच्या मागे लागलेले दाखवले आहेत. त्यांची आणि डुक्कराची ती धडपड, पळापळ बराच वेळ चालते. पळून पळून जब्याचा बाप इतका दमतो की त्याच्या अक्षरश: छातीचा भाता होतो. ही सगळी पळापळ हळूहळू करत जब्याच्या शाळेभोवतीच्या परिसरात येते. मग जब्या त्याचे सवंगडी आणि 'ती'च्यापासून स्वत:चं तोंड लपवण्याचा अयशस्वी प्रयत्न करत राहतो. त्या प्रयत्नात १-२ वेळा पकडता येऊ शकणारं डुक्कर निसटतं. बाप खूप शिव्या घालतो. अखेरीस जब्या परिस्थितीला शरण जातो आणि आपलं हे अस्तित्व स्वीकारतो. त्याची लव्ह स्टोरी त्याच्या कधीही न वाचल्या जाऊ शकणाऱ्या एका कागदोपत्री फुटकळ इतिहासात जमा होते आणि त्या लव्ह स्टोरीचा पूर्णविराम म्हणून तो एक दगड थेट आपल्याकडे - कॅमेऱ्याच्या दिशेने - फेकतो. कहाणी संपते. बराच वेळ चाललेला डुक्कर पकडण्याचा प्रसंग ठळकपणे लक्षात राहतो. लक्षात राहते जब्याची केविलवाणी धडपड आणि त्याच्याहीपेक्षा केविलवाणा त्याचा बाप. 'फॅण्ड्री' मधला हा शेवटचा प्रसंग चालतो बराच वेळ, पण तरी तो लांबलेला वाटत नाही. किंबहुना 'फॅण्ड्री' एकूणच ची लांबी हे त्याचं एक बलस्थानच होतं. जेमतेम शंभर मिनिटं - साधारण पावणे दोन तास फक्त - चालते ती कहाणी.
'फॅण्ड्री' चं अजून एक बलस्थान होतं 'नाविन्य'. ती एक अशी कहाणी होती, जी कुणी कधी ह्यापूर्वी सांगितली नव्हती. कुणाला ते कदाचित पेलणारंच नव्हतं. 'हे दाखवून काय मिळणार आहे', असाच विचार त्यामागे असावा, कारण ती कहाणी कुणाला माहित नव्हती किंवा कुणी पाहिलेली नव्हती, असं तर नक्कीच नव्हतं. नागराज मंजुळेंनी ते आव्हान पेललं. मी असं म्हणणार नाही की, 'त्यांनी तो धोका पत्करला.' त्यांना त्यात धोका वगैरे वाटायचा प्रश्नच नव्हता. कारण काही कमवण्यासाठी ती कलाकृती नव्हतीच, त्यामुळे काही गमवण्याचा किंवा न कमवण्याचा धोकाच उद्भवत नाही.
'फॅण्ड्री'मध्ये मला काय आवडलं असं मला कुणी विचारलं, तर उत्तर सोपं आहे. 'उत्कटता.' आणि ही जी उत्कटता 'फॅण्ड्री'त आहे, ती माझ्या मते तरी वरील दोन कारणांमुळे आहे.
'सैराट' ह्याच दोन बाबतींत 'फॅण्ड्री'समोर खूपच कमी पडतो.
तब्बल तीन तासांची लांबी, 'सैराट'ला खऱ्या अर्थाने पसरट करते. सुरुवातीच्या कमीत कमी एक तासाच्या चित्रपटाला जर पूर्णपणे कापून टाकलं असतं, तर काय झालं असतं, असा एक विचार मनात येतो. हा एक तास - सव्वा तासाचा सिनेमा चक्क रवी जाधवांनी केलेला वाटतो. ह्या तास - सव्वा तासात मिसरूड फुटलेली पोरं टवाळक्या करतात. समवयस्क मुलींवर लाईन मारतात. ह्या तास - सव्वा तासात किती तरी वेळा नायक-नायिका एकमेकांशी फुल्ल फिल्मी नजरानजर करतात. म्हणजे बाजूनी जाता जाता नजरा भिडवणे वगैरे..! लव्ह लेटर्स दिली जातात आणि टाका भिडतो.
मग अजय-अतुलच्या ट्रेडमार्क स्टाईलच्या बुंगाट गाण्यावर पब्लिक झिंगाट नाचतं आणि त्यानंतर खरा सिनेमा सुरु होतो.
इथून पुढचा सिनेमा क़यामत से क़यामत तक़, इशक़जादे, साथिया अश्या काही सिनेमांचं 'सुधारित मिश्रण' आहे. QSQT मध्ये खानदानी दुष्मनी असते, इथे जातीय भेद. QSQT मध्ये नायिकेकडच्या एका कौटुंबिक सोहळ्याच्या वेळी प्रेम प्रकरण उघडकीला येतं, इथेही तसंच. QSQT मध्ये दोघे जण पळून जातात आणि एका तात्पुरत्या घरात आश्रय घेतात, तेव्हा समजतं, नायिकेला तर चहासुद्धा करता येत नाही, इथेही तसंच. मग जसं 'साथिया'मध्ये नायक-नायिकेत अहंकार आड येऊन दुरावा निर्माण होतो, तसा इथेही काही मिनिटांसाठी होतं. कहाणी अपेक्षित वळणांनी अपेक्षित शेवटापर्यंत जाते. ह्या सगळ्या प्रवासात छोटे-छोटे फिल्मी योगायोगही बरेच जुळून आलेले आहेत. पळून जाण्यासाठी किनाऱ्यावर एक unattended मोटारबोट तयारच असणं, (पहिल्या वेळेस) भरपूर चोप मिळालेला असतानाही कुठे जखमा नसणं, (दुसऱ्या वेळेस) गुरासारखा मार खाऊनही किरकोळ जखमांसह पळ काढू शकणं, ज्या रस्त्याने गाडी जाणार आहे, त्याच्या बाजूलाच पोरांना बदडणं की अगदी लगेच दिसून यावं, वगैरे.
'सैराट'च्या संगीताचीही एक हवा आहे. 'अजय-अतुल' ने धूम मचवली असली, तरी सगळ्याच गाण्यांवर त्यांच्याच कुठल्या न कुठल्या गाण्याची (नेहमीप्रमाणे) छाप दिसतेच. 'झिंगाट' गाण्यावर बेभान होऊन नाचणारं अख्खं सिनेमागृह मी पाहून आलो आहे. अनेक दिवसांनंतर अशी जादू कुणी केली आहे. ह्या 'X-factor' बद्दल तर वादच नाही. गाण्यांचं संयोजनही केवळ अफलातून झालं आहे. 'हॉलीवूड'मध्ये संगीत संयोजन केलं गेलेला हा पहिला भारतीय चित्रपट आहे. भरमसाट वाद्यांचा मेळ कसा असतो, हे समजून घेण्यासाठी भन्साळीने इकडे शिकवणी लावावी म्हणतो ! कुठेही कर्णकर्कश्य न होताही सांगीतिक भव्यता कशी असते, हे 'सैराट'ची गाणी दाखवतात. खास करून 'सैराट झालं' आणि 'याड लागलं' मधला वाद्यमेळ तर ऐकावाच.
'ऑनर किलिंग' ही उत्तर भारताच्या बऱ्याच भागांतली एक भीषण समस्या आहे. गुन्हेगारी जगतातल्या सत्यघटनांवर आधारित एका कार्यक्रमात अशीच एक कहाणी मागे पाहिली होती. 'सैराट'चं कथानक त्या सत्यघटनेवर बेतलेलं आहे. कहाणीतली सगळी वळणं आधीच कळून येतात. शेवटही माहितच असतो, पण अचूक नेम साधून शेवटाचा दगड थेट भिरकावण्याचं नागराज मंजुळेंचं कौशल्य व्यावसायिकतेचा कीडा चावल्यावरही अबाधित आहे. हा शेवट पायाखालची जमीन, डोक्यावरचं छप्पर, बुडाखालची खुर्ची सगळं बाजूला करतो. पोटातली आतडी पिळवटतो आणि डोक्यातला मेंदू बधीर करतो. डोळे थिजतात, हात-पाय गारठतात आणि ओठांना कंप सुटतो. केवळ ह्या शेवटासाठी दिग्दर्शक मंजुळे हवे होते, बाकीच्या पसाऱ्यासाठी कुणीही, अगदी कुणीही चाललं असतं.
समजा, हा चित्रपट 'फॅण्ड्री' वाल्याचा नसता, दुसऱ्या कुणाचा असता तर ?
तर हा एक महान चित्रपट असता. कितीही काहीही म्हणा, कुणी केलंय ह्यावर त्याचं मूल्यमापन ठरतंच ठरतं. जो मुलगा अभ्यासूच आहे, तो जर पहिल्या ऐवजी दुसऱ्या क्रमांकावर आला तर ते जास्त धक्कादायक असतं आणि काठावर पास होणारं एखादं दिवटं टपकलं, तरी विशेष काही घडलेलं नसतंच ! मंजुळेंचा दुसरा क्रमांक आला आहे, हे धक्कादायक आहे.
तीन तासांपैकी फक्त पाच मिनिटं मंजुळे दिसतात, एरव्ही दिसत नाहीत ही चित्रपटाची दुसरी शोकांतिका आहे. 'नागराज कमर्शियल मंजुळे' मला तरी पाहायचा नव्हता, इथून पुढेही पाहायचा नाहीय. त्यासाठी त्यांना किशोरवयीन प्रेम ह्या आजच्या मराठी चित्रपटाच्या जिव्हाळ्याच्या विषयापासून जरा वेगळं व्हावं लागेल. कारण आत्तापर्यंतच्या त्यांच्या दोन्ही चित्रपटांत हा समान धागा आहे.
नवीन चेहरे आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरू आश्वासक आहेत. नायिकेच्या भूमिकेसाठी एखादा चिकना चेहरा न निवडता रफ अॅण्ड टफ रिंकू निवडणं हा मास्टरस्ट्रोक होता. आकाश ठोसरसुद्धा एकदम मातीतला वाटतो. त्याच्या डोळ्यात एक प्रकारची निरागसता आहे. दोघेही फ्रेश असल्यामुळे कुठेही ते व्यक्तिरेखेच्या पुढ्यात येत नाहीत. नायकाच्या मित्रांच्या भूमिकेतल्या दोघांची नावं नीट कळू शकली नाहीत. (क्षमस्व) सुरेश विश्वकर्मा, सुरज पवार आणि तानाजी गालगुंडे ह्यांपैकी दोघे असावेत आणि उरलेला नायिकेचा भाऊ ! दोघा मित्रांची कामंही जबरदस्त झाली आहेत. खासकरून लंगड्या प्रदीपचं काम खूपच मस्त !
'सैराट' एकदा पाहण्यासारखा आहे. पण नागराज मंजुळेंचा चित्रपट म्हणून पाहिल्यास अपेक्षाभंग हमखास आहे. काही वेळेस संवेदनशील मनाला व्यावसायिकतेचीही एक दुसरी बाजू असते, हे एक नव्याने शिकता येऊ शकेल.
रेटिंग - * * १/२
- रणजित पराडकर
http://www.ranjeetparadkar.com/2016/04/movie-review-sairat.html
सकुरा यांची पोस्ट बदनामीकारक
सकुरा यांची पोस्ट बदनामीकारक असल्याने त्यांना संपादीत करण्याचे आवाहन केले होते. त्यांनी त्यास प्रतिसाद देऊन पोस्ट संपादीत केली आहे. पण काहींनी ते तसेच कॉपी पेस्ट केलेले असल्याने उद्देशच फसतोय.
हे सगळे मी शहरात राहतो, मी
हे सगळे मी शहरात राहतो, मी माझ्या जातीतल्या/समाजातल्या विरोधात गेलेल्या लोकांना फाट्यावर मारून जगू शकतो म्हणून बोलू शकतो पण मी जर एखाद्या गावातला छोटासा व्यावसायिक/नोकरदार असेन तर ??????
गावात/खेड्यात हे सगळं इतकं सहज आणि सोप्प नाही याचीही मला जाणीव आहे.
झंपी,अतरंगी, mi_anu >>
झंपी,अतरंगी, mi_anu >> +१००
माझा मुलगा/मुलगी पौगंडावस्थेत कोणत्याही धर्माच्या/ जातीच्या मुलामुलींच्या प्रेमात पडले तरी मी त्यांना फक्त इतकेच सांगेन कि बाळांनो शिक्षण घ्या, स्वतःच्या पायावर उभे रहा आणि मग निवांत तुम्हाला हवे तसे हवे तेव्हा लग्न करा.
हे इतके साधे सरळ आणि सोप्पे असायला हवे. >>+१००००००
आणि या आणि अशा चित्रपटांमुळे
आणि या आणि अशा चित्रपटांमुळे अगदी थोड्या प्रमाणात का होईना गावातही चित्र बदलू लागले आहे. वरती दिलेल्या दोन उदाहरणांवरून लक्षात येईल.
त्यामुळे जे लोक हा चित्रपट मुलांना बिघडवेल अशा बोंबा मारत फिरत होते त्यांना सांगावे वाटते की, मुले बिघडण्यापेक्षा पालक सुधारण्याची शक्यता जास्त वाटते आहे.
कदाचित कित्येक मुला-मुलींनाही प्रेमानंतरच्या प्रखर वास्तवाची जाणीव होईल. आर्चीमध्ये ती धमक होती, तिने निभावून नेले. पण सगळ्यांनाच ते शक्य होईल असे नाही.
आणि पोरांपेक्षा निदान पोरीतरी ज्याच्यासोबत पळून जायची स्वप्ने बघत आहोत तो या कसोटीला खरा उतरेल का नाही याचा किमान विचार करतील अशी आशा वाटते.
इथे आर्थिक क्षमता गौण आहे, पण निदान कसोटीच्या क्षणी आपला जोडीदार ठामपणे आपल्या सोबत उभा राहील, कच खाऊन पळून जाणार नाही, सोडून जाणार नाही किंवा आपले जगणे दुसह्य बनवणार नाही याची खातरजमा तरी करून घ्यायचा प्रयत्न करतील.
या चित्रपटाने इतके जरी साधले तरी ते रग्गड यश असेल असे मी म्हणेन.
आशुचॅम्प अरे किती वेळा +१
आशुचॅम्प अरे किती वेळा +१ लिहायचे?
बरोबर लिहितो आहेस. हि पण पोस्ट आवडली.
धन्यवाद ☺
धन्यवाद ☺
सिनेमाने, साहित्याने कुठलीही
सिनेमाने, साहित्याने कुठलीही क्रांती होत नसते. होणाऱ्या क्रांतीचे ते साक्षीदार होऊ शकतात. लोकांना सक्रीय करण्यासाठी नेतृत्व लागतं. काही तरी पाहून, वाचून होणारा बदल हा अल्पजीवी असतो.
^^^^ हे माझं मत आहे. कुणी ते स्वीकारावं अशी माझी अजिबात अपेक्षा नाही.
पण ह्या मतामुळेच माझं दुसरं मत असं आहे की कसलाही सामाजिक संदेश वगैरे देण्याचा आव कलाकृतीने आणू नये. तिने फक्त प्रतिनिधित्व करावं. गेलेल्या, आजच्या किंवा बदलत्या काळाचं. तिने फक्त स्वत:शी प्रामाणिक राहावं.
व्यावसायिक गणितंही अवश्य सोडवावीत. पण सामाजिक संदेश फिन्देश वाले मुखवटे धारण करुन हे सगळं करायची आवश्यकता नाही.
सैराट चित्रपट रोहित वेमुला
सैराट चित्रपट रोहित वेमुला प्रकरणावरून लोकांचे लक्ष उडवण्यासाठी काढण्यात आलेला आहे . हा झीवाल्यांचा त्यातला अंतःस्थ हेतु आहे.
अरे व्वा व्वा झी वाल्यांनी
अरे व्वा व्वा झी वाल्यांनी बक्कळ पैसा कमावला की अंतस्थ हेतु ठेऊन.
जिकडे तिकडे सैराट , सैराट.
जिकडे तिकडे सैराट , सैराट. रोहित वेमुलाची आठवण तरी कोणी काढतेय का? मी जरा काही तासांसाठी बाहेर जाऊन येतो तोपर्यन्त उत्तर देऊ शकणार नाही.
अरे तुम्हिच तर इथे काढली की
अरे तुम्हिच तर इथे काढली की आठवण बघा बर पुर्ण सैराट धाग्यावर कुठे आहे का रोहित.
हाच नाही तर दुसरे सैराट धागे पण बघा बाकीचे
तुम्हाला का एवढी आठवण येते आहे रोहित ची?
हे गृहस्थ सिरियसली बोलतायत का
हे गृहस्थ सिरियसली बोलतायत का बझिंगा
अभअ काय बकत आहेत त्यांनाच
अभअ काय बकत आहेत त्यांनाच माहित.
ಏಕಹೀ ಕಾನಾ ಮಾತ್ರಾ ನಸಣಾರೇ ನಾವ
ಏಕಹೀ ಕಾನಾ ಮಾತ್ರಾ ನಸಣಾರೇ ನಾವ ಹಾ ಕಾಹೀ ಲೋಕಾಂಚಾ ಆವಡತಾ ವಿನೋದೀ ಛಂದ ಆಹೇ. ಅಸೇ ನಾವ ಹುಡಕಣೇ ಹೇ ಕುಣಾಚೇ ಕಾಮ ಅಸಾವೇ ?
ಯಾತ ರೋಹೀತ ವೇಮುಲಾ ಪ್ರಕರಣಾಚಾ ತ್ರಾಸ ಝಾಲೇಲೇ ಕಾಹೀ ಲೋಕ ಆಹೇತ. ಮೋದೀಂಚೀ ಡಿಗ್ರೀ ಹಾ ನೊನ ಇಶ್ಯೂ ಆಹೇ, ಕಾರಭಾರಾವರೂನ ಲಕ್ಷ ವಳವಣ್ಯಾಚಾ ಹಾ ಡಾವ ಆಹೇ ಅಶೀ ಧಾರಣಾ ಅಸಲೇಲೇ ಕಾಹೀ ಜಣ ರೋಹೀತ ವೇಮುಲಾ ಪ್ರಕರಣಾವರೂನ ಲಕ್ಷ ವಳವಣ್ಯಾಸಾಠೀ ಕನ್ಹೈಯ್ಯಾ ಇಶ್ಯೂ ನಿರ್ಮಾಣ ಕೇಲಾ ಗೇಲಾ ಅಸಾವಾ ಯಾ ತರ್ಕಾಲಾ ನಾಕಾರತಾತ.
ಯಾತಲೇಹೀ ಕುಣೀ ಅಸತೀಲ.
ಭಕ್ತ ಅಸತೀಲ.
ಕುಣೀ ಗಝಲಗಾಯಕ ಅಸತೀಲ.
ಬರಾಚ ಕಾಳ ಸ್ವತ:ಚ್ಯಾ ನಾವೇ ನ ಲಿಹೀಣಾರೇ ಕುಣೀ ಅಸೂ ಶಕತೀಲ. ಸಾಪಡತೀಲಚ ಜಾತಾತ ಕುಠೇ ?
किती ते तर्क! मला माहित्येयत.
किती ते तर्क!

मला माहित्येयत. पण मी नै सांगणार.
kapoche +१
kapoche +१
सकुरातै पण कन्नड वाचायला
सकुरातै पण कन्नड वाचायला शिकल्या का? छान!
नाही मला नाही असे वाटत. उलट
नाही मला नाही असे वाटत. उलट योग्य जागी चित्रपट संपला आहे. त्या गुन्ह्याबद्दल समाज काय शिक्षा देतो यापेक्षा खडकावर जिद्दीने उगवलेले रोपटे, एक हसता-खेळता संसार केवळ अहंकाराच्या मस्तीपायी खुडून टाकला जातो, त्याची जी बोच आहे ती जास्त प्रभावी आहे. >>>>>> सुरेखच.
सैराटमधला एक आवडलेला सीन म्हणजे काखाली बसेलेले लोखंडेमास्तर जेव्हा परशाला विचारतात की,चुकी दोघांकडून आहे.त्या पोरीबरोबर------------की नाही? त्यावेळी परशा उद्गारतो"शी काय बोलता सर,मी तिच्यावर प्रेम करतोय"(वाक्य तंतोतंत नसेल्,पण असेच).मास्तरांची अवहेलनेमुळे,सवर्ण धनदांडग्याबरोबर आपण काही करू शकत नसल्याचे वैफल्यातून येणारी सूडबुद्धी त्यांच्या उद्गारातून दिसते.तर जातीपलीकडे पाहून केवळ प्रेमाची निर्मळ भावना,तिचा सन्मान परशाच्या वाक्यातून दिसला.
ತೇ ಗೃಹಸ್ಥ ನಿಕಾಳಜೇ ಆಹೇತ ಹೇ
ತೇ ಗೃಹಸ್ಥ ನಿಕಾಳಜೇ ಆಹೇತ ಹೇ ಲಿಹಾಯಚೇ ನಾಹೀಯೇ ಮಲಾ ತಿಥೇ. ಕುಠಲ್ಯಾಹೀ ಭಾಷೇತ.
मी आता सैराटचे कानडीतून
मी आता सैराटचे कानडीतून रसग्रहण लिहिणार आहे.

कृपया अजून एक धागा म्हणून इग्नोरू नये.
Ah, we've increased Cana kahi
Ah, we've increased Cana kahi lokanca nasanare vinodi avadata ekahi ahe chanda. Hey, we've assay hudakane asave kunace lust?
Kahi jhalele pair of balances in the world vemula prakaranaca yata aheta rohita. Known Issue modinci Ha degree ahe, ahe asi dava karabharavaruna lakh ha valavanyaca retention issue asalele kanhaiyya kahi valavanyasathi jana has produced rohita vemula kela prakaranavaruna asava-to-tarkala nakaratata gela.
Asatila yatalehi kuni.
Asatila cult.
Asatila gajhalagayaka kuni.
Baraca black himself, asu sakatila cya kuni lihinare of ourselves. Kuthe jatata sapadatilaca? Ekahi Cana Oh we've nasanare increased vinodi kahi avadata lokanca ahe chanda. Hey, we've assay hudakane asave kunace lust?
Kahi jhalele pair of balances in the world vemula prakaranaca yata aheta rohita. Known Issue modinci Ha degree ahe, ahe asi dava karabharavaruna lakh ha valavanyaca retention issue asalele kanhaiyya kahi valavanyasathi jana has produced rohita vemula kela prakaranavaruna asava-to-tarkala nakaratata gela.
Asatila yatalehi kuni.
Asatila cult.
Asatila gajhalagayaka kuni.
Baraca black himself, asu sakatila cya kuni lihinare of ourselves. Kuthe jatata sapadatilaca?
काही कळतय का ते बघा... हे म्हणजे एकदम बाहुबली मधल्या त्या रासवट राजाचे बोलणे वाटते आहे..
Ēkahī kānā mātrā nasaṇārē
Ēkahī kānā mātrā nasaṇārē nāva hā kāhī lōkān̄cā āvaḍatā vinōdī chanda āhē. Asē nāva huḍakaṇē hē kuṇācē kāma asāvē?
Yāta rōhīta vēmulā prakaraṇācā trāsa jhālēlē kāhī lōka āhēta. Mōdīn̄cī ḍigrī hā nona iśyū āhē, kārabhārāvarūna lakṣa vaḷavaṇyācā hā ḍāva āhē aśī dhāraṇā asalēlē kāhī jaṇa rōhīta vēmulā prakaraṇāvarūna lakṣa vaḷavaṇyāsāṭhī kanhaiyyā iśyū nirmāṇa kēlā gēlā asāvā yā tarkālā nākāratāta.
Yātalēhī kuṇī asatīla.
Bhakta asatīla.
Kuṇī gajhalagāyaka asatīla.
Barāca kāḷa svata:Cyā nāvē na lihīṇārē kuṇī asū śakatīla. Sāpaḍatīlaca jātāta kuṭhē?
साती उपहास सुद्धा रेखीव
साती
उपहास सुद्धा रेखीव पद्धतीने व्यक्त करता येतो हे दुसरे उदाहरण पाहीले, पहिले उदाहरण माझ्या घरात आहे.:फिदी: काश, मला पण देवाने अशी बुद्धी दिली असती.:अरेरे: ( मी हे वाक्य चांगल्या अर्थाने म्हणले आहे कारण बर्याच वेळा मी आपल्या लोकांकडुन दुखावले गेले तरी मला कधीच असे व्यक्त होता आले नाही, आणी त्याबद्दल मी देवावर नाराज आहे)
परवा एकदा काकांच्या घरी गेलो
परवा एकदा काकांच्या घरी गेलो होतो.....चुलत भाऊ सद्ध्या इयत्ता चौथी मध्ये आहे. घरात मोठया माणसांच्या गप्पा चालू होत्या म्हणून बाहेर डोकावलो तर चुलत भाऊ आणि त्याच्याच वयाचे तीन चार पोरं बाहेरच्या कट्ट्यावर बसले होते. त्यांच्या बोलण्याकडे लक्ष दिले...तर ते एकमेकांना चिडवत होते..की ही तुझी आर्ची ही माझी आर्ची...प्रत्येकजण स्वतः मध्ये आणि परश्या मध्ये कसे साम्य आहे सांगत होता. बाजूलाच एक सहावी ला असणारी मुलगी आहे तिला परश्या स्टाइल मध्ये पटवण्याचे प्लॅन चालू होते. हे सगळे ऐकून डोक्याला हात लावला. सैराट इफ्फेक्ट
होतं असं कधी कधी. बहुतेक ती
होतं असं कधी कधी. बहुतेक ती पोरं सैराट पेक्षा नोबिताच जास्त बघत असावीत.:इश्श:
लक्ष ठेवा हो मुलांकडे, सनीताई
लक्ष ठेवा हो मुलांकडे, सनीताई लहानेंचा "वन नाईट स्टँड" येतोय..
सनि लावणी
सनि लावणी
बहुतेक ती पोरं सैराट पेक्षा
बहुतेक ती पोरं सैराट पेक्षा नोबिताच जास्त बघत असावीत>>>>
:हहगलो::हहगलो::हहगलो:
सैराट पेक्षा नोबिताच जास्त
सैराट पेक्षा नोबिताच जास्त बघत असावीत.>>>>
आवरा रे.. हे बेश्ट होत.
पण इथल्या रिव्यू पेक्षाही
पण इथल्या रिव्यू पेक्षाही त्यांच अब्ज़र्वेशन कडक...प्रत्येक सीन आणि त्यातल्या चुका एका पेक्षा एक सांगत होते ते...शेवटला आर्ची आणि पर्श्याच्या बाळाचे पाय तया लंगडया सारखे कसे काय ? हे त्यांच वन ऑफ बेस्ट अब्ज़र्वेशन ..लोल
Pages